Marathi My Articles

शब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण

अज्ञेभ्यो ग्र्न्थिन: श्रेष्ठा ग्रंथिभ्यो धारिणो वरा: |

धारिभ्यो ज्ञनिन: श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिन: ||मनुस्मृती.१०३||

अशिक्षित व्यक्तिपेक्षा शिक्षित मनुष्य श्रेष्ठ. ग्रंथातील ज्ञान हृदयस्थ करणारा केवळ  वाचणार्‍यापेक्षा श्रेष्ठ. केवळ ग्रंथ हृदयस्थ करणार्‍यापेक्षा त्यातील खरे ज्ञान ज्याने आत्मसात केले तो अधिक श्रेष्ठ; आणि जो आत्मसात केलेय ज्ञानाप्रमाणे आपले आयुष्य जगतो तो सर्वात श्रेष्ठ. तर असे श्रेष्ठ ज्ञान मिळविण्याकरिता सर्वप्रथम उत्कृष्ट ग्रंथांचे वचन तर करायलाच पाहिजे व त्यातील मतितार्थही समजायला पाहिजे.

ज्ञानेश्वर माउलीने सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये दहाव्या अध्यायात असे म्हटले आहे,

जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी |

जरी मुकेयाते अंगिकारी |

तो वाचस्पतीशी  करी | प्रबंधुहोडा ||१०.८||

आपल्या प्रेमरूपी सरस्वतीने एखाद्या मुक्याचा जरी अंगिकार केला, तर तो मुकासुद्धा बृहस्पतीबरोबर वादविवाद करण्याची पैज मारू शकेल. हे  जरी खरे असले तरी मनुष्याला प्रयत्न तर करावेच लागतील. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाला देखिल गलीतगात्र झालेल्या अर्जुनाला युद्धप्र्वृत्त करण्याकरिता किती कष्ट घ्यावे लागले व नंतर संपूर्ण युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करावे लागले. तसेच आपल्याल देखील कष्ट तर करावेच लागतील. परिणामत्रयसंयमादतीतानागतज्ञाननम् |” पातंजल योगसुत्र-विभूतिपाद-१६ | ज्ञानार्जन करण्याकरिता वचन, मनन व चिंतन आवश्यक आहे.

तस्मादकृतकं शास्त्रं स्मृतीं च सनिबन्धनाम्|

आश्रित्यारभ्यते शिष्टै: शब्दानामनुशासनम् || वाकपदीय – १.४३ ||

कोणीही न रचलेला वेद व शिष्टव्यवहारानुसार पूर्वींच्या ऋषींनी तयार केलेली व्याकरणशास्त्रे ह्या सर्वांचा आधार घेऊन ऋषींनी हे साधू शब्दांचे शास्त्र सुरू केलेलं आहे. (वाक्यपदीय-१. १७३)

अतोSनिर्ज्ञातरुपत्वात्किमाहेत्याभिधीयते |

नेंद्रियाणाम प्रकाश्येSर्थे स्वरुपं गृह्यते तथा || वाक्यपदीय – १.५७||

 शब्द हा केवळ इंद्रियाप्रमाणे असल्याने अर्थज्ञानाचे कारण होऊ शकत नाही, तर तो अर्थ जाणल्यानंतरच अर्थज्ञानाचे कारण होऊ शकतो. ह्य वस्तुस्थितिची प्रचीति कांही विशेष प्रसंगी आपणास व्यवहारातही जाणवते.

पाणिनिनीय शिक्षेमध्ये असे म्हटले आहे,  

आत्म बुद्ध्यासमेत्यार्थन युङ्ग्ते विवाकस्या |

मना: कायाग्निमहानती सा प्रेरयती मारूतं ||

मारूतस्तुरसि करन मंद्रम जानायते स्वरं |||

सोदिर्नो मुर्धन्या भिहतो वक्त्रमापद्या मरुत: वर्णन  जानयते ||९||  

Soul with the help of intellect, registers an object in mind. Then, with a desire to utter words that express the object, the soul inspires the mind. The mind, in turn, inspires the fire in the body. The spurred fire moves the air all over the body. Thus, air that is pushed, moving in the heart, makes a gentle sound. Lastly, the air enters the head and rebounds, touching the throat, palate and other places, issues out as letters. Therefore, a letter (वर्ण) means conjunction of air with source-places of letters. But the air unrelated to these places of origination of letters is sound (ध्वनि). The lines or strokes we have conceived to understand words constitute script (लिपि)

इंद्रियस्यैव संस्कार: शब्दस्यैवोभयस्य वा |

क्रियते ध्वनिभिर्वादस्त्रयोभिव्यक्तिवादिनाम् || वाकपदीय – १.७८||

अर्थबोध करून देणारा स्फोटरूप शब्द नित्य आहे. ध्वनिमुळे तो उत्पन्न होत नाही तर अभिव्यक्त होतो, जसा पंख्यामुळे असलेला वारा अगर दिव्यामुळे पूर्वी असलेलेच पदार्थ व्यक्त होतात, असे वैययाकरणांचे व मीमांसकांचे मत आहे. त्यांचाच उल्लेख प्रस्तुत कारिकेमध्ये ‘अभिव्यक्तीवादीनाम्’ ह्या शब्दांने केलेला आहे.

भर्तृहरीने त्यांच्या वाक्यपदीयमध्ये ध्वनिबाबत खूप चांगले विवेचन केले आहे. It is made as an observation in Bhartruhari’s Vakyapadiy that when a letter or sound is made, the sound atoms are produced like ripples when a piece of stone is dropped into a lake. These atoms spread like the clouds that scatter in the sky. These atoms so spread are apprehended by the ear. According to grammarians, Shabda (शब्द) is not comprised of letter or sound. It is ‘Sphota (स्फोट) manifested by the letter or sound. That is, the sound and the letter are the creators / makers of the ‘Sphota’ (स्फोट). For e.g. by manifesting, this through conglomeration of the letters ‘gauh’ (गौ), the idea of cow is obtained, in Shabd or Sphota. However, I usage, the term Shabd denotes letters and sound. This is to be understood only in a secondary sense. Shabdpratyay (शब्दप्रत्यय), then, would mean the sound atoms or waves entering or coming in contact with the auditory organ. But the primary sense of Shabd is Sphota (स्फोट) only. Its perception means manifestation. The Sphota envelopes the entire world. Rather, the world is just an appearance of this Sphota; and the Sphota is the material cause of this world.  (Page No. 181 – 183)

वैयाकरणी कशाला ‘शब्द’ संबोधतात? सर्वसामान्यपणे अक्षरांच्या समूहाला ‘शब्द’ असे  आपण दररोजच्या व्यवहारात म्हणतो, परंतु वैयाकरणी असे म्हणत नाहीत. In the opinion of the grammarians, the ‘Vaikhari-Nada (वैखरी-नाद) is the manifestations of Shabd (शब्द). It is comprised of letters. The letters themselves originate as follows: Soul in association with intellect (बुद्धी) comes to know about what is desired to be said and instigates the mind. The mind spurs the fire in the body.   The fire, in turn, activates the air in the   Muladhar Chakra (मूलाधार चक्र), which is the region below navel. This air       moves up the head and strikes against it (the skull portion). Afterwards, having entered the mouth produces letters through throat palate and other places. These letters are not Shabda. Shabd is what is manifested by these letters.

Sphota (स्फोट) manifested by Madhyama-Nada (मध्यमानाद) is termed as Madhyama Vaak (मध्यम- वाक), because the speaker comes to know of the meaning through this. So, Sphota is that by which sense is known:

स्फुटती अर्थ: अनेना इति स्फोट: |

स्फोटयती अर्थं इति वा स्फोट:  ||

The Sphota expressed by Vaikhari – Nada makes the sense clear to others. In all, according to grammarians, sound (नाद) and Shabd are different. While sound is apprehended by the auditory sense Shabd is apprehended by the intellect.

मला वाटते पुढे जाण्यापूर्वी ‘सूत्र’, ‘वार्तिक’, व ‘भाष्य’ या तीन शब्दांची नेमकी परिभाषा पाहणे हितावह ठरेल.

सूत्र:

‘अल्पाक्षरमसंदिग्धं सारवद्विश्वतोमुखम् |

अस्तोभमनवद्यं च सूत्रं शास्त्रविदो विदु: ||’

ज्यागोष्टीचा उपयोग पुष्कळ ठिकाणी होतो, त्यातील उपयोगी पडणारा असा मुख्यभाग ज्या वाक्यांमध्ये थोडक्या अक्षरांनी नि:संशय रीतीने प्रतिपादन केला आहे, म्हणजे अर्थातच ज्यामध्ये वायफळ अक्षरे मुळीच नाहीत त्या वाक्याला सूत्र म्हणतात.

वार्तिक:

“उक्तानुक्तदुरूक्तानां चिंता यत्र प्रवर्तते |

तं ग्रन्थं वार्तिकं प्राहुर्वार्तिकज्ञा मनीषिण: ||”

सूत्रामधील उच्चारलेला शब्द तसाच न उच्चारलेला शब्द आणि भलताच कांही तरी शब्द पडला असल्यासारखा भासणारा शब्द यांसंबंधी सर्व प्रकारचा विचार ज्यांमध्ये केला  जातो त्या ग्रंथाला वार्तिक असें म्हणतात,

भाष्य:

“सुत्रार्थो वर्ण्यते यत्र पदै: सूत्रानुकारिभि: |

स्वपदानि च वर्ण्यन्ते भाष्यं भाष्यविदो विदु: ||”

सूत्रातील शब्दासारख्याच शब्दांनी ज्या ठिकाणी सूत्रांचा अर्थ दाखविला जातो, आणि आपणच उच्चारलेल्या पदांचा म्हणजे वाक्यांचा अर्थ आपणच सांगितलं जातो त्याला ‘भाष्य’ म्हणतात.

अक्षरे (स्वर व व्यंजने) आत्मसात केल्याशिवाय तर पुढचे काहीच ना ते वाचता येईल ना ते समजेल. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की, बाराखडीतील मुळाक्षरे तर ‘मूळ’ आहे कुठलेही ज्ञान संपादन करण्याचे. श्रीमदभगवद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ‘विभूतियोगात साङ्गतात,

अक्षरणामकारोSस्मि द्वंद्व: सामासिकस्य च | भगवदगीता: विभूतियोग.३३|

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ” संस्कृत वर्णमालेतील ‘अ’ कार या प्रथम स्वरापासून वेदांचा प्रारंभ होतो. ‘अ’ काराविना कोणताच ध्वनि काढता येत नाही, म्हणून ‘अ’ हा ध्वनिचा प्रारंभ आहे.  संस्कृत भाषेमध्ये अनेक सामासिक शब्द आहेत.  वर्णमालेत सर्व प्रथम आकार येतो. स्वर आणि व्यंजन–दोन्हीत आकार मुख्य आहे. अकाराविना व्यंजनाचा उच्चार होत नाही, म्हणून भगवंतांनी अकाराला आपली विभूति म्हटले आहे. ‘द्वंद्व सामासिकस्य च’… दोन किंवा अधिक शब्द मिळून जो एक शब्द बनतो, त्याला समास म्हणतात. समास पुष्कळ प्रकारचे असतात. त्यात अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व हे चार मुख्य आहेत. दोन शब्दांच्या समासामध्ये जर पहिला शब्द मुख्य असेल तर तो ‘अव्ययीभाव’ समास होतो. जर शेवटचा शब्द प्रधान असेल तर तो ‘तत्पुरुष’ समास होतो. जर दोन्ही शब्द तिसर्‍याचे वाचक असतील तर तो ‘बहुव्रीही’ समास होतो. जर दोन्ही शब्द मुख्य असतील तर तो ‘द्वंद्व’ समास होत असतो. द्वंद्व समासात दोन्ही शब्दाचे अर्थ मुख्य असल्याने, भगवंतानी  त्याला  आपली विभूति म्हटले आहे.  

चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राम्हणा ये मनीषिण: |

गुहा त्रीणी निहिता नेङ्गयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति || ऋग्वेद:१-१६४-४५ ||

वाक्-वाण, भाषा इतकी विशाल आणि गूढ आहे, की ती चार प्रकारची वाणी फक्त मनीषा ऋषीच जाणू शकतात. तिचे केवळ ‘तुरी’ नावाची सामान्य वाचा; भाषाच काय ती मनुष्य बोलण्यास समर्थ आहे. पूर्वी (संस्कृत) भाषा ही प्र्कृति-प्रत्ययादी विश्लेषणरहित अशा नउ अव्याकृत अवस्थेत होती. ही अव्याकृत अवस्था देवांना रुचेना, म्हणून त्यांनी इंद्राकडे जाऊन मागणी केली, “ हे इन्द्रा ! आमच्या या वाचेचे तू विश्लेषण कर.’  ही विनंती ऐकून इंद्राने भाषेच्या आत शिरून तिचे विश्लेषण केले. तेव्हापासून ही भाषा विश्लेषण केलेल्या स्वरुपात बोलली जाते.

“एक: शब्द: सम्यग्ज्ञात: सुप्रयुक्त: स्वर्गे लोकेच काम धुग् भवति |”

उत्तम रीतीने अर्थज्ञान करून घेतलेला (भाषेतील) शब्द आणि त्याचा यथायोग्य केलेला उपयोग मनुष्याला स्वर्गलोकात इच्छा पूर्तीस साह्यभूत ठरते; परंतु, चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्यास तोच शब्द वज्र होऊन म्हणणार्यावर विपरीत परिणाम करतो. यामुळे भाषा शुद्धच बोलली पाहिजे. वार्तिककारांनी ‘सिद्धे शब्दार्थसंबन्धे’ या वार्तिकामध्ये शब्द नित्य आहे व त्यांचा संबंधही नित्य आहे असे सांगितले आहे. 

दुष्ट: शब्द: स्वरतो वर्णतो वा मिथ्याप्रयुक्तो न तमर्थंमाह सवाग्वजो

यजमानं हिनस्ति यथेन्द्रशत्रु: स्वरतोsपराsधात् || महाभाष्यकार पतंजली ||”

आधुनिक काळात भाषेचे अत्यंत व्यापक, विविध अंगोपांगांनी अध्ययन झालेले आहे. पाश्चिमात्य विद्वानांनी ह्या भाषेशी संबंधित शास्त्राला वेगवेगळी नावे दिलेली आढळतात. जसे की, तुलनात्मक भाषाशास्त्र, भाषाविज्ञान, भाषा-विचार, भाषातत्व, शब्दतत्व, भाषालोचन, भाषिकी वगैरे. आंग्ल भाषेत, Philology, Linguistic ही नावे प्रामुख्याने दिसून येतात.

स्वनिमविचार:

स्वनिम हा आधुनिक भाषाशास्त्रात एक अत्यंत महत्वाचा, मूलभूत संबोध असून त्याच्यावर संरचणात्मक भाषाशास्त्र आधारलेले आहे. पदार्थविज्ञान शास्त्रामध्ये मोलेक्यूल  किंवा एटम यांना जितके महत्व आहे, तितकेच महत्व भाषाशास्त्रात स्वनिम संकल्पनेस आहे. स्वनिम या  संबोधनाने भाषाशास्त्रात क्र्नाती घडवून आणलेली आहे. संस्कृत व्याकरणकार आणि अर्वाचीन  भाषाशास्त्र स्वनिम हा संबोध निरवयव मानतात, स्वणिमामुळेच दोन शब्द निराळे राखले  जातात. या संबंधात पतंजलीनी कूप, सूप, यूप अशी उदाहरणे देऊन क्, ए आणि यू हे  वर्णस्फोट मानले आहेत. ज्यामुळे दोन शब्द अलग राखले जातात अशा भाषेतील स्वनलक्षणांना स्वनिम म्हणतात. स्वन म्हणजे भाषेत उपयोगात आणलेला ध्वनि. उदा. ‘पार, बार, तार, दार,       कार, गार’ हे शब्द घेऊया. मराठी भाषेमध्ये हे शब्द निरनिराळे आहेत. त्यांच्यात भिन्नत्व कशात आहे तर, फक्त आद्य व्यंजनांमध्ये. बाकीचे सर्व स्वन तहक आहेत.याचा अर्थ असा  किन ए, ब्, त्, क्, ग् हे स्वनिम आहेत. या सर्व स्वनांमध्ये जे वैधर्म्य आहे ते स्वनिमिक आहे. यांच्यामध्ये, प्रत्येकी स्वतंत्र जी विशिष्ट लक्षणे आहेत त्यामुळेच हे सर्व शब्द निराळे गणले जातात. दोन शब्द भाषेत अलग समजले जातात त्यांना ‘स्वनिम’ म्हणतात. स्वनिमविचारामध्ये  स्वनांचा कार्यात्मक दृष्टीने अभ्यास केल्यानंतर त्याही पुढे जाणे क्रमप्राप्त आहे. स्वनिम म्हणजे  भाषा नव्हे. निव्वळ भाषेची स्वनिम व्यवस्था जाणून घेतल्यामुळे आशय व्यक्त होऊ शकत नाही. स्वनिमांचा आशयाशी प्रत्यक्ष संबंध नाही, म्हणूनच नुसत्या स्वनिमणे भाषेचे सामाजिक  करी पूर्ण होऊ शकत नाही. ‘पदिम’ हा स्वनिमाप्रमाणे भाषेचा एक मूलभूत घटक आहे.   भाषेतील सार्थ घटकांना ‘पदिम’ म्हणतात. पदिम म्हणजे विशिष्ट अनुक्रमाणे येणारे स्वनिमांचे   गट. हे पुन: पुन्हा भाषेत येतात. पण विशिष्ट अनुक्रमाने येणारा प्रत्येक गट पदिम नसतो. पदिम   ठरण्यासाठी आशय रचनेतील कोणत्या ना कोणत्या तरी घटकाशी त्याचे नाते असावे लागते.  

विश्लेषणासाठी वाक्य हा मूलभूत घटक धरला जातो. भारतीय वैययाकरणांचे असे मत आहे  की, भाषेचा मूलभूत घटक वाक्य आहे आणि वाक्याच्या आधारेच विश्लेषण केले पाहिजे. वाक्य पदीयामध्ये भर्तृहरी असे सांगतो की वाक्याशिवाय शब्दांना  स्वतंत्र अस्तित्वच नाही. [वाक्यात्  पदानामत्यन्तं प्रविवेको न कुतश्चन | १.७३ |] त्याचे विभाजन करून अभिव्यक्तीचे तेच स्वरूप आणि अर्थाचे तेच क्षेत्र असलेले खंड अलग काढल्यास पदिम, पदान्तरे मिळतात. ‘लघुत्तम सार्थ    घटक’ अशी पदिमाची सर्वमान्य व्याख्या आहे.

वाक्यविचार:

एक पूर्ण विचार व्यक्त करणारा शब्द किंवा शब्दसमूह. पृन विचारांचा दृष्टीने अपूर्ण पण  स्वत:पुरता असा भाषेचा एक खंड असे वाक्याचे लक्षण सांगता येऊ शकते. वाक्य हे संपूर्ण स्वतंत्र उच्चारण आहे. ते स्वतंत्रपणे राहू शकते किंवा टीएसई राहण्याचे त्याचाजवळ सामर्थ्य  आहे. उच्चारणातील दुसर्‍या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना (किंवा रूप) म्हणजे वाक्य. कोणत्या गोष्टी असल्यास उच्चारण खंडस वाक्य म्हणता येईल हे ही पाहणे आव्शुयक आहे.

सार्थता: वकयामधील शब्द सार्थ हवेत.

सामर्थ्य: समकृत नैयायिकांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास योग्यता म्हणजे अर्थबोध. याचाच अर्थ वाक्यामधील निरनिराळ्या शब्दांच्या अरथामध्ये विरोध, असंगती असतं कामा नये. उदा. ‘तो विसतावणे प्रोक्षण करतो.’ किंवा झाडाला घोड्यांनी पाणी घालतो’ असा तर्‍हेची उच्चारणे वाक्ये होणार नाहीत. या वाक्यांमध्ये व्याकरणिक योग्यता असली तरी अर्थदृष्ट्या ती अयोग्य आहेत. म्हणजेच व्याकरणिक आणि अर्थसंबंधी अशा दोन्ही  प्रकारची योग्यता वाक्यात असायला हवी.

आकांक्षा:

वाक्यामधील शब्दांना एकमेकांच्या काही तरी आकांक्षा असाव्याला हव्या. वाक्याचा सुसंगत अर्थ त्यातील शब्दांवर अवलंबून असतो व त्यामुळे त्यातील काही शब्दांच्या अभावी तो प्राप्त होणार नाही. देवदत्त गावाला जातो हे तीन शब्द साकांक्ष आहेत. देवदत्त हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचे काय? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. जातो शब्द ऐकल्यावर कोण? कोठे? हे समजल्यशिवाय त्या उच्चारणाला अर्थच प्राप्त होणार नाही.     

वाक्यांश संरचना व्याकरण

वाक्याचा अचूक व बिनचूक अर्थ समजण्यासाठी वाक्याचे विभाजन करावे लागते. असे लहान खंड वाक्यरचनेच्या दृष्टीने हळूहळू कमी व्यापक होत जातात व अखेरीस असे घटक शिल्लक राहतात की त्यापुढे जाउन उरलेल्या घटकाचे आणखी विभाजन होऊ शकत नाही. त्या घटकांना उद्देश, विधेय, क्रियापद, विशेषण इत्यादि संज्ञावाचक घटक क्रमश: विभाजित होत असल्यामुळे कोणत्याही वाक्यासाठी पुनर्लेखनाचे नियम आवश्यक असतात. ह्या पार्श्वभूमीवर, संस्कृत व्याकऱणाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे; आणि त्याही आधी संस्कृत व्याकरणाचा इतिहास पाहणे अत्यंत उपयोगी व महत्वाचे आहे.

मानवी संभाषणाची प्रक्रिया वरवर पाहत संहज, सोपी व विनासायास वाटते, परंतु वास्तविकपणे ती खूप क्लिष्ट व गुंतागुंतीची आहे. A speaker wishes what is to be said through his intellect, and to convey the same, he employs a sentence comprised of words uttered one after another Word itself consists of letters uttered, like-wise, one after another. We are aware that the mouth is the common place for generating letters; the letters are produced out of the several parts within it. Throat, head, teeth, lips, nose, root of the tongue and bosom are the eight places of origination of letters. Two-fold efforts are generally required for uttering a letter or a syllable, the Internal Efforts (अंतर्गत प्रयत्न) and the External Efforts (बाह्य प्रयत्न). They are further divided into four and eleven kinds respectively. All the relevant processes of this are discussed in detail in Sanskrit Phonetics.

 Out of two manifestations, viz. Madhyama (माध्यमा)) and Vaikhari (वैखरी), the former is of the nature of Sound (Nada) and is perceptible to the intellect of the speaker; and the later which has distinct vibrations is perceptible to the ears of the listener. In other words, what the listener listens through the auditory organ is वैखरी नाद or ध्वनि and what his intellect grasps is स्फोट. This स्फोट by which the sense is understood is truly शब्द. In reality, शब्द Shabda or स्फोट can neither be uttered nor be heard. What is uttered or heard is वैखरी नाद consisting of letter. 

मूलत: संस्कृत भाषेचा जन्मच भगवान शंकराच्या डमरु वादनातून झालेला आहे; आणि म्हणूनच  “महेश्वर सूत्रे” हीच खरी सुरुवात. थोडेस त्याविषयी पाहून मग पुढे जाऊया.

भारतात प्राचीन काळी लिहीलेल्या ग्रंथांची दृष्टी ‘भाषाविज्ञानाची’ नसून ‘वैदिक मंत्राचे अर्थ’ लावण्याच्या चिंतनातून भाषेसंबंधी काहीमूलभूत सिद्धान्त आनुषंगिक निष्कर्ष काढल्या गेलेत. कृष्ण यजुर्वेदीय संहितेत म्हटले आहे की, देवाद्वारे इंद्रला केलेली प्रार्थना आम्हा लोकांसाठी तुकड्या-तुकड्यात  वाटून द्या. ह्या विधानावरून  ‘वाक्याचे विभाजन होऊ शकते’ हे तत्कालीन आर्यांना माहीत होते असे म्हणता येईल. पदपाठ, प्रातिशाख्य, शिक्षा, निघंटु, निरुक्त इत्यादि ग्रंथ भाषेच्या रुपाचे विवेचन करतात. निरुक्तातील यास्काने केलेला ‘अर्थविचार’ सर्वात प्राचीन आहे. वैदिक ज्ञान भांडार जपण्याचे पुढ अनेक प्रयत्न झाले. भारतात झालेल कार्य ब्राम्हणे, आरण्यके, शिक्षा-ग्रंथ, निघंटु, निरुक्त व्गैरेत दिसून येते. भाषेची उत्पती, शब्दाचा इतिहास, अर्थ, अर्थविस्तार, शब्दांचे विश्लेषण, पदांचे भेद, तसेच,  ‘नामान्याख्यातजानि’ असे सिद्धान्त निरुकतणे मांडले. पानिणी पूर्व काळात, आपिशलि, काशकृत्स्न ह्यांचे नाव पाणीनिपूर्व वैयाकरणात येते.  

पाणिनि:

जगातील सर्वश्रेष्ठ अद्भुत ‘अष्टाध्यायी’ ग्रंथाचा कर्ता पाणिनि आहेत. गांधारातील शालातुरात ह्यांचा जन्म झाला. ‘बृहत्कथा मंजरी’ या ग्रंथाच्या आधाराने ह्यांच्या गुरूचे नाव ‘वर्ष’ होते असे कळते. सर्वसाधारणपणे पाणिनि इ.स.पूर्व ५०० च्या आधी ते होऊन गेले असे मानल्या जाते. अष्टाध्यायी आठ अध्यायाची आहे. ह्यात ज्या पद्धतीने व्याकरणाचा विचार केल्या गेलेला आहे, तो अत्युतम कोटीचा आहे यात मुळीच शंका नाही. हा ग्रंथ संपूर्णपणे सूत्रमय आहे. महेश्वर सूत्राच्या आधारे प्रत्याहारानी शब्दलाघव साधलेले आहे. पाणिनिन्च्या मते भाषेत ‘वाक्य’ महत्वाचे आहे, शब्द नाही. त्यांच्या मते सर्व शब्दांची उत्पत्ती ही धातूपासून झालेली आहे. उपसर्गव प्रत्ययाच्या साह्याने नवीन शब्द बनवता येतात. पाणिनिनी शब्द (सुबंत) व क्रिया (तिडन्त) मानून दोन्ही प्रकार विभक्त केले. त्यांनी लौकिक संस्कृत व वैदिक संस्कृत वेगळे केले. अष्टाध्यायी शिवाय त्यांनी, धातुपाठ, गणपाठ, उनादीसूत्रे असे ग्रंथ रचिले आहेत. अष्टाध्यायीत ध्वनि, पद, वाक्य, अर्थ, आख्यात इत्यादि सर्व भाषांगावर विचार केलेला आहे. 

अर्थविज्ञान:
भाषेत अर्थाचे स्थान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे, शब्द आणि अर्थ यांचा स्वाभाविक  नित्य संबंध  आहेच. जर अर्थहीन शब्दांचे उच्चारण केले तर ते तथ्यहीन ठरेल. निर्जीव व निष्प्राण होईल. महाकवी कालिदासाने वाणी आणि अर्थ ह्यांचे रूप स्पष्ट केले आहे, “वागर्थाविव संपृक्तौ  वागर्थप्रतिपत्तये |” वाणी-शब्द आणि अर्थ हे जसे एकमेकांशी संपृक्त – एकरस – एकरूप असतात त्यांच्या प्रतिपादनासाठी….. अर्थ शब्दाची परिभाषा लिहिताना वाक्य पदीयकार  भर्तृहरीने असे म्हटले आहे,

यस्मिंस्तूच्चरिते शब्दे यदा योSर्थ: प्रतीयते |

तमाहुरर्थ तस्यैव नान्यदस्यैव लक्षणम् ||   

ज्या शब्दाच्या उच्चारणाने, जेव्हा ज्या अर्थाची प्रतीती होते, तोच त्याचा अर्थ आहे. अर्थाचे अन्य  कोणतेही लक्षण होऊ शकत नाही. वाक्यपदीय भर्तृहरीने तर शब्दशास्त्रास- व्याकरणशास्त्रास अध्यात्माची ऊंची गाठून दिली आहे. अर्थातच शब्दार्थ – पद – -अर्थ- तत्वच त्याला अभिप्रेत आहे. त्यांची प्रसिद्ध कारिका अशी:

अनादिनिधनं ब्रम्ह शब्दतत्वं यदक्षरम् |

निवर्ततेSर्थभावेन प्रक्रिया जगतो यथा ||

याबाबत एक खूप चांगला संदर्भ पातंजल योग सूत्रात आढळतो. त्याविषयी आपण जरा विचार करू या. विभूतिपादात असे म्हटले आहे,

“शब्दार्थप्रत्ययानामितरेतराध्यासात्संकरस्तत्प्रविभागसंयमात्सर्वभूतरुतज्ञानम् ||

विभूतिपाद-१७||

कोणत्याहि पदार्थाला उद्देशुन उच्चारला जाणारा शब्द, ज्याला उद्देशून  तो शब्द उच्चारला जातो तो त्या शब्दाचा अर्थ आणि त्या शब्दावरुन त्या अर्थाचा जो बोध होतो तो प्रत्यय. ह्या तीन गोष्टी वस्तुत: परस्पराहून देशत: कालत: व वस्तुत: अत्यंत भिन्न असूनही त्यांचा एकमेकांवर अध्यास होतो  व त्यामुळे तिहींचा संकर झालेला असतो. ह्या संकराचे शब्द, अर्थ व प्रत्यय हे जे प्रविभाग त्यांवर संयम केला असता सर्व भूतांचे जें रुत म्हणजे बोलणे त्यांचे ज्ञान होते. शब्दोच्चार करणारा माणूस ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी त्याच्या वाणीतून तो शब्द निघत असतो. त्या शब्दाने लक्षित असलेला पदार्थ निराळ्याच ठिकाणी असतो आणि त्या शब्दोच्चाराने  त्या पदार्थाचा बोध तिसर्‍या ठिकाणी असलेलया मनुष्याच्या बुद्धीत होत असतो. हयाप्रमाणे शब्द, अर्थ व प्रत्यय हे तीन पदार्थ तीन ठिकाणी असतात हा त्यांचा स्थलभेद होय. हे तीन पदार्थ स्वरूपत: असेच परस्परांहून अत्यंत भिन्न आहेत. कांही विशिष्ट क्रमाने उच्चारलेल्या वर्णापासून शब्द बनतो. म्हणजे विशिष्ट क्रमाने उच्चारलेले ध्वनि हा शब्द होय. अशा अनेक शब्दांचे वाक्य बनते. म्हणजे शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप ध्वनि हेच आहे. हे ध्वनि ज्या पदार्थाला उद्देशून उच्चारले जातात ते द्रव्य, गुण, कर्म, जाति, इत्यादि सर्व पदार्थ त्या ध्वनिहून स्वरूपत: भिन्नच असतात. ते ध्वनि ऐकून ऐकणार्‍याला  जो  बोध होतो तो त्यांच्या बुद्धीत होत असून तो वृत्तुयात्मक असतो. हे तीन पदार्थ कालत: सुद्धा एकामागून दूसरा असे अस्तित्वात आलेले असतात.

प्रथम पदार्थ अस्तित्वात येतो, मग तिचा वाचक शब्द उत्पन्न होतो व शब्दानंतर प्रत्यय उत्पन्न होतो. अशा प्रकारे शब्द, अर्थ व प्रत्यय हे तीन देशत: वस्तूत: आणि कालत: परस्परांहून अत्यंत भिन्न असूनही त्यांचा एकमेकांवर अध्यास होऊन ते अगदी एकरूप भासतात. ध्वनींच्या साहाययाने जेंव्हा कोणताही प्राणी कांही अर्थ व्यक्त करीत असतोत्या वेळी त्या ठिकाणी वरील तीन प्र्विभागांचा असाच संकर झालेला असतो. ज्याला त्या प्राण्यांचे ते बोलणे कळावे अशी इच्छा असेल त्याने ह्या प्रविभागावर संयम करावा. मागील सूत्रांत परिणामत्रयांवर ज्या प्रकारचा संयम सांगितला तसाच संयम येथेही करावयाचा असतो. ह्या प्राण्याने कोणता ध्वनि उच्चारला, त्या ध्वनिमुळे ज्याला बोध झाला तो कोणता व त्या बोधणे उपलक्षित पदार्थ कोणता अशा जिज्ञासूवृत्तीवर मन एकाग्र करून त्या तिहींचे अवलोकन सूक्ष्मपणे करीत गेले म्हणजे हळूहळू ह्या प्राण्याचे रुत म्हणजे ऐकून आपल्या बुद्धीत त्या अर्थाचा प्रत्यय येऊ लागतो. हेच प्रकृत सूत्रांतील सर्व भूतरुतज्ञान होय.      

जे अक्षर शब्दतत्व तेच अनादि निधन (आद्यंतशून्य) ब्रम्ह होय. ते शब्दाच्या अर्थरूपाने विवर्त पावते.  वेदांमध्ये असे वर्णन केलेले आहे,

चत्वारि शृङ्गा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |

त्रिधा बद्धो वृषभो रोरविती महो देवो मर्त्या आविवेष ||

ज्याची नाम, आख्यात (क्रिया) उपसर्ग आणि निपात अशी चार पदे हीच चार शृंगेआहेत. भूत,  भविष्यत् आणि वर्तमान हे तीनच काळ आहेत. नित्य आबी अनित्य शब्दरूप दोन मस्तके  आहेत. तिङ प्रत्ययासह सात ‘सुप्’ विभक्ती हे सात हात आहेत. जो उर, कण्ठ आणि शिर ह्या  तीन स्थानी बद्ध झालेला  आहे.  

संस्कृतचा प्रसिद्ध वैययाकरण पाणिनि  याने सर्व ध्वनी समूह १४ सूत्रात विभाजित केलेले आहेत. ह्या १४ सूत्रांना ‘माहेश्वरसूत्रे’ असे नाव आहे.  ती सूत्रे आहेत, “अइउण | ऋलृक् | एओङ | ऐऔच् | हयवरट् | लण् | यमङणनम् | झभञ | घढघष् | जबगददश् | खफछठचरतंव् | कपय | शपसर् | हल् | ह्या सर्व सूत्रातील अंतिम (हलन्त) व्यंजन स्वररहित आहेत. त्यांना ‘ईत्’ असे म्हणतात. ह्या सूत्राच्या साहाययाने प्रत्याहार बनवून समस्त ध्वनींचे वर्गीकरण करून पाणीणीने अष्टाध्यायीत सूत्रलाघवासाठी वापरले आहे.  

संस्कृत व्याकरणाची परंपरा खूप जुनी आहे. वेदकाळीच व्याकरण हे एक स्वतंत्र वेदाङ्ग म्हणून प्र्स्थपित झाले होते. वेदांची रचना व भाषासौन्दर्य पहिले की, पटते की निश्चितच त्या काळी व्याकरण हे माहीत पण होते अन त्याचा अभ्यासही केल्या जात होता. काही ब्राम्हण ग्रंथांमध्ये व्याकरणाचा उल्लेख आढळतो. प्रातिशाख्य ग्रंथ हा देखील व्याकरणाच्या अभ्यासाचाच ग्रंथ आहे. यास्काने सुद्धा अनेक व्याकरण तज्ञांच्या नावाचा उल्लकेह केलेला आहे त्यांच्या ‘निरुक्ता’त. याचाच अर्थ असा की यासकांच्या पूर्वी व्याकरण शास्त्रज्ञ होऊन गेले.

पाणिनिच्या पूर्वीचे वैयाकरणी:

पाणिनिंच्या पूर्वी जे व्याकरणतज्ञ होऊन गेले त्यांची नावे देवतांची होती. ऋकतंत्रानुसार व्याकरणाचा प्रथम प्रवक्ता स्वत: ब्रह्मा होते. त्यांनी बृहस्पतीला व्याकरणाचे ज्ञान प्रदान केले,  नंतर ब्रहाने ते इंद्राला दिले व इंद्राने भारद्वाज ऋषिना दिले. भारद्वाज ऋषींनी ते इतर ऋषिना दिले.  

महेश्वर सूत्रे हे तर सर्वांना ज्ञात आहे. याचा उल्लेख महाभारतात शांतिपर्वात ‘शिवसहस्त्रनाम’  स्तोत्रात आढळतो. पाणिनिन्च्या व्याकरणात महेश्वर असा वैययाकरणी म्हणून उल्लेख आढळतो.  

येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् |

कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नम: ||

ज्या पाणिनिनी अक्षरसमाम्नाय महेश्वराकडुन ग्रहण करुन संपूर्ण व्याकरण शास्त्राची रचना  केली त्या पाणिनीना मी नमस्कार करतो. 

नत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपचवारम् |

उद्धर्तुकाम: सनकादिसिद्धानेतद् विमर्षे शिवसूत्रजालम् ||

नन्दिकेशरकृत काशिका नावाच्या ग्रंथामध्ये वरील श्लोक आढळतो. ह्या श्लोकानुसार सनकादी  ऋषींच्या उद्धाराकरिता भगवान  शंकरानी १४ वेळा डमरु वाजविले, ज्यामुळे १४ माहेश्वर सूत्रे  निर्माण झाली.

पाणिनिनी ‘अष्टाध्यायी’ तयार केली. त्यांची, पाणिन, दाक्षीपुत्र, शाल्ङ्किक, शालातुरिय व आहिक  अशी नावे उपलब्ध आहेत. पाणिनिनिंचा काळ इसवी सन पूर्व २४०० पासून तर इसवी सन पूर्व  ३०० असा वेगवेगळा मानण्यात येतो. अष्टाध्यायीला ‘अष्टक’  ह्या नावाने सुद्धा ओळखतात.  दुसरे एक नाव ‘श्श्ब्दानुशासन’ असेही आहे. चीनी प्रवासी इत्सिंगच्या वर्णनानुसार ‘वत्तिसूत्र’  असेही एक नाव आहे. असो. प्रत्येक अध्यायात चार-चार पाद आहेत. अष्टाध्यायीमध्ये ३९८३  सूत्रे आहेत, परंतु सिद्धान्तकौमुदीनुसार ती ३९७६ आहे. सर्व पौर्वात्य व पाश्चिमात्य विद्वान अष्टाध्यायीला महत्वपूर्ण मानतात. व्याकरणाच्या सर्व ग्रंथांमध्ये अष्टाध्यायीला सर्वोत्कृष्ट मानल्या  गेले आहे. कुठलेही शास्त्र लोप पावण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या लोकप्रियतेचा अभाव.  परकिय आक्रमणानी ग्रंथ नष्ट होऊ शकतात, परंतु त्या ग्रंथाला अनुसरणारे नष्ट होत नाहीत.  ग्रंथांची लोकप्रियता कमी होण्याची दोन प्रमुख कारणे असू शकतात. पहीले म्हणजे, त्या ग्रंथाचे  अनुकरण करता येत नाही किंवा दुसरे कारण त्यातील संकल्पना अतिशय कठीण व दुर्बोध असणे. जेव्हा एखाद्या ध्येयापर्यन्त पोहचण्याकरिता एक सोपा व एक कठीण मार्ग उपलब्ध  असतो, तेव्हा साहजिकच लोक सोप्या मार्गाचा अवलंब करतात.   

पाणिनिच्या रचनांमध्ये ‘अष्टाध्यायी’ किंवा ‘पाणिनियाष्टक’ हे प्रमुख आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेतील अमूल्य रत्न आहे. संस्कृत भाषेमध्ये याच्या तोडीचा दूसरा कुठलाच व्याकराणावरील ग्रंथ नाही. पाणिनिनी ह्या छोटयाशा ग्रंथात संस्कृत सारख्या विशाल भाषेचे विष्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी केलेले विवेचन वैज्ञानिक, शैली आटोपती, सांकेतिक व संयमित आहे. ह्या ग्रंथाची रचना अनन्यसाधारण आहे.  पहिल्या अध्यायात विशेष करून संज्ञा आणि परिभाषा यांचा विचार केलेला आहे. दुसर्‍या अध्यायात समास व विभक्ती, तिसर्‍या अध्यायात कदंत, चौथ्या व पाचव्या अध्यायात स्त्रीप्रत्यय आणि तद्धित प्रकरण आहे. सहाव्या, सातव्या व आठव्या अध्यायात संधि, आदेश, आणि स्वरप्रक्रिया इत्यादि विषय मांडलेले आहेत. या शिवाय आचार्य पाणिनिनी धातुपाठ व गणपाठ यांची पण रचना केलेली आहे. असे म्हणतात की, उणादिसूत्र देखील पाणिनिच रचलेले आहेत, परंतु त्याबाबत मतमतांतरे आहेत.

कात्यायन (इसवी सन पूर्व ५०० ते इसवी सन पूर्व ३००):

कात्यायन मुनि व्याकरण शास्त्रामध्ये वार्तिककार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना वररुचि नावाने देखील ओळखतात. त्यांचा नक्की काळ कोणता याबाबत मतभेद आहेत. महाभाष्यकार यांच्या मतानुसार ‘प्रियतद्धिता दाक्षिणात्या’ हयानुसार वार्तिककार कात्यायन दक्षिण भारतातील होते असे वाटते. कात्यायनांचे भाषाविषयक ज्ञान अगाध होते. त्यांचा दृष्टीकोण हा एका समिक्षकाचा होता. त्यांनी पाणिनिनींच्या सूत्रांचा बारकाईने अभ्यास करून त्यातील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला; व अष्टाध्यायीतील १५०० सूत्रांवर जवळपास ४००० वार्तिकाची रचना केली आहे.   पाणिनि व्याकरणाच्या विकास व प्र्चारामध्ये कात्यायनाचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी पाणिनि व्याकरणाला वास्तविक व कालानुरूप बनविण्याचा प्रयत्न केला व त्यातील उणिवा देखिल दूर केल्या. त्यांच्या लिखाणात संशोधकाची दृष्टी दिसून येते. कात्यायनाचा उद्देश पाणिनिनींच्या सूत्रात संशोधन व आवश्यक ते बदल करणे हा होता.

पतंजली (इसवी सन पूर्व २०० ते इसवी सनाचे पहिले शतक:

पतंजलिने ‘महाभाष्य’ नावाच्या ग्रंथाची रचना केली आहे. महाभाष्यकारानी एका सूत्रात “इह   पुष्यमित्रं याजयाम |” असे म्हटलेआहे. याचा अर्थ पतंजलिनी पुष्यमित्राला यज्ञ करण्यास सांगितले होते. म्हणजेच पतंजलि पुष्यमित्राचे समकालीन होते. पुष्यमित्राचा काळ  इतिहासकारानी इसवी सनपूर्व १५० असा मान्य केलेला आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की  पाटांजलींचा काळ देखील इसविसन पूर्व १५० च असावा. पतंजलीनी पाणिनि व कात्यायनच्या मुख्य सूत्रांची परिभाषा निश्चित केली. त्यांची पाणिनि वर नितांत श्रद्धा होती. पतंजलींचे असे स्पष्ट मत होते की, ज्याअर्थी भगवान पाणिनिन्चा एक वर्णही निरर्थक असू शकत नाही त्याअर्थी त्यांच्या सारख्या महान वैययाकरणाच्या कामात दोष काढण्याचे दुस्साहस कोण करेल? कात्यायनाच्या वार्तिकांवर देखील भाष्यकारांनी भाष्य केले व त्याच्या उपयोगीतेवर मत प्रदर्शित केले आहे. तसेच पतंजलिनी पाणिनिनींची सूत्रे व कात्यायनाच्या वार्तिका, याची समीक्षा करून त्यांच्या उपयोगीतेवर आपले विचार मांडून आपला निर्णय देखिल दिलेला आहे. 

द्वितीय युग:

महाभाष्याच्या बरोबर पाणिनि व्याकरणाचे प्रथम युग संपुष्टात आले.  इसवी सणाच्या सातव्या शतकात पुन्हा काही टीकाग्रंथ लिहिण्यास सुरुवात झाली. येथुनच दुसर्‍या युगाला सुरुवात झाली. भर्तृहरीने महाभाष्यावर टिकात्मक ग्रंथ लिहिला. ‘काशीका’ वर जिनेन्द्रबुद्धी यांनी ‘न्यास’ नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच, हरदत्ताने ‘पदमंजिरी’ नावाचा ग्रंथ लिहिला. भर्तृहरीने ‘वाक्यपदीय’ नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.  ह्या दुसर्‍या युगाचा अंत कैयटाच्या ‘प्रदीप’ नावाच्या टीकेने झाला असे म्हणता येईल. ती महाभारतावरील एक खूप सुंदर टिका आहे. 

भर्तृहरि (इसवी सनाचे सातवे शतक):   

भर्तृहरींचे संस्कृत व्याकरणात अत्यंत उच्च स्थान आहे. व्याकरणातील मुनित्रया नंतर ह्या क्षेत्रात   अति उत्तम कार्य करणार्‍यात भर्तृहरिंचे नाव साहाजिकच येते. यांच्याही बाबतीत खात्रीशीर व  बिनचूक माहिती उपलब्ध नाही. त्यांनी ‘महाभाष्यदीपिका’, ‘वाक्यपदीय’ ‘नीतिशतक’, ‘शतकत्रय’ ‘भट्टीकाव्य’ आणि ‘भागवत्ति’ नावाच्या एका प्राचीन अष्टाध्यायीची पण रचना केलेलीआहे. असे म्हणतात की भर्तृहरिने ‘वेदान्तसूत्रवति’ नावाचाही ग्रंथ लिहिला आहे. युधिष्टीर मीमांसाकाने असे प्रस्थापित केले आहे की ‘वाक्यपदीय’ व ‘महाभाष्यदीपिका’ या दोन्ही ग्रंथाचा रचनाकार एकच  असून तो भर्तृहरीच आहे.

महाभाष्यदीपिका

महाभाष्यावर भर्तृहरीने एक विस्तृत टीका लिहिली. इत्सिङ्ग ह्या चीनी प्रवाशानुसार ती  जवळपास २५००० श्लोका इतकी मोठी होती, परंतु आता ती पूर्ण स्वरुपात उपलब्ध नाही. भर्तृहरीने वाक्यपदीय ब्रम्हकांडात, ‘संहितसूत्र- भाष्यविवरणे बहूधा विचारीतम्’ असा उल्लेख केलेला आहे.

वाक्यापदीय:

हा व्याकरण दर्शनावरील ग्रंथ आहे असून ह्यात तीन कांडे आहेत, ब्रम्हकांड, वाक्यकांड आणि प्रकीर्णकांड. ह्यामध्ये संपूर्ण विश्वाला श्श्ब्दब्रह्म मानलेले आहे. तसेच स्फोटरूप श्श्ब्दचे स्पष्टीकारण सुद्धा ह्यात दिलेले आहे. ह्याचबरोबर, व्याकरणाच्या वेगवेगळ्या प्रक्रियांचे व त्यांच्या अर्थांचे विवेचनही केलेले आहे. भर्तृहरि केवळ महाभाष्याचे कर्ते नसून विशेष म्हणजे त्यांनी व्याकरणदर्शन व्यवस्थित केले आहे. महाभाष्यातील अनेक बाबींचे वैज्ञानिक पद्धतीने क्रमवार विश्लेषण देखील त्यांनी केले आहे. त्यांचे ह्या मौलिक कार्याकरिता त्यांचे नेहमी आदरपूर्वक स्मरण केल्या जाते व केल्या जाईल.

तृतीय युग:  

तृतीय युगात पाणिनिनींच्या अभ्यासाची दिशा बदललेली आहे. विषयव विभागानुसार अष्टाध्यायीतिल सूत्रांची पुनर्रचना होऊ लागली, किम्बहूना पुनर्माण्डणी होऊ लागली. ह्या युगात, श्श्ब्द-सिद्धिच्या प्रक्रियेवर जास्त भर दिल्या जाऊ लागला व सूत्रांच्या विवेचनावर कमी. अशा प्रकारचा सर्व प्रथम प्रयत्न श्री विमल सरस्वती (इसवीसन १३५०) यांनी केला, ज्यांनी ‘रुपमाला’ या ग्रंथाची निर्मिती केली. श्री रामचंद्र (१५ वे शतक) यांनी ‘प्रक्रियाकौमुदी’ हा ग्रंथ लिहिला. त्या काळातील सर्वात प्रसिद्ध विद्वान ‘वैययाकारण भूषण’ म्हणजे श्री भट्टोजिदीक्षित यांचे भाचे कौण्डभट्ट यांनी दार्शनिक विवेचनासंबंधी लिखाण केलेले आढळते.

भट्टोजिदीक्षित ( इसविसनाचे १६ वे शतक):  

भट्टोजिदीक्षित हे महाराष्ट्रीय ब्राम्हण होते. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मीधर होते. पंडितराज जगन्नाथ ह्यांच्या ‘प्रौढमनोरमा- खंडन’ नावच्या ग्रंथावरून असे कळते की, भट्टोजिदीक्षितांनी नृसिंहांचे पुत्र शेषकृष्ण यांच्याकडून व्याकरणशास्त्र शिकले. भट्टोजिदीक्षितांनी ‘श्श्ब्दकौस्तुभ’ या ग्रंथात शेषकृष्ण यांच्याकरिता ‘गुरु’ या शब्दाचा उपयोग केलेला आहे. भट्टोजिदीक्षितांनी अष्टाध्यायीवर ‘श्श्ब्द्कौस्तुभ’ नावांची टीका लिहिली आहे.

सिद्धान्तकौमुदी किंवा वैयाकरण सिद्धान्तकौमुदी:

‘श्श्ब्द कौस्तुभ’ ह्या ग्रंथानंतर भट्टोजिदीक्षितांनी, सिद्धान्त कौमुदी हा ग्रंथ लिहिला आहे.     सिद्धान्त कौमुदीला प्रक्रिया–पद्धती वरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजण्यात येतो. या पूर्वी जे ही प्रक्रिया-ग्रंथ लिहिल्या गेलेत त्यात अष्टाध्यायीमधील सर्व सूत्रांचा समावेश नव्हता. मात्र भट्टोजिदीक्षितांनी सिद्धान्तकौमुदीमध्ये, अष्टाध्यायीमधील सर्व सूत्रांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये  विभागून सर्व धातूरूपांचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे. त्याच बरोबर, लौकिक संस्कृत व्याकरणाचे विश्लेषण करून वैदिक-प्रक्रिया तथा स्वर-प्रक्रिया यांना शेवटी स्थान दिले आहे. भट्टोजिदीक्षितांनी काशीका, न्यास व पदमंजिरी इत्यादि सुत्रक्रमानुसार व्याख्या व प्रक्रियाकौमुदी व त्यावरील टीकांचा अभ्यास करून प्रक्रिया-पद्धतीनुसार पाणिनिय व्याकरणास सर्वांगीण स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आवश्यकतेनुसार व्याख्या, वार्तिका व अनेक भाष्यांचा उल्लेखही सिद्धान्त कौमुदित केलेल आहे. त्यांनी मुनित्रयांच्या मतांचा विचार करून व महाभाष्याचा आधार घेऊन स्वत:ची मतेही मांडलेली आहेत. मध्ययुगात सिद्धान्त कौमुदीचा इतका प्रचार व प्रसार झाला की, पाणिनिय  व्याकरणाची जुनी पद्धत तथा मुक्तबोध व्याकरण पद्धती हळूहळू विलयास जाण्यास सुरुवात झाली. कालांतराने सिद्धान्त कौमुदी व प्रक्रिया-पद्धती यातील दोष विद्वानांना लक्षात आले, तरिही ते सिद्धान्त कौमुदीला सोडू शकले नाही.

याशिवाय भट्टोदीक्षितांचा ‘वेदभाष्यसार’ हा ग्रंथही प्रकाशित झाला. हा ग्र्नठ म्हणजे ऋग्वेद सायणभाष्य याचे सार आहे. त्यांनी ‘धातुपाठ-निर्णय’ ग्रंथाची सुद्धा रचना केली. ‘अमरटीका’ हे एक हस्तलिखित सुद्धा उपलब्ध आहे.  पाणिनिय व्याकरणामध्ये भट्टोजिदीक्षितांचे स्थान फार महत्वपूर्ण आहे. पाणिनिय व्याकरणावर त्यांचा इतका प्रभाव पडला की, महाभाष्याचे महत्व देखिल कमी होऊ लागले. सिद्धान्तकौमुदी हा महाभाष्य समजण्याचा केवळ सुलभ मार्ग नसून महाभाष्याचे संक्षिप्त परंतु उत्कृष्ट सार आहे. त्यावरूनच एक श्लोक प्रसिद्ध झाला आहे,

कौमुदी यदि कंठस्था वथा भाष्ये परिश्रम: |

कौमुदी यद्यकण्ठ्स्ठा वथा भाष्ये परिश्रम: ||

कौमुदी हा व्याकरणाचा ग्रंथ कंठस्थ असेल तर व्याकरण भाष्य शिकण्याचा प्रयत्न व्यर्थ आणि कौमुदी जर कंठस्थ नसेल तरीही भाषेवर मेहनत करणे व्यर्थ आहे.

नागेश भट्ट (इसवी सणाचे १७ किंवा १८ वे शतक):

नागेश भट्ट उपाख्य नागोजी भट्ट हे एक महाराष्ट्रीय ऋग्वेदी ब्राम्हण होते. नागेश भट्ट यांनी महाभाष्यप्रदीपोद्योत, लघु श्श्ब्देन्दुशेखर, बहच्छब्देन्दुशेखर, परिभाषेन्दुशेखर, लघुमंजूषा, परमलमंजूषा आणि स्फोटवाद ह्या व्याकरणविषयक रचना केलेल्या आहेत.  प्रक्रिया युगाला शास्त्रर्थाच्या युगात घेऊन जाणार्‍यात नागेश भट्ट हे अग्रणी आहेत. त्यांची प्रतिभा अभूतपूर्व होती. त्यांचा वेगवेगळ्या शास्त्रांचा सुद्धा अभ्यास होता. त्यांनी व्याकरणाच्या क्षेत्रात ‘नव्य-न्याय’ ह्या शैलीचा प्रवेश घडवून आणला व  अनेक महत्वाच्या ग्रंथांची रचना केली.

सिद्धान्तकौमुदी या विषयावर अनेक टीका लिहिल्या गेल्यात, परंतु त्या सर्वांमध्ये परिव्राजकाचार्य ज्ञानेंद्र सरस्वतीनी लिहिलेली ‘तत्वबोधिनी’ विशेष महत्वपूर्ण आहे.

वरदराज – लघुसिद्धान्त कौमुदी: 

पाणिनि-व्याकरण मुलांना समजण्याच्या दृष्टीकोणातून भट्टोजिदीक्षितांचे शिष्य वरदाचार्य यांनी लघुकौमुदी किंवा म्ध्यकौमुदी ची रचना केली. लघुकौमुदीमध्ये व्याकरण-प्रक्रियाचे सर्वअपेक्षित वर्णन दिलेले आहे. लघुसिद्धान्त कौमुदी हे सिद्धान्त कौमुदी चे संक्षिप्त स्वरूप असूनही ती एक विलक्षण रचना आहे यात तीळमात्रही शंका नाही.

सिद्धान्तकौमुदीमध्ये पाणिनिन्च्या जवळ जवळ सर्व सूत्रांचा समावेश केलेला आहे, परंतु ल्घुसिद्धांतकौमुदीमध्ये मात्र जी नित्योपयोगी सूत्रे आहेत त्यांचाच समावेश केलेला आहे. वैदिकी प्रक्रिया आणि स्वर प्रक्रिया संपूर्णपणे बाजूला ठेवलेले आहेत.११

आता आपण ‘बोध’ (Perception) ह्या संकल्पनेबाबत पाहू या. Perception is an interaction between the individual and the physical world. Perception of sound (Shabd) is the only the last kind of perception that is described in detail in Vyakarana Shastra (व्याकरणशास्त्र), otherwise known as ‘Shabdnu-sasana. But here, the perception of Shabd is an activity between two individuals. That is, the one utters sound (Shabd), ‘वक्ताthe other receives it,ग्रहिता’.

Chandogya Upanishad, speech or sound (Vak) is described as a kind of internal air,व्यान, an intermediary stage between Prana (प्राण) and Apan (अपान). When we speak or utter sound we experience the going and coming of air. So, sound is nothing but a column of air made vibrant by our physical efforts that develop into sound by virtue of its contact with the wound-producing apparatus (शब्दोत्पत्तीस्थान). Both fire (तेजस) and air (वायु) contribute to the production of sound, in accordance with a stimulus received from the mind. The thought that arises in the mind is materialized by the fire and is driven out in the form of ‘words by the force of outgoing air’. Words manifested by the combination of two forces, viz., Pran and Buddhi, become capable of expressing the intended meaning. According to Patanjali, Shabda perceived by the auditory organ, comprehended by the intellect and manifested by the sound, pertains to ether. So, in the व्याकरण शास्त्र (Grammar), perception of Shabda means manifestation of Word (स्फोट) and sound (ध्वनि-शब्द) is its creator. या सर्वांचा सारांश असा की, शब्द हे बौद्धिक व श्रवणीय आहेत.

असो. एवढे मात्र खरे की, व्याकरण अजून कितीही सोपे केले तरीही ते समजण्यासाठी, हृदयस्थ करण्यासाठी कष्ट तर करावेच लागणार. यशचा मार्ग हा नेहमीच खडतर, काट्याकुट्याचा व अवघडच असतो, आणि तो जर तो तसा नसेल तर कदाचित मग तो यशाचा मार्गच नसेल. भाशेचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी व त्यातील दडलेला अर्थ माहीत करून घेण्यासाठी व आस्वादासाठी व्याकरणाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

संदर्भ ग्रंथ:

(०१) मनुस्मृती – संपादन: डॉ. आर. एन. शर्मा, चौखम्बा प्रकाशन, वाराणषी, पृष्ठ क्रमांक-५४४

(०२) सार्थ श्रीज्ञानेश्वरी, प्रकाशक: प्रकाश य. कुंदूर, मे. शारदा साहित्य, पुणे, 1999, पृष्ठ क्रमांक-333

(03) भारतीय मानसशास्त्र  अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन – योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, प्रकाशक- आदित्य प्रतिष्ठान, पुणे, आवृती- २००७, ISBN–81–868–19-6

(०४) वाक्यपदीयम (ब्रम्हकाण्डम्), अनुवाद्क: वा. बा. भागवत, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे-२, आवृत्ती-१९६५

(०५) Sense Perception in Science and Shastra, published by Sharada Trust, Sringeri, Edition – 1986 

(०६) व्याकरणमहाभाष्य, म. म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर, प्रकाशक-श्री. वि. ना. दीक्षित, पुणे, पृष्ठ क्रं. ९ ते ११

(०७) श्रीमदभगवदगीता-साधक संजीवनी-मराठी टीका, संपादन-स्वामी रामसुखदास, प्रकाशक-गीताप्रेस, गोरखपुर, पुनर्मुद्र्ण-संवत-२०७६, पृष्ठ क्रमांक-६७०

(०८) संस्कृत प्राकृत भाषाविज्ञान, लेखक डॉ अशोक व्हटकर, प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे, ISBN 978–81–7294–957–0, आवृत्ती-२०१२

(०९) भाषा व भाषाशास्त्र, लेखक: श्री. न. गजेंद्रगडकर, व्हीनस प्रकाशन, पुणे, आवृत्ती-1999,

(१०) श्रीमद भगवदगीता – जशी आहे तशी  – कृष्णमूर्ती श्री श्रीपाद ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद, भक्तिवेदान्त बुक ट्रस्ट, मुंबई, ISBN 978-93-92176-39-8, पृष्ठ क्रमांक-३९०

(११)) व्याकरण: महर्षि दयानंद विद्यापीठ, २००३

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top