स्वर्गीय दृश्य ऐसे, स्मरणात साठलेले
ऋचा मुनीजनांच्या, आसमंत भारलेले….
ऐसे पवित्र सारे, गंगोदकात दिसलें,
माझेच रूप मी ते, गंगेत पाहिलेले….
कैसे पवित्र सारे, हिमरूप मंत्र झाले,
जीवनात तृप्त दिसलें, माझे मलाच सारे….
मन सारखे तिथेच, अवचित फिरुनी जाते,
कैसे मनास आवरू, ते थांबता न थांबे…..
जावे फिरुनी तेथे, का ओढ अंतरीची,
उमगे मला न काही, ही ओढ ही कशाची..
पावित्र्य शुद्ध येथे, आहे चराचरात,
सारेच शुद्ध भाव, त्या वायुच्या गतीत..
काही न बंध तेथे, सारेच मुक्त आहे,
स्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…
Back To Top