चिरंजीव पल्लवी,
तुझ्या आगमनाने पल्लवीत झाल्या, आशा प्रेम सार्या उमलुन आल्या,
निळ्या नभांची कमनीय कविता, मनी मोहविते पल्लवीत आशा…..
सुखांची सुरांची बरसात झाली, फुले अक्षयाची उमलुन आली,
स्वरांनी सुरांना जसे रंग द्यावे, तसे शब्द अक्षय पल्लवीत व्हावे…..
आनंद सारा उधळीत ये तू, मनी मोर आनंद फुलवित ये तू,
सिमा नसावी मने फुलवाया, कविता स्वरांची रंगुन गाया………..
हरी दु:ख सारे कवितामुकुंद, नवे विश्व सारे अक्षय अनंत,
स्वप्नील गंधीत, सारा प्रवास, नयनात अक्षय मनी पल्लवीत……..
मुकुंद भालेराव
नागपुर / दुपारी २ ते २.३५ वाजता
पल्लवी साठी लिहिलिये का? मस्त