Marathi

नको दूर जाऊ चिंपू………..

नको दूर जाऊ रे चिंपू, येईल तुझी आठवण,
कशी किती करून ठेऊ, इतकी सारी साठवण………….

गोवा आहे रे खूप छान, समुद्र आहे चोहीकडे,
खेळशील तू पाण्यामध्ये, गम्मत करशील सगळीकडे…….

तुझी मला आठवण येईल, मग काय करू मी,
फोनवर थोडेच खेळता येइल, भाऊ तिथे अन इथे मी……..

रूप तुझे गोड गोड, बोबडे आठवतात तुझे बोल,
छान साठवून ठेवले आहेत, शब्द तुझे खूप खोल…… …..

अरे प्रश्न किती विचारायचास, गम्मत जम्मत करायचास,
डोके-पाठी-मानेवर तर, कुठेही तू बसायचास……….

भाव निरागस सारे तुझे, मुक्त तू खेळायचास,
हसून हसून किती रे तू, मन माझे रमवायचास……

इवले इवले हात तुझे, डोळे कसे गोल गोल,
अजून ते आहे मनांत, रुजले आहे खोल खोल……

गोड आमचा आहे चिंपू, काय काय सांगावे,
झेप घे उंच आकाशी, असेच त्याला सांगावे…….

आहे माहीत मला रे, शाळेत तू जाणार आहेस,
तरीही पट्कन भेट आता आपली कशी होणार आहे?

पंख नाही ना रे मला, उंच उंच उडायला,
झरझर नाही येता येणार, तिथे तुला भेटायला………

नको दूर जाऊ रे चिंपू, येईल तुझी आठवण,
कशी किती करून ठेऊ, इतकी सारी साठवण………….

Click here for audio

मुकुंद भालेराव
औरांगाबाद / ०८-०३-२०२२ / सकाळी: ०९:३० / १३-०४-२०२२ / संध्याकाळी: ०६:०७

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top