Marathi

गरम गरम भजी, वाफाळलेला चहा आणि बरेच काही…………

पाउस तर धो धो पडणारच,
आवाज तर खळखळ होणारच,
मुले पावसात नाचणारच,
मोर तर पंख पसरणारच……

हसरा पाऊस येणारच,
कुरकुर नाही करणारच,
घरासमोर पाणी साचणारच,
घराच्या पत्र्यावर,
टपटप पाणी पडणारच,
झाकीर हुसेनच्या तबल्यावर,
तिरकीट तिरकीट वाजणारच……………..

मुले पाण्यात खेळणारच,
पन्हाळी खाली सारी मुलं,
बिनधास्त नाचणारच,
अवचितपणे अगदी मग,
कागदी नावं वाहणारच…………

ढग गडगड करणारच,
वारा भिरभिर वाहणारच,
चिमण्या चिवचिव करणारच,
विजा कडकड चमकणारच……..

तरुण धाडस करणारच,
तरुणी विभ्रम करणारच,
प्रौढ काळजी करणारच,
गृहीणी सगळ्यांना जपणारच….

छत्री जवळ असून सुद्धा,
कपडे ओले करणारच,
रेनकोट मुद्दाम विसरुन घरी,
मनसोक्त पावसात भिजणारच………

गरम भजी बनणारच,
वाफळलेला चहा लागणारच,
पु लं च्या गोष्टी ऐकणारच,
पण पावसाची पिरपीर राहणारच…..

झीवर सिनेमा पाहतानाच,
जगजीत सिंग सुंदरतेने
कागजकी कस्ती बारीषका पाणी ऐकणारच,
मोबाईलवर स्माईली टाकणारच,
बुद्धीबळाचा डाव लागणारच……..

शास्त्रीय गाणे लागणारच,
भीमसेन बालमुरली असणारच,
तलत मेहमूद डोकावणारच,
ठुमरी शोभा गुर्टुची ‘बिन पिया निंद न आए’
आर्तता वाढवणारच,
‘सावनके महिनेमे एक आग थी सिनेमे’,
देवानन्द म्हणणारच,
‘एक चतुर नार करके शृंगार’
किशोर हमखास गाणारच………..

तितक्यातच शंकरमहादेवनचे
ब्रेदलेस वाजणारच,
आणि सुरेश भटांची स्वप्नील गझल मराठीतली,
‘आत्ताच अमृताची बरसून रात गेली’
आणि सुरेश वाडकरांनच्या आवाजात……..

पाठोपाठ धमाल गझल ‘ए दिल पागल दिल मेरा’
गुलाम अली गाणारच………

सुकन्या म्हणते बाबा, सीडी लावा झटकन्,
‘मेंदीच्या पानावर लावा बर पटकन् ,
तर मुलगा म्हणतो ‘नाही नाही’,
‘ऐ दिवानो मुझे पहचानो’
ऐकू द्या बर पटकन्,
कुणी तरी तिकडून आळवतो मुकेशला,
‘सजन रे झूठ मत बोलो’,
सगळे धरती ठेक्याला………..

तिसरा कुणी तरी रेडियो तिकडे लावतो,
‘मुझे तूम नजरसे गिरा तो रहे हो’
आर्ततेने गात मेहदी हसन येतो……..

इतक्या सार्या विनवण्या मग,
एकदम पुढे आल्या,
वर्हाड निघालेय लंडनला,
विमानप्रवास आठवला,
चहामध्ये फ्यांटा अन,
कॉफीमध्ये लिमका,
अशीच सार्या पोरासोरांची,
फर्माईश तर ऐका……………. अशी सारी मौज मस्ती,
लहान मोठे सारे जण,
मनमुराद हास्य कल्लोळ,
विनातिकीट धमाल पण……..

वाकडीतीकडी चित्रे सारी,
आम्ही हमखास काढणारच,
नसेल गाता येत तरी,
सगळे मात्र गाणारच,
तबला तो हवा कशाला,
डब्बे सोफा वाजवणारच,’
घरातल्या घरातच,
वनभोजन करणारच………….

तितक्यात शंकर महादेवनचे,
अफलातून ब्रेदलेस ऐकणारच,
सुरेश भटांना वार्याेवर,
कसे बरे सोडायचे,
‘रंगुनी रंगात सार्यास रंग माझा वेगळा’
न थांबता ऐकायचे…………..

‘ए दिल ए पागल दिल मेरा
गझल तर मष्टच
गुलाम अली आठवणारच……..

मीच मग काढतो माझी आवड,
गझलेच्या राणी बेगम अख्तरची,
‘वो जो हममे तुममे करार था’
लय भारी गझल गुणगुणनारच………..

तरीही मन भरत नाही,
आता काय ऐकावे,
म्हणून जरा हटके,
‘आज जानेकी जिद ना करो’
फरीदा खानूमला म्हणायला लावणारच………….

अरे हो ! आपली भूमी संतांची,
अभंग तर झालाचा पाहिजे,
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी
अभंग हृदयात घुमणारच……..

सारे कसे सोपे आहे,
जादू अशी करणारच,
विनोद तो कसाही असो,
खळाळून सारे हसणारच…………

शब्दकोडी, कवितांच्या भेंड्या,
खेळाव्या लागणारच,
गम्मतजम्मत करायला,
पाउस बाहेर येणारच,
जमेल तशी आरामात,
रविवारची महफील होणारच….

मुकुंद भालेराव | औरंगाबाद /|
१६-०७-२०२२ | रात्री: २२:५५ व १७-०७-२०२२ | दुपार: २.०० वाजता.

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top