Marathi

कला, कलाकार, कलात्मता व सामाजिक जबाबदारी

समाजातील प्रथितयश व्यक्ति ह्या कायमच समजातील सर्वच स्तरातील व्यक्तींच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. प्रत्येक वेळी असा परिणाम करण्याचा उद्देश मनात ठेवूनच तसे केल्या जाते असे नव्हे, पण असा परिणाम ज्या व्यक्तींच्या वर्तणूकीमुळे होत असतो त्यांनी अधिक सतर्क व सजग असायला हवे, कारण अशा व्यक्ती समजात जेंव्हा एखादे विशिष्ट स्थान संपादन करतात, तेंव्हा त्यांना ते स्थान प्राप्त करण्याकरिता समाजाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हातभार लावलेला असतो; मग ती व्यक्ति गायक असो, वादक असो, क्रीडापटू असो, साहित्यिक असतो, धार्मिक नेतृत्व करणारा धर्मगुरू असो किंवा राजकीय पक्षाचे नेतृत्व करणारा नेता असो अथवा उद्योग जगतातील उद्योगपती असो. त्या सर्वांनी ह्याच समाजातून काहीतरी घेऊनच आपल्या प्रगतिची वाटचाल केलेली असते.

आजच म्हणजे दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ ला हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक अतिसामान्य अभिनेत्री श्रीमती ऋचा चढ्ढा हिने गलवानच्या संदर्भात एक ट्विट केले. हे ट्विट तिने करण्यापूर्वीच भारतीय सैन्याच्या उत्तर कमांडच्या एका वरिष्ठ व जबाबदार अधिकार्‍याने आजच भारत सरकारने आदेश दिल्यास, पाकिस्ताने भारताचा बळकाविलेला काश्मीरचा भाग, म्हणजेच पाकव्याप्त  काश्मिर परत घेण्यास सेना सज्ज असल्याचे विधान केले होते.  तेंव्हा त्या अधिकर्‍याचे विधान व त्यानंतर लगेचच रिचा चढ्ढाचे ते अपमानकारक व सर्व भारतीयांच्या भावना दुखविणारे अत्यंत दुर्दैवी, अपमानकारक व बेशरमपणाचे आहे. खरे तर ती इतकी सामान्य अभिनेत्री (!!!) (???) आहे की, तिच्या असल्या फालतू विधानाला केराची टोपलीच दाखवायला हवी, कारणं त्याची किंमत शून्य आहे; परंतु असल्या नालायक तथाकथित लोकांना त्यांची जागा व लायकी जेंव्हाची तेंव्हाच दाखवायला हवी. एरवी अगदी हिरीरीने व तावातावाने अगदी तार सप्तकात बोलणार्‍या एका राजकीय पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार याबाबतीत मात्र अजून पर्यन्त मूग गिळून बसल्या आहेत. आता या प्रकरणात बॉलीवूडची कानउघाडणी करायला त्यांना भीती वाटते की काय.  असेल तसेही असेल कारण, त्याच बोलीवूडच्या भरोशावर तर त्यांच्या कुटुंबातील चोघांचा उदरनिर्वाह चालतो. त्या नाही बोलल्या म्हणून काय झाले, आपण सर्वसामान्य नागरिक असलो तरी आपल्या सर्वांना आपल्या राज्यघटनेने सर्वांना आपले मत मांडण्याचा व योग्य आणि आवश्यक त्या विधानावर प्रतिसाद, प्रतिक्रिया व समर्पक टीका करण्याचा मुलभूत अधिकार (Fundamental Right) घटनेच्या कलम १९ प्रमाणे दिलेला आहे.

ती कोण तथाकथित अभिनेत्री रिचा चढ्ढा माझा हा लेख वाचेल की नाही मला माहीत नाही आणि जरी तिने वाचला तरी तिच्या सामान्य बुद्धिमत्तेला तो कळेल किंवा नाही हे परमेश्वरच जाणे. कमीत कमी जनसामान्यांच्या महितीकरिता म्हणून मी लिहीत आहे.

अर्थात असले वाह्यात, निरर्थक, असंबद्ध व निर्लज्जपणाचे अकलेचे तारे तोडणारी रिचा चढ्ढा ही काही पहिलीच अभिनेत्री नाही. यापूर्वीही, दक्षिणेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू हिने ही असेच वादग्रस्त विधान केले होते तामिळनाडूमध्ये. त्यावरून तिच्या विरुद्ध अनेक ठिकाणी, खासकरून तामिळनाडूमध्ये २२ व मध्यप्रदेशात इंदूरमध्ये १ फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती. तिने कोणते विधान केले होते ते पाहणेही आवश्यक आहे. तामिळनाडूमध्ये इंडिया टूडेने एक पाहणी केली होती व त्याचाच एक भाग म्हणून खुशबूची मुलाखात घेतली होती. त्या पाहणीचा विषय होता ‘भारतात शहरी भागात राहणार्‍या लोकांच्या लैंगिक सवयी.’ त्या पाहणीतील एक प्रश्न होता तो ‘विवाहपूर्व लैंगिक सबंध’. त्यामध्ये तिने असे मत प्रदर्शित केले की, विवाहपूर्व संबंध हे जास्तीकरून ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ मध्ये होतात व त्याचबरोबर तिने समाजाने ते स्विकारायला हवे असे म्हटले होते. त्यातील सर्वात आक्षेपार्ह विधान होते, जे तेथील एक वर्तमानपत्र ‘धिना थांती’ मध्ये  प्रसिद्ध झाले होते. ते खालील प्रमाणे होते.

“The persons who are protesting against my interview, are talking about which culture? Is there anyone who does not know about sex in Tamil Nadu? Is there anyone who does not know about AIDS? How many men and women do not have sex before marriage?

Why are people saying that after the marriage the husband and wife should have confidence in other, only to avoid the mistakes from being committed? If the husband, without the knowledge of the wife, or the wife, without the knowledge of the husband, have sex with other persons, if a disease is caused through that, the same will affect both the persons. It will also affect the children, only because of this, they are saying like that.”  आश्चर्याची व दु:खदायक बाब म्हणजे ह्या प्रकरणात आपल्या मा. सर्वोच्च न्यायालयाने खुशबूच्या आपिलास मान्य करून तिने कोणताही गुन्हा केलेला नाही असे म्हणून तिची सर्वच्या सर्व म्हणजे 23 फौजदारी तक्रारीमधून मुक्तता केली. (Supreme Court of India, Criminal Appellate Jurisdiction, Criminal Appeal No. 913 of 2010 arising out of SLP (Criminal) No. 4010 of 2008.) आपले सर्वोच्च न्यायालय हे आपल्या राज्य घटनेचे संरक्षक आहे असे मानल्या जाते. त्यात असणारे न्यायाधीश हे बुद्धिमान असतातच यात मुळीच शंका नाही, कारण असे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी कमीत कमी वीस वर्ष तरी कायद्याच्या क्षेत्रात काम करत असतात, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून. इतके असूनही वर नमूद केलेल्या निवाड्यामध्ये परिच्छेद क्रमांक 30 मध्ये सन्माननीय न्यायमूर्तींनीं मांडलेले मत कुणाही भारतीय नागरिकाला मुळीच पटण्यासारखे नसून ते धक्का देणारे आहे. न्यायमूर्तीनीच जर अशी विधाने केली तर मग समाजाने काय करायचे.  त्या परिच्छेदात केलेले ते चीड आणणारे विधान असे आहे.

 “…….A culture of responsible reading is to be inculcated amongst the prudent readers. Morality and criminality are far from being co-extensive. An expression of opinion in favor of non-dogmatic and non-conventional morality has to be tolerated as the same cannot be a ground to penalize the author.”      

मग वरील परिच्छेदात सन्माननीय न्यायमूर्तीनी दिलेल्या सल्याप्रमाणे, त्यांनीही स्विकारावे की, न्यायमूर्तींना देखिल संस्कृती, नीतिमत्ता व धर्मशास्त्राचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मी तर पुढे जाऊन असेही म्हणेल की, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायलयातील न्यायमूरतींच्या नियुक्त्या करतांना त्यांच्या भारतीय संस्कृतीच्या आकलनाचा देखील विचार व्हायला हवा. नुसते कायद्याचे ज्ञान व अनुभव ह्या तर तांत्रिक बाबी झाल्या व त्याशिवाय त्यांच्या इतर सामाजिक बाबी तपासण्याची जशी व्यवस्था आहे,  तशीच व्यवस्था त्यांच्या सांस्कृतिक आकलनाची देखील असायला हवी; नाही तर पुढे जाऊन मुस्लिम कायद्यातील ‘Muta Marriage’ सारखे इतरांना देखील ‘काही दिवसांसाठी किंवा तासांसाठी विवाह’ (Marriage for some / fixed days or hours.) अशा प्रकारच्या कल्पनेस सुद्धा ते मान्यता देतील व त्याकरिता कारण देखील देतील की, नीतिमत्ता व कायदा यांचा संबंध नाही; आणि असे झाले तर आत्ताच्या ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ च्याही पुढे जाऊन ‘ठराविक दिवस किंवा ठराविक तासांचा विवाह’ असल्या भंकस (Weird), विचित्र (Strange), अतार्किक (Illogical) आणि चुकीच्या (Inappropriate) कल्पनांना मान्यता मिळेल. ह्या असल्या कायद्याच्या राज्याकरिता आपल्या घटना समितीने एवढे कष्ट घेतले नाहीत.     

मला वाटते वरील प्रकरणातील न्यायमूर्तिंची मते मागच्या शतकातील ब्रिटिश विचारवंत व साहित्यातील नोबेल परितोषिक विजेते स्व. बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) यांच्या विचारांशी मिळणारे आहेत. बर्ट्रांड अर्थर विलियम रसेल हे गणितज्ञ, तत्वज्ञ, तर्कशास्त्रज्ञ होते. सेट थिअरी, भाषातज्ञ, कृत्रिम बुद्धीमत्ता, आकलनशास्त्र, संगणक विज्ञान, गणिताचे तत्वज्ञान, भाषेचे तत्वज्ञान, आधिभौतिकशास्त्र व ज्ञानशास्त्र या विषयातले जाणकार होते. त्यांच्या काही निबंधाचा संग्रह ‘Unpopular Essays’ ह्या नावाने १९५० मध्ये प्रसिद्ध झाला. त्या संग्रहात एक निबंध आहे ‘The Functions of Teacher’. त्या निबंधात ते लिहितात पृष्ठ क्रमांक–११३ वर लिहितात,

“The thing, above all, that a teacher should endeavor to produce in his pupils if democracy is to survive, is the kind of tolerance that springs from an endeavor to understand those who are different from ourselves. It is perhaps a natural human impulse to view with horror and disgust all manners and customs different from those to which we are used. Ants and savages put strangers to death. And those who have never travelled either physically or mentally find it difficult to tolerate the queer ways and outlandish beliefs of other nations and other times, other sects and other political parties. This kind of ignorant intolerance is the antithesis of a civilized outlook, and is one of the gravest dangers to which our overcrowded world is exposed………Collective hysteria, the most mad and cruel of all human emotions, is encouraged instead of being discouraged, and the young are encouraged to believe what they hear frequently said rather than what there is some rational ground for believing.” [Emphasis is added by italics is added by me to highlight it.]

वरील श्री. बर्ट्रांड रसेलचे विचार चांगलेच आहेत. समाज स्वास्थ्याकरिता इतरांची मते ऐकून घेणे लोकशाहीत आवश्यक आहेच, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की, वेगळे विचार म्हणजे समाजाच्या पायाभूत विचारांवर, मूल्यांवर, श्रद्धांवर आघात करणे, कारणं अशा समाजविघातक बोलण्यावर जर नियंत्रण नसेल तर कायद्याचे राज्य हे स्वप्नातच राहील. मतस्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे काहीही बोलण्याचा धिकार नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत राहून इतरांच्या स्वातंत्र्यावर आघात होणार नाही व त्यांच्या श्रद्धाना धक्का पोहचणार नाही अशा प्रकारे मतप्रदर्शित करणे. 

ह्याच करणाकरिता, समाजात विशिष्ट स्थान मिळविलेल्या किंवा मिळालेल्या व्यक्तींनी अत्यंत जबाबदारीने बोलायला व वागायला पाहिजे.

Such people draw energy, inspiration, opportunities, and encouragement from the society. Other people had sacrificed something for them, may be little bit and might have also tolerated and pardoned their even unintended mistakes and blunders they have committed in the process of and journey of their so called growth. Everything cannot be paid back by money or by simply saying “Thank you”. The society always gives through people with an expectation from such people to receive it back to society. It is not at all sufficient to just observe a “Thanks Giving Day”. The Westerners celebrate different days in a year to remember, like Father’s Day, Mother’s Day and so on. Does it mean that on all other remaining days of the year, there is no need to remember anybody and express gratitude towards them? It is not so. A single day in a year to remember somebody is quite mean and selfish. The attitude of gratitude is always enriching. It should be throughout the year and always, as a good habit of a good human being. [Reference: The Seven Spiritual Laws of Success by Dr. Deepak Chopra].

यासंदर्भात, महाभारतात १ल्या पर्वात एक प्रसिद्ध श्लोक आहे.

त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् |

ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् || [अध्याय – १०७, श्लोक – ३२]

संपूर्ण कुळाकरिता, एका पुत्राचा त्याग करणे आवश्यक असेल तर त्याचा त्याग करावा. एका गावाच्या रक्षणाकरिता गरज असल्यास कुळाचा त्याग करावा. राष्ट्राकरिता आपल्या गावाचा त्याग करावा व आत्मकल्याणाकरिता पृथ्वीचाही त्याग करावा. परंतु, कलियुगात, मात्र चित्र एकदम बदलून गेले आहे. आता,

त्यजेत् कुलं ह्येकस्यार्थे, कुलंस्यार्थे ग्रामं त्यजेत् |

जनपदं ग्रामस्यार्थे, स्वार्थाय पृथिवीं त्यजेत् || (डॉक्टर जयंत आठवले: ३१-०३-२०१५)

अर्थपूर्ण जीवन म्हणजे काय तर ज्या जीवनात व्यक्तिच सर्वांगाने विकास झालेला आहे. Everybody must develop some interest or inclination towards either literature, art, music, sport or some social service, to make his or her life more meaningful. However, one should not and must not forget that while getting involved in such an art, literature or so, one should get it permanently imprinted on his mind that ultimate purpose of life and whatever you do for your living, is to supplement and compliment other’s lives and society at large. Whatever you earn in your life, whether money, wealth, fame or prosperity, is not only because of you, but it is a cumulative effect of what you attempted in the society and what society has sacrificed for you; whether directly or indirectly, knowingly or unknowingly; whether you are aware of it or not. If you are not aware of it is your problem, because your sensitivity is disabled and your empathy towards others in the society is maimed. And when such celebrities, famous people and personalities become insensitive, cold and turn a deaf ear towards the contribution made by others, including relatives, friends or other members of the society; they turn into rogue, irrespective of their so called stature in the society. And then, such people start making statements as if, they are the ‘Destiny Makers’ of the people or ‘Epoch-Makers, like social reformers, great literary personalities, and spiritual gurus and so on.  

आहार निद्रा भय मैथुनं सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |

धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीना: पशुभि: समाना: ||  

आहार, निद्रा, भय व समागम ह्या चार गोष्टी मनुष्य व पशुमध्ये समान आहेत. माणसांमध्ये पशुपेक्षा एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे ‘धर्म’; अर्थातच धर्माशिवाय मनुष्य असेल तर तो पशुच म्हटला पाहिजे.

महाभारतात युधिष्टिराने पितामह भिष्मांना प्रश्न विचारला की, ‘धर्म’ म्हणजे काय, तेंव्हा त्यांनी उत्तर दिले,

तादृश्योSयमनुप्रश्नो यत्र धर्म: सुदुर्लभ: | दुष्कर: प्रतिसंख्यातुं तत्केनात्र व्यवस्यति ||

प्रभावार्याय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् | : स्यात्प्रभवसंयुक्त: सधर्म इति निश्चय: ||

धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मेण विधृता: प्रजा: | : स्यद्धारणसंयुक्त: धर्म इति निश्चय: ||

खरे तर धर्माची परिभाषा करणे कठीणच आहे. मानवाच्या उत्थानाला सहाय्यभूत ठरते तो धर्म. त्यामुळे निश्चितच मानवाचे ज्यामुळे कल्याण होते तोच खरा धर्म. The learned Maharishis have declared that which sustains is Dharma. The word ‘धर्म’ is derived from a ‘Root’ verb ‘धृ’, which means to sustain (धारण करणे). [Reference: Legal and Constitutional History of India, Vol. I, Ancient Legal, Judicial and Constitutional System by Mr. Justice (Retired) M. Rama Jois, High Court of Karnataka, published by N. M. Tripathi Pvt. Ltd., Mumbai, 1984]   

मानवाला एक अजोड गोष्ट परमेश्वराने दिलेले आहे व ती म्हणजे ‘बुद्धी’. बुद्धीमुळेच चांगले काय व वाईट काय, योग्य काय व अयोग्य काय, नितीतत्वाला धरून काय व अनीतीचे काय, ह्यामधील फरक ओळखण्याची क्षमता व कौशल्य मनुष्याला प्राप्त झालेली आहे. जसे आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिगमंड फ्राईड (Sigmund Freud) याने मनुष्याच्या व्यक्तिमत्वाच्या तीन भागांची कल्पना मांडली आहे. त्यात सर्वात खालच्या स्तरावर जे आहे त्याला त्याने ‘Id’ म्हटले आहे, जो की अपरिपक्व आहे, जो कशालाच मानत नाही, कशाचीही पर्वा करत नाही, कुठलेही बंधन स्विकारत नाही व जे मनात येईल ते, जेंव्हा वाटेल तेंव्हा व जिथे वाटेल तिथे करू इच्छितो. त्याच्या वरील पातळीवर फ्रोइडने दुसरी पातळी किंवा संकल्पना सांगितली ती म्हणजे ‘Ego’. हा प्रौढ माणसासारखा खालच्या पातळीवरील ‘Id’ ला सतत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी ते त्याला अवघड जाते किंवा खूपच अशक्य होऊन बसते, अशा वेळी त्याच्या मदतीला धावून येतो तो ‘Superego’. हा सुपर इगो कसा तयार होतो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लहानपणापासून आईवडील, काका, मोठा भाऊ किंवा मोठी बहीण, शाळेतील शिक्षक आजुबाजुचे, शेजारी व समाजातील धुरीण लोक जे सांगतात, बोलतात, वागतात व करतात त्या सर्वांचा संयुक्त व एकत्रित परिणाम व्यक्तीच्या अंतर्मानावर अव्याहतपणे होत असतो; व त्यातूनच हा सुपरइगो तयार होतो, जन्माला येत असतो, त्याचे पोषण व वृद्धी होत असते. हा सुपर इगो खरे तर घरातील वडीलधार्‍या मंडळीप्रमाणे, म्हणजे आजोबा-आजी प्रमाणे सर्वांना मार्गदर्शन करीत असतो, जे सहसा सर्वजण स्विकारतात व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात. हे मार्गदर्शन म्हणजे समाजमान्य वर्तन, नैतिक नियम, धार्मिक बंधने तथा कायदेशीर बंधने होत; परंतु याची  काही अशी लिखित नियमावली (Code of Conduct) तयार केलेली नाही किंवा ती जशीच्या तशी संपूर्ण देशभर, भारतीय राज्यघटनेप्रमाणे एकच नाही. प्रदेशानुसार, धर्मानुसार व काही पारंपारिक सामाजिक पद्धतीनुसार ते बदलत जातात. कालानुसार देखील त्यात बदल होत जातात. यापूर्वी, वर आलेला संदर्भ ‘त्यजेत एकं कुलस्यार्थे’ यावर प्रकाश टाकतोच. आचार्य चाणाक्यांनी सांगितलेले नियम, महर्षि मनुने सांगितलेले नियम, याज्ञवल्क्यस्मृतिमध्ये सांगितलेले नियम व आज समाजात अस्तित्वात असलेले नियम एकसारखे नाहीत. ते बदलत गेलेले आहेत कालानुरूप. ह्या महान विभूतींनी जे त्या काळात सांगितले त्याला आपण आजच्या कायद्याच्या परिभाषेत Juridical Science किंवा Principles of Jurisprudence म्हणू शकतो.  

श्री. डबल्यू फ्रिडमन ह्या कायदेतज्ञाने त्याच्या ‘Law in the Changing Society, Sweet & Maxwell, Universal Book Traders, end Edition, 1st Indian Reprint, 1996, ISBN 81-7494-011-1 ह्या पुस्तकात ह्यावर प्रदीर्घ चर्चा केलेली आहे.

तर मुद्दा असा की, वर उल्लेखिलेला ‘सुपरइगो’ शतकानुशतके एक सारखाच आहे असे म्हणता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की, सर्वकाळी तेच समान नियम असू शकत नाही, तर ते कालानुरूप बदलावे लागतात व बदलले पाहिजे, म्हणजे ते कालबाह्य होणार नाहीत व त्यांचे पालन समाजातील लोक करतील.

आपल्या राज्यघटनेच्या घटना समितीने ही बाब लक्षात घेऊनच आपल्या संविधानात 20 व्या भागात कलम ३६८ मध्ये राज्यघटनेत बदल करण्याच्या अधिकाराची (खरे तर बदल कसा करायचा त्या पद्धतीची) तरतूद केलेली आहे. ह्या बाबत खूप प्रसिद्ध निवाडा मा. सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य व इतर ह्या प्रकरणात दिलेला आहे व तो खूप दूरगामी परिणाम करणारा (Prospective Overruling) आहे. त्या निवाड्याच्या परिच्छेद- ७८ मध्ये असे म्हटले आहे की,

“(1) The power of the Parliament to amend the Constitution is derived from Articles 245, 246 and 248 of the Constitution and not from Article 368 thereof, which only deals with procedure. Amendment is a legislative process.   

Before, we close, it would be necessary to advert to an argument advanced on external plane. It was said that if the provisions of the Constitution could not be amended it would lead to revolution. We have not said that the provisions of the Constitution cannot be amended but what we have said is that they cannot be amended so as to take away of abridge the fundamental rights. Nor can we appreciate the argument that all the agrarian reforms which the Parliament in power wants to effectuate cannot be brought about without amending the fundamental rights. It was exactly to prevent the rights of the people that the fundamental rights were inserted in the Constitution. It is the duty of the Parliament to enforce the directive principles; it is equally its duty to enforce them without infringing the fundamental rights. The Constitution-makers thought that it could be done and we also think that the directive principles can reasonably be enforced with the self-regulatory machinery provided by Part-III. Indeed both Parts III and IV of the Constitution form an integrated scheme and are elastic enough to respond to the changing needs of the society. The verdict of the Parliament on the scope of the laws of social control of the fundamental rights is not final, but justifiable. If not so, the whole scheme of the Constitution will break. (AIR 1973 SC 1461: 1973 4 SCC 225)

आजच्या आधुनिक विधिशास्त्राप्रमाणे कायदा हा गरजेनुसार बदलायला हवा. बदल हा जगाचा आत्मा आहे. आपण आज ज्याला कायदा (Law) म्हणतो त्यालाच पूर्वीच्या काळी, धर्म म्हणत होते. धर्मशास्त्र म्हणजेच कायदेशास्त्र.

या संदर्भात, मनुस्मृतीमध्ये,  

‘धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षती रक्षित: |

तस्माद्धर्मो न हन्तव्यो, मानो धर्मो हतोsवधीत् || [मनुस्मृती:  अध्याय-८, श्लोक १५]

असा एक श्लोक आहे, त्याचा अर्थ असा आहे की, जो धर्माचे रक्षण करतो, धर्म त्याचे रक्षण करतो. म्हणून कधीही धर्माचा नाश करू नये. जर आपण असे कृत्य केले की, त्यामुळे धर्माचा नाश होईल, तर मग आपले रक्षण कोण करेल?  धर्म याचा अर्थ इंग्रजीतील ‘रिलीजन’ (Religion) असा होत नाही, तर आपली विहित कर्तव्ये (Prescribed Duties) करणे. Duties casted upon you by either society or law etc. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत (The Way of Life) म्हणजे आजच्या परिभाषेत सांगावयाचे झाले तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या राज्यघटनेच्या भाग-४-अ, कलम-५१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘नागरिकांची ११ मूलभूत कर्तव्ये’ (Duties of Citizens) म्हणता येतील.  

आता जबाबदार नागरिकांची कर्तव्ये तर आपण शाळेत असताना ‘नागरिकशास्त्रात’ (Civics) शिकलो आहे. एक उत्तम व आदर्श नागरिक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे पसायदान मागितले आहे, त्यात ते काय मागतात ’जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात.’ किती मोठी वैश्विक संकल्पना! किती सहृदयता त्यांची. स्वत:करिता काहीहीं नाही मागितले, तर जे काही मागितले ते इतरांसाठी. सर्वांचे कल्याणच फक्त डोळ्यासमोर होते. याच सदवृत्तीच्या अनुषंगाने समाजाचा एक जबाबदार व उत्कृष्ट घटक म्हणजे नागरिक बनण्याकरिता प्रत्येकाने समाजाप्रती प्रेम, आस्था, आपुलकी, माया व करुणा बाळगायला हवी, तरच व्यक्ति समाजोपयोगी बानु शकेल. समाजोपयोगी बनण्याकरिता व्यक्ति चारित्र्यवान तर असायला पाहिजेच, पण त्याशिवाय तो सदगुणांनी संपन्न देखील असायला हवा. हेच तर आपल्या संविधानात वर उल्लेखिलेल्या कलम-५१ अ (ई व जे) मध्ये नमूद केलेले आहे.

संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध सुभाषित आहे.

साहित्यसंगीतकलाविहीन: साक्षत्पशु: पुच्छविषाणहीन: |

तृणम् खादन्नपि जीवमान: तद्भागधेयं परं पशूनां ||

ज्या व्यक्तिला साहित्य, संगीत, कला यापैकी कशातच रस किंवा आवड नाही, तो शिंग व शेपूट नसलेल्या प्राण्याप्रमाणे आहे; जो फक्त पशुप्रमाणे गवत खात नाही इतकाच काय तो फरक. म्हणजे कुठल्याही व्यक्तिला खर्‍या अर्थाने जगण्याकरिता किंवा जगण्यातील अर्थ कळण्याकरिता, जगण्यातील आनंद अनुभवण्याकरिता गायन, वादन, नृत्यकला, चित्रकला, मूर्तिकला, अभिनय किंवा कविता रचणे, लेख लिहिणे, नाटक लिहिणे किंवा एखाद्या क्रिडा प्रकारात तरीआवड असावी, रस असावा, जाण असावी.

समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात रममाण झालेल्या व्यक्ति, मग त्या नाटककार कै. अण्णासाहेव किर्लोस्कर, बालगंधर्व, पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब, पद्मभूषण पं. बिरजु महाराज, पद्मभूषण पं. केलुचरण महापात्रा, श्रीमती महाश्वेता देवी, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर, भारतरत्न पं. रवीशंकर, पद्मविभूषण पं. ओंकारनाथ ठाकूर, पदद्मश्री उस्ताद अलारखा खाँ साहेब, पं. पन्नालाल घोष, पद्मभूषण पं. सामता प्रसाद, पंडिता हिराबाई बडोदेकर, पद्मभूषण श्री. विजय तेंडुलकर, श्री. रविंद्रनाथ टागोर, पद्मश्री श्री. अशोक कुमार, भारतरत्न पंडीता एम. सुब्बलक्ष्मी, पदद्मश्री श्री. प्रकाश पदूकोण, श्री. गोविंद बल्लाळ देवल, श्री. साने गुरुजी, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, श्री. पु. ल. देशपांडे, भारतरत्न श्री. भुपेन हजारीका, भारतरत्न श्री. सत्यजित रे, पद्मभूषण श्री. राज कपूर, डॉक्टर श्रीराम लागू, पदद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल, श्री. भा. रा. तांबे, श्री. बा. सी. मर्ढेकर, कवियत्री श्रीमती बहिणाबाई चौधरी, कवि श्री. ग्रेस, पदद्मश्री श्री. मणीरत्नम, पद्मभूषण श्री. शाम बेनेगल, पद्मभूषण श्री. विनु मंकड, पदद्मश्री श्री. मन्सुर अली खान (टायगर) पातौडी, सर डोनाल्ड ब्र्याडमन, श्री. माल्कम मार्शल, श्री. यांडी राबर्ट, श्रीमती मार्टिना नवरातीलोव्हा, पद्मविभूषण श्रीमती मेरी कॉम, भारतरत्न श्री. एम. जी. रामचंद्रन, श्री. दादासाहेब फाळके, पद्मभूषण श्री. सुनील गावस्कर, श्री, विजय मर्चन्ट, पद्मश्री नाना पाटेकर वगैरे, ह्या सर्वच महान व्यक्ति आहेत यात तिळमात्रही शंका नाही. या सर्वांनी आपापल्या परीने समाजाची सेवा करून समाजाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु, यापैकी कुणीही समाजाला घातक ठरेल असे कुठलेही कृत्य कधीही केलेले नाही.

चित्रपटाचा शोध १९व्या शतकात लागल्यापासून चित्रपट समाजावर परिणाम करणारे एक प्रभावी साधन ठरलेले आहे. सुरूवातीला चित्रपट मूकपट होते, तरीसुद्धा ते परिणामकारक होतेच. संवादशास्त्रानुसार (Science of Communication) कुठल्याही दोन व्यक्तिमध्ये जो संवाद होतो त्यातील जवळपास ८०% संवाद हा शब्दविनाच होतो, ज्याला आपण ‘देहबोली’ (Body Language or Non-Verbal Communication) म्हणतो. देहबोलीमध्ये डोक्यावरील केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवांचा पूरेपूर उपयोग करता येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नृत्य, मग ते कुचीपुडी असो, भरतनाट्ट्यम असो,  मणीपुरी असो की कत्थक असो. त्या त्या नृत्य प्रकारची वैशिष्ठे काहीही असली तरी, चेहर्‍यावरील भावमुद्रा (डोळ्यांच्या हावभावांसह) श्ब्दातील व मनातील भाव व विचार व्यक्त करण्याचे सर्वात प्रमुख माध्यम आहे. तुलनात्मकदृष्ट्या १९५० ते १९७० च्या काळात हिन्दी चित्रपटसृष्टी गाजविणारे प्रख्यात कलाकार स्व. श्री. शम्मी कपूर यांच्या अभिनीत कुठल्याही चित्रपटातील कुठलेही गाणे पहा म्हणजे चेहर्‍याचा किती ऊतम उपयोग करून घेता येऊ शकतो याची साक्ष पटेल. हे मीच नाही तर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. सचिन पिळगावकर ह्यांनी ‘एकापेक्षा एक’ ह्या लोकप्रिय नृत्य स्पर्धेच्या टीव्हीवरील कार्यक्रमात स्पर्धकांना स्सांगितल्याचे मला आठवते. माझ्या माहितीप्रमाणे भरतनाट्ट्यम शिकवितांना सर्वप्रथम डोळ्यांच्या हालचाली व चेहर्यावरील भाव कसे दाखवायचे हेच शिकविले जाते. म्हणजेच शब्दाविना देखील मनातील विचार व्यक्त करता येतात.              

मुकपटाची जागा बोलक्या चित्रपटांनी घेतल्यानंतर तर क्रांतीच झाली. विद्युत दिवा व रेडिओने जसे जग बदलून टाकले, त्यापेक्षाही जास्त सामाजिक परिणाम बोलक्या चित्रपटांनी समाजावर करण्यास सुरुवात केली. ह्या दृकश्राव्य माध्यमाने भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्नासच्या दशकात देशभक्ती, गरीबी वगैरे विषय प्रामुख्याने त्यावेळच्या चित्रपटात हाताळले. याचा अर्थ असा मुळीच नाही की, त्याच कारणांकरिता ते चित्रपट बनविल्या गेलेत. चित्रपट हा व्यवसाय असून पैसा कमावणे, नफा कमावणे हा चित्रपट निर्मितीचा मुख्य उद्देश असणारच व आहे सुद्धा.

प्रत्येक चित्रपट निर्माता समाजाला कांहीतरी संदेश देऊ ईच्छितो व त्या अनुषंगाने तो कथा निवडतो व दिग्दर्शकाकडून देखिल तीच अपेक्षा ठेवत असतो.

साधारणत: १९५० ते जवळपास १९७० पर्यन्तच्या काळात तयार करण्यात आलेले हिन्दी चित्रपट हे प्रामुख्याने मनोरंजनात्मकच होते, ‘हकीकत’, ‘हरेराम हरेकृष्ण’ सारखे कांही अपवाद वगळता. त्यानंतर मात्र ज्याला समांतर सिनेमा (Parallel Cinema) किंवा कलात्मक सिनेमा (Art Films) म्हणू शकतो, अशा चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरवात झाली. त्यात अग्रभागी असणारे दिग्दर्शक म्हणजे श्री. शाम बेनेगल. त्यांच्या निशांत, अंकुर, कोंडूरा, मंथन, जुनुन, त्रिकाल, मंडी, कलयुग वगैरे चित्रपटांद्वारे त्यांनी अतिशय गहन आशय असणारे संदेश समाजाला दिलेत. त्यांच्या त्या चित्रपटात, श्री. नासिरुद्दीन शहा, श्रीमती शबाना आझमी, श्री. अनंत नाग, श्री. साधू मेहेर, स्व. श्रीमती स्मिता पाटील, श्री. कुलभूषण खरबंदा सारख्या प्रख्यात कलाकारांनी भूमिका करून त्या चित्रपटांचे सोने केले. ऋषिकेश मुखर्जींचे ‘रजनीगंधा’, ‘चितचोर’ सारखे हलकेफुलके पण समाजातील सामान्य माणसांच्या समस्या मांडणार्‍या चित्रपटात श्री. अमोल पालेकरांसारख्या मराठी अभिनेत्याने बहार आणली. स्व. डॉक्टर गिरीश कर्नाडांचे  ‘हयवदन’ पण गाजले. नंतरच्या काळात, यातील कांही कलाकारांनी आपण फार प्रसिद्ध व मोठे वरिष्ठ अभिनेते आहोत या गुर्मीत समाजात तेढ निर्माण करणारे, समाज व देशाविरुद्ध भूमिका घेऊन विद्वेषक विधाने केली, जसे की या देशात रहेण सुरक्षित वाटत नाही, इथे एका विवक्षित धर्मांच्या लोकांवर अन्याय होतो, इथे बोलण्याचे स्वातंत्र्य शिल्लक राहिलेलं नाही वगैरे.   

त्याआधीच्या म्हणजे साठच्या दशकात, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी या भागात कनू सन्यालच्या  नेतृत्वात ‘नक्षल चळवळी’ ला सुरुवात झाली. मला वाटते तो काळ १९६५ चा असावा. त्यावेळी पुण्यातून प्रसिद्ध होणारे ‘माणूस’ नावाचे एक साप्ताहिक होते, जे श्री. ज. माजगावकर संपादित करीत होते. त्यात एक प्रदीर्घ लेखमाला ‘रोखलेल्या बंदुका उठलेली जनता’ श्री. अरुण साधू यांनी लिहिली होती व ती खूप गाजलीही होती. ती लेखमाला जर कुणाला वाचता आली तर नक्षल चळलवळीविषयी बरीच विस्तृत माहिती मिळू शकेल.

पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाले व सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारी जमीनदारी पद्धती व जमिनदारांविरुद्ध संघर्षाकरिता नक्षल चळवळ जन्माला आली. या चळवळीचे मूळ खरे तर आदिवासींचे हक्क होते, व ती चळवळ तशीच रहायला हवी होती, पण पुढे जाऊन दुर्दैवाने तो विषय बाजूला पडून ‘केवळ प्रस्थापितांविरुद्ध संघर्षं’  हाच प्रमुख मुद्दा झाला व ती चळवळ भलतीकडेच भरकटत गेली. पुढे जाऊन तर कायद्याने प्रस्थापित झालेल्या राज्यांच्या विरोधात सशस्त्र हिंसात्मक बेकायदेशीर समूह हेच स्वरूप आज मितीला पाहाव्यास मिळते.

यापूर्वी वर उल्लेख केलेल्या चित्रपटात भूमिका करणारे कलाकार, त्यांच्या भूमिकेंशी शंभर टक्के तादात्म्य पावणारे कलाकार होते, व ते त्या भूमिका त्या चित्रपटामध्ये खरोखर जगले. त्यात त्यांचे अभिनय सामर्थ्य पण सिद्ध झाले; परंतु तो चित्रपट व त्यातील भूमिका म्हणजे वास्तविक आयुष्य नाही याचा विसर त्यांना पडला. ते त्यांच्या भूमिकांच्या इतके प्रेमात पडले की, त्यांच्या नकळत ते विभाजित व्यक्तिमत्व (Split Personality Disorder) ह्या मानसिक रोग्यासारखे वागू लागले.  त्यातून गाजलेले कलाकार, जसे नासिरुद्दीन शहा, शबाना आझमी, डॉक्टर गिरीश कर्नाड, अमोल पालेकर सुद्धा सुटले नाहीत. त्यांच्या अभिनीत भुमिकेच्या कथाबिजांचा त्यांच्या अंतर्मनावर नकळत परिणाम होत गेला. अवास्तव व स्वप्नील ध्येयाकडे निरर्थक घोडदौड करणे त्यांनी सुरूच ठेवले. ते पुढे इतक्या थराला जाऊन पोहचले की, स्व. डॉक्टर गिरीश कर्नाड सारखे प्रसिद्ध प्रचंड बुद्धिमान लेखक, दिग्दर्शक व अभिनेते आपल्या गळ्यात ‘I am Urban Naxal.’ अशी पाटी बांधून अर्बन नक्षल स्व. श्रीमती गौरी लंकेशच्या खुणासंबंधात उपोषणाला बसले होते. डॉ. गिरीश उत्तम कलाकार होते व आशियातील प्रसिद्ध फिल्म व टेलिव्हीजन इंस्टिट्यूटचे काही काळाकरिता संचालक पण होते, त्यांनी या थरापर्यंत जावे हे किती दुर्दैवी आहे समाजाकरिता.  

पुर्वी ‘ब्रिलक्रीम’ ह्या हेअरक्रिमची जाहिरात जुना प्रसिद्ध विकेट-किपर श्री. फारूख इंजिनीअर करायचा. खा. श्री. सनी देओल व श्री. मिथुन चक्रवर्ती हे ‘ब्यागपायपर’ ह्या व्हिस्कीची जाहिरात करायचे आणि आता तर पदमभूषण श्री. अमिताभ बच्चन कशाचीहि जाहिरात करतात. कपडे, आयुर्वेदिक चूर्ण, हजमोला इत्यादि. उद्या त्यांनी एखाद्या प्रसिद्ध कंपनीच्या स्यानीटरी वेअरची जाहिरात केली तरी आश्चर्य वाटायला नको; कारण

यस्यास्ति वित्तं स नर: कुलीन: स पंडित: स श्रुतवाङ्गुणज्ञ: |

स एव वक्ता स च दर्शनीय: सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते || ४१||

[ नीतिशतक – राजा भर्तृहारी ]     

ज्याच्याकडे धन आहे, पैसा आहे, त्याला कुलीन, पंडित, शास्त्रज्ञ व सर्वगुण संपन्न असणारा आहे असे समजण्यात येते; म्हणजेच दुसर्‍या भाषेत असे म्हणता येईल की, धनवान सर्वगुण संपन्न असतो.  हे तत्वच फक्त खरे आहे असे गृहीत धरले की, मग धन मिळविण्याकरिता काय वाट्टेल ते करण्यास व्यक्ति तयार होते. आता बघा ना १९८४ साली महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ मध्ये पदमश्री अनुपम खेर यांनी त्यांच्या पाहिल्याच चित्रपटात त्यांच्या त्या वेळच्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त वयाची, ज्याने आपला एक तरुण मुलगा गमावलेला आहे अशा वृद्धाची आव्हानात्मक अर्थपूर्ण भूमिका केली; तर त्याच्या अगदी विरुद्ध, वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या असतांना अमिताभ बच्चनने २००७ मध्ये, राम गोपाल वर्मांच्या ‘निशब्द’ ह्या चित्रपटात, त्यांच्या नातीच्या वयाच्या मुलीची भूमिका स्व. श्रीमती जिया खान बरोबर केली. ज्यामध्ये, दोघांच्या वयात जवळपास तीस पेक्षा जास्त वयाचे अंतर आहे, अशा व्यक्तिमधील प्रेम व प्रणयपूर्ण (Romantic acting) असाअभिनय केला. हे जरी खरे असले की, तो चित्रपट होता व ती भूमिका होती. कलाकाराने कुठलीही भूमिका करावी व ती भूमिका जिवंत करण्याकरिता त्या भूमिकेत जीव ओतावा. त्या भूमिकेशी एकरूप व्हावे, हे सर्व मान्य केले तरी तसे करण्याकरिता मनात व हृदयात सुयोग्य भाव व विचार निर्माण केल्याशिवाय ती भूमिका उत्कृष्ट होउच शकत नाही हे नाकारता येत नाही. हा मुद्दा दुसर्‍या एका उदाहरणावरुन नक्की पटेल.

१९७० मध्ये श्री. वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित ‘नटसम्राट’ मधील श्री. अप्पा बेलवलकरांची भूमिका डॉक्टर श्रीराम लागुंनी अजरामर केली. नंतर तीच भूमिका श्री. दत्ता भट, श्री. सतीश दुभाषी वगैरे अनेकांनी केली. यापैकी, डॉक्टर श्रीराम लागू व श्री दत्ता भटांसारख्या अव्वल कलाकारांना भूमिकेशी १०० % तादात्म्य पावल्यामुळे शरीरावर होणार्‍या गंभीर परिणामांपासून सुरक्षित राहण्याकरिता काही काळानंतर, ती भूमिका न करण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्याचे माझ्या वाचण्यात आलेले आहे.

माझा मुद्दा असा आहे की, मग अशा भूमिका केल्यानंतर त्याचे परिणाम आपोआपच आपल्या खर्‍या आयुष्यावर होतात. याचा अर्थ असा मुळीच नाही की, चित्रपटात गुंडाची भूमिका करणारा खर्‍या आयुष्यात देखील गुंडगिरीच करेल. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे १९६० च्या दशकापासून तर अगदी १९८० दशकापर्यंत खलनायकाची तुफान भूमिका करणारे अफलातून कलाकार स्व. श्री. प्राण सिकंदर, जे त्यांच्या दररोजच्या आयुष्यात अत्यंत चांगले नागरिक जोते. प्रत्येकच कलाकाराने आपली भूमिका उत्कृष्टच करणे अपेक्षित असते, परंतु आपली भूमिका चांगली वठविणे जितके आवश्यक आहे तितकेच त्या कलाकारांनी प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे देखील आवश्यकच नव्हे तर अपरीहार्य आहे.  

कला, कलात्मकता व कलावाद जोपासतांना नकळत त्या आभासी विश्वाला बळजबरीने प्रत्यक्ष खर्‍या आयुष्यात ओढून आणण्याचा प्रयत्न केला की, मग ‘माझ्या नातीला लग्नाविना किंवा लग्नापूर्वी मूल झाले, तरीही मला काहीही हरकत नाही’; असे विचार बोलल्या जातात. आपल्याला काय त्याचे असेही आपण म्हणू शकतो, पण समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहेच की. कायदेशास्त्राच्या संदर्भात एक म्हण आहे, ‘Suggestio Falsi and Suppressio Veri’. याचा अर्थ आहे ‘खोटे सांगणे व खरे दडवून ठेवणे. (A. P. Public Service Commission vs. Koneti Venkateswarulu and Others (Supreme Court of India, Appeal (Civil) 5335 of 2005). आपण एक जबाबदार नागरिक म्हणून जे योग्य वाटते ते मत प्रदर्शित केलेच पाहिजे. त्याकरिताच तर आपल्याला आपल्या संविधानाने भाषण स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार [भारतीय राज्यघटना: कलम १९ (१ ) (अ )] आपल्याला दिलेला आहे.

आपल्या प्रस्तुत लेखाचा मुळ मुद्दा आहे तो ‘प्रतिक्रियावाद’ (Reactionary Approach). प्रस्थापित सामाजिक मूल्यांविरोधात बोलले म्हणजे आपोआप प्रसिद्धी मिळते हे कटूसत्य आहे. माध्यमे नकारात्मक बोलणार्‍या व्यक्तींची बातमी ताबडतोब करतात. तेंव्हा तसे काही नकारात्मक केले की कामच झाले. अशाच काहीशा भ्रामक समजुतीमधून १९ व्या शतकात प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्वज्ञ कार्ल मार्क्स याने उत्पादनाचा महत्वपूर्ण व मुख्य घटक असलेल्या ‘भांडवल’ पूरवणार्‍या पायाभूत स्त्रोतावरच निशाणा साधला. पुढचा इतिहास सर्वांना माहीत आहे. आपल्या लक्षात येईल की, कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान कसे फसवे होते व आज तर चीन व रशियामध्ये खुद्द तेथील जनता कम्युनिझमच्या विरोधात जाताना दिसून येत आहे.

मला आठवते १९७७ साली, आणीबाणी संपल्यानंतर एका खाजगी बैठकीत माझी सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ खासदार डॉक्टर सुब्रमनियम स्वामी यांची पुण्यात गाठ पडली. त्यावेळी, त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या रशिया भेटीचा एक अनुभव सांगितला. ते एका व्यक्तिला

भेटण्याकरिता मास्कोमध्ये त्याच्या घरी गेले होते. तेंव्हा ते सद्गगृहस्थ घरी नव्हते व त्यांची पत्नी देखील घरी नव्हती. घरी असणार्‍या मुलाला त्यांनी  विचारले की, बाबा लवकर येतील का आई? व तुझी आई कुठे गेलेली आहे? मुलाने संगितले की, बाबा बाहेर गावाला गेलेले आहेत व ते बहुधा लवकर येतील. पण आईला यायला वेळ लागेल कारण, आई बाजारात ब्रेड आणयला गेलेली आहे. ही आहे वस्तुस्थिती कम्युनिझमची. आजही रशिया व चीनमध्ये चित्र यापेक्षा फार वेगळे नाही. म्हणजे कार्ल मार्क्सने लोकप्रिय होईल असा मुद्दा उचलला, पण त्याचा समाजाला काय उपयोग झाला? याशिवाय, आज त्या दोन्ही देशांमध्ये मानवी हक्क नावाला देखील शिल्लक नाहीत.  

सदविचाराने वागणार्‍याच्या सात्विक कृतीला किती व कोणती प्रसिद्धी मिळते. प्रामाणिक नोकरी करणार्‍यांपेक्षा आपल्या कार्यालयात अरेरावी, उद्धटपणा व भ्रष्टाचार करणार्‍यांची बातमी लगोलग वार्‍यासारखी पसरते, ज्याला आजच्या डिजिटल यूगाच्या भाषेत ‘व्हायरल होणे’ असे म्हणतात.                    

कुठल्याही क्षेत्रात, मग ते साहित्य, कला, क्रिडा, संगीत असो, नकारात्मक विचाराने पछाडलेले व पैशाचा हव्यास असलेले लोक त्यांच्या क्षेत्रांबरोबरच समाजाचेही अतोनात नुकसान करतात, कारण सर्वसामान्य लोक अशा व्यक्तींमुळे लवकर प्रभावित होतात. किंबहुना जाहिरातदार मुद्दामच अशा व्यक्तिना भरमसाठ पैसे देऊन आपल्या वस्तूची जाहिरात करुन घेतात. सामान्य माणसाला का नाही अशी जाहिरात कराण्याकरिता पैसे देत, कारण सामान्य माणसाच्या मागे ते प्रसिद्धीचे वलय नसते? दक्षिण भारतात तर सर्वसामान्य लोक चित्रपट कलाकारांचे वेडेच असतात, मग ते स्व. एम. जी. रामचंद्रन असो की श्रीमती जय ललीता असो किंवा अगदी आताचे श्री. रजनीकांत असो.  

आता थोडेसे ‘कला’ ह्या विषयाबाबत पाहू. The purpose of art is not to produce a product. The purpose of art is to produce thinking. The secret is not the mechanics or technical skills that create art, but the process of introspection and different levels of contemplation that generate it. Once you learn to embrace this process, your creative potential is limitless.

Artwork should be an active verb (A lens by which to view the world.), not a passive noun (A painting that sits dormant in a museum.) Creativity lies NOT in the ‘done’, but in the ‘doing’. Art is active and incomplete. Always shifting, always becoming. Art is a sneak peek into the future of potential, of what could be. Not a past result of what has been already done. Art is a process, not a product. [Article: The Purpose of Art – The Art of Vision by Mr. Erik Wahl].  

कला, सृजनात्मकता, कलात्मकता व नावीन्यपूर्ण निर्मिती (Creative Art) ही कुठल्याही कलेला, संगीताला, साहित्याला किंवा क्रिडा प्रकाराला समृद्ध करते.  तशा समृद्धीकरिता त्या विषयाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी उचित (Appropriate), उत्साहवर्धक (Inspiring), रचनात्मक (Positive) व सृजनशील (Creative) कार्य करायला हवे, हे महत्वाचे तत्व विसरून केवळ स्वत:च्या स्वार्थाकरिता आभासी व अवास्तव अशी स्वप्ने प्रत्यक्षात ऊतरविण्याचा केविलवाणा प्रयत्न, समाज मनावर विपरीत परिणाम करून दिर्घकालीन नुकसानीला कारणीभूत ठरू शकतील, नव्हे ठरणारच.

नीतिशास्त्र (Ethics and Morality) हे समाजातील सर्वच क्षेत्रांना लागू आहे. कायदेशीर असणार्‍या सर्वच कृती नीती तत्वांना मान्य असतातच असे नव्हे. मा. सर्वोच्च न्यायालयाने असे अनेक निकाल दिलेले आहेत की जे कायदेशीर आहेत, पण समाजाला ते मान्य नाहीत कारण ते प्रस्थापित नितीतत्वांना धरून नाहीत. (उदाहरणार्थ, ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ किंवा ‘समलिंगी विवाह’.) भारतात नितिशास्त्रावरील सुप्रसिद्ध ग्रंथ म्हणजे राजा भर्तृहरीचे “नितीशतक”. त्यामध्ये भर्तृहरीने असे म्हटले आहे, 

भवन्ति नम्रास्तरव: फलागमैर्नवाम्बुभिर्दुलाम्बिनो घना: |

अनुध्दता: सत्पुरूषा: समृद्धीभि: स्वभाव एवैष परोपकारिणाम् ||५०||  

[ नीतिशतक ]  

या श्लोकाचे मराठीत भाषांतर केलेले आहे प्रसिद्ध कवि श्री. वामन पंडीत यांनी.

वृक्ष फार लवती फलभारे, लोंबती जलद घेउनि नीरे,

थोर गर्व न धरी विभवाचा, हा स्वभाव उपकारपराचा ||५०||

याचाच अजून एक चांगला मराठी अनुवाद केला आहे श्री. ल. गो. विंझे यांनी.

होती थोरही वृक्ष नम्र जधि ये त्याते फलांचा भर,

येतां नीर नवे सुदूर धनही, ओळंबती भूवर ||

होती गर्वित ना कधी सुजन हे, संपत्ति येवो किती,

त्यांचा हाच असे स्वभाव जन जे अन्यार्थची कष्टता ||५०||

फळांचा बहर आला की, झाडे नम्र होतात, नवे पाणी भरले की, मेघ पुष्कळच खाली लोंबतात, त्याचप्रमाणे सज्जनांना वैभव आले तरी ते गर्वित होत नाहीत. परोपकारी माणसांचा हा स्वभावच आहे. जगप्रसिद्ध तत्वज्ञ जॉर्ज बर्नोर्ड शॉ यांचे एक वाक्य आहे, “Education is not for knowing more, but for behaving differently.” म्हणजे शिक्षण हे काही फक्त खूप माहिती मिळविण्याकरिता नसते तर वागण्यात परिपक्वता वाढण्याकरिता असते.    

श्रुति, स्मृति, वेद, उपनिषद व पुराणे हे भारतीय जीवनाचे खर्‍या अर्थाने आधारभूत स्त्रोत आहेत. दोन दिवसांपूर्वी इंडोनेशियातील बाली येथे आपले मा. पंतप्रधान श्री. नरेन्द्र्भाई मोदींनी नुकत्याच झालेल्या जी-२० ह्या जगातील अत्यंत शक्तीशाली समूहाचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतांना पुन्हा एकदा ‘वसुधैवं कुटुंबकं |’ ह्याच संकल्पनेचाच पुनरुच्चार केलेला आहे. हे सूत्र आपल्या रुग्वेदातील १० व्या  मंडलातील १९२ वे ‘संज्ञानसूक्त’च्या गाभ्याशी सुसंबद्ध (Aligned, Equated, Mingled and Synchronized) आहे. तेंव्हा, कला विश्वात काम करणार्‍या सर्वांना ( मग ते कलेचे कुठलेही क्षेत्र असो वा क्रिडेचे क्षेत्र असो.) हे लक्षात ठेवावयास हवे की, त्यांची प्रत्येक कृती ही भारतीय समाजाशी, म्हणजे भारतीयांच्या श्रद्धा (Faith), कल्पना (Ideas), मूल्ये (Values) व नितीकल्पनांशी (Moral concepts and Ethical thinking) सुसंगतच असली पाहिजे, मग तो कलाकार कितीही मोठा असेल. त्याला त्याच्या क्षेत्रातील प्राप्त झालेला मोठेपणा कितीही मोठा असो, तो मोठेपणा म्हणजे समाजात वाट्टेल तसे वागण्याचा, बोलण्याचा व करण्याचा अनिर्बंध व मुक्त परवाना मुळीच नाही. (The constitutional guarantee of Liberty and Freedom is not a guarantee to anybody; irrespective of his or her position, religion, gender, place of birth, economic condition or social status, under the Article 14 and Article 19 under Part–III, namely ‘Fundamental Rights’ to talk, comment, act or criticize anybody or anything, which is against the ethos of our nation and its culture. All constitutional guarantees are subject to, and governed by, or conditions and reasonable restrictions, as well as the Fundamental Duties mentioned in Part–IV A, above. All are equal before the law, because we have in India, ‘Rule of Law’.

त्यामुळे कुठल्याही क्षेत्रातील कुठल्याही व्यक्तिला कला, कलात्मकता, सृजनशिलता व निर्मिती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारताच्या अमोल वारशाला पायदळी तुडविता येणार नाही.          


मुकुंद भालेरावछत्रपती संभाजीनगर / २५-११-२०२२ / संध्याकाळी – १९:१३

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top