My Stories

जुलिया

जुलिया
आज मला उच्च न्यायालयात न्यायाधीश होऊन पाच वर्ष झालीत जवळपास. प्रत्येक सप्ताहात दर शनिवारी संध्याकाळी पहिले काम पुढच्या सप्ताहाच्या कामाची प्रकरणे पाहणे. दर वेळी वेगवेगळी प्रकरणे येतात. कधी सिव्हील, कधी मालमत्तेची, कधी निवडणुकीची, कधी येकसाइज, कधी हुंडाबळी, तर लईन्गिक छळ. क्वचित घटस्फोटांची देखील. त्यामुळे, आता कशीही प्रकरणे आली तरी तस फारस काही वाट्त नाही. म्हणजे भावनिक गुंतवणूक वगैरे. Absolutely professional. अगदी भगवतगितेत अपेक्षित असलेल्या स्थितप्रज्ञा प्रमाणे.
इतक्यात दारावरची बेल वाजली अन मी भानावर आले. आज शुक्रवार. उद्या शनिवार व पर्वा रविवार दोन्हीही दिवस कामकाज बंद असते. त्यामुळे, सगळ्या फाइलस आजच घरी आणल्यात. चला लिस्ट बघू आता. बापरे बाप तीनशे फाइल्स…..कित्ती हि प्रकरणे. एकंदर तीनशे…अबब….चला कोणती आहेत ते तर एकदा बघू. नोकरी, प्रमोशन, ट्रान्स्फर, येक्सैज, इम्पोर्ट, मालमत्ता, कौतूम्बिक……ठीक आहे. विविधता आहे तर.
I feel really nice that Malvika is coming after almost a year….after her marriage…..i am happy how she is enjoying her married life with Philips……..I was worried when first she shared with me her wish to marry with him…I can understand she and Philips studied in the same university at the same time…..दोघांनी अमेरिकन पद्धतीने विवाह केला अमेरिकेतच, कालीफोरनियात. आम्ही होतो तिथे. परंतु मालवीकाचा विषय होता अर्तीफिशियल इंटेलिजन्स आणि फिलीप्सचा विषय होता अस्त्रोफिजीक्स…..फिलिप्सच्या घरी..म्हणजे त्याच्या वडिलांचा मिलियन डॉलरचा व्यवसाय आहे व फिलिप्स एकुलता एकच मुलगा आहे. चला आजचे काम करूया….
अरे पहिलीच केस घटस्फोटाची….बघू काय आहे प्रकरण……ज्युलिया विरुद्ध प्रभाकर…जुलिया उच्च विद्या विभूषित….पी. एच. डी. (जेनेटीकल येनजिनिअरिंग)…..हिचेही लग्न साधारण एक वर्षापूर्वी झाले आहे. त्यांचाही प्रेम विवाहच…..दोघे परद्यू युनिव्हर्सिटीत बरोबर शिकले….प्रभाकरचा विषय मात्र वेगळा होता. त्याने म्युझीकालाजीत पि.एच. डी. केले. त्याची आवड संगीताची….ज्युलीयाला वाटते प्रभाकरने संपूर्ण वेळ तिच्या व्यवसायात द्यावा, कारण ती त्याच्या करता अमेरिका सोडून भारतात आली, आईवडीलाना एकुलती एक असून…..प्रभाकरला त्याच्या विषयातच संशोधन करावयाचे आहे. ह्या कारणाकरिता ज्युलीयाला घतोस्फोट हवाय………बर दोघांचे लग्न भारतीय म्हणजे हिंदू पद्धतीने झालेले आहे भारतात….म्हणजे यांचे प्रकरण हिंदू विवाह कायद्या प्रमाणे पाहावे लागेल, जरी ज्युलिया अमेरिकन असली तरीही……..
“बोल मालविका……काय…..काय बोलतेस तू………तुला कळतय का…की तू काय बोलतेस ते? अग लग्न म्हणजे काय तुला भातुकलीचा खेळ वाटला का……..अजून एक वर्षदेखील झाले नाही लग्नाला आणि तू घटोस्फोटाचे बोलतेस……काय झाले मालवीका?……..”
मला संपूर्ण जग माझी भोवती फिरतेय असे वाटले. काळाकुट्ट अंधार फक्त…..बससस्स……………Oh My God !!!!!
“युवर ओनर…..Julia fell in love with Mr. Prabhakar and decided to marry and shift to India permanently. Mr. Prabhakar is only son to his parents. He did not want to leave his parent here and live himself in USA. Julia agreed to come and stay here permanently, even though she is also only daughter. However, Mr. Prabhakar had agreed to give up his vocation of Indian Classical Music and join hands with Ms. Julia in her vocation., but of late he told Julia that he cannot discontinue his own vocation and hence, my client Julia wants a divorce.”
“अहो मी. देशमुख……परंतु हिंदू विवाह कायद्याप्रमाणे एक वर्षात घटस्फोट कसा देता येइल?”
“Your Honour….but asking her to stay with Mr. Prabhakar against her wish is violative of Article 21 of Constitution of India, Right to Life….means right to life with dignity….”
“मालविका पण ह्याच परिस्थितीत आहे…..”
“….एस…..मी. पाटील….तुम्ही काय म्हणता…?”
“युवर ओनर……हे अस केवळ जुलीयाला तिच्या व्यवसायात सामील होत नाही म्हणून घटस्फोट मागणे कितपत बरोबर आहे….. नाहीच चूकच’ आहे….हिंदू विवाह कायद्याप्रमाणे असा घटस्फोट नाही देता येणार..तो कायद्याचा भंग होईल………..”
“खरच आहे. अस कस पटकन लग्न मोडता येईल बर…..जन्मोजन्मीचा संबंध…..अस एकदम कसा संपवता येईल बर सगळ…….”
“युवर ओनर….परंतु घटस्फोट न देणे म्हणजे जगण्याचा अधिकार हिरावून घेणे होईल….युवर ओनर…”
“पण मालविकालाही तर असाच त्रास होत असेल…….”
“नाही…..नाही….नाही………जुलीयाचा पण विचार करायला हवा मला……”
“युवर ओनर…..जुलीयाला न्याय मिलालच पाहिजे……”
“युवर ओनर……आय ओब्जेकट……नाही देता येणार असा घटस्फोट…..एकदम……”
“पण मग मालविकाला तिच्या इचछेविरुद्ध तिथे दुसर्या देशात मनाचा कोंडमारा करून जागाव लागेल……..हे चूक आहे…अन्याय आहे…….”
“युवर ओनर….जुलीयाव्रर अन्याय होतोय……” देशमुखांचा आवाज आता चढलेला होता.
“मी. पाटील मी’ तुमच्याशी सहमत आहे……..this court agrees with the respondent…Mr. Prabhakar’s plea……..it is unacceptable to grant divorce, so fast just on emotional turmoil…….there are ways to save marriage…moreover, in Hindu Marriage Act, judicial separation can be considered, if at all it is must……….”
“अरे बापरे……अन मालविकाला अमेरिकन कोर्टाने’ असाच निकाल दिला तर…..किती भयंकर होईल. नाही नाही. मालविकाला घटस्फोट मिळालाच पाहिजे……”
“हे देवा काय करू मी ???? हि कसली परीक्षा पाहतोस माझी……….आतला आवाज म्हणतो घटस्फोट द्यायला हवा पण, कायदा म्हणतो नाही देता येणार……नाही नाही…मला कायद्याचा वेगळा अर्थ लावावा लागेल…माझे न्यायमूर्ती म्हणून ते कामच आहे….मानवतेचा आवाज ऐकणे…..Universal Declaration of Human Rights भारताने स्विकारले आहेत……….The Law in the Changing Society मध्ये नवीन अर्थ लावण्याच्या पद्द्ध्तीस प्रोत्साहन दिले आहे……भारतीय राज्य घटनेने मला तसे अधिकारही दिलेले आहेत. मला कायद्याचा योग्य अर्थ लावण्याचा अधिकार आहे…बस….झाले तर…..मालविकास न्याय मिळालाच पाहिजे…..तसा जुलीयाला पण न्याय मिळाला पाहिजे….”
“मिस जुलिया….do you really want a divorce from Mr. Prabahakar? Is it your well thought decision?”
“Your Honour…yes…it is my well thought decision. I want to live….I want to live with dignity….you being a woman can understand my agony….”
“युअर ओनर…….” मी. पाटलांचा आवाज धारदार झाला होता…”तुम्ही असा घटस्फोट नाही मंजूर करू शकत…हिंदू विवाह असा संपुष्टात आणता येणार नाही…..नोंद घ्या याची आपण….”
“मी मालविकाला घटस्फोट मंजूर करते………”

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top