My eBooks











Mukund Bhalerao I am a Nationalist Democratic Citizen of India. I am socially concerned person. Author, Poet, Photographer, Thinker, Facilitator. Story Teller. Dreamer. A Poet.

  • || श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||
    by noreply@blogger.com (Mukundayan) on December 25, 2020 at 8:05 am

      || श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार || “नारायणं नमस्क्रुत्य नरं चैव नरोत्तमम् | देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत ||” (महाभारत आदिम श्लोक)          गिताजयंती म्हणजे ज्यादिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धात मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. ही घटना कुरुक्षेत्रावर घडली, जे आत्ताच्या  हरियाणामध्ये आहे.         “महाभारतात गीतेचा समावेश झाला तेव्हांइतकीच आजही ती नावीन्यपूर्ण व स्फूर्तिदायक प्रत्यक्ष अनुभवाने ठरते. गीतेच्या शिकवणीचा प्रभाव हा केवळ तात्विक किंवा विद्व्चर्चेचा विषय नसून, आचारविचारांच्या क्षेत्रात जिवंत आणि लगेच जाणवणारा आहे. एका राष्ट्राचें आणि संस्कृतीचें पुनरुज्जीवन गीतेची शिकवण प्रत्यक्ष घडवीत आहे. जगांतील श्रेष्ठ शास्त्रग्रंथात तिचा एकमताने समावेश झाला आहे.” योगी अरविन्द घोष           “माझ्या बालपणीच्या आयुष्यांत मोहाच्या आणि कसोटीच्या प्रसंगी अचूक मार्गदर्शन  करणाऱ्या शास्त्र-ग्रंथाची गरज मला भासली. मी कोठें तरी वाचलें होतें कीं, अवघ्या सातशें श्लोकांच्या मर्यादेत गीतेनें साऱ्या शास्त्रांचें व उपनिषदांचे सार ग्रथित केलें  आहे. माझ्या मनाचा निश्चय झाला. गीता वाचतां यावी म्हणून मी संस्कृत शिकलों. आज गीता माझें बायबल किंवा कुराण तर काय, परंतु त्यापेक्षांही अधिक, प्रत्यक्ष माताच झाली आहे. माझ्या लौकिक मातेस मी फार पूर्वीच अंतरलो; परंतु तेंव्हापासून या गीतामाऊलीने माझ्या जीवनांत तिची जागा पूर्णपणें भरून काढली. आपत्काली तिचाच मी आश्रय घेतों.” राष्ट्रपिता महात्मा गांधी (बनारस-कानपूरची भाषणें)                        आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांचे मौलिक योगदान आहे अशी हे दोन महान पुरुष. त्यांच्या ह्या विचारांकडे पाहिले किे, गीतेच्या महतत्त्तेचे दर्शन घडते आणि म्हणूनच गीताजयंतीच्या निमित्तानें श्रीमद्भगवद्गीतेबाबतच्या काही व महत्वपूर्ण गोष्टींचे पुनः एकदा एकदा स्मरण करणें हितावह ठरेल.           संत ज्ञानेश्वर माऊलीने अर्जुनाच्या असहाय्यतेचे, वैषम्यतेचे व नैराश्याचे खूपच प्रत्यवाही वर्णन सार्थ ज्ञानेश्वरीत विषादयोगात केले आहे, “येणें नावेंचि नेणों कायी| मज आपणपें सर्वथा नाहीं | मन बुद्धी ठायीं | स्थिर नोहे ||९५|| देखे देह कांपत | तोंड असे कोरडें होत | विकळता उपजत गात्रांसीही ||९६|| सर्वांगा कांटाला आला | अति संतापु उपनला | तेथ बेंबळ हातु गेला | गंडिवाचा ||९७|| तें न धरताचि निश्ट्लें | परि नेणेंचि हातोनि पडिलें | ऐसें हृदय असें व्यापिलें | मोहें येणें ||९८|| जे वज्रापासोनि कठीण | दुर्धर अतिदारूण | तयाहून असाधारण | हें स्नेह नवल ||९९||” (सार्थ ज्ञानेश्वरी: अध्याय:पहिला: अर्जुनविषादयोग) अशी गलीतगात्र अवस्था झाली अर्जुनाची आणि तो हताश होऊंन  रथात खाली बसला.           अवसान गळून पडलेल्या अर्जुनाच्या अंत:करणातील भाव त्याच्या व्याकुलतेची साक्ष देतात. “अवधारी मग तो अर्जुनु | देखोनि सकळ स्वजनु | विसरला अभिमानु | संग्रामींचा ||४|| कैसी नेणों सदयता | उपनली तेथें चित्ता | मग म्हणे कृष्णा आतां | नसिजे एथ ||५|| माझें अतिशय मन व्याकुळ  | होतसे वाचा बरळ || जे वधावे हे सकळ | येणें नांवे ||६||” (सार्थ ज्ञानेश्वरी: अध्याय पहिला: अर्जुनविषादयोग)                       अर्जुनाची अशी अवस्थाच झाली नसती तर भगवान् श्रीकृष्णाला श्रीमद्भगवद्गीता सांगण्याची गरजच पडली नसती, पण नियतीचे ठरलेल होते, जसे अहिल्येची मुक्ती श्रीरामाच्या पदस्पर्शाने झाली.           महाभारतात येकुण अठरा पर्वे असुन, त्यात २,२०,००० ओळी आहेत. महाभारतात सहावे ‘भीष्मपर्व’ आहे. त्यात एकूण ११७ अध्याय आहेत, भीष्मपर्वात,  श्रीमद्भगवद्गीता सांगितलेली आहे. [कंसात अध्यायाची नांवे व श्लोक संख्या नमूद केलेली आहे.]  आदिपर्व (अध्याय-२२५,श्लोक-७,१९७), सभापर्व (अध्याय-७२,श्लोक-२,३९०), वनपर्व (अध्याय-२९९,श्लोक-१०,३३८), विराटपर्व (अध्याय-६७,श्लोक-१,८२४), उद्योगपर्व (अध्याय-१९७,श्लोक-६,०६३), भीष्मपर्व (अध्याय-११७,श्लोक-५,४०६), द्रोणपर्व (अध्याय-१७३,श्लोक-८,१९२), कर्णपर्व (अध्याय-६९, श्लोक-३,८७१), शल्यपर्व (अध्याय-६४,श्लोक-३,३१५), सौप्तीकपर्व (अध्याय-१८,श्लोक-७७२), स्त्रीपर्व (अध्याय-२७,श्लोक-७३०), शांतिपर्व (अध्याय-३५३, श्लोक-१२,९०२), अनुशासनपर्व (अध्याय-१५४,श्लोक-६,४३९), अशवमेधिकापर्व (अध्याय-९६,श्लोक-२,७४३), आश्रमवासिकापर्व (अध्याय-४७,श्लोक-,१०६२), मौसलापर्व (अध्याय-९,श्लोक-२७३), महाप्रस्थानिकापर्व (अध्याय-३,श्लोक-१०६), स्वर्गावरोहणपर्व (अध्याय-५,श्लोक-१९४).           शास्त्रज्ञानी नुकत्याच केलेल्या कार्बन डेटिंगच्या तंत्रज्ञानानुसार केलेल्या संशोधनानुसार, द्वारका साधारणत: ३२,००० वर्षापूर्वी अस्तित्वात होती.   [https://pparihar.com/2014/01/21/32000-year-old-lost-city-of-dwarika-krishna-indian-hinduism-is-not-mythology/] महाभारत त्याच्या किमान काही वर्षें आधी झाले असावे. अर्थातच, महाभारताचा काळही तितकाच जुना आहे. महाभारत हे जगातील दुसरे सर्वात मोठे महकाव्य आहे. वेद हे ‘श्रुती’ असून, महाभारत हे ‘स्मृति’ ग्रंथात मोडते. श्री. जेम्स एल फिजराल्ड, संस्कृत प्राध्यापक, ब्राऊन विश्वविद्यालय, प्रॉव्हिडेन्स, ह्रोड आयलंड, अमेरिका, असे म्हणतात, “Simply The Mahabharat is a powerful and amazing text that inspires awe and wonder. It presents sweeping visions of the cosmos and humanity and intriguing and frightening glimpses of divinity in an ancient narrative that is accessible, interesting and compelling for anyone willing to learn the basic themes of India’s culture. The Mahabharat definitely is one of those creations of human language and spirit that has travelled far beyond the place of its original creation and will eventually take its rightful place on the highest shelf or world literature besides Homer’s epics, the Greek tragedies, the Bible, Shakespeare and similarly transcendent works.”   [www.factsanddetails.com/world/cat55/sub354/entry-5627.html]           भारतीय संस्कृतीचा भगवद्गीता हा एक महान ग्रंथ आहे, ज्यात युद्ध व शांतता, मान व अपमान, प्रामाणिकपणा व द्रोह अशा विविध गोष्टींचे दर्शन घडते. इसवीसनाच्या ९व्या शतकापासून भगवदगीतेवर, शंकराचार्य, रामानुज, माधवाचाऱ्य, निंबार्क आणि अभिनवगुप्त यांनी वेगवेगळे टिकात्मक ग्रंथ लिहिलेत. १३ व्या शतकात मराठीमध्ये संत ज्ञानेश्वरानी सार्थ ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली आहे. इंडोनेशियामध्ये जुन्या जावा भाषेत भगवदगीतेचा अनुवाद झालेला आहे. राजाराम मोहनरॉय यांनी गीतेबाबत असे म्हटले आहे की, “गीता सर्व शास्त्राचे सार आहे.”           श्रीमदभगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर सर्वप्रथम १७८५ मध्ये चार्ल्स विलकिन यांनी केले. [https://en.wikipedia.org/wiki/Charles_Wilkins] या भाषांतरचा परिणाम राल्फ वालडो इमर्सन यांच्यावर झाला व तो त्यांच्या ‘ब्रम्हा’ या कवितेत दिसुन येतो. [https://www.poetryfoundation.org/poems/45868/brahma-56d225936127b] अलीकडच्या काळात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे यांनी, १९१९ मध्ये महाभारताच्या संशोधित प्रतीवर काम करण्यास सुरुवात करून ते काम १९६६ मध्ये पूर्ण केले. त्यात श्री. व्हि एस सुखटणकर यांच्या शिवाय, इतर १० संस्कृत पंडितानी काम केले होते. ती प्रत आजही तेथे उपलब्ध असून त्यात एकूण १९ खंड व एकूण १३,००० पृष्ठे आहेत.          भगवद्गीता आता पर्यन्त, चायनीज, स्पॅनिश, रशियन, अरेबिक, पोर्तुगीज, बंगाली, हिन्दी, मराठी, फ्रेंच, मलाय, जर्मन, स्वाहिली, जपनीज, फारसी, विएतनामीज, इंडोनेशियन, जावाणीज, तमिळ, कोरियन, टर्किश, तेलगू, इटालियन, थाई, कयानटोणीज, कन्नड, गुजराथी, पॉलिश, बरमिज, मोलडोवन, युक्रेनियन, उरिया, डच, तागलोग, योरुबा, आफ्रिकन, नेपाळी, सिंहली, हंगेरीयन, ग्रीक, अजरेबेजाणी, आकान, झेक, बुलगेरीयन, स्विडीश, श्लोवाक, लिथुयानियन, मकडोणीयन, श्लो वेणीयण, लॅटीवहीयन, सऱ्बो क्रोशीयन, आमहरीक, पापीआमेनटू, काटलान, फान्ति, बोसणीयन, एसपरनेतो, तुरकमेणियन, नेवारी, जॉर्जियन, कझाक, भोजपुरी इतक्या भाषेत, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉनशसनेस यांनी त्यांच्या “गीता जशी आहे तशी” या पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध केलेली आहे, व जवळपास अजून किमान ५० भाषामध्ये काम चालू आहे.   [https://vanimedia.org/wiki/Introduction_to_Bhagvad-gita_in_108+_Languages]          संजयाने ती जशी आणि जेव्हा प्रत्यक्षात घडत होती, त्याच वेळेस धृतराष्ट्राला सांगितली. संजय हा अंध धृतराष्ट्राचा सचिव होता. संजयाला त्याचे गुरु महर्षि व्यासानी असा आशिर्वाद दिला होता की, त्याला दुरून रणांगणावर सुरू असलेल्या घटना पाहता येतील.          अनेक प्रयत्न व भगवान् श्रीकृष्णाची शिष्टाई निष्फल ठरल्यानंतर शेवटी महाभारताचे युद्ध अटळ झाले. अर्जुनाबद्दल सहानुभूति व मित्रप्रेम यामुळे भगवान् श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करण्याचे मान्य केले. युद्धाच्या ठरलेल्या दिवशी कौरव व पांडवाच्या सेना एकमेकसमोर येऊन उभ्या ठाकल्या. “सेनयोरूभयोर्म्ध्ये रथं स्थापय मेsच्युत ||१.२१||” युद्ध सुरू होण्याच्या आधी, अर्जुनाने श्रीकृष्णाला त्याचा रथ युद्ध भूमीच्या एकदम मध्यभागी नेण्यास सांगितले व त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ मध्यभागी नेऊन उभा केला. त्याठिकाणी, अर्जुनाने, पितामह भीष्म व ज्यांनी त्याला धनुर्विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविले ते गुरु द्रोणाचार्य, यांना समोर कौरवाच्या सेनेमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या हृदयाची धडधड वाढली, ती भीतीमुळे नाहीतर महान पितृतुल्य महर्षिना युद्धात सामोरे जाण्यामुळे.          “दृष्टेमं स्वजनं कृष्ण यूयुत्सुं समुपस्थितम् ||१.२८|| सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति | वेपथुशचय शरीरे मे रोमहर्षशच्य जायते ||१.२९|| गांडीवं स्त्रंसते हस्तात्वकैव परिदह्यते| न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: || १.३० ||” [अध्याय १ ला] त्याच्या शरीराला कंप सुटला. त्याच्या अंत:कर्णाला अनेक शंकानी ग्रासून टाकले व अर्जुन त्याचे क्षत्रिय कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ झाला. अत्यंत निराश व हताश झालेले अर्जुनाने आपला प्रिय व विश्वासू मित्र श्रीकृष्णास आपली व्यथा सांगितली व मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यावेळी भवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केले मार्गदर्शन व बोध म्हणजेच अतिशय पवित्र भगवदगीता. भगवंताने सर्वात शेवटी भगवद्गीतेतील ज्ञान कुणास सांगावे याच्याकरिता एक अट सांगितलेली आहे.           “इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन | न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योsभ्यसूयति ||१८.६७||” श्रीमद्भगवद्गीता अगाध व असिम आहे. भगवद्गीता प्रस्थानत्रयी पैकी एक आहे. मानवाच्या कल्याणाचे तिन मार्ग आहेत, “भगवद्गीता”,  “उपनिषद”, व “ब्रम्हसूत्र”. उपनिषदामध्ये “मंत्र” आहेत. ब्रम्हसुत्रामध्ये “सूत्रे” आहेत आणि भगवदगीतेमध्ये “श्लोक” आहेत. कोणत्याही देशाचा, समुदायाचा, सांप्रदायाचा, वर्णाचा असला तरीही सर्वांच्या उपयोगाचा असा हा ग्रंथ आहे. भगवदगीतेमध्ये एकूण अठरा अध्याय असून ७१३ श्लोक आहेत. अध्याय, त्याचे नाव  व  त्यातील श्लोकांची संख्या खालील प्रमाणे आहे.   पहिला अध्याय:अर्जुन विषाद योग (४७), दुसरा अध्याय:सांख्ययोग (७२), तीसरा अध्याय:कर्मयोग (४३), चौथा अध्याय:ज्ञानकर्मसन्यासयोग (४२), पाचवा अध्याय:कर्मसन्यासयोग (२९), सहावा अध्याय:आत्मसंयमयोग (४७), सातवा अध्याय:ज्ञानविज्ञानयोग (३०), आठवा अध्याय:अक्षरब्रम्हयोग (२८), नऊवा अध्याय:राजविद्याराजगुहययोग(३४),दहावा अध्याय:विभूतियोग (४२), अकरावा अध्याय:विश्वरूपदर्शनयोग (५५),बारावा अध्याय:भक्तियोग (२०), तेरावा अध्याय:क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग (३४), चौदावा अध्याय:गुणत्रयविभागयोग(२७), पंधरावा अध्याय:पुरुषोत्तमयोग (२०), सोळावा अध्याय:दैवासुरसंपद्विभागयोग (२४), सतरावा अध्याय:श्रद्धात्रयविभागयोग (२८),अठरावा अध्याय: मोक्षसंन्यासयोग (७८).       जगात आज होत असलेली मूल्यांची घसरण ही होणारच होती व आहे, आणि ती तशी भारतात देखिल होणार आहे. तशा प्रकारची भविष्यवाणी फार पूर्वी श्रीमद्भागवतात (१२.२.१) केलेली आहे.           “ततश्चनुदिनं धर्म: सत्यं शौचं क्षमा द्या | कालेन बलिना राजन् नङ्गक्षत्यायुरबलं स्मृति: || याचा अर्थ कलियुगात धर्म, सत्य, स्वच्छता, दया, आयुष्यमान, शारीरिक क्षमता, ताकद व स्मृति यांचा ऱ्हास होईल. खरे तर याच गोष्टीमुळे मनुष्य हा प्राण्यांपासून वेगळा आहे आणि ह्या शक्ति मानवाच्या कमी झाल्या तर मग मानवात व प्राण्यांत काय फरक राहिला, परंतु घाबरण्याचे काहीच कारण नाही; कारण भगवान् श्रीकृष्णांनी गीतेच्या ९ व्या अध्यायात सोपा उपाय सांगितलेला आहे.           “अनन्याश्चिंतयंतोमां ये जना: पर्युपासते | तेशामंनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् || (अध्याय-९, श्लोक-२२). जे अनन्यनिष्ट लोक माझें चिंतन करून मला भजतात, त्या नित्य योगयुक्त पुरुषांचा योगक्षेम मी चालवित असतो. न मिळालेली वस्तु मिळणे याचेंच नांव योग व  मिळविलेल्या वस्तूचें संरक्षण करणें म्हणजे क्षेम, अशी योगक्षेम याची व्याख्या शाश्वतकोशातही (१०० व २९२ श्लोक) (गीतारहस्य: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक: पृष्ठ ३८३, आवृत्ती-पंधरावी-१९९०) केलेली असून, त्याचा एकंदर अर्थ ‘संसारातील नित्य निर्वाह’ असा आहे, आणि परमेश्वराची बहूत्वाने जें सेवा करितात त्यांचे पुढे काय होते. “येsप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:| तेsपि मामेव कौंतेय यजन्त्यविधिपूर्वकम् ||२३||” श्रद्धेनें युक्त होत्साते दुसऱ्या देवताचे भक्त बनून जे यजन करितात हे कौंतेया ! तेहि विधिपूर्वक नसलें तरी (पर्यायाने) माझेंच यजन करितात कारण, “अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च| न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्चवन्ति ते ||२४||” सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी मीच आहे, पण त्यांना माझें तत्वत: ज्ञान नाहीं म्हणून ते घसरत असतात. वास्तविकपणे, “एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यंग्निं यमं मातरिश्वावानमाहू:|” (ऋग्वेद-१६४.४६) परमेश्वर एक असून त्याला पंडित लोक अग्नि, यम, मातरिश्वा (वायु) अशी अनेक प्रकारची नांवे देत असतात असे म्हटले आहे आणि म्हणूनच “आकाशात पतितं तोयम यथा गच्छ्ती सागरमं | सर्व देव नमस्कार:, केशवमं प्रतिगच्छ्ती|” (विष्णुसहस्त्रनाम)             सारांशरूपाने असे म्हणता येईल कि, दोन श्लोक जर दररोज वाचले तर एक वर्षात संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता वाचून होऊ शकते, जे उपनिषद सार आहे. या पवित्र दिवशी सर्वाना गिताजयंतीच्या अनेक शुभेच्छा! सर्व वाचकांना  

  • by noreply@blogger.com (Mukundayan) on August 6, 2020 at 6:35 pm

    || सामवेद आणि संगीत || वेदनाम सामवेदोस्मि देवानामस्मि वासव: | इंद्रियणाम मनष्चस्मि भूतानामस्मि चेतना ||२२||  भगवतगीता: अध्याय १० भगवतगीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विभूति योगात स्पष्टपणे संगितले आहे की, वेदांमध्ये मी सामवेदात आहे. यावरून हे लक्षात येते की सर्व वेदांमध्ये सामवेद किती महत्वाचा आहे. या लेखात पुढे जाण्यापूर्वी आपण प्रथम सामवेदाविषयी काही महत्वाच्या ठळक गोष्टी पाहू. ०१] सामवेद हा भारत-यूरोपामधील सर्वात जुना ग्रंथ असून, तो जवळपास इसवीसना पूर्वी १७०० वर्षे लिहिला आहे. ०२] सामवेद हा सर्व वेदांमध्ये सर्वात लहान वेद आहे. त्यात एकूण १८७५ सूत्रे आहेत; ज्या पैकी १७७१ सूत्रे ऋग्वेदातून घेतली आहेत व फक्त ९९ सूत्रे ही मूळ सामवेदातील आहेत. ०३] सामवेद ही जगातील सर्वात जुनी सांगितीक रचना आहे. तसेच मानवी साहित्यातील संगीताविषयी सर्वात जुने साहित्य म्हणता येईल. त्यामध्ये, मंत्र, छंद, भाषशास्त्र असे विविध प्रकार आहेत. सामवेदाची रचना खास करून यज्ञ प्रसंगाच्या वेळी व विशेष प्रसंगाच्या वेळी गाण्याकरिता केलेली आहे.   ०४] सामवेद संहितेने बरेचशे श्लोक ऋग्वेद संहितेतून घेतले आहेत, खास करून ऋग्वेदाच्या आठव्या व नवव्या मंडलातून. ०५] अतिप्राचीन काळातील साहित्यातून सुव्यवस्थित संगीतशास्त्र हे सामवेदाच्या शक्तिशाली प्रेरणास्त्रोतातून झालेले आहे. सामवेदाचा अर्थ पाहू या आधी. समान म्हणजे गाणे व वेद म्हणजे ज्ञान. सुश्राव्य रचना व मंत्र म्हणजे सामवेद. सामवेदाची रचना ही जवळपास अथर्ववेद व यजुर्वेदांच्या बरोबरच झालेली आहे. सामवेदामध्ये छान्दोग्य उपनिषद आणि केन उपनिषद समाविष्ट आहेत ज्याचा अभ्यास खूप लोक करतात. ही दोन उपनिषदे ही प्राथमिक व मूलगामी अशी उपनिषदे आहेत. यांचा प्रभाव तत्वज्ञान व वेदान्त ह्यावर जास्त  झालेला आढळून येतो.  सामवेद हा संगीता प्रमाणेच नृत्य कलेचाही प्रवर्तक आहे. सामवेद गाण्याचे जवळपास १०-१२ प्रकार आहेत. जैमिनिया ही जिवंत असणारी सर्वात जुनी सामवेद गायन पद्धती आहे. हे मंत्रांचे भांडार आहे. याला गाण्याचा ऋग्वेद असेही म्हणता येईल. सामवेदाची लिखाणपद्धती वेगळी आहे. त्यात अक्षरांच्या वर किंवा मध्ये, अक्षरात किंवा आकड्यात लिहिण्याची पद्धत आहे.  सामवेदाचे दोन मुख्य भाग आहेत. पहील्या भागात चार प्रकारच्या संगीत रचना आहेत, तर दुसर्‍या भागात तीन रचना आहेत. गानसंग्रहात दोन भाग आहेत, ग्रामगेय व अरण्यगेय; तर अर्चिकेत पूर्वाचिका व उत्तरारचिका असे दोन भाग आहेत. पूर्वाचिकेत एकूण ५८५ एका कडव्याचे गद्य लिखाण आहेत आणि ते दैवता प्रमाणे रचलेले आहेत. उत्तरारचिकेत ते कर्मविधी प्रमाणे आहेत. ग्रामगेय काव्यरचना ह्या गावातील लोकांना गाण्याकरिता आहेत, तर अरण्यगेयातील रचना ह्या साधूसंत, योगी व सन्यासी यांना अरण्यात गाण्याकरिता आहे. ऋग्वेदाप्रमाणेच, सामवेदाची सुरुवातदेखिल अग्नि आणि इंद्र यांच्याविषयीच्या मंत्रानीच होते; परंतु त्यात अस्पष्ट तत्वज्ञान व तार्किक संकल्पनाकडे उतरत्या क्रमाणे वळते. सामवेद हा बाकीच्या वेदांसारख वाचण्याकरता नाही, तर गाण्याकरिता व ऐकण्याकरीता आहे. तो श्रवणीय आहे कारण तो त्याकरिताच रचलेला आहे. संगीत, ध्वनि व गहन अर्थ यांचा सुंदर संगम म्हणजे सामवेद. ऋग्वेदातील सूत्रे गेय बनवून गाण्याकरिता व ऐकण्याकरिता रचलेली आहेत. उदा. “अग्न आ याहि वीतये (Agna a yahi vitye) rugved 6.16.10 Samveda transformation (Jaiminiya manuscript) “O gna I / a ya hi va / ta ya I ta ya I /” It means “O Agni come to the feast.” “हे अग्निदेवा, आपण या सभारंभाकरिता यावे असे मी आपणास आवाहन करतो.” छंदोग्य उपनिषद हे सामवेदाचाच भाग असून त्याचा अभ्यास तत्व्ज्ञानाचा अभ्यास करण्या करिता जास्त केल्या जातो. साक्षात वेदमूर्ति आदिशंकराच्यार्यानी छंदोग्य उपनिषदाचा उल्लेख वेदान्तसूत्र भाषयात एकूण 810 वेळा केलेला आहे. छानदोग्य उपनिषद हे सामवेदातील तत्वज्ञानाविषयी आहे. भारतीय नृत्य व अभिजात संगीत यांचे मूळ सामवेदाच्या गेयता व सांगितीक स्वरुपात आहे. सामवेदामध्ये मंत्र व गाण्याशिवाय, संगीत वाद्द्यांचा उल्लेखही आहे. सामवेदातच “गांधर्ववेद” समाविष्ट केलेला आहे. सामवेदातील मंत्रांची रचना व स्वरूप यांच्याच प्रेरणेतून भारतीय अभिजात संगीत व प्रदर्शनीय कला याचे मूळ असल्याचे अनेक संगीतकारांचे मत आहे. सामवेदाचा जन्म हा यज्ञकर्म करण्याच्या वेळी म्हणावयाच्या गतीबद्ध व् सूमधूर मंत्र उच्चारण्याकरिता झालेला आहे. यज्ञामध्ये देवांची प्रार्थना करून त्यांना आवाहन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. तसेच यज्ञामध्ये हवीय अर्पण करताना मंत्र म्हणण्यासाठी एक लयबद्ध व सुश्राव्य रचना हाही सामवेदाचा उद्देश होता व आहे. जसा एक श्लोक आपण ऐकलेला आहे, “ब्रम्हार्पणमं ब्रम्हहवीर, ब्रम्हाग्नो ब्रम्हणाहुतमं | ब्रम्हैव्तेन गंतव्यमं, ब्रम्हकर्म समाधीना: ||” त्याकाळी यज्ञाच्या वेळी जे ऋषि मंत्र म्हणत असत, त्यांनी त्यांच्या सोयीसाठी, ऋग्वेदातील निवडक मंत्र, जे की गाण्याकरिता सुयोग्य होते त्याचे संकलन केले. अशा संकलित केलेल्या गेयमंत्राच्या संग्रहास पुढे जाऊन सामवेद संहिता असे नाव पडले असावे. सामवेदातील बहुतेक मंत्र हे गायत्री छंदामधील आहेत. “एसा उ समा | वग वई समईयसा सा कामास सेती तत समाह समत्वाम | यद व एवा समाह प्लुसिना समो मसाकेना समो | नगेना समा इभिस त्रिभीर लोकइथ समो | नेना सर्वेना तस्म्द वी समा | असणूते समानह सईयूयाम सलोकतामं | या एवाम येतत साम वेद |” बृहदारण्य उपनिषदात (१-३-२२). सामवेद खरोखरच ऋग्वेदातील निवडक मंत्रांचे सुश्राव्य स्वरुपात गायन करण्याची आखीव व रेखीव महान केलाकृती आहे. ऋग्वेदातील मंत्राना गेय स्वरूप देण्याकरिता त्या मुळ मंत्राना थोडेसे बदलले, लांबविले, त्यातील काही उच्चार बदलले, आवाजातील चढउतार तयार केले. गाताना शब्दांना तरंगण्यासारखा आभास निर्माण केला. स्वरांचा प्रक्षेप केला किंवा त्यात काही अर्थहीन स्वर उपयोगात आणले, जसे की, “स्तोभ” (आनंदातून निर्माण निघणारा आवाज), जसा की, होई, होय, होवा, हाई, हाऊ, ओइई, आई, हा, हो, ऊहा, तायो वगैरे. सामवेदात गाण्याकरिता प्रत्येक मंत्रचा उच्चार हा लांबवलेला (Elongated) आढळतो. सामवेदातील मंत्र म्हणणार्‍या ऋषिना ऊदगत्रुस (उदगीता म्हणजे गाणे म्हणणे मोठयाने). छान्दोग्य उपनिषदात(१.३.६), या सूत्रात, उदगीता या शब्दाचा संधीविग्रह, ऊद म्हणजे श्वास (प्राण) खूप उंच आवाजात घेणे, गी म्हणजे (वाक) आणि थ म्हणजे ज्यात हे सर्व स्थित आहे. त्याकाळात जे ऋषि यज्ञ करताना मंत्र म्हणत असत, त्यांना “उद्ग्थृस”  असे म्हणत. या शब्दाचे मूळ उदगीता म्हणजे मोठ्या आवाजात गाणे म्हणणे असा आहे.   “अथ खलू उदगितक्ष्ररनाय उपासिता उद-गी-था इति | प्राणा इव्होत | प्रनेणा हय उत्तीसस्थिती | वगगिह | वाको हा गिरा इति अकक्षते | अन्ंनाम थाम | अन्ने हिदम सर्वाम स्थितम |” च्छांदोग्य उपनिषद (१.३.६)   “सा” म्हणजे ऋग्वेद मंत्र व “म” म्हणजे वेगवेगळ्या रचना असे म्हटले आहे. सामवेद संहितेची रचना ही उद्गाथृस यांच्या’ सोईकरिता झाली होती. अशा उद्गातृसच्या समूहात तीन ऋषि असत. त्यांना प्रस्थोथृ, उदग्थृ व प्रथिहरथा असे म्हणत. हा सामगान करणार समूह सामगान पाच पातळ्यामध्ये करीत असत. प्रस्थाव: मंत्राच्या सुरुवातीचा भाग प्रसथोथृ गात असत आणि ते खोल आवाजातील “हुंकार” करून गात असत. उदगीता: ह्या चरणात, उद्गाथृ ऋग्वेदातील मंत्र पठण करीत असत व ते त्यांच्या गायनाची सुरुवात “ओम” ह्याचा विस्तारपूर्वक ध्वनि वापरुन करत असत. प्रतीहारा: श्लोकांचा मध्य भाग हा मोठ्या आवाजात प्रथिहार्था करीत. ह्याचा उद्देश ज्या देवतेची आराधना करावयाची आहे त्याना प्रसन्न वाटावे असा होता. उपद्रव: मुख्य ऊदगरथृ पुन्हा गान करायचे. निधान: श्लोकाचा अंतिम भाग वरील सर्व, एकत्र मिळून करीत असत व त्याची सुरुवात विस्तारलेल्या (Elongated) “ओssssssssssssम” ने करावयाची असते. वरील पद्धतीने मंत्राचा तीन वेळा उच्चार करण्याला “स्तोम” असे म्हणतात. काही ठिकाणी याचा उल्लेख पाच वेळा मंत्रोच्चार करावा असाही आहे, तर काही ठिकाणी सात वेळा व त्यास भक्ति म्हटल्याचे उल्लेख आढळतात.   उच्चारण्याचे शास्त्र: तैतरिय उपनिशदामध्ये, ध्वनिशास्त्र व मंत्रोचार याचा उपयोग कसा करावयाचा याविषयी विस्तृत विवेचन केलेले आहे. त्यात उच्चार करण्याचे सहा महत्वाचे पैलू विशद केलेले आहेत; ज्यात, वर्ण (Syllable), स्वर (Accent), मात्रा (Duration), बलम (Stress) आणि सम (Even Tone) या विषयी लिहिलेले आहे. यातील पहीले चार शुद्ध उच्चार करण्याविषयी आहेत तर, शेवटचे दोन संपूर्ण वाक्य किंवा पूर्ण स्तोत्र म्हणण्याविषयी आहे. “ओम सिक्षाम व्याख्यास्यामह | वर्णह स्वरराह | मात्रा बलम | समा संतानह | इतयुक्ताह शिक्षाध्यायह ||” तैतरिय उपनिषद. (१.२) वर्ण म्हणजे प्रत्येक स्वतंत्र शब्दाचा (ज्यात स्वर व व्यंजने आहेत) शुद्ध उच्चार. स्वर म्हणजे शब्दाचा उच्चार कसा (उद्द्त, अनुद्द्त किंवा, स्वरीत) करावयाचा. मात्रा म्हणजे एक शब्द उच्चार करण्याकरिता किती वेळ घ्यावयाचा. चार प्रकार आहेत त्याचे. हर्स्व, एकदम छोटा कालावधी छोट्या शब्दांकरिता; दिर्घ, म्हणजे लाम्ब कालावधी लांब व्यंजना करिता, प्लुटम, ज्याचा कालावधी अधिक मोठा आहे; आणि चौथा, व्यंजनाकरिता अर्धी मात्रा ज्या बरोबर एकही स्वर नाही. समस्वरा: सुरूवातीला, सामगानाकरिता फक्त तीन मधुरालाप, उद्द्त, अनुद्द्त आणि स्वरीत. त्यावेळी मंत्र म्हणणार्याना साथसंगत करण्याकरिता फक्त तीनतारी वाद्य (विणेसारखे) होते. ती सामगाणातील गाणी बहुधा, ग ग रे रे सा सा असे असावेत. तशा प्रकारची गायनसुक्ते गाण्याकरिता सुयोग्य असावेत. त्या तीन मधुरालापतील फरक हा की, ते तालव्य, उचईच्य किंवा निचईच्या यावरून करतात. सामगानातील अक्षरे लिहिण्याच्या पद्धतीमध्ये उद्द्त लिहिण्याकरिता अक्षरावर १, अनुद्त्त करिता अक्षरावर २ व स्वरीत करिता अक्षरावर ३ लिहितात. उदा: २  ३    १   २    ३१२   ३  २  ३१    २ अग्न    आ  याहि  वीतये ग्रुनाणो हव्य दातये Udatt:  (1) आ, त, व्य, Svarita: (2) अ, या, ये, नो, दा Anudatta: (3) ग्न, वी, णा, ह Prachaya: हि, ग्रु, त, ये नारदीय शिक्षेमध्ये समास्वरातील मधुरालाप वेणुमध्ये म, ग, रे, सा, ध, नी आणि प असे आहेत. समस्वर वेणुस्वर १ प्रथमा मध्यमा म २ द्वितीया गंधर्वा ग ३ तृतीया ऋषभ रे ४ चतुर्थ षड्ज सा ५ पंचम निषाद नि ६ शष्ठ धैवत ध ७ सप्तम पंचम प नारदीय शिक्षेमध्ये (१.५.३; १.५.४) प्रत्येक स्वर हे विविध पक्षांनी किंवा प्राण्यांनी काढलेल्या आवाजावरून ठरविले आहे प्रतिपादित केले आहे; जसे, बैलावरून ऋषभ, क्रौंच पक्ष्याच्या आवाजावरून मध्यम, हत्तीच्या चित्कारावरून निषाद, कोकिळेच्या सुमधुर आवाजवरुन पंचम अशा प्रकारे ठरले आहेत. सामगानातील नाव चिन्ह सामवेदस्वर पक्षी / प्राणी / ध्वनि मध्यमा    म स्वरिता सारस गांधर्व ग उद्त्त बकरी ऋषभ रे अनुद्त्त बैल षड्ज सा स्वरित मोर निषाद नि ऊदत्त हत्ती धैवत ध अनुद्त्त घोडा पंचम प स्वरीत कोकीळ   त्या काळात ध्वनिग्राहक (Microphone) व ध्वनिवर्धक (Loudspeaker) नसल्यामुळे, सामगान हे मोकळ्या, उघड्या, मोठ्या, प्रशस्त जागेत, परंतु वर प्रागभार (Canopy) असलेल्या ठिकाणी गात; जेणेकरून सर्वांना स्पष्टपणे ऐकू येईल व त्या परिस्थिथितीत जर गाण्यामध्ये “म ग रे सा ध” हे सुर असतील तर फक्त येखाद्या छोट्या खोलीत ते ऐकू येईल; परंतु जर स्वर “सा नि ध प ग” असे तारसप्तकापासून सुरू होत असतील तर सर्वांना सहजपणे ऐकू येईल. ह्या दृष्टीकोणातून “सा नि ध प ग” हे स्वर, “म ग रे सा ध” यापेक्षा जास्ती सुयोग्य आहेत. सामवेदाला पंचम वेद असेही म्हणतात. “वीणावादनत्तवजानह श्रुतिजातीविसरदाह | तालज्ञानस कप्रयसेना मोक्षमार्गम नियच्छती ||” (याज्ञवल्क्यस्मृतिसी- ३.११५ ) मनाला व अंत:करणाला अतिशय आनंदीत करणार्‍या सर्व कलांमध्ये सर्वोर्कृष्ट संगीतच असे आहे, ज्यामध्ये भावनांच्या सर्व छटा प्रसृत करण्याची क्षमता आहे. या कलेचा यथायोग्य अभ्यास केला तर त्यातून मुक्तता व मोक्ष प्राप्ती होऊ शकते. काव्यवाचन व नृत्य हे काव्यगायना बरोबर केले तर ते मंत्रोचाराईतकेच श्रेष्ठ आहे. पाठयम नाट्यम तथा गेयम सित्रावा आदित्रमेवा का | वेदा मंत्रार्थ वाकनेही सामाम हयतद भविष्यती || २६ || देवाचे देव इंद्र यांच्याकडून मी असे ऐकले आणि हो भगवान शंकराकडूनही ऐकले की संगीत गेय किंवा वाद्यावर वाजविलेले, हे अतिशय खूप शुद्ध व अतिश्रेष्ठ आहे, विशिष्ट काळी पवित्र नदीत स्नान किंवा एखादा मंत्र हजार वेळा म्हटल्यापेक्षाही जास्ती मौल्यवान आहे. हितावह आहे. “श्रूतम मया देवदेवात तत्तावताह शंकेराधितम | स्नान जप्य सहा श्रेभ्या पवित्रम गिता वादीतम || २७ || ज्या ज्या ठिकाणी शुभ गाण्याचे मंगल ध्वनि आणि नृत्याचे संगीत वारंवार ध्वनित होते, त्या ठिकाणी कधीही अशुभ घटना घडत नाही. “यस्मिन  नाट्टोद्य नत्त्यास्या गीतपाठ्या ध्वनीह शुभ | भविस्यत्या शुभम देसे नैव तस्मिन कदाचन || २८ || कर्नाटक अक्षरे हिंदुस्थानी पद्धत पाश्चिमात्य षड्ज षड्ज षड्ज C शुद्ध रे रे१ कोमलऋषभ D Flat Db चतुश्रुती रे२ तीव्र ऋषभ D सदारना ग ग१ कोमल ग E Flat Eb अंतरा ग ग२ तीव्र ग E शुद्ध म म१ कोमल म F प्रती म म२ तीव्र म F Sharp F+ पंचम प पंचम G शुद्ध ड ड१ कोमल ड A Flat b  चतुश्रुती ड ड२ तीव्र A         कैसिकी न न१ कोमल न B Flat Bb       काकली न न२ तीव्र न१ B   यज्ञाच्या देवता कडे पहिले असता असा एक कयास बांधता येतो की, मानवाने अति प्राचीन काळात, कदाचित भयामुळे, वा वाटणार्‍या भितीपोटी आपल्या भयाला वाट करून देण्याकरिता व त्याचबरोबर त्या दृश्य शक्तिना पाहून त्याच्या तोंडून जे स्वर बाहेर पडले असतील तेच स्तवन, किंवा प्रार्थना यास्वरुपात प्रगट झाले. मी असे मुळीच म्हणत नाही केवळ भितियुक्त अंत:करणामुळेच ते शब्द नकळत आपोआप बाहेर पडले; त्यापेक्षा असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल की मानवाच्या त्याही स्थितीत व परिस्थितीत त्या ऋषींनी जाणीवपूर्वक सचेतपणे ती रचलेली आर्ष स्तुतिस्तोत्रे आहेत. त्यात भितीपेक्षा आदर, प्रेम, आस्था, आपुलकी, ओढ ही जास्त अनावरपणे जाणवते. त्या स्तोत्रातील प्रमुख देवता व त्याच्याविषयी थोडीसी माहिती पाहणे येथे योग्य ठरेल. ०१) अग्नि:  अग्नीचे निवास पृथ्वीवर असून त्याची अनुभूति सहज शक्य आहे, मात्र त्याचे यथोचित स्थान यज्ञाचे यज्ञकुंड आहे. वैदिक काळापासून पूजनीय देवतांमध्ये इंद्रा नंतर अग्नीचा क्रम येतो. ०२) इंद्र:  इंद्राचे निवासस्थान अंतरीक्ष आहे. वैदिक काळापासून सर्व देवतांचा प्रमुख इंद्र असे मानले जाते. इंद्रास सोमपान फार प्रिय आहे. इंद्राचे अमोघ अस्त्र “वज्र”, हे महर्षि दधीची ऋषींच्या हाडांपासून बनलेले आहे. इंद्राच्या प्रमुख कर्तव्यामध्ये प्रकाश, पर्जन्य व सर्व प्रकारची संपती देणे हे आहे. ०३) सोम:  सोमाचा निवास पृथ्वीवर आहे. सोम ही वेली उत्तर भारतात डोंगरावर आढळते. त्या डोंगराचे नाव “मुजावम” असे आहे. त्या वेलीना वाटून त्याचा रस काढल्या जातो व त्यापासून निघणार्‍या रसाला शुद्ध केल्यानंतर जो अर्क राहतो त्याला “पवमानम” असे म्हणतात. ०४) उषा:  उषा स्त्री देवता आहे. उषेचे निवासस्थान अंतरिक्ष आहे. सूर्योद्यापूर्वी उषा तिच्या आकर्षक लाल र्ंगाने दृगोच्छर होते. ०५) सूर्य:  सूर्याचेही निवासस्थान अंतरीक्ष आहे. विश्वाचा आत्मा सूर्य आहे. सूर्य सर्वांना आरोग्य, गरिमा (तेज) व ताकद / शक्ति (वितसमिन D) प्रदान करतो. ०६) विष्णु: विष्णुचेही निवासस्थान अंतरीक्षच आहे. विष्णु सर्वस्थळी उपस्थित असतो असे मानल्या जाते. विष्णुला संपूर्ण विश्वाचे शक्तिस्थान मानल्या जाते. आता थोडेसे आधुनिक उपलब्ध ग्रंथविशयी पाहू. तुलनात्मक दृष्ट्या अलीकडच्या काळातील संगीत शास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ व ग्रंथकार पाहू. अ)  पं. द्त्तिल – द्त्तिलम आ)    पं मतंग – बहूद्देशी इ)    पं जयदेव – गीतगोविंद ई)    पं शार्ङ्ग्देव – संगीत रत्नाकर उ)    पं लोचन – रागतरंगिणी ऊ)  पं रामामात्य – स्वरमेल कलानिधी ऋ) पं पुंडरीक विटठ्ल – रागच्न्द्रोदय इत्यादि  ऌ)  पं सोमनाथ – रागविबोध ऍ)   पं दामोदर – संगीत दर्पण ऎ)   पं अहोबल – संगीत पारिजात ए)   पं भावभट्ट – विलासंकुश रत्नाकर ऐ)   पं श्रीनिवास – रागतत्व विनोध ऑ)        पं कृष्णांनंद व्यास – राग कल्पद्रुम ऒ)        पं अप्पा तुळशी – संगीत शस्त्रदीपिका ओ)        पं वि ना भातखंडे – हिंदुस्तानी संगीत पद्धती औ)        पं वि दी पलूस्कर – संगीत बाळबोधादि वरील सर्वांमध्ये सारङ्ग्धर ह्यांनी अत्यंत उत्कृष्ट लिखाण शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिले आहे. देवगिरी नृपाश्रित शारंग्धर पंडित | ग्रंथ रत्ंनाकर श्रेष्ठ द्क्षिंनोतर संमत ||२२|| नाट्ट्य शास्त्र बृहद्देशी ग्रंथमान्य रत्ंनाकरा|गीत वाद्य नृत्यत्र्यये विशेषत्व रत्ंनाकरा ||२३|| स्वर, राग, प्रकीर्ंनाख्य प्रबंध, ताल, वादन| नर्तनात सप्ताध्यायी संगीत शास्त्रभूशण ||२४|| संगीत भारती संगीत रत्ंनाकरामध्ये एकूण आठ प्रकरणे आहेत. ती अशी, ०१) पदार्थसंग्रहप्रकरणम ०२) पिंडोत्प्त्तीप्रकरणम ०३) नाद-स्थान-श्रुति-स्वर-जति-कुल-दैवत-पिच्छन्दो-रसप्रकरणम ०४) जीआरएएन-मूर्छ्ना-क्रम-तान-प्रकरणम ०५) साधारन प्रकरणम ०६) वर्ंनालंकार प्रकरणम ०७) जातिप्रकरणम ०८) गीतिप्रकरणम याशिवाय, त्या पुस्तकाच्या शेवटी सात अनुबंध सुद्धा जोडलेले आहेत. अनुबंध: ०१) श्रुतिवीणास्वरग्रामबोधिनी ०२) शुद्धस्वरविकृतम्बरपट्टीका ०३) मूर्छनानामबोधिनी ०४) मूर्छनाभेदा ०५) ज्यात्त्यष्ठादशकविमर्शनी ०६) स्वरप्रस्तार ०७) श्लोकानामर्धानुक्रमणीका संगीतरत्ंनाकर हा अत्यंत सुंदर, विस्तृत व महितीपूर्ण असा संगीतावरील ग्रंथ आहे. संस्कृत व संगीत प्रेमिनी एक शोध निबंध अवश्य वाचवा. Therapeutic Aspects and Science Behind Raga Chikitsa by Shambhavi Das. [Shambavi Das, 2019, Int J Recent Sci Res. 10 (10), pp.35266-35269.DOI: http://dx.doi.org/10.24327/ijrsr.2019.1010.4068] हा लेख परिपूर्ण करण्यापूर्वी थोडक्यात, माझे पितृव्य, स्व. राष्ट्रीय संस्कृत पंडित अच्युत बाळकृष्ण भालेराव यांनी लिहीलेल्या संगीत भारती, या पुस्तकातील काही श्लोक “संगीतपरंमपरासूत्र” स्वरुपात आहे. ते खाली उधृत करतो. गीत शोध विधात्याचा, भरता बोध जाहला | आदिदेव सभेमध्ये, गीतनाद निनादला ||५|| जगाची वेद ही माता, साम संगीत माऊली | गांधर्व वेद ही संज्ञा, संगीता रूढ जाहली ||६|| गानी नारद गंधर्व, श्रीकृष्ण वेणु वादनी | नर्तनी आदिदेवाच्या, गीत वाद्य नृत्य ध्वनि ||७|| वीणामर्मज्ञ सुग्रीव, संगीतज्ञ रावण | भेरी मृद्ङ्ग वाद्यांचे, रामायणी निनादन ||८||   श्रीकृष्ण वाजवी वेणु, पार्थ वीणा विशारद |   गायिका उत्तरा उषा, शोभे संगीत भारत ||९||   चित्रसेन गंधर्व, उर्वशी अप्सरागण |   संगीतशास्त्र मर्मज्ञ, देवराज सभाजन ||१०||   कालिदास जग्गनाथ, गीत साहित्य केसरी |   स्वरांचा गंध स्वछ्ंदे, घेती देती महीवरी ||११||   शिक्षात्रय श्रुतिस्मृति, सर्व संगीत मानिती |   पुराणग्रंथ साहित्य, संगीतशास्त्र शंसती ||१२||   वैदिकोपनिश्त्काल, पुराण बौद्ध जैन ही |   गुप्त मुस्लिम आङ्ग्लादि, संगीत सार्वकालही ||१३|| मी काही संस्कृत पंडित नाही किंवा हा लेख म्हणजे आचार्य पदवी करिता केलेले संशोधनही नाही. हा संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने अभ्यास करून लिहिलेला फार तर लघु निबंध आहे. मानस: प्रबंधगुणसंदोह, शास्त्र गुरुकृपेमुळे | प्रबंधदोष सारे ते, माझ्या मंद प्रज्ञेमुळे || वाचनी चिंतनी जे जे, तयांचे व्यक्त चिंतन | न्यूनातिरिक्त पुरत्यर्थ, तज्ञपादाभिवंदन || श्रीगणेश जगदंबा, सद्गुरू चरणार्पण | कृति सामवेदसंगीत, सेवा सर्वाभिनंदन || संस्कृतभारती सेवार्थ, केले अल्प प्रयत्नही | लिहीले अल्पज्ञानाने, इति मुकुंदायन || मुकुंद भालेराव प्रचार प्रमुख: देवगिरी प्रांत – संस्कृत भारती संपर्कसूत्र: mukundayan@yahoo.co.in

  • by noreply@blogger.com (Mukundayan) on August 3, 2020 at 1:51 pm

    संस्कृत आणि गणित अर्थात सांस्कृतिक गणितशास्त्र [Ethnomathematics] यथा  सिखा मयूरानाम, नागानाम मन्यो यथा | तद्वत वेदांगा सहत्रानाम, गणितं मुर्धनाम स्थितम || ज्याप्रमाणे, मोराच्या डोक्यावर तूरा असतो, नागाच्या मस्तकावर मणी असतो, त्याचप्रमाणे, सर्व वेदांग शास्त्रामध्ये गणित खूप महत्वाचे आहे. आजच्या लेखात आपण संस्कृत मध्ये गणित या विषयाचे काय काय साहित्य उपलब्ध आहे हे पाहणार आहोत. जगभरात बर्‍याच काळपर्यन्त अशी समजूत होती की बीजगणित, त्रिकोणमिती वगैरे गोष्टी ह्या पाश्चिमात्य देशांनी प्रथम शोधून काढल्यात, पण ते खरे नाही. बीजगणित, त्रिकोणमिती ह्या विषयांचा अभ्यास व शोध खूप पूर्वी म्हणजे इसविसनापूर्वी भारतीय संशोधकानी लावला. पूर्वीच्या काळी दळणवळनाची साधने फारशी उपलब्ध नव्हती. जमिनीवरून किवा समुद्रमार्गे दुसऱया देशाशी व्यापाराकरिता संबंध येत होते. उपल्ब्द्ध माहितीवरून असे लक्षात येते की गुजराथ व केरळ या दोन राज्यातून सर्वात जास्त व्यापार चालत असे. कदाचित या मार्गाने काही गणितातील व इतर शोध मध्यपूर्वेच्या देशात व तेथून युरोपिय देशांमध्ये पोहोचले; आणि त्याही काळात भारतात दस्तऐवज जतन करण्याच्या पद्ध्ति कमी होत्या किवा दस्तऐवज ठेवण्याचे महत्व लक्षात आले नसावे, त्यामुळे देशाबाहेर गेलेल्या ज्ञानसंपदेवर बाहेरचे देश हक्क सांगू लागले. अजूनही भारतात अति प्राचीन वा प्राचीन काळात ऋषि महर्षींनी व शास्त्रज्ञानी महत्वाचे शोध गणितात व ज्ञानाच्या इतर शाखात, जसे रसायनशास्त्र, विमानशास्त्र, औषधीशास्त्र, श्ल्यचिकित्सा, धातुशास्त्र, विद्युतशास्त्र भारतात लावले आहेत हे स्वीकारल्या जात नाहीत; याचे कारण काही अंशी मानववंशशास्त्र व काही अंशी संस्कृतिशास्त्र यात आढळते. आत्ता आताच्या काळात जसे जागतिक पातळीवर योगाचे महत्व पटले, व सध्याच्या करोंना महामारीत आयुर्वेदाकडे लक्ष गेले व सरकारने आयुर्वेदात रोगप्रतिकारक शक्ति असल्याचे मान्य करून ते सर्वांनी घ्यावे असे सुचविले. यावरून एक निष्कर्ष असा काढता येईल की, भारतात स्वाभिमानाचा निर्देशांक आधीच्या तुलनेत वाढला आहे.  या संदर्भात जगप्रसिध्द शास्त्रज्ञ अलबर्ट आइनस्टाईनने काढलेले ऊद्गार महत्वाचे आहेत, “जगाने भारताचे उपकार मानावयास पाहिजे की भारताने जगाला श्युन्याच्या रूपाने मोजायला शिकविले; अन्यथा कुठलेही वैज्ञानिक संशोधन करता येणे शक्यच झाले नसते.” सर्वसाधारणपणे वेदांचा काळ पाच हजार वर्ष होता असे मानण्यात येते; परंतु नुकतेच एक संशोधन पुढे आले की श्रीकृष्णाची द्वारका ३२००० हजार वर्षापूर्वी अस्तित्वात होती. हे संशोधन जर खरे असेल व महाभारत काळाच्या आधी वेदांची इयेरचना झालेली आहे ही मान्यता आहे, तर सहाजिकच वेदांचा काळ त्यापूर्वीचा होता. एखाध्या ग्रहशास्त्र किवा खगोलशस्त्रज्ञाने याची पडताळणी करून बघावी. आपण आता, सुरूवातीला थोडक्यात गणिताचा कसा विस्तार होत गेला हे पाहूया. सर्वात प्राचीन भारतीय गणित शास्त्रज्ञ इसवीसनापूर्वी खालील प्रमाणे होते. ०१) महर्षि भाष्कर-१: इसवीसनापूर्वी ६०० – ६८० ०२) महर्षि वराहमिहीर: इसवीसनापूर्वी ५०५ – ५८७ ०३) महर्षि आर्यभट्ट: इसवीसनापूर्वी ४७६ – ५५० ०४) महर्षि पाणिणी: इसवीसनापूर्वी ५२० – ४६० ०५) महर्षि पिंगला: ३०० – २०० ०६) महर्षि भद्रसाहू: २९८ इसवीसना नंतर गणितात महान कार्य करणारे शास्त्रज्ञ खलील प्रमाणे आहेत. ०१) महर्षि उमासवती: १५० ०२) महर्षि यतीवृषम: १७६ ०३) महर्षि आचार्य सतखंगम: २ रे शतक ०४) महर्षि कात्यायन:3३ रे शतक ०५) महर्षि महावीरस्वामी: ६ वे शतक ०६) महर्षि बौद्धायन: ८ वे शतक ०७) महावीर आचार्य: ८०० ते ८७० ०८) श्रीधर: ८७० ते ९३० ०९) आर्यभट्ट – २: ९२० ते १००० १०) श्रीपति मिश्रा: १०१९ ते १०६६ ११) भाष्कर – २ : १११४ ते ११८५ १२) परमेश्वरा: १३७० ते १४६० १३) जेष्ठदेवा: १५३० १४) चित्रेभानू: १५०० ते १५७५   आता सविस्तरपणे, क्रमश: कशाप्रकारे गणितात अनेक गणित तज्ञानी मोलाचे काम केले ते पाहूया. हरप्पा, मोहोजोदारो व सिंधु खोर्‍यात केलेल्या उत्खननात प्रत्यक्ष गणितीय संकल्पना वापरल्याचे पुरावे आढळले आहेत. शिंधू नदीच्या खोर्‍यात वीट उत्पादकानी तयार केलेल्या बांधकामाच्या विटांचा आकार ४:२:१ असा प्रमाणबद्द आढळला. हे आकारमान विटांचा उपयोग करून बांधावयाच्या इमारतीच्या सक्षमतेच्या व टिकाउपणाच्या दृषीटीने महत्वाचे आहे. त्यांनी त्या काळात वजनाच्या प्रमानित पद्धतीचा उपयोग १/२०, १/१०, १/५, १/२, १, २, ५, १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० केला व त्याचबरोबर प्रत्येक एककाचे वजन अंदाजे २८ ग्राम्स असे ठेवले. ते वेगवेगळ्या आकाराच्या विटा तयार करीत असत. ह्याच प्रमाणे, त्यांनी लांबी मोजण्याकरिता अतिसूक्ष्म व अचूकतेची पद्धत असणारी मापिका (Measuring Scale) तयार केलेली आढळली. त्या मापीकेच्या एका भागाची लांबी साधारणत: १.३२ इंच किवा ३.४ सेंटीमीटर इतकी आढळली. एका एकक समान\ दहा भागात विभागलेले होते. संख्या लिहिण्याची पद्धत शंभराकरिता (शत) १०२, हजाराकरिता (सहस्त्र) १०३, दहा हजाराकरिता (आयुत) १०4, शंभर हजाराकरिता (नियुत) १०५, लक्षाकरिता (प्रयुत) १०६, दहा लाख (अर्बुदा) १०७, शंभर लक्ष (न्यरबुद) १०८, अब्ज (समुद्र) १०९, दशअब्ज (मध्य) १०१०, शंभरअब्ज (अंत) १०११, एक त्रिलियन (परार्ध) १०१२. आंशिक अपूर्णांक वरील उत्तर ऋग्वेद काळात असल्याचे पुरुष सुक्तात (ऋग्वेद – १०.९०.४) आढळते. शथपथ ब्राह्मनात (७ व्या शतकात) यज्ञवेदीच्या रचणे करिता भूमितीय संरचणा करण्याचे ज्ञान अवगत होते, ज्याचा उल्लेख सुल्बसूत्रातही आढळतो. सुल्बसूत्रे: सुल्बसूत्रे (इसवीसंना पूर्वी ७ वे शतक) यज्ञ्वेदीच्या रचना ज्यात हवी अर्पण करित असत, कसे तयार करावयाचे याची सूची दिलेली आहे. ह्याच सुल्ब सुतरांमध्ये पायथ्यागोरसच्या सिद्धांतविशयी माहितीचा उलेख आहे. इसवीसना पूर्वी ३०० ते २०० ह्या काळात पिंगलाने संगीतरचना करिता गणिताचा उपयोग केलेला आहे. त्याने छंदशास्त्राची (छंदसूत्रे) ची रचना करून पुढे मंत्रमेरूही तयार केला. कात्यायन: इसवी सनाच्या तिसर्‍या शतकातील कात्यायन हे शेवटचे वैदिक \ गणिती मानल्या जातात]. त्यांनी कात्यायन सुल्बसूत्रे लिहिलीत, ज्यात भूमितीय संकल्पना मांडलेल्या आहेत, ज्यात पायथ्यागोरसचा सिद्धान्त व दोनचे वर्गमूळ पाच दशांश स्थानापर्यंत अचूक आहेत. बौध्यायन: इसवीसनापूर्वी आठव्या शतकात बौद्धयनाने दोनच्या वर्गमूळाचे समिकरण शोधलेले आहे. वर्गमूळ २ = १ + १/३ + १/३.४ – १/३.४.३४ = १.४१४२१५६   सुल्बसूत्रांचा मूळ व मुख्य उद्देश हा यज्ञाला लागणार्‍या यज्ञवेदिची रचना हा असल्यामुळे, सुल्बसूत्रात जरी पायथ्या गोरसच्या सिद्धांचे उल्लेख आहेत तरीही त्यावर भर देण्यात आलेला नाही. जैन गणितज्ञ: सहाव्या शतकात महावीर जैन यांनी धर्म व तत्व्ज्ञान मांडले. त्या नंतर गणित विषयक बाबींचा उल्लेख आढळतो. सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे, जैन गणिती तज्ञानी “अमर्याद” या तत्वाचे पाच प्रकार मांडले आहेत. एक दिशा अमर्यादत्व (One Directional Infinity), द्विदिशा अमर्यादत्व (Two Directional Infinity), क्षेत्रफळाचे अमर्यादत्व (Infinite in Area), सर्वत्र अमर्यादत्व (Infinite everywhere), कायमचे अमर्यादत्व (Infinite Perpetually). सूर्य प्रजनापती शिवाय, स्थङ्ग्सुत्रे (इसवीसनापूर्वी ३०० ते इसवीसना नंतर २०० ह्या काळात, तर अनुयोग्द्वारा सूत्र (इसवी न २०० ते १००), आणि सतखंडगम (इसवीनाचे २ रे शतक) याची रचना केली. इसवी सनापूर्वी दुसर्या शतकात, भद्रबाहूने दोन ग्रंथांची रचना केली, भद्रबहावी संहिता आणि सूर्यप्र्जनापती यावर विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला. यतीवृषम आच्यार्य यांनी (इसवी सनापूर्वी १७६) तिलोयपन्नती लिहीला. तसेच, उमास्वती (इसवी एसनापूर्वी १५०) यांनी तत्वार्थदिगम सूत्रसंहिता लिहिली. भारतातील सर्वात जुने हस्त लिखित “बक्षाहली” हे बुद्धिस्ट व संस्कृत या दोन्ही भाषांचा संयुक्त उपयोग करून लिहीला आहे. तो सारदा लिपीत लिहीला असून त्या लिपीचा उपयोग हा वायव्ये कडील भागात आठव्या ते बाराव्या शतकात करत होते. इसवीसन १८८१ मध्ये एका शेतकर्यास पेशावर जवळ असणार्‍या बक्षाली या खेड्यात खोदताना सापडले. बक्षाली हे ब्रिटिश इंडियात होते. ते आता पाकीस्थानात आहे. हा ग्रंथ आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडेलीन ग्रंथालयात आहे. हा ग्रंथ साधारणत: ७ व्या शकतील असावा असा कयास बांधण्यात आलेला आहे. त्यात सत्तर पृष्टे आहेत. त्यात प्रामुख्याने पद्य स्वरुपात लिखाण कलेले असून स्पष्टीकर्णाथ गद्याचा वापर केलेला आहे. त्या मध्ये, अंकगणितातील अपूर्णांक, वर्गमूळ, नफातोटा, सरळव्याज, तीनचा नियम, तसेच, बीजगणितातील काही संकल्पनाही मांडलेल्या आहेत. भूमितीय कल्पनांचा ऊहापोहही त्यात केलेला आहे. त्या हस्तलिखितात, दशांशचिन्ह व शून्याच्या ऐवजी टिम्बाचा उपयोग केलेला आढळतो. आर्यभट्टाने (४७६ ते ५५०) आर्यभाटीय हा ग्रंथ’ लिहिला. मूलगामी गणितातील कल्पना त्यांनी ३३२ श्लोकात मांडलेल्या आहेत, ज्यात क्वाद्रिक समिकरने, त्रिकोणमिती व पायची किंमत चार दशांश स्थानापर्यन्त काढलेली आहे. याशिवाय, ज्या (Sine), कोज्या (Cosine), उतकर्मज्या (Versine), ओतकर्मज्या (Inverse Sine) व यांचे अंदाजे मूल्य काढण्याची पद्ध्द्त विशद केलेली आहे. ज्या, कोजया व उत्कर्मज्याच्या मूल्याचे कोष्टक तयार केले; व ते ही ३.७५० च्या मध्यंतराने ० ते ९० पर्यन्त चार दशांश स्थानापर्यन्त अचूकपणे काशी काढवयाची हे विदित केलेले आहे. महत्वाचे म्हणजे, आर्यभट्टाने त्यात त्रिकोणमितीचे सूत्र, Sin (n+1) x – sin nx = sin nx – sin (n-1) x – (1/225) sin nx. वराहमिहिर (५०५ ते ५८७ ): वराहमिहिराने पंच सिद्धांत लिहिले. त्याने त्रिकोण मितीतील साईन व कोस च तयार’ केला. sin2 (x) + cos2 (x) = 1 sin (x) = cos (TT / 2 – x)       ब्रम्हगुप्ताने (७ वे शतक) देखील बीजगणितात, भूमिती व त्रिकोणमिती बाबत बरेच काम केलेले आहे. भाष्कराने (६०० ते ६८०) महाभाष्करिय, आर्यभटियभाष्य व लघुभाष्करिय हे बीजगणित व त्रिकोममिती वरील ग्रंथ लिहिलेले आहेत. नवव्या ते बाराव्या शतकात, विरासना (८ वे शतक) हा जैन गणितज्ञ राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष, मान्यखेत, कर्नाटक याच्या दरबारी होता. त्याने धवल हा टीकात्मक ग्रंथ लिहिला. त्यात त्याने अर्धछेद, किती वेळा एखाद्या संख्येचा अर्धा भाग करता येतो हे विशद केलेले आहे. महावीर आचार्य (८०० ते ८७०) हा देखील कर्नाटकात होता. त्याने गणितसार संग्रह हा ग्रंथ समगणित यावर लिहिलेला आहे, ज्यात शून्य, चौरस इत्यादि विषयावर लेखन केले आहे. त्याने ऋण संख्येचे वर्गमूळ अस्तीत्वात नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर श्रीधराने (८७० ते ९३०) गोलकाचा परीमा विस्तरण करण्याकरिता काम केले आहे. त्यानी पाती गणितह्यात वर्गमूळ व घनमूळ \ काढण्याच्या पद्धती विशद केलेल्या आहेत.   आर्यभट्ट – २ (९२० ते १०००): आर्यभ्ट्ट-२ ने श्रीधराच्या महासिद्धांत या ग्रंथावर विस्तृत टीका लिहिली. हा ग्रंथ ख्गोलशास्त्रावर लिहिलेला आहे. त्यात १८ प्रकरणे असून त्यात अंकगणित, बीजगीत व कूत्तक (Indeterminate Equations) या विषयांवर विस्तृत चर्चा केलेली आहे. श्रीपति (१०१९ ते १०६६): यांनी सिद्धान्तशेखर हा खगोलशास्त्रावर लिहिलेला ग्रंथ असून त्यात १९ प्रकरणे आहेत. त्यात परम्युटेशन व कॉम्बिनेशन आणि जनरल सोल्यूशन फॉर सायमलटेनियस इंटरमिजीयेट लिनियर इक्वेशन यावर काम केलेले आहे. श्रीपतिनी याशिवाय धिकोतीधरना लिहिला ज्यात एकूण २० श्लोक आहेत. त्यामध्ये सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यावर चर्चा केलेली आहे. ध्रुवमानस या ग्रंथात १०५ श्लोक असून त्यात ग्रंहांची स्थाने, ग्रहणे व ग्रहांचे भ्रमण सिद्धान्त यावर प्रकाश टाकलेला आहे. भाष्कर-२ (१११४ ते ११८५): यांनी सिद्धान्त शिरोमणि, लीलावती, बीजगणित, गोलाद्ध्या, ग्रहगणितं व कर्णकुतूहल इतके ग्रंथ लिहिलेत. यानी असे प्रतिपादित केले की शून्याने भागीतले असता उत्तर अपरिमित येते (Infinity). याशिवाय, त्यांनी धनक्रमांक व त्याचे दोन वर्गमूळ यास दुजोरा दिलेला आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी खालील समस्यावर उपाय शोधून काढले. ०१) क्वाड्रयाटिक समिकरने, ०२) कुबिक समिकरने, ०३) क्वाद्रिक समिकरने वगैरे. त्यांनी पायथ्या गोरसच्या सिद्धांताचा पुरवाही दिला. कयालकुलस या विषयावरही भरपूर काम त्यांनी केले आहे. क्षेत्रीय त्रिकोणमिती व त्रिकोणमितीची सूत्रे त्यांनी प्रतिपादित केली. केरळमधील गणितज्ञ (१३०० ते १६००): केरळमध्ये खगोलशास्त्र व गणित या विषयाची सुरुवात संगमग्राम येथील माधव यांनी केली, ज्यात पुढे परमेश्वर, नीलकंठ सोमयाजी, ज्येष्ठदेवा, अच्युत पिशर्ती, मेलपाथुर नारायण भट्टाथिरी आणि अच्युत पनीक्कर यांचा समावेश होतो. १४व्या व १६व्या शतकात या विशयात खूप काम झाले आहे; परंतु पुढे नारायण भट्टाथिरी (१५५९ ते १६३२) यांच्या नंतर ती परंमपर पुढे खंडित झाली. त्या काळात, नीलकंठाने तंत्रसंग्रह व तंत्रसंग्रहव्याख्या या ग्रंथात, त्रिकोणमिती कार्याचा विस्तार संस्कृत काव्यात स्वरुपात केलेला आहे. आयझ्क न्यूटन व गॉटफ्रिड लेबनीज यांनी युरोप मध्ये चलनकलन (Calculus) याची मांडणी करण्यापूर्वी कित्येक शतके या संकल्पनेवर भारतात काम केलेले आढळते. नारायण पंडित, परमेश्वर व चित्रभानू यांनी त्रिकोणमिती व बीजगणितात खूप मूलगामी काम केलेले आहे. एका संशोधनात वेदांचा कालावधी इसवीसनापूर्वी ६००० ते १९००० वर्ष असा म्हटला आहे. यजुर्वेदाच्या १७ व्या प्रक्र्णत, श्यून्या पासून नउ पर्यंत संख्याचा उल्लेख आहे. अतिप्राचीन काळातील संस्कृत साहित्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. या  विषयी अनेक पुस्तके उपलब्ध असून त्याचा विश्वविद्यालयानि संशोधन कार्‍याकरिता उपयोग करून संकलन केले तर ह्या मौल्यवान ज्ञानसागराचा चांगला परीचय संपूर्ण जगाला होईल. हा लेख पूर्ण करण्यापूर्वी इशावास्योपीनिशदातील एक श्लोक उधृत करणे संयुक्तिक ठरेल. ओम पुर्णमदा पूर्णमिदमं, पूर्णात पुर्ण मुद्च्यते | पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते || यजुर्वेद ३.४ || याचा अर्थ अनंतातून अनंत येते आणि जेव्हा अनंतातून अनंत वजा केले तरीही शेवटी शेष अनंतच राहते. आधुनिक काळातील इन्फीनिटी ची संकल्पना अशीच आहे. मानवाने कितीही अभ्यास व प्रयत्न केले तरीही विश्वातील ज्ञान हे अनंत आहे. अस्तित्वात असलेल्या ज्ञांनाच्या आधारे मानव त्याचे प्रतिपादन करत असतो. कोणत्याही वेळी मानवाने मांडलेले ज्ञान हे अनंत वाटले तरीही, खर्‍या अर्थाने अनंत ज्ञान शेवटी अनंतच राहते. ते संपूर्ण कधीच ज्ञात होऊ शकत नाही. मात्र या बाबत स्वामी विवेकानंदानी असे म्हटले आहे की, “केव्हाही मानवाने प्रतीपादीत केलेले ज्ञान हे अनंतच असते.”  मुकुंद भालेराव वाङ्ग्मय पारंगत (इतिहास), वाङ्गमय पारंगत (राज्यशास्त्र) प्रचार प्रमुख – देवगिरी प्रांत, संस्कृत भारती

  • by noreply@blogger.com (Mukundayan) on July 31, 2020 at 7:41 pm

    संस्कृत  साहित्य जयतू संस्कृतमं | वदतू संस्कृतमं | संस्कृत भाषा ही भारताने जगाला दिलेली एक अभूतपूर्व देणगी आहे. संस्कृत ही अत्यंत अचूक, संपूर्ण, वैज्ञानिक, मधुर व श्रीमंत भाषा आहे. जगातील कुठल्याही भाषेपेक्ष जास्त अक्षरे व शब्द संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत साहित्यात काव्य, नाटक, तत्वज्ञान, तांत्रिक, वैज्ञानिक व धार्मिक ग्रंथांचा सामावेश होतो. आदि काळापासून संस्कृतचे ज्ञान मौखिक पद्धतिने पिढ्यान पिढ्या प्रसृत करण्यात आलेले आहे. संस्कृतची ज्ञानधन ब्राम्ही व देवनागरी लिपीमध्ये नोंदविण्यात आलेली आहे. ३१ जुलै २०२० च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २४,८२१ लोकांनी त्यांची मातृभाषा संस्कृत असल्याची नोंद केलेली आहे. तसेच भारतात संस्कृत बोलणार्‍यांची संख्या एकूण २३,६०,८२१ इतकी आहे. भारतीय राज्य घटनेच्या आठव्या सूचीनुसार संस्कृत ही इतर २२ भाषांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. उत्तर भारतीय व कर्नाटक संगीतामध्ये संस्कृतचा भरपूर उपयोग केल्या जातो, परंतु आता ह्या लेखात आपण त्या विषयी बोलणार नाही. त्याबाबत पुढील लेखात बोलूया. जगप्रसिद्ध वेद, उपनिषदे व भगवतगीता हे प्रमुख ग्रंथ संस्कृतमध्येच आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे चार वेद भारतीय संस्कृत व संस्कृतिक इतिहासाचे प्रमुख संदर्भ ग्रंथ आहेत. प्रत्येक वेदात, संहिता, ब्राह्मनम, आरण्यक व उपनिषत असे चारभाग आहेत. जगातील सर्वात जुने व्याकरण हे महर्षि पाणिणी यांचे “अष्टाध्यायी” आहे व अजूनही ते उपयोगात आहे. उत्तर वैदिक काळात वेदांग म्हणून व्याक्रणाचा समावेश झालेला आहे. अष्टाध्यायीत एकूण ३९५९ सूत्रे आहेत. जगातील बर्‍याच भाषांमध्ये संस्कृत मधून कित्येक शब्द गेलेले आहेत. एक उदाहरण घेऊ. जर्मनीच्या प्रसिद्ध विमान कंपनीचे, “लुफ्तानसा”. या शब्दाचा संधिविग्रह केला तर तो असा होईल, “लुफ्त” आणि “हंस”; म्हणजे हरवलेला हंस. भारतात, हंस हा अचैतन्याचा द्योतक मानल्या जातो. जगातील कुठल्याही भाषेपेक्षा जास्त म्हणजे १०२ अरब, ८७ कोटी ५० लाख शब्द वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथामध्ये, पुरस्तकामध्ये व बोलण्यामध्ये उपयोगात आणल्या जातात. इतकेच नवे शब्द पुढच्या १००-१५० वर्षात तयार होऊ शकतात. जसे ५० वर्षापूर्वी अस्तित्वात नसलेले शब्द, स्मृतिकोष (Pen drive), विद्युतकोष (Dry Battery Cell), जंगमदूरध्वनी (Mobile), पुन:पुरणी (Refill), संगणक (Computer), प्रतिमायंत्र (Camera), चित्रमुद्रिका (Video Camera), उपग्रहदूरध्वनी (Satellite Phone), चचार (Car), उर्जाकोष (Power bank). आता आपण संस्कृतमध्ये काय काय साहित्य उपलब्ध आहे ते पाहूया. रामायणाशिवाय, आध्यात्मरामायण, आनंदरामायण, अद्भुत्तरामायण, वसिष्ठरामायण. मत्स्यपुराण, मार्कंडेयपुराण, भागवतपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मांडपुराण, ब्रह्मपुराण, ब्रम्हवैवर्तपुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, वामनपुराण, वराहपुराण, अग्निपुराण, नारदपुराण, पद्मपुराण, लिङ्गपुराण, गरुडपुराण, कूर्मपुराण, स्कंदपुराण अशी आहेत. याशिवाय अजून काही उपपुराणे आहेत. ती अशी, विष्णुधर्मपुराण, विष्णुधर्मोंतरपुराण, नारसिंह, ब्रुहन्नारदीय, क्रिययोगसार, देवीपुराण, कालिकापुराण, देवीभागवत, महाभागवत, शिवपुराण, शिवरहस्य, एकाम्रपुराण, साम्बपुराण, गणेशपुराण, मुद्ग्लपुराण, भविष्योंत्तरम, बृहद्धर्मपुराण, भार्गवपुराण. पाच महाकाव्ये तर साहित्यातील खजिनाच म्हटला पाहिजे, ज्यात, कलिदासाचे रघुवंश, कुमारसंभव, भारावीचे किरातार्जुनीय, माघाचे शिशुपालवध, तर श्रीहर्षाचे नैषधीयचरितमं याचा समावेश होतो. यावरूनच श्लोक निर्माण झाला असावा.    “उपमा कालिदासस्य, भारवे अर्थगौरम | दन्डिन: पदलालित्यम, माघे सन्ति त्रयो गुणा: ||” महाकवि कालिदासने याशिवाय अभिज्ञानशाकुंतल, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम ही नाटके तर मेघदूतव ऋतुसंहार ही खांडकाव्येही लिहिती आहेत. संस्कृत साहित्यात प्रसिद्ध असणार्‍यांमध्ये शिलाभट्टारिका, तिरूमलाम्बा, विज्जीका, विजया, गंङादेवी, रामभद्राम्बा, देवकुमारिका व क्षमराव ह्यांचा समावेश होतो.   कथा स्वरुपात, विष्णुशर्माचे पंचतंत्र, नारायनाचे हितोपदेश, सोमदेवाचे कथासरित्सागर व गुणाढ्याचे बृहत्क्था यांचा समावेश होतो. फक्त ३०० श्लोक लिहिणारा राजा भर्तृहारी तर अद्वितीयच म्हणावा लागेल. त्यात, १०० श्लोक शृंगारशतक, १०० श्लोक वैराग्य शतक तर १०० श्लोक नीतीशतकाचे आहेत, तरीही हा अभूतपूर्व खजिना म्हणावा लागेल. सुभाषितरत्नभंडारामध्ये १०,००० सुभाषिते आढळतात. एक वेगळ्या प्रकारचे साहित्य म्हणजे अमरकोष, मेदिनीकोष, हलायुधकोष व त्रिकांडशेषकोष. वेदांचाच पुढचा भाग म्हणजे उपनिषदे, ज्यात ईशावास्योपनिषत, केणोपनिषत, कठोपनिषत, प्रष्ंनोपनिषत, मुंडकोपनिषत, मांडूक्योपनिषत, ताईतरीयोपनिषत, ऐतरेयोपनिषत, छानदोग्योपनिषत, बृहदारण्यकोपनिषत होत. प्रस्थानत्रयि मध्ये उपनिषद, भगवतगीता व ब्रह्मसूत्रे यांचा समावेश होतो. स्मृतिग्रंथामध्ये मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृति, पराशरस्मृति, देवलस्मृति व् नारदस्मृति हे मौल्यवान ग्रंथ आहेत. आस्तिक दर्शनामध्ये, कपिल मुनींचे सांख्यदर्शनम, महर्षि पतंजलिचे योगदर्शन, गौतमाचे न्यायदर्शन, कनादांचे वईषेशिकदर्शनम, जैमिनीचे पूर्वमिमांसा व महर्षि व्यासांचे उत्तर मिमांसा हे येतात. त्याचप्रमाणे, नास्तिक दर्शनात, चार्वाकदर्शन, जैनदर्शन, बौद्धदर्शन यांचा समावेश होतो.   साहित्य, तत्वज्ञान, धार्मिक याशिवाय संस्कृत भाषेमध्ये इतर ज्ञानविषयक लिखाण केलेले आहे. आरोग्याच्या बाबतीत चरक, सुश्रुत, जीवक व दिवोदास यांचे पण योगदान खूप मोलाचे व महत्वाचे मानले जाते. आपण याबाबत पुढे येका लेखात चर्चा करणार आहोतच. पायथ्यागोरसने (Pythagoras) त्याचा सिद्धान्त मांडण्यापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व ७००-६०० या काळात हाच सिद्धान्त शुल्बसूत्रात मांडलेला आहे. तसेच प्रसिद्ध पायची किंमत आर्यभट्टने ख्रिस्तपूर्व ५०० मध्येच मांडलेली आहे. सौरशक्ती, प्रकाश, उष्णता, वर्ण याविषयी भरद्व्ज यांनी अंशुबोधिनी व नारायनसुक्तम हे ग्रंथ लिहिले आहेत. रसायनशास्त्रावर (Chemistry) भरद्वाजानी विश्ववाद्म ह्या ग्रंथाचे लेखन केले. पाकक्रियेबाबत (Catering & Recipe) ऋषि सुकेश यांनी पाकविज्ञान ह्या ग्रंथाचे लेखन कळे. महर्षि वाल्मिकीनी गणितावरील ६४ सूत्रे अक्षरलक्षणगणितशास्त्रं याचे लेखन केले आहे. आश्चर्य म्हणजे छायाचित्रीकरणावर (Photography) देखील भीममहर्षिनी चित्रकर्म हा ग्रंथ निर्माण केला. प्राणीवैद्यक शास्त्रावर (Veterinary Science) शालिहोत्रमहर्षि यांनी अश्वचिकीत्साशास्त्रं हा विज्ञाना संबंधी ग्रंथाची रचना केली. संगीतावरील (Musicology) सुप्रसिद्ध संगीत रत्ंनाकर हा महर्षि शारंगधरानी लिहिलेला आहे. राज्यप्रशासन व व्यवस्थापनशास्त्रावर (State Governance & Management) सुप्रसिद्ध आर्य चाणक्यांनी तर तितकेच महत्वाचे काम केलेले आहे. संगीत, आरोग्य व व्यवस्थापनशास्त्र या विशयावर स्वतंत्र लेख लिहिणार आहोतच. आधुनिक काळात काही संस्कृत पंडितांनी सुद्धा लेखण केलेले आहे. श्री. जग्गूवकुलभूषण यांनी अद्भुतदूतम, शृंगारलीलामृतम, श्री. श्रीधर भाष्कर वर्णेकर यांनी शिवराज्योदय, जवाहर तरंगिणी याचे लेखण केले आहे. याशिवायही इतर लेखकांनी संस्कृतमध्ये अलीकडच्या काळात लिखाण केलेले आहे. आज भारतात एकूण १६ संस्कृत विद्यापीठे कार्यरत आहेत. कालच भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार संस्कृतला भरपूर महत्वं प्रदान करण्यात आलेले आहे. येणार्‍या काळात जसा, योगाचा संयुक्त राष्ट्र संघाने स्विकार करून आंतरराष्ट्रीय योगदिन सुरू केला तद्वतच आपण सगळे आशा करूया की लवकरच संस्कृत भाषेचा अव्वल व उत्तम दर्ज्याची वैज्ञानिक भाषा म्हणून स्विकार केल्या जाईल. || पुनर्मिलाम: || पठामि संस्कृतं नित्यम, वदामि संस्कृतं सदा | ध्यायामि संस्कृतं सम्यक, वन्दे संस्कृत मातरम ||१||   मुकुंद भालेराव प्रमुख: प्रचार विभाग, देवगिरी प्रांत, संस्कृत भारती || संपर्क || | Twitter: @mukundayan | Instagram: mukundayan | | Telegram: mukundayan | Blog: Mukund Bhalerao | |Skype: Mukundayan | E-Mail: mukundayan@yahoo.co.in|

  • by noreply@blogger.com (Mukundayan) on July 30, 2020 at 9:13 am

    || जयतू संस्कृतमं | वदतू संस्कृतमं || “भारत देशाकरिता येकच समान सांस्कृतिक भाषा म्हणजे संस्कृत भाषा.” – भारतरत्न डों बाबासाहेब आंबेडकर श्रावण द्वादशी (दिनांक ३१ जुलै २०२०) शुक्रवार ते तृतीया (६ ऑगस्ट २०२०) गुरुवार या सप्ताहात पूर्ण देशात व देशाबाहेर संस्कृत सप्ताह साजरा होणार आहे. भारत सरकारने नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले, त्या प्रमाणे तीन भाषेच्या सूत्रात संस्कृतचा समावेश करण्यात आला आहे. ह्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीय नागरिकाला संस्कृतविषयी माहिती करून घेणे हितावह ठरेल ह्या उद्देशाने काही विचार मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.   संस्कृत ही भारताची येक अधिकृत भाषा आहे. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी समजले जाते. संस्कृत भाषा ही तिच्या अचूकते करिता व सौन्दर्‍याकरिता ओळखल्या जाते. हिंदू शिवाय, जैन व बौद्ध धर्मातील साहित्य संस्कृत भाषेत आहे. आज सगळे जग संस्कृतकडे आकर्षित होत आहे. भारतातील सर्व हिंदू, धार्मिक कार्यक्रमात संस्कृत भाषेचाच वापर करतात व ती अत्यंत पवित्र समजल्या जाते. संस्कृत मंत्राचे ऊच्चारण हे विशिष्ट पद्धतीने केल्यामुळे तयार होणार्‍या ध्वनिचा, व्यक्तीच्या मनावर व शरीरावर चांगला परिणाम होत असतो. असे समजल्या जाते कि, संस्कृत भाषा प्रत्यक्ष ब्रम्हदेवाने निर्माण केली असून ती ब्रह्मदेवाने ऋषिना सांगितली. त्यामुळे संस्कृतला “देववाणी” म्हणतात.   आठराव्या शतकात संस्कृत, लॅटिन व ग्रीक भाषेमध्ये काही समानता आढळून आल्यानंतर संस्कृत व यूरोपियन भाषांचा तौलनिक अभ्यास भारतात व युरोपीय देशांमध्ये सुरू झाला. संस्कृत भाषेतील सर्वात जुने लिखाण हे वेद कालीन असून त्याचा कालावधी इसवीसनापूर्वी १५०० ते २०० असा आहे. त्यावेळी ज्ञानदानाची पद्धत ही मौखिक होती. मानवी इतिहासात संस्कृत साहित्य हे सर्वात जुने साहित्य आहे.   हिदू धर्माला पायाभूत असणारे वेद, उपनिषदे, पुराणे, वेदांगे, मंत्र (Vedas, Upanishdas, Puranas, Vedange and Mantras) या सर्वांची निर्मिती याच काळात झाली. त्यात सर्वात जुने म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद (Rugved, Samved, Yajurved & Atharvaved). या महान ग्रंथावर आधारित ग्रंथ, पुढे इसवीसनापूर्वी ५०० ते १००० या काळात निर्माण झाले. या नंतरच्या काळात महर्षि पाणिणीनी (Maharshi Panini) संस्कृत व्याकरणाची रचना केली.   भारताला अति सम्रुध्द साहित्यिक वारसा प्राप्त झालेला आहे, ज्यात दोन महाकाव्ये (Epics) म्हणजे रामायण व महाभारत हे होत. याशिवाय, चार वेद (Vedas), दहा उपनिषदे (Upnishadas), सहा आस्तिक दर्शने (Astik Darshne), चार नास्तिक दर्शने (Nastik Darshane), अठरा पुराणे (Puranas), अठरा उपपुराणे (Uppuranas), नाट्ट्यशास्त्र (Dramatics), विमानशास्त्र (Aeronautics), रसायनशास्त्र(Chemistry), शस्त्रशास्त्र (Weapon Technology), नौकाशास्त्र (Marine Engineering), युध्दशास्त्र (Science of Wars), काव्यशास्त्र (Art of Poetry), संगीतशास्त्र (Musicology), आयुर्वेद व शल्यचिकित्सा (Health Science & Surgery), औषधीशास्त्र (Pharmacology), प्रशासनशास्त्र(Management Science), न्यायशास्त्र (Judicial Science) असे अनेक ग्रंथ, महान ऋषींनी अखंड परिश्रमाने तयार करून ठेवलेले आहेत. दुर्दैव असे की, स्वातंत्र्योत्तर काळात तयार केलेल्या शिक्षण धोरणांत, महान भारतीय संस्कृति व प्राचीन गौरवशाली इतिहास याचा विचारच केलेला नाही.   या अनुषंगाने संस्कृत सप्ताहात दररोज एका विषयाची तोंडओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्ंन करून त्यात संगीत, रसायनशास्त्र, न्यायशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, आरोग्यशास्त्र, साहित्य, गणितशास्त्र यातील काही विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.  पठामि संस्कृतं नित्यम, वदामि संस्कृतं सदा | ध्यायामि संस्कृतं सम्यक, वन्दे संस्कृत मातरम ||१|| मुकुंद भालेराव प्रमुख: प्रचार विभाग, देवगिरी प्रांत, संस्कृत भारती ******************************************** || संपर्क || | Twitter: @mukundayan Instagram: mukundayan | Telegram: mukundayan Blog: Mukund Bhalerao | | Skype: Mukundayan | E-Mail: mukundayan@yahoo.co.in ==================================================  

  • by noreply@blogger.com (Mukundayan) on July 22, 2020 at 7:19 pm

    China is pushing India  In last sic months or so, China is trying to encroach upon the territory integrity of India as well as many small island nations around South China Sea. It is because China assumes that those small countries will be unable to face the onslaught of China. Reason being they have limited  resources, both economic and defence.  China’s exports travel through Malaka straight and that route is intercepted by Indian waters. Therefore, if China resorts to a mischievous misadventure of blocking small island countries by dominating South China Sea, showing scant respect to international law, it losses to claim any right over free unhindered passage through Malaka straight and Indian waters and that will be very costly proposal for Chain, because it will push China to change its navigation route through or below Indonesia, which will be circuitous increasing the cost of export.  It is trying to sandwich India between Arunachal Pradesh, Nepal, Ladakh and Aksai Chin on North and by putting its feet in Sri Lanka, Iran. But China is forgetting that Rusia form North, Japan form North East, Australia from South  and England, Germany etc form West are all with India, because China is adopting imperialism design.  India’s democratic values are very strong and well rooted. And so, America, England, Germany. France, Australia and Japan, all are willing to make a safety-net around India.  India, unlike India in 1962, is well prepared, agile and all alert to push back China like it had done in Doklam and Galwan.  China, at the same time, is facing home turmoil in Hong Kong and even in main country. Taiwan is opposing China too. India with its “Peace & Prosperity for All”  had already won the hearts of all. India’ Army, Navy and Air Force are well equipped and strengthened better today. Indian scientists and organization like DRDO, RD&EE etc. are providing full support defence services to augment their  assailing powers.  India is within its rights to protect its territorial integrity & nation’s sovereignty and is determined to assert everywhere and anywhere, at any cost.  #sovereignty #terriotorialintegrety #peaceand prosperity #democracy #internaitonallaw, #indianwaters 

  • by noreply@blogger.com (Mukundayan) on July 20, 2020 at 6:02 pm

    You Also Have Inner Power Story Excerpt from “Marriage which could not be stopped” from the E-Book Shweta called her father and communicated, “Papa, I decided to get marry. Shweta was waiting for her father’s response, but the call got disconnected. So, she called up again, but her father was not picking up. She got an audio message form her father, “You know the ritual of throwing rice and coins symbolizes that you are repaying back us, for keeping you in the house and spreading happiness and prosperity in all corners of the house. Bitiya, hamne kya gunah kiya jo tum hame bidaikee rasm bhi nasseb nahi kar rahi ho?” She heard that and her heart started lamenting with an anguish and pain. She, for a moment felt that she is robbing priceless memorable happy moment form her father and mother too. She got uneasy and restless. What to do?  “Mr Shekhawat, now this court passes this order. I rely on the judgement of Hon. Supreme Court of India, on the point of two adults marrying from different castes. ‘Once the fundamental right is inherent in a person, the intolerant groups who subscribe to the view of superiority class complex or higher clan cannot scuttle the right of a person by leaning on any kind of philosophy, moral or social, or self-proclaimed elevation. Order Your Copy here: https://www.amazon.in/You-Also-Have-Inner-Power-ebook/dp/B08BX27J99 for #fiction #anthlogy #socialharmony #treasureofhappiness #daughter #justice

  • by noreply@blogger.com (Mukundayan) on July 12, 2020 at 5:51 am

    मुझे तूम नजरसे गिरा तो रहे हो.. [सबाह फैझ अली] Indian subcontinent is rich with Urdu literature, especially Gazals. Ghalib is known more across the continent. There are more Shayars, like Faiz Ahmed Faiz, Nida Fazali etc. Everybody does not understand Urdu or Farasi and hence, I felt a need to make it available for those who do not understand Urdu or Farsi.  In this, direction, this is the maiden attempt. The below is the famous gazal penned by Sabah Faiz Ali and sung by many, but most soul touching is sung by Mehadi Hasan. Nusrat Fate Ali Khan, Anuradha Poudwal had also sung it. It is real unique experience to listen this gazal by Mehadi Hasan… You are demeaning me, but you can never forget me…… Do not know but, I am feeling it surely that you could not, erase my love, Wherever you go,  You will remember me sometime like a song or, in flowing tears on your cheeks…… You will find me restless, anywhere you go Because I have lighted me, Love-lamp with sincerity, And even if you want, You could not darken my lamp…. When you hear my name, Oh Dear, You will be restless, And Mind, You will miss a pulse, your eyes will be dampened by a dark acute pain, and if somebody asks You, reason for your cry, even if you wish, Hey, you will fall and fail to, tell the reason why………. My heart is beating like a wildfire, and it is igniting my desires by trickling my tears, I am sure one day you will realise, but then I will not be there, in your life, and then, even if, you yearn to invite me, you could not, so sad my Love…. I am very much thankful to #Dr Jairna Sani #Dr VInay Waikar for their literary work on Urdu Gazal, “Aiena-E-Gazal”. https://www.instagram.com/mukundayan/

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top