Marathi

कवितेतील कविता

चाळीस झाली वर्षे आता, हात तुझा हातात असे |
मनी भावना आनंदाच्या, गंध सुखी हृदयात वसे ||१||

मनात तेंव्हा जे रुजले ते, तेच मनातही अजून असे |
ऋतू ऋतूतून विहरत विहरत, मनी प्रेमही तेच असे ||२||

सप्तपदीला धरला कर तो, मनी भावना तीच असे |
मंगल मंगल मनी विहरते, तीच कविता मनी वसे ||३||

काळ बदलला वेळ बदलली, जगात सारे बदल नवे |
अंतरातले नादब्रम्ह जे, तेच तसे ते अजून असे ||४||

चिंता आल्या चिंता गेल्या, दुःख विराले दुःख नसे |
मनात साऱ्या सुखद भावना, दुःखाचा लवलेश नसे ||५||

सुखद भावना तशा कल्पना, आनंदाचे ऋतू नवे |
तीच कविता प्रेमरूपही, कवितेचे नव विश्व असे ||६||

Share this on:

One thought on “कवितेतील कविता

Comments are closed.

©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top