नमस्कार विक्रमा……
कारगीरलच्या धरतीवरती,
अश्रु मजला नावरती,
डोंब उसळले दु:खाचे,
पेटुन उठली मग धरती…….
नतमस्तक मी विजयभाष्करा,
पूण्यपुरूष वीरा,
घडु दे काही सेवा ऎसी,
मजला धन्य करा………….
दिव्यगती ती तूला लाभू दे,
वीरमरण तव मनी असु दे,
सदैव तुझिया समर्पणाची,
स्म्रुती माझीया मनी वसुदे……,
तव मातेचे अश्रु पुसण्या,
शब्द नव्हे अन शक्ति मला,
उतराई तव रूण मातेचे,
सदैव असुदे स्म्रुती मला……..
मुकुंद भालेरव,
कारगिल शहिद स्मारक,
कारागिल, १० जुलै २००९