Marathi My Articles

धर्मशास्त्र, वेद, श्रुति, स्मृति व पुराणे

प्राचीन भारतातील कायदे व न्यायपद्धतीचे मूळस्त्रोत

 || यतो धर्म स्ततो जया: ||

महाभारत हे धर्मयूद्ध होते. त्या युद्धाला काही नितीनियम होते, जसे आजच्या आधुनिक जगात युद्धामध्येही रेडक्रॉसमध्ये काम करित असलेल्या वाहनावर व कर्मं चार्‍यावर कोणत्याही पक्षाने हल्ला करायचा नसतो; तसेच महाभारत युद्धात सकाळी सूर्योदयापूर्वी युद्ध सुरू करावयाचे नाही व सूर्यास्तानंतर सुरू ठेवायाचे नाही असा दंडक होता. थोडक्यात ते यूद्धही सर्वमान्य निती व युद्धाच्या नियमाना धरूनच लढले गेले. थोडक्यात, महाभारताचे युद्ध कायद्यानुसारच लढले गेले. या अनुषंगाने, भारतीय कायद्याची जडणघडण कशी झाली हे पाहणे आनंददायी ठरेल.

या युद्धात अनेक वेळा जो महत्वाचा सल्ला देण्यात आला होता, तो म्हणजे “जिथे धर्म तिथे जय”. हे वाक्य तसे वाचकांपैकी बहुतेक जणानी वाचले असेलच. आपण जर कुणालाही विचारले की बाबारे याचा अर्थ काय तर चटकन उत्तर येईल की आपल्या धर्माकरिता जो लढतो त्याचाच विजय होतो. सक्रुत दर्शनी हेउत्तर बरोबरही वाटते, पण ते खरे नाही. आपण पुढे त्याचा विचार करू. महाभारतात “यतो धर्म स्ततो जय:|” हे वाक्य जवळ पास सात वेळा आलेले आहे. यावरून या वाक्याचे महत्व लक्षात येईल. एक महत्वाची बाब म्हणजे, स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मानचिन्हात हे वाक्य       ऊदघोषणा म्हणून लिहिलेले आहे.

यातून हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट होते की, स्वतंत्र भारताच्या संविधानास देखिल न्यायदानाचे काम हे धर्माच्या आधारेच झाले पाहिजे हे अपेक्षित आहे. भारताची न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानातून निर्माण झालेली आहे. भारताचे संविधान हे घटना समितीने तयार केलेले आहे. घटना तयार करणार्‍या घटना समितीस देखिल हेच अपेक्षित आहे, व पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, धर्माधारे न्यायदान हे भारताच्या संविधानाच्या मूळ रचनेचा एक अविभाज्य अंग आहे; आणि जो राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे त्याला कुठल्याही कायद्याने, कायद्यातील दुरूस्तीने, घटना दुरुस्तीने, राष्ट्रपतीच्या अध्यादेशाने देखिल बदलता येणार नाही; आणि कुणी तसा प्रयत्न केलाच तर तसा कायदा, कायद्यातील दुरूस्ती किंवा घटनेतील दुरूस्ती मुळातच महाशून्यता (Void) ठरेल. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी  भविष्यातील धोक्याचा विचार करून तसे होऊ नये म्हणून राज्यघटनेच्या तिसर्‍या भागात एक खास कलम, कलम-१३ समाविष्ट केले. It is a vaccine against the future anti-national virus. It is most appropriate preemptive step to keep in-tact the Basic Structure of the Constitution, well insulated from the risk of autocratic despots.

Article-13: Laws inconsistent with or derogatory of the fundamental rights:

(1) All laws in force in the territory of India, before the commencement of this Constitution, in so far as they are inconsistent with the provisions of this Part, shall, to the extent of such inconsistency, be void.

(2) The State shall not make any law which takes or abridges the rights conferred by this Part and any law made in contravention of this clause shall, to the extent of the contravention, be void.

(3) In this article, unless the context otherwise requires,

(a) “law: includes any Ordinance, order, bye-law, rule, regulations, notification, custom or usages having in the territory of India the force of law;

(b) “laws in force” includes laws passed or made by a legislature or other competent authority in the territory of India। before the commencement of this Constitution and not previously repealed, notwithstanding that any such law or any part thereof may not be then in operation either at all or in particular areas.

(4)  Nothing in this article shall apply to any amendment of this Constitution made under Article 368.  

कलम-१३: मूलभूत अधिकारांशी विसंगत किंवा त्यांना अवरोध करणारे कायदे

(१) ही राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात लागू असणारे सर्व कायदे, ह्या भागाशी जितके विसंगत व विरोधी असतील, तितके परिणामशून्य असतील किंवा ठरतील.  

(२) सरकार (केंद्र किंवा राज्य) अशा प्रकारचा कुठलाही कायदा तयार करणार नाही की, ज्यामुळे कुठल्याही नागरिकास ह्या भागाने दिलेले अधिकार काढून घेतल्या जातील किंवा कमी केल्या जातील; आणि असा एखादा कायदा केलाच तर, तो कायदा किंवा त्यातील तो भाग जो ह्या कलमाशी विसंगत असेल, तेवढा भाग महाश्यून्य (अस्तित्वहीन) ठरेल. 

(३) ह्या कलमामध्ये, काही विशिष्ट संदर्भ असल्याशिवाय,

nbsp;   (अ) “कायदा” ह्यात वटहुकुम, हुकूम, उपनियम, नियम, परिपत्रक, चालीरीत, पद्धत ज्याला भारतातील कुठल्याही कायद्याचे स्थान आहे;

    (ब) “लागू असणारे कायदे”, भारतात ही राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी कायदेमंडळाने किंवा इतर कुठल्याही सक्षम अधिकार्‍याने पारीत केलेले कायदे, परंतु जे दुरुस्त केलेले नाहीत; आणि ते प्रत्यक्षातच नाहीत किंवा काही भागात लागू नाहीत;

(४) घटनेच्या कलम – ३६८ प्रमाणे केलेल्या कुठल्याही दुरुस्तीस ह्या कलमातील काहीही लागू होणार नाही.

वरील कलम–१३ (४) ह्या तरतूदीस असे अपेक्षित आहे की, घटना दुरूस्ती करताना ह्या गोष्टीचे भान ठेवले जाईल की, ती प्रस्तावित घटनादुरूस्ती ही अस्तित्वात असलेल्या घटनेच्या मूल रचनेस बाधा पोहचवणार नाही.

आता आपण थोडे मागे जाऊया. ते म्हणजे मारतीय कायद्याचा इतिहास. भारतातील कायदे प्रामुख्याने, चालत आलेल्या परंपरा व रूढी आणि धार्मिक विधाने. आजच्या भारतीय कायद्यांचे मूळ वेदांमध्ये आहे. ब्रोंझ युगात व सिंधु संस्कृती काळातही भारतात कायदे अस्तित्वात होते. वेद काळात, कायद्यांचा मुख्य उद्देश “धर्माचे संरक्षण” असा होता; ज्याचा अर्थ कर्तव्यपूर्ती व सदाचरण. धर्म ह्या संकल्पनेत, कायदेशीर व धार्मिक कर्तव्ये ह्या दोन्हीचा समावेश होता.

महाभारतात युधिष्टीर पितामह भिष्माना विचारतात की, धर्म म्हणजे काय व धर्मात काय समाविष्ट होते. त्यावेळी पितामह भिष्म सांगतात,

तादृशोयमनुप्रश्ंनो यत्र धर्म सुदुर्लभ: |

दुष्कर: प्रतिसंख्यातुमं तत्केंनात्र व्यवस्यति ||

प्रभवर्थाय भुतानां धर्मप्रवचनं क्रुतम |

य: स्यात्प्रभवसंयुक्त: सं धर्म इति निश्चय: ||

धारणाद्धर्ममित्याहुर्ध्र्मेण विधृता: प्रजा: |

य: स्याद्धरणसंयुक्त: सं धर्म इति निश्चय||

सर्व जिवंत प्राणिमात्राचे उत्थापन ज्यात होते किंवा ज्यामुळे होते त्याला धर्म असे म्हणतात. ज्यामुळे प्राणिमात्राचे कल्याण होते तो धर्म. ऋषि मुनींनी असे म्हटले आहे की, ज्याच्यामुळे जीवन जगता येते तो धर्म. धर्म श्ब्दातील “ध्रु” या संस्कृत शब्दाचा अर्थच मुळी धारण करणे असा होतो.

त्तैरिय स्ंहितेप्रमाणे,

धर्मो विश्वस्य जगत: प्रतिष्ठा|

लोके धर्मिष्ठ प्रजा उपसर्पन्ति |

धर्मेण पापमपनुदति |

धर्मे सर्वमं प्रतिष्ठितम |

तस्माद्धर्म परमं वदन्ति ||

जगातील सर्व व्यवहाराचे मूळ धर्मच आहे. लोक त्या व्यक्तीला मान देतात जो धर्माप्रमाणे वागतो. धर्म व्यक्तीचे पापयुक्त विचार व आचारापासून संरक्षण करतो. जगातील सर्व गोष्टींचा आधार धर्म आहे आणि त्यामुळेच धर्म सर्वश्रेष्ठ आहे.

जैमिनी:

स हि नि:श्रेयसेन पुरुषमं संयुएनक्तीति प्रतिजानीमंहे |

तदभिधीवायते चोदनाल्क्ष्णोssर्थो धर्म: ||

सर्वोत्तम ईप्सित प्राप्त्यर्थ ज्या गोष्टींचा उपयोग होतो तो खरा धर्म.

मधवाचार्य हे विजयनगर साम्राज्य स्थापन करणार्‍या हक्का व बुक्का यांचे मंत्री होते. त्यांनी अत्यंत समर्पक शब्दात व थोडक्यात धर्माची व्याख्या केलेली आहे.

अभ्युदय नि:श्रेयसे साधनत्वेन धारयति इति धर्म |

स च लक्षण प्रमाणाभ्यां चोदनासुत्रैर्व्यवस्थापित: ||

धर्म म्हणजे ज्याच्या मुळे धारणा  होते (जीवन जगता येते), ज्याच्यामुळे आयूषात प्रगती होते, समृद्धी मिळते व स्थायी परमशांति प्राप्त होते.

मानवाच्या नैसर्गिक इच्छा व आकांक्षातून निर्माण होणार्‍या समस्यावर उपाय शोधण्यास धर्म मदत करतो.

अकामस्य क्रियाकाचिदृश्यते नेह कहिचित |

यद्यद्धी कुरुते किश्चित तत्तकामस्य चेष्ठितम ||

मानवाची कुठलीही कृती ही इच्छेशिवाय घडत नसते. मनुष्य जे ही करतो ते इच्छेने निर्माण झालेल्या उर्जेमुळेच. मनुस्मृती ११.४

धर्माचे पालन का करावयाचे याचे उत्कृष्ट उत्तर भगवान मनुनी दिलेलेआहे.

धर्म एव हतो ह्ंति धर्मो रक्षति रक्षित: |

तस्माद्ध्र्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोsवधीत ||

धर्म त्यांचे रक्षण करतो जे धर्माचे रक्षण करतात. जे धर्माचा नाश करतात, धर्म त्यांचा निनाश करतो. त्यामुळे धर्माचा नाश होणार नाही याची काळजी घेतली तर आपलाही विनाश होणार नाही.

त्या काळातील, कायद्याचे स्त्रोत म्हणजे श्रुति, स्मृति, रूढी हे होत. श्रुतीमध्ये चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांचा समावेश होतो. वेदांमध्ये प्रामुख्याने, धार्मिक कर्तव्ये वपरंपरा आणि चालीरिती यांचा समावेश आहे. दूसरा स्त्रोत म्हणजे, स्मृति, ज्याचा अक्षरश:” अर्थ होतो “जसे ऐकलेले”, ज्याचा संदर्भ परंपराशी आहे. काही प्रमुख स्मृतीमध्ये धर्मशास्त्र महत्वाचे आहे. त्यात, मनुस्मृती (इसवीसनापूर्वी २०० वर्षे), याज्ञवलक्य स्मृति (इसवीसनापूर्वी १०० ते ४०० वर्षे), नारदस्मृति (इसवीसनापूर्वी १०० ते ४०० वर्षे, विष्णुस्मृती (इसवी सन ७०० ते १०००), बृहस्पती स्मृति (इसवी सन २०० ते ४००) आणि कात्यायनस्मृति (इसवी सन ३०० ते६००) यांचा समावेश होतो. हया स्मृतींचा आधार बर्‍याच वेळा न्यायदाना करिता घेतल्या जातो. ह्या सर्व स्मृति धर्मविषयक बाबींचा विचार करतात. धार्मिक विषयांकरिता ते मार्गदर्शक आहेत.

वेदिक काळात, कायदेशीर प्रक्रिया, ज्यात दावा दाखल करणे याला “व्यवहार” असे म्हणत होते. आताच्या न्यायालयीन भाषेत ज्याला “वाद” म्हणतात त्याला पूर्वी “पूर्वपक्ष”, व ज्याला आता प्रतिवाद म्हणतात त्याला पूर्वी “ उत्तर” म्हणत असत. दावा चालविण्याला पूर्वी “क्रिया” म्हणत, तर निकालाला “निर्णय” संबोधत होते. धर्मशास्त्र म्हणजे “सदाचाराचे शास्त्र”. धर्मशास्त्राविषयी भारतात जवळपास ५००० ग्रंथ उपलब्ध आहेत. धर्मशास्त्रात फक्त हिंदू ग्रंथ नसून त्यात शैव, वैष्णव यांचाही समावेश होतो. वेदांपैकी तीन वेद हे यज्ञ कसे करावयाचे याविषयी आहेत. ऋग्वेदामध्ये यज्ञाच्यावेळी म्हणावयाचे मंत्र आहेत.

सामवेदामध्ये यज्ञाच्या वेळी गाण्याच्या मन्त्रांचा समावेश आहे. ऋग्वेदात जारणमारण या विषयी मंत्र आहेत. धर्मशास्त्रामध्ये भगवान मनू, प्रभू रामचंद्र, युधिष्टीर आणि भगवान गौतम बुद्ध हे समाविष्ट आहेत.

धर्म म्हणजे मनाचे कार्य करण्याचे नियम, किंवा समाजात वागण्याचे नियम. हिंदू तत्वज्ञानात, न्याय, सामाजिक सोहार्द्र आणि आनंद तेव्हाच मिळू शकतो, जेव्हा लोक धर्माप्रमाणे वागतात. अशा सर्व नियमांनाच धर्मशास्त्र म्हणतात. त्या काळात धर्म व कायद्याचा उद्देश हा वैयक्तिक व सामुदायिक कल्याण असा होता. धर्म हा मानवी आयुष्याचा अंतिम उद्देश असावा, असाच दंडक त्यावेळी होता. जैमिनीनी वेदाचरनाणे सामाजिक कल्याण प्राप्त करणे यालाच धर्म म्हटलेले आहे. धर्म ही संकल्पना वेदकालीन “रीत” ह्याच्या पलीकडे जाते. न्यायमूर्ति रामा जोईस यांच्या म्हणण्याप्रमाणे, धर्म त्याला म्हणतात, जो मानवाला धारण करण्यास सहाय्यभूत होतो, शिवाय तो मानवाची प्रगती आणि कल्याण ह्या जगात तसेच त्याही पलीकडे शाश्वत परमानंद प्राप्त करून देतो. भारताच्या मा सर्वोच्च्य न्यायालयाने कित्येक निवाड्यात धर्माच्या आधारावर निकाल दिलले आहेत. त्यातील एक प्रसिद्ध प्रकरण म्हणजे श्री ए एस नारायण दीक्षितुलू विरुद्ध आध्र प्रदेश सरकार आणि इतर (१९९६ AIR १७६५). त्या प्रकरणात धर्म म्हणजे रिलीजन नव्हे हे स्पष्ट केले आहे. धर्म हा सामान्यपणे आपण ज्याला धर्म म्हणतो तो नव्हे, ज्यात प्रत्येक नागरिकाच्या नियमित व्यवहाराबाबतचे सर्वंसामान्य व विशेष नियम उधृत केलेले आहेत.

याज्ञवल्यस्मृति: याज्ञवल्क्य हे वेदकालीन महर्षि होते. त्यांचा उल्लेख उपनिषदात आढळतो. इसवी सना पूर्वी ८०० ते ७०० ह्याकाळात ते होऊन गेले. माहीत असलेल्या इतिहासप्रमाणे, याज्ञ्ववल्क्य हे सर्वात जुने तत्वज्ञ आहेत. निसर्गाचे स्वरूप, जागरूकता, आधिभौतिक विश्व या सारख्या अतिगहन विषयावर चर्चा यांच्याच कलावधीत सुरू झाली. सर्वानुभूती परमेश्वर व आत्मनुभूती व त्याच्बरोबर “हे नाही, हे नाही” (नेति नेति) हा सिद्धान्त त्यांनी मांडला. हिंदुधर्मशास्त्रात “अद्वैत” (दोन नाही) सिद्धान्त सर्वंप्रथम याज्ञवल्क्यानी मांडला. त्यांनी लिहीलेल्या ग्रंथांमध्ये याज्ञवल्क्यस्मृति, योग याज्ञवल्क्य या ग्रंथांचा समावेश होतो. याज्ञवल्क्यांचा उल्लेख ब्राहमणे व आरण्यकामध्ये आढळतो. शुक्लयजुर्वेद, शतपथ ब्राम्हण, बृहदारण्य उपनिशद, याज्ञवल्क्यस्मृति, वृद्धंयाज्ञ्व्ल्क्य, बृहद याज्ञवल्क्य या सर्व महान ग्रंथाची रचना महर्षि याज्ञवल्कयानी केलो. त्यांच्याए अभूतपूर्व ज्ञांनामुळे त्यांचा उल्लेख महाभारत, पुराणे व प्राचीन जैन ग्रंथ यशतिलका (Yashtilaka)  या ग्रंथात आढळतो. महर्षी याज्ञवल्क्यानंतर त्यांच्या मुलाने, महर्षि वाजसनेयांनी योग याज्ञवल्क्याचे लिखाण केले. याज्ञवल्क्यस्मृतिच्या आधारेच मिताक्षरा हा ग्रंथ लिहिल्या गेला. मिताक्षरा ही याज्ञवल्क्यस्मृतिवर लिहिलेली टीका आहे. ही टीका वाजसनेय यांनी लिहिली आहे. मिताक्षरा हा ग्रंथ’ हिंदू वारसा हक्कासंबंधात लिहिलेला आहे. अकराव्या व बाराव्या शतकात वाजसनेय हे चालुक्याच्या दरबारात होते.  याज्ञवल्क्यस्मृती व मिताक्षरा मिळून साधारणत: ४९२ पृष्ठांचा ग्रंथ आहे. वाजसनेय हे पूर्वमीमांसाचे अभ्यासक होते॰

मनुस्मृती: भगवान मनूनी लिहिलेली म्ंनुस्मृती हा जगातील सर्व कायद्याच्या ग्रंथातील प्राचीन ग्रंथ आहे. हा १७९४ मध्ये इंग्रजीत भाषांतरित झालेला हा पहिला संस्कृत ग्रंथ आहे. तो सर विल्यम जोन्स यांनी अनुवादीत केलेला आहे. मध्ययुगीन काळात (इसवी सन १२०० च्यापुढे) भारताच्या बाहेर देखिल मांनुस्मृतिचा प्राचार व प्रसार झालेला असून बुद्धिस्ट कायद्यांचा आधार मनुस्मृती असल्याची श्रद्धा मायनामर (ब्रम्हदेश) व थायलँड (सयाम) येथे दिसून येते. प्राचीनकाळात कंबोडिया (क्ंबोज) व इंडोनेशिया, व्हिएतनाम (चम्पा) व फिलिपाईन्स या सर्व ठिकाणी हिंदू साम्राज्ये होती.

धॄतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥

याचा अर्थ असा आहे की, धर्माची दहा लक्षणे आहेत. धैर्य, क्षमा, आत्म-नियंत्रण, चोरी न करणे, पवित्रता, इंद्रिय संयमं, बुद्धी, विद्या, सत्य आणि राग न येणे.

फिलीपाईन्स पूर्वी जावाच्या विजय साम्राज्याचा भाग होता व त्यामुळे त्या ठिकाणी हिदू धर्म, संस्कृति व कायदे लागू होते. तेथील कायदेमंडळात भगवान मनूचे चित्र  लावलेले माझ्या वाचण्यात आले आहे.

कायद्याचे मुळस्त्रोत:

‘धर्मयोनीह’ ही २४ सूत्रे कायद्याचा मूल स्त्रोताविषयी आहेत.

“वेदोsssखिलो धर्ममूलमं स्मृतिशीले च तद्विद्म |

आचारश्चईव साधुनात्मनस्तुष्टिरेव च || म्ंनुस्मृती – २.६ |

पवित्र वेद हे कायद्याचे प्रथम स्त्रोत आहेत. त्यानंतर, परंपरा, रूढी  व चालीरीती हयाही स्त्रोत आहेत.

वेद: स्मृति: सदाचार: स्वस्य च प्रियमात्मन: |

एतच्चतुर्विध्मं प्राहु: साक्षाद धर्मस्य लक्षणमं || म्ंनुस्मृती – २.१२

धर्माचे चार पैलू म्हणजे वेद, परंपरा, लोकांचा व्यवहार आणि स्वत:ल प्रेयस वाटणार्‍या गोष्टी.

कठोपनिशद – ४५

तस्माच्छास्त्रानुसारेण राजा कार्यानि साधयेत |

वाक्याभावे तु सर्वेषा देशदृष्टेन सन्नयेत ||

अस्वर्ग्या लोकनाशाय परानीकभयावहा |

आयुर्बीजहरी राद्न्यम सति वाक्ये स्वयं कृति: ||

राजाने शास्त्रापप्रमाणे समस्या सोडवाव्यात; आणि तशा प्रकारचा संदर्भ शास्त्रात उपलब्ध न झाल्यास, राजाने रूढीचा आधार घ्यावा. राजाने कधीही आपल्या मनाने किंवा इछेने कार्य करू नये. अशा प्रकारे स्वत:च्या मर्जीने राजाने राज्याचा कारभार चालविला तर राजा स्वत:हून संकट उभे करेल व त्यामुळे, त्याचा विपरीत परिणाम लोकांवर होईल.

वेदोsखिलो धर्ममुलं स्मृतिशीले च तद्विदाम |

आचारश्चईव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च || म्ंनुस्मृती – ११.६ धर्माचा सर्व प्रथम स्त्रोत वेदच आहेत. स्मृतिकारानी पिढ्यान पिढ्या मौखिक पद्धतीने, ज्यांचे वेदांचे ज्ञान उत्तम आहे त्यांच्या वर्तनाचे दाखले, कोणते वर्तन सदाचारस अनुसरून आहे हे विशद केले. 

याज्ञवल्क्य: १.७

श्रुति: स्मृति: सदाचार: स्वस्य च प्रियमात्मएन: |

सम्यकसंकल्पज: कामो धर्ममूलमिदं स्म्रुतं ||

चांगल्या उद्देशाने प्रेरित होऊन सदाचारास अभिप्रेत असलेले, चांगली वागणूक, सर्वसम्मत चालीरीती, वेद, स्मृती हे सर्व कायद्याचे स्त्रोत आहेत.

गौतम: २३४-१९-२०

तस्य च व्यवहारो वेदो धर्मशास्त्राण्यंगान्यूपवेदा: पुराणम |

देशजातिकुलधर्म श्च्याम्ंनायैरविरुद्धा: प्रमाणमं ||

न्यायदानाचे काम हे वेदांप्रमाणे, परमंपवित्र कायद्याच्या संस्था, वेदांगे व पुराणाप्रमाणे केल्या जाईल. कायद्याच्या विरोधात जात नसतील तर देशाच्या, कुटुंबाच्या व जातीच्या परंपरा ह्यांना पण न्यायदानात मान्यता असेल. कृषिक, व्यापारी, मेंढपाळ, सावकार आणि कारागीर यांना आपआपल्या क्षेत्राकरिता नियम बनविता येतील.

भगवान मनूनी तयार केलेले नियम, तसेच महर्षि याज्ञवल्क्य, गौतम आणि बृहस्पति यांनी पुरस्कृत विधानाकडे पाहिले असता असे लक्षात येते की, स्मृतिकाराना बदलणार्‍या सामाजिक गरजा विषयी कल्पना होती; म्हणूनच त्यांनी “सदाचार” ह्यावर भर दिलेला दिसतो. सदाचाराची परिभाषा ऋषि हरितानी मांडली ती अशी,

साधव: क्षीणदोषा: स्यु: सछ्च्द: साधुवाचक:|

तेषामाचरणमं यत्तु स सदाचार उच्यते ||

सदाचार म्हणजे अशा लोकांचे वर्तन जे कुठल्याही अमंगल कार्यात लिप्त नाहीत व ज्यांचे विचार देखील सदोदित शुद्ध व मंगलकारक आहेत.

श्रुतिस्मृतिपुराणानां विरोधे यत्र दृश्यते |

तत्र श्रौतं प्रमाणन्तु तयोर्द्वेधे स्मृतित्वरा ||

जेव्हा जेव्हा श्रुति (वेद) स्मृति आणि पुरानामध्ये विसंवाद निर्माण होईल, तेव्हा तेव्हा जे श्रुतिमध्ये विशद केलेले आहे ते प्रमाण मानण्यात येईल.

समानता तत्व:

यजुर्वेद: २-२१-१

स्मृत्योरविरोधे न्यायस्तु बलवान व्यवहारत: |

जेव्हा दोन स्मृतिमध्ये (वेदांमध्ये) विसंगती निर्माण होईल, तेव्हा लोकमान्य पद्धतीप्रमाणे निर्णय घ्यावा.

अपवाद:

यद्यदाचरति श्रेष्ठो धर्म्यम वाsधर्म्यमेव वा |

कुलदिदेशाचरणाच्चरित्र्म तत्प्रकीर्तितम ||

ग्रामगोष्ठपुरश्रेणीसार्थसेनानिवासिनाम |

व्यवहारश्चरित्रेण निर्णेत्व्यो बृहस्पति: ||

देशपत्तन गोष्ठेषू पुरग्रामेषू वासिनाम |

तेषामं स्वसम्यैयर्धर्मशास्त्रतोsन्येशु तैसह ||

कायद्याला धरून असेल किंवा नसेल, जर एखादी प्रथा देशातील कुटुंबे पाळीत असतील तर तशा प्रथेस मान्यता मिळेल.

धर्मकोष:

श्रुतिस्मृतिविरुद्ध्मं च भुतानामहिमं च यत |

न त्त्प्र्वर्तयेद्राजा प्रव्रुत्त्मं च निवर्तयेत ||

न्यायापेतं यदन्येन राज्ञा ज्ञानक्रुतमं भवेत |

तदप्यन्यायविहितं पुनन्यार्ये निवेशयेत || जेव्हा कायद्याची तंत्वे आणि मार्गदर्शक विचार यांच्यात तफावत पडते, तेव्हा राजाने कायद्याचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु जेव्हा कायद्याचे पालन करणे अशक्य असेल, तेव्हा समंर्पक कारणांचा आधार घेऊन कायद्याच्या तरतुदींना बाजूस ठेवावे.

कायद्याची परिभाषा:  

तदेत्त क्षत्रस्य क्षत्र्म यदधर्म|

तस्माद्धर्मात्परं नास्ति |

अथो अबलीयान बलीयांसमांशसते धर्मेएन |

यथा राज्ञा एवमं ||

कायदा हा राजांचा राजा आहे. कायद्यापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. राजाच्या शक्तीने कायदा अधिक बलवान होतो, ज्यामुळे अशक्त नागरिकही शक्तिशाली व्यक्तिविरुद्ध सामना करू शकते.

न्यायतत्त्वशास्त्र:

कायद्याच्या क्षेत्रात बर्‍याच वेळा कायद्याचा अर्थ नव्याने लावावा लागतो. कायद्याचा अर्थ कसा लावावयाचा याचेहि एक शास्त्र आहे व त्यालाच “न्यायतत्वशास्त्र” (Jurisprudence) असे म्हणतात. प्राचीन भारतात त्या काळातील न्यायतत्वज्ञानी मीमांसा तत्वे ग्रथित केली. कायदेकारी मंडळ नेहमी विचारपूर्वक कायद्याची निर्मिती करीत असते, तरीही बदलत्या सामाजिक परिस्थितिमुळे कायद्याचा नव्याने अर्थ लावावा लागतो व त्याकरीताच न्यायतत्वशास्त्र आवश्यक आहे. ह्या शास्त्राच्या बर्‍याच बाजू किंवा पैलू आहेत. आपला तो विषय नसल्यामूळे व त्याची इथे आवश्यकता नसल्यामूळे त्यास बाजूला ठेवणे हितावह ठरेल.

भारताच्या राष्ट्रीय मानचिन्हामधील “सत्यमेव जयते” हे महावाक्य मांडूक्य उपनिषदातून घेतलेले आहे. त्याचा अर्थ सत्याचाच नेहमी विजय होत असतो. न्यायतत्वशास्त्रज्ञामध्ये, महर्षि नारद,  महर्षि जैमिनी, महर्षि यज्ञवल्क्य, भगवान मनू, आचर्य कौटिल्य (चाणक्य), महर्षि गौतम, भगवान महावीर, प्रभू रामचंद्र, पितामह भिष्म वगैरे आहेत.

कल्याणकारी राज्य, मानवी अधिकार, मूलभूत अधिकार, समानता, सर्वधर्मसमंभाव ह्या व इतर अनेक राज्यघटनेतील तरतूदींचा उगम हा चतुर्वेद, श्रुति, स्मृति, उपनिषद व पुरानामध्ये आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, “Rex is Lex and Lex is Rex”. याचा अर्थ असा आहे की, राजा म्हणजेच “ कायदा व कायदा म्हणजेच राजा.” वास्तविक भगवान मनुने म्ंनुस्मृतीमध्येच हे तत्व मांडलेले आहे. ते असे, “कायदा हा राजांचा राजा आहे.”

हिंदुत्व ही जगण्याची पद्धती आहे. त्याचा रिलीजन (Religion) या श्ब्दाशी काहीही संबंध नाही. कुठल्याही श्र्द्धेच्या मार्गाने प्रत्येक नागरिकाला पुजा, प्रार्थना व भक्ति करण्याचा पूर्ण अधिकार आहे व अशा व्यवस्थेलाच ‘निधर्मी’ असे म्हणतात. निधर्मी म्हणजे धर्म विरहित नव्हे, तर ‘सर्वधर्मसमभाव’. या व्यवस्थेची खात्री भारतीय राज्य घटनेच्या कलम–१४ मध्ये दिलेली आहे; कायदायासमोर सर्व समान आहेत. कुठलाही एखादा विधी किंवा पूजाअर्चा करणे म्हणजे धर्म नव्हे.

बृहस्पति संहितेत न्यायालयांची रचना विशद केलेली आहे. त्यात सर्वात प्रथम कुटुंब न्यायालय व सर्वात वरिष्ठ राजा असे. सर्वसाधारणपणे ह्याच पद्धतीप्रमाणे आजही भारतात न्यायव्यवस्था  प्रचलित आहे. याचा अर्थ असा आहे की, आपल्या देशात असणारे कायदे, कायद्याची तत्वे, कार्यप्रणाली, न्यायदांनाची व्यवस्था, हे सर्व ब्रिटीशांची नक्कल नसून त्या सर्वांचा उगम व मूलस्त्रोत हा आपल्या प्राचीन भारतातील ऋषि, महर्षि, विचारवंत यांच्या मंहान कार्‍यातून झालेला आहे.

उपसंहार:

अमेरिका, इंग्लंड, रशिया वगैरे देशांना पुढारलेले देश म्हणणे किंवा भारताला प्रगतीशील देश म्हणणे हे किती चुकीचे आहे याची थोडीशी का होईना कल्पना वाचकाना आली असेल. इछुकानी याबाबत अधिक खोलवर जाऊन अभ्यास केला तर लक्षात येईल की, आपण जगाच्या किती पुढे, कित्येक वर्षापूर्वीच पोहचलो होतो. गणित, विज्ञान, रंसायनशास्त्र  ह्या भौतिक विज्ञानाच्या विषयात तर पुढे होतोच, पण त्याशिवाय, कायदा, न्यायशास्त्र व न्यातत्वशास्त्र ह्या सारख्या प्रगत विषयात देखिल आपला देश फारपूर्वीच समृद्ध झालेला होता व त्याचा आपल्याला आनंद वाटायला हवा. 

**************************************************************************

मुकुंद भालेराव

सामान्य विधी स्नातक (१९७८),

विधी स्नातक (करप्रणाली व कामगार कायदे) १९७९

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

**************************************************************************

प्रचार प्रमुख – देवगिरी प्रांत: संस्कृत भारती

संपर्क सूत्र : विद्युतसंदेशसूत्र : mukundayan@yahoo.co.in  

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top