Marathi

आनंदाची फुले बहरली

विशाल मोठ्या सागरात ते,
एकच गलबत डोलत होते,
प्रतिबिंब असे लाटांमध्ये,
धवल शीड ते चमकत होते………………….

तिथे बहादुर एक नावाडी,
गलबत एकटे हाकत होता,
उफाळणार्याह सागराचे
संगीत कानात साठवत होता…………..

खळाळणार्याह लाटांबरोबर,
उच्च रवाने तो गात होता,
जोरात वारा घोंगावत होता,
पाण्याचा शिडकाव होत होता………..

तितक्यात एक गलबत दिसते,
हात कुणी तरी दाखवीत होते,
पुसटशी ती दिसते प्रातिमा,
ओरडून कांहीतरी सांगत होती……………….

दुसर्यात गलबतावरील व्यक्ति,
नावाडी तर वाटत नव्हती,
जिन्स आणि टी शर्ट मॉडर्न लुक,
ऐट मात्र फारच भारी……………

गलबत थोडे जवळ आले,
अरे ! ती तर मुलगी दिसत होती,
हवेबरोबर नाचणार्या सुंदर
कुन्तलांची सागरकन्या वाटत होती………….

दोन्ही गलबते जवळ आली,
तेंव्हा त्याच्या लक्षात आले,
दुसर्या गलबताचे उभे शीड,
फाटुन पार विदीर्ण झाले………..

जाणीव झाली त्याला याची,
तिचे गलबत धोक्यात होते,
म्हणून जिवाच्या आकांताने,
ती मदत मागत होती……………….

गळ त्याने टाकला पटकन,
दोर फेकला तिच्याकडे,
हातानेच खुणावले तिला,
ये इकडे माझ्याकडे………………

लाटा खूप उसळत होत्या,
वारा वेडा झाला होता,
क्षणाक्षणाला दोनही गलबते,
इकडून तिकडे ढकलत होता……………..

त्याने आपल्या गलबताला,
एक मोठा दोर बांधला,
क्षणाचाही विचार न करता,
त्या गलबतावर लटकत गेला…………..

खूप घाबरली होती ती,
चेहरा दु:खी झाला होता,
भिती चेहर्या:वर दिसत होती,
जीव कासावीस झाला होता………………..

धरण्यासाठी पटकन तिला,
त्याने आपला हात दिला,
तिकडून इकडे दोराला लटकत,
गलबतावर घेऊन आला………

दुसरे गलबत सोडून दिले,
त्याचे गलबत डोलत होते,
तिच्या सुंदर डोळ्यांमध्ये,
जगण्याचे प्रेम दिसत होते……………

माझे नाव मारीया लोबो !,
वाटले नव्हते असे होईल,
सकाळी ऊन पडले होते,
तेंव्हा वाटले छान होईल…………………

एकदम वादळ सुरू झाले,
शीड माझ्या गलबताचे फाटून गेले,
नेव्हीगेशन होते जवळ,
पण ती घाबरली होती………..

वाटले आता सारेच संपलय,
धावा देवाचा करीत होती,
काय होईल कसे होईल,
मेरीला हात जोडत होती………………

“तितक्यात अचानक दिसला तू,
प्रार्थना माझी सफल झाली,
संपणारच होते जीवन तेंव्हा,
जिवलग माझा झाला तू……….

नाही तरी संपत होते,
आयुष्य तेंव्हा तसे तरी,
आलास धावून असा तू,
जसा मिरेचा कृष्ण तू………..

जीवन दिले तू मला,
उतराई मी होऊ कशी,
तुझ्या शिवाय दुसर्या, कुणाची,
आता मी होऊ कशी………………..

सागराच्या लाटांमध्ये,
जीवन संपेल वाटत होते,
वेळीच धावून आला तू,
जरी नाते काहीच नव्हते………

पण हाच क्षण देवाने,
नक्की केला होता वाटे,
मिलनाचा संकेत घेऊन,
वादळ वारा आला वाटे……………..

आता नको म्हणू नको,
सागर तू माझा हो,
मिळाली ही सरिता तुझी,
आता मला सामावून घे” ……………

तो अंतरी शांत होता,
दैवाचा विचार करत होता,
मत्स्यकन्या असते का अशी,
प्रश्न स्वत:ला विचारत होता……………

आतून त्याच्या आवाज आला,
‘नाही तिला म्हणू नको,
हाती धरला हात तिचा,
आता कधीच सोडू नको”………….

पाऊल एक पुढे सरकला,
वाकून खाली बसला तो,
ओंजळीत घेऊन तिच्या मुखा,
तिच्या ओंजळीत नमला तो…………

मावळतीचे रंग गुलाबी,
वादळ सारे शांत झाले,
परिणयन त्यांचा पाहून ऐसा,
देवांचेही चित्त बहरले…………………..

नयनामध्ये स्मित गुलाबी,
ओठांवरती फुले उमलली,
निळ्या नभाच्या साक्षीने ती,
आनंदाची फुले बहरली…………….


मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर | ११-१२-२०२२ | १५:५१

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top