Marathi

ते कसले शेतकरी..

दिल्लीच्या दारावर बरे, कोण तिथे उभे आहे,
वाटा सगळ्या रोखून तिथे, कोण बसले आहे..

काय त्याना हवे आहे, खरे त्याना माहीत नाही,
कुणी तरी फसवून त्याना, खरे काही सांगत नाही..

नियम सारे तोडून आले, अडथळेही फेकून आले,
पोलिसाना धक्काबुक्की, खुशाल सारे करून आले..

वाचले नसतील तीन कायदे, एकानेही निघण्यापूर्वी,
नसतील समजून घेतले त्यांनी, काय फायदे जाळण्यापूर्वी..

करोंना भयंकर आहे तरी, मास्क कुणी लावत नाही,
अंतराचा नियम पाळून, काळजी कुणी घेत नाही..

इतके दिवस रस्त्यावर, ठाण मांडून बसले आहे,
शेतात यांच्या काम कसे, तरिही मात्र सुरू आहे..

लस्सी छान तिथे आहे, काजू बदाम आराम आहे,
नागरिकांच्या व्यवहाराला मात्र, पूर्ण विराम देत आहे….

खरेच आहे का हे शेतकरी, वेठीस सारे धरून बसले,
कायदा नाही कोविड नाही, भिती सारे सोडून बसले..

लाखों करोडो रुपये यांना, कोण बरे आणून देतो,
स्त्रिया, मुळे, वृद्धाना, कोण बरे घेऊन येतो..

लंगर यांचे चाले जोरात, यांच्या मागे कोण आहे,
फक्त पंजाबच्याच शेतकऱ्याना, कशाची बरे भिती आहे….

संसद नाही कायदा नाही, पोलिसांची भिती नाही,
आणि आता म्हणे यांना, न्यायालयाचे ऐकणे नाही..

गणतंत्र दिवसाला यांना, तमाशा करायची ईछ्या आहे,
ट्रॅक्र्दरची परेड यांना, निरलज्प्ईणे करायची आहे…

देश नाही कायदा नाही, नियम मोडीत काढीत आहेत,
कारण यांचा बोलविता धनी, कुणी तरी दुसराच आहे..

प्रश्न नाही कायद्याचा, ना फायदा तोट्यांचा,
डाव त्यांचा वेगळा आहे, अराजक माजविण्याचा..

आधी म्हणाले करु आदर, सर्वोच्च् न्यायालयाचा,
आता म्हणतात करत आहे, सरकार वापर न्यायालयाचा..

घातकी वाटते चाल यांची, कसले यांचे कारस्थान,
देश तर नाही तोडणार, दुष्ट घातकी कारस्थान….

बस्स आता पुरे झाले, लाड आणि कौतुक यांचे,
निरागस कसले हे शेतकरी, फसवे सारे चेहरे यांचे..

कायदे रद्द करू नका, हमी मात्र जरूर द्या,
छळ त्यांचा होणार नाही, काळजी मात्र जरूर घ्या..

———————————————————————————————————
मुकुंद भालेराव | औरंगाबाद |
संपर्क : | mukundayan@yahoo.co.in |

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top