एक माझे स्वप्न आहे…
डोंगराचा असावा पहारा, बाजूला नदीचा किनारा
मनाली सारखे गाव असावे, बर्फाचे आकाश असावे
हिरव्या चिनारांची सळसळ असावी, निळ्या नदीची खळखळ असावी
चिमुकल्या गावातहि येक शाळा असावी,
शाळेत नसावे वर्ग, वर्गाना नसाव्या भिंती,
भिरभिरत्या नजरेच्या मुलाना, नकोत पुस्तके अन पाटी
एक चिमुकले घर असावे, सगळ्या घरातून आकाश दिसावे
पानाच्या स्वरांना नदीचा ताल,
भावनांच्या फुलांना असावा प्रेमाचा सुवास
सकाळच्या तेजाने न्हालेल्या, बर्फाने सलाम करावा
दुपारच्या रिमझिम पावसाने आरमा करावा
कललेल्या भाष्कराला करावे वंदन,
अन कणाकणातून ओघलणार्या निशेला सामावून स्पंदन
शुभ्र असावे चांदणे, अन हसावे चांदीच्या बर्फाने,
चटकन मला पंख यावेत, मनाच्या वेगाने,
झरकन सरकन मी मात्र, बेभान होऊन जावे
नभानभाला स्पर्शून, परत परत मी यावे
हिरव्या निसर्गाच्या गालिच्यावर, मनसोक्त उधळून द्यावे
मनाच्या मोराबरोबर मी, मग फुलून जावे.
मुकुंद भालेराव, औरंगाबाद