Marathi My Articles

सामाजिक माध्यमे – महत्व व उपयोग

एकविसाव्या शतकात लोकशाही मधील एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे सामाजिक माध्यमे. मागच्या शतकाच्या शेवटी शेवटी विदयूत माध्यमांचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. साधारणत: १९९९ च्या मागे पुढे, प्रथम भारतात विद्युतकसंदेश प्रणाली सुरू झाली. माहिती जतन करून ठेवण्यासाठी फ्लॉपी, नंतर सीडी, डीव्हीडी अशी हळू हळू वाटचाल सुरू झाली.

बाइट (१ अक्षर किवा १ मुळाक्षर) ह्या परीमाणा पासून सुरुवात होऊन आता जिपिबी (१० चा तिसावा घात) पर्यन्त येऊन पोहोचलो. पूर्वी एक संगणक ठेवायला एक १०x१२ ची खोली लागायची, आता खिशातच नव्हे तर मनगटावरील घड्याळात संगणक येऊन पोहचला आहे. हातातील घड्याळातून आता फोन करता येतो, छायाचित्र पाहता येतात, आलोकलेखयंत्र त्यात आहे, मेल वाचता येते, लघुसंदेश पाठविता येतो, गणकयंत्र त्यात वापरता येते.

साधारणत: येक इंचाच्या आकाराच्या स्मृतिकोशात पाचशे पानांचे पुस्तक सहज बसू लागले. जंगमदूरध्वनी मधील पत्रबिम्बकाच्या सहाययाने एका क्षणात छायाक्रुती करता येऊ लागली. भारताचे मा पंतप्रधान जगातल्या अनेक देशांच्या नेत्यांबरोबर दिल्लीत आपल्या कार्यालयात बसून प्रत्यक्ष समोर बघून बोलू शकतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यावायमूर्ती नागपुर मध्ये, येक अधिवक्ता अमेरिकेत, दूसरा आधीवक्ता दिल्लीत असे न्यायालयाचे कामकाज अङ्क्कियवैदयूतकच्या माध्यमातून व्हायला लागले.

प्रचार माध्यमा उपयोग पन्यवीथिका, चलच्चित्र, शिक्षण, कृषिकर्मन, आरोग्य सारख्या विविध क्षेत्रात होऊ लागला. नोकरी व व्यवसायाच्या कारणाने मित्र, नातेवाईक हे खूप खूप दूर दूर होऊ लागले. पूर्वीच्या काळातील पोस्टकार्ड, अंतरदेशीय पत्र, पाकीट, तार, तातडीचा दूरध्वनी हे सगळे पडद्यामागे गेले. आता कुणालाही वाट पहायला वेळ नाही. सगळ्यांना क्षणात हवी प्रत्येक गोष्ट.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर, संपर्क व संवादाकरिता ईमेल, मोबाइल, उपग्रहदूरध्वनि, फेसबुक, ट्विटर, इनस्टाग्राम, टेलिग्राम, युट्यूब, लिङ्क्द इन, ब्लॉग ही साधने अस्तित्वात आली. अमिताभ बच्चन ने नानावटी भरती होताच ट्विट केले आणि पाचच मिनिटात त्या ट्विटला हजारो ट्वित्स्स हजर झाले. वार्याच्या वेगाने असे म्हणण्या पेक्षा विजेच्या वेगाने माहिती धाउ लागली. कॅलिफोर्नियात ५० अंश सेल्सियस तापमान झाल्याझाल्या दुसर्‍या मिनिटाला न्यूझीलँड मध्ये चिंता वाटायला लागली.

घरात बसल्या बसल्या गुगुल अर्थने जगाच्या पाठीवरील कुठलाही प्रदेश काय किवा समुद्र काय, वाळवंट काय, घोर अरण्य काय, अगदी तिथे गेल्या सारखे अगदी जवळून पाहता येते. उपग्रह द्वारा आकलँड व सांफ्रान्सिस्को मधील किंवा  द्वारका आणि वालोंग, किंवा गिलगीट आणि रामेश्वरमं; प्रत्यक्ष भौगोलिक अंतर कितीही असले तरीही क्षणात संपर्क करण्याची इछा, गरज व आवश्यकता वाढल्यामुळे आता या साधनांचा वापर दिवसे दिवस वाढत जाणार, आणि म्हणून अशा सामाजिक परिस्थितीत काम करायचे असल्यामुळे सर्व सामाजिक माध्यमांची योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top