Marathi

नयतू परमवैभवास राष्ट्

जेथ जेथ मंदिरे, यवन धावले तिथे,
शंख-चक्र-पदम् जिथे, क्रूर कर्म तिथे तिथे …….
सहीष्णूता नसे तिथे, मद्य-धुंद राज्य ते,
नष्ट भ्रष्ट करण्यास ते, यवन दुष्ट सर्व ते……….
उत्तरेत दक्षिणेत, दूर सर्व क्रूर ते,
धर्म-कर्म-सर्व-भ्रष्ट, मदांध सर्व यवन ते…….
शिखधर्म सर्वशूर, ठाकले बुलंद ते,
धर्म-कर्म-रक्षिण्यास, मृत्युंजय सर्व ते………
राष्ट्र महा धन्य हे, कृपाण खड्ग धरियले,
दुष्ट रिपु निपातण्यास, शिवप्रभू प्रगटले……….
सभोवताली दशदिशा, घोर घोर प्रलय तो,
धर्म-स्थापण्या महेश, शिवप्रभू खचित तो……..
सहस्त्र वर्ष सर्वदूर, मदांध मत्त जाहले,
धर्म-नष्ट-हेच-लक्ष, बुद्धीभ्रष्ट जाहले………
पुन्हा आता तशीच वेळ, दशोदिशी काळरात्र,
सर्व धर्म बुडविण्यास, सज्ज पापी अहोरात्र……..
उत्थाय हिंदू बंधुनो, बना तुम्हीच वज्र हो,
प्रत्यंचा आकर्ण ती, करा विनाश अधर्म तो……….
गीतेत सत्य वचन ते, संभवामी युगे युगे,
रक्षिण्यास साधू साधू, संपविण्या रिपुसर्व ते……..
आता कुणी न चक्रपाणी, अवतार ना व्हायचा,
रक्षिण्यास धर्म आपुला, आता न कृष्ण यायचा……….
वृत्रासुरा मारण्या, दधीची अस्थि-अस्त्र ते,
हिन्दू रिपुविनाशयार्थ, करा अभेद्य लक्ष्य ते……….
शपथ तुम्हा वेदवाक्य, एक लक्ष सिद्ध ते
अखंड राष्ट्र निर्मिण्यास, वचनबद्ध लक्ष ते ……
उत्तिष्ठतू तू आता, श्वास तुझे धर्मकार्य,
संपन्नराष्ट्र घडविणे, हेच ध्येय एक कार्य………
सर्वदूर सर्वस्थिर, जनमानसी उदितशांत,
नयतू परमवैभवास राष्ट्, कृत्वा तव जीवन यथार्थ………

मुकुंद भालेराव
|| संभाजी नगर ||

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top