मन नेहमी तरल असत …..
मन नेहमी तरल असत, वार्यासारखे उडत असत,
पकडुन त्याला ठेवावे, तर पान्यासारखे निसटून जात,
मन हे आत्म्याचे दुसरे नाव, त्याला चिरनजिवीत्वाचे आहे वरदान,
मग चाळीस काय अन साठ, अनंत काळाशी आहे गाठ,
कशाला ऊगाच मग, विचार करून थकायचे,
नसत्या शंकांनी, घाबरेघुबरे व्हायचे,
फुलुन फुलुन जायचे, उधलुन रंग द्यायचे,
मनाच्य अंतरंगात, बेफाम बनुन जगायचे,
शरीर, मन, भावना, काहीच आपले नसते,
देवाने जे दिले ते, हसत घेउन जगायचे,
सुख नाही दु:ख नाही, राग नाही आनंद,
कशाला व्रुथा चिंता मग, नाच तू स्वच्छंद,
किती झाले जन्म तरी, नाती काही संपत नाही,
आणी प्रत्येक जन्मात ती, जुनी काही होत नाही,
एकदम कुठलासा, चेहरा हसुन येतो,
कासावीस होते मन,
मुकुंद भालेराव,
नागपुर,
२८-०७-२००९,
सकाळी-०९.२५ : ०९.४८