Marathi

माझ्या मनात सारे रंगुन रंग आले

माझ्या मनात सारे रंगुन रंग आले….

मन नेहमी तरल असत, वार्यासारखे उडत असत,
पकडुन त्याला ठेवावे, तर पटकन ते निसटून जात,
मन आत्म्याच दुसर नाव, त्याला चिरंजिवीत्वाचे वरदान,
नाही कळ्त पण, अनंत काळाशी आहे गाठ,
कशाला ऊगाच मग, विचार करून थकायचे,
नसत्या शंकांनी, घाबरेघुबरे व्हायचे,
फुलुन फुलुन जायचे, उधळुन रंग द्यायचे,
मनाच्या अंतरंगात, बेफाम बनुन जगायचे,
शरीर, मन, भावना, काहीच आपले नसते,
देवाने जे दिले ते, हसत घेउन जगायचे,
सुख नाही दु:ख नाही, राग नाही आनंद,
कशाला व्रुथा चिंता मग, नाच तू स्वच्छंद,
किती झाले जन्म तरी, नाती काही संपत नाही,
आणी प्रत्येक जन्मात ती, जुनी काही होत नाही,
एकदम कुठलासा, चेहरा समोर हसुन येतो,
आनंदाची बरसात तो, मग क्षणात करून जातो.

मुकुंद भालेराव,
नागपुर,
२८-०७-२००९,
सकाळी-०९.२५ : ०९.४८

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top