Marathi

नशीब म्हणजे काय असतं हो !

सकाळच्या कोवळ्या उन्हाची सुखावणारी ऊब असते,

निरभ्र आकाशात अचानक दिसणारी एकसाथ उडणारी पक्षांची रांग असते,

निरागसपणे हसणार्‍या सोनुल्यांची गम्मत असते,

खूप दिवसांनी अचानक पाठीवर पडणारी मित्राची थाप असते,

अवचित चेहर्‍यावर थिरकणार्‍या जलबिन्दुची बहार असते,

रेडिओ लावावा अन् पन्नासच्या शतकातील गोड जुनी गाणी लागावी,

प्रेमळ ताईचा दूरच्या गावावरून फोनवर ‘दादा कसा आहेस?’ असा प्रश्न यावा,

अर्धंगीनीने ‘अहो चहा टाकू कां?’ प्रेमाने प्रश्न करावा,

लाडक्या मुलीने पप्पा आज तुम्ही एकदम स्मार्ट दिसता म्हणावे ,

सायंकाळी ऑफिसमधून परतलेल्या मुलाने खूप दिवस झाले बाहेर जेवायला गेलो नाही म्हणावे,

तितक्यात नातवाने त्याच्या बाबाला, ‘आबांना आइसक्रीम पण द्या हं’ म्हणावे,

टीव्ही लावावा अन् ‘चित्रहार’ मध्ये देवानंद-मधुबालाचे “अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना |” दिसावे,

शेजारच्या फ्ल्याटमधून ‘माझे माहेर पंढरी’ पंडित भीमसेनच्या आवाजातील अभंग रेडिओवर ऐकू यावा,

गवक्षातून मावळतीला जाणार्‍या भाष्कराची सांध्यलाली खुलावी,

उंच उंच हिमशिखरावर सूर्य किरणांची सुवर्ण वर्षा व्हावी,

आनंदाने प्रेमाने अचानक पत्नीने ‘चला आज सालसा करू या’ म्हणावे,

तितक्यात नातवाने ‘नाही, रामरक्षा म्हणू या’ हुकूम सोडावा,

अन अवचितपणे आठवते कवि ग्रेसची व त्यांच्या  ‘चांदणे‘ ह्या कवितेची.

दिशांनी मला आज रंगांध केले

कुण्या मंद तंद्रीत रे साजणा ?

फिरे हात मेघांवरी सारखा अन्

तुटे शुभ्र संवेदनेचा कणा………

निळ्या अंतराळातुनी खोल येतात

संज्ञेत वाळूतली अक्षरे;

जशी दूरचा खंड सोडूनी आली,

इथे दाट शोकांतली पाखरे……….

कुशीला फुटाच्या कधी चंद्रवेली,

पुढे पृथ्विबिंबातले आरसे;

तुझ्या स्पर्शगांधार शैलीतले शिल्प

स्वप्नात माझ्या हंसावे जसे………….

गूढ भावनांमध्ये चित्त व्याकुळ होते, शोधत असते कसली तरी संवेदना  आणि विवरातून दूरवरून खोलातून ऊर्ध्वगामी उसळून येणारा एक विरळ, सशक्त अन् क्षणात तेज:पुंज होणारा प्रबळ ऊर्जेचा अमृत प्रकाशपुंज, जणू त्याला देवगंधर्वांनी भारून प्रवाहीत केले त्याला अन् देवांश असणार्‍या एका विचारवंत व भावनाप्रधान अस्तित्वाला अमृतमय करण्यासाठी प्रक्षेपित केले.

गहन विचारांची सहज समाधी भंग पावते ‘कुरीअर’ म्हणून आम्याझोंनवाला ‘धर्मशास्त्राचा इतिहास‘  हे  पुस्तक घेऊन यावा.

मित्राला फोन करावा अन्, त्याची कॉलर ट्यून ‘इतनी शक्ती हमे देना देता’ एकू यावी,

जवळच्या मंदिरातून मृदुंग चिपळ्यांच्या साथीने ‘जय जय रामकृष्ण हारी’ ऐकू यावे,

देवासमोर लावलेल्या सांजदिव्याच्या मंद प्रकाशात देवघरातील मुर्तींच्या  चेहर्‍यावर मंदस्मित दिसावे,

आणि अचानक सराईतपणे पुलंची संवादीनीवर

‘चंद्रिका ही जणू’ वाजवितांना फिरणार बोटे आठवावी,

तितक्यात कुठल्यातरी गझलेतील गुलाम अलींची ओळ,

हम तेरे शहरमे आये है एक मुसाफीरकी तरहा’ आठवावी.

समोरच्या भिंतीवर रवी वर्माचे पेंटिंग असावे असे वाटावे,

अन् डोळे मिटताच ते विनासायास दिसावे,

वाफाळलेल्या सुगंधी चहाच्या वासाने मन प्रसन्न व्हावे अन रसना जागृत व्हावी,

प्लेटमधली गरम भज्यांनी भुकेची आठवण करून द्यावी व अन पंचेचाळीस वर्षांपूर्वी लोणावळ्याहून पनवेलला पावसांत भिजत मित्राबरोबर डोंगरातून आडवाटेने केलेली भटकंती,  

परंतु, प्लेट बाजूला करून ‘शुभं करोती कल्याणम् |

ओळ आपसूकच बाहेर पडावी,

मुलीने जुन्या अल्बममधून सागरलाटांबरोबर 

खेळतांनाचा फोटो दाखवावा,

समोरच्या अक्वेरियममध्ये सोनेरी माशाने मोहकपणे गिरक्या घ्याव्या,

आणि आचानक लाइट जावे, मंद मेणबत्तीच्या अंधुकशा प्रकाशात

नातवाचा लोभा चेहरा दिसावा………..                 

पैशाचा विसर पडून जावा,

धनाचा मोह ओसरून जावा,

आतला आवाज ऐकू यावा,

अनाहत ध्वनि निनादत यावा,

ओंकाराचा आकार साकार व्हावा,

सहा चक्रांची जाणीव व्हावी,

ज्ञानेंद्रिये सजग व्हावी,

मेंदूच्या न्यूक्लियसमधून सार्‍या जाणिववांची गंगा,

मेंदूच्या मेंब्रेनला पार करून,

सप्तलोकांपर्यंत सलगपणे झरझर वाहत जावी,

वेदांमधल्या ज्ञानाबरोबर,

उपनिषदाची गंगा यावी,

पुराणांच्या सहवासाने,

वेदांगाची रसना यावी,

पूर्वसुकृताने धीरगंभीर,

चार महावाक्ये ऐकू यावी,

ओं प्र्ज्ञानं ब्रम्ह |

ओं अहं ब्रम्हास्मि |

ओं तत्वमसि |

ओं अयनात्मा ब्रम्ह |

चार वाक्यांचा महासंगम अनुभवास यावा…….

ऐतरेय उपनिषद,

बृहदारण्यक उपनिषद,

छंदोग्य उपनिषद,

मांडूक्य उपनिषद……….

सार्‍या उपनिषदांचे सार सिंधुनदीच्या काठावर,

प्राचीन काळी घन पद्धतीने,

वेदांचा उच्चरवाणे उद्घोष करणार्‍या महर्षींच्या,

निरामय सुंदर स्वरात अंतरात शिरावा……………….

अन असे वाटावे की जणू श्रावणातील

नितांत ब्रम्हमुहूर्तावर मंद मंद वार्‍याबरोबर,

एखाद्या पट्टीच्या गायकाने मेघमल्हाराची सुंदर ताण घ्यावी,

‘घन घन धारा नाभी दाटल्या कोसळती धारा,

केकारव करी मोर, काननी उभवून उंच पिसारा’ 

ह्या गदीमांच्या ‘वरदक्षिणा’ मधील मन्ना डे च्या

सुमधुर आवाजाची आठवण व्हावी………..

आणि पंडित बिरजू महाराजांच्या

झंकारणार्‍या पायातील पैंजणाबरोबर

मनाने थिरकायला सुरुवात करावी………….

पंडित हरिप्रसादांच्या बासरीतून

कोमल निषाद संतूरच्या साथीने,

शरीराच्या कणाकणात विहरत जावा…………

प्रत्येक स्वराने भारावून टाकावे,

तबल्यावर उस्ताद झाकीर हुसेनच्या

थिरकणार्‍या बोटातून निघणार्‍या

तालाबरोबर आत्मभान हरवून

देवाचिये द्वारे चित्त स्तब्ध व्हावे…………

अजून काय हवे असते,

आनंदाचे आंदण,

अजून काय हवे असते,

आनंदाचे कारण,

अजून काय वेगळे हवे असते,

‘अमृतासही पैजा जिंके’

ज्ञानेशाचे मागणे………..

एकदा कां सम सापडली की,

साथसंगत जमून जाते,

मात्रा एक देखील चुकत नाही,

वर्ज्य स्वर लागत नाही,

आरोह आणि अवरोहात,

रागांचे चलन विसंगत होत नाही,

शब्दांमध्ये मन अडकत नाही,

ध्रुवपदाबरोबर अंतरा सुद्धा जमून जातो,

पहिल्यापासून शेवटपर्यन्त,

सारा थाट रंगून जातो,

ब्र्म्हानंदी टाळी लागून जाते,

शक्तिस्वरूप दिसून येते,

कुंडलिनीच्या अस्तित्वाची जाणीव

मेंदूच्या न्यूक्लियस पर्यन्त पोहचते,

आदि शंकराचार्‍यांच्या गुरुअष्टकाचा उद्घोष होऊ लागतो: 

षडंगदिवेदो मुखे शास्त्रविद्या,

कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति

मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रिपद्मे

तत: किं तत: किं तत: किं तत: किं………….

आदि शंकराचार्‍यांच्या प्रश्नाची मालिका फेर धरू लागते,

व मग त्यावर उपाय पण दृष्टोपत्तीस येतो त्यांच्याच अमृतमय वाचनांमध्ये,

गुरोराष्टकं य: पठेत्पुण्यदेही

यतिर्भूपतिर्ब्रम्हचारी च गेही |

लभेत् वांछितार्थ पदं ब्रम्हसंज्ञं

गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् ||

आयुष्य सोप होऊन जाते,

प्रश्नांचे पहाड क्षणार्धात ढासळू लागतात,

समस्यांचा काळोख विरून जातो,

दु:खाचे लोंढे थांबून जातात,

आनंदाचा वर्षाव होऊ लागतो व त्या आनंद वर्षावात आठवतो सहज सुंदर ‘हरीपाठ’.

हरिपाठातील नितांत मनोहर शब्द योजना मनास मोहून टाकते.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,

तेने मुक्तिचारी साधियेल्या ||१.१||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा |

पुण्याची गणना कोण करी ||१.२||

भावेविण देव न कळे नि:संदेह |

गुरुविण अनुभव कैसा कळे ||५.३|| [हरीपाठ]

थोडक्यात काय तर,  

‘न गुरोरधिकं न गुरोरधिकं |’ मन सुस्थिर झाले की, मग,

ऐसे गुरूचे स्मरण होई तेधवा | भाग्याचा प्रसाद लाभे मला ||१||

विस्मरण न व्हावे आपुल्या मातापित्याचे | गुरुचरणाशी मन नित्य असो ||२||

गुरु स्मरणाने जळो पापराशी | हरीच्या चरणी मन रमो ||३||

हेचि खरे सुख आनंदकंद | असे लाभो भाग्य सर्वांशी ||४||

हरीचीच गोडी श्रवणास लागो | आनंदाशी कारण इतुके पुरे ||५|| [मुकुंदायन]

सुस्थिर होत असलेल्या मनात एक नवे विश्व दृग्गोचर होऊ लागते………..

एकदा कां असे ट्यूनिंग झाले आणि

परमेश्वराच्या अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीशी सिंक्रोनायझेशन झाले की

मग सतारीच्या झंकारणार्‍या तारातून

एक नवे विश्व दृगोच्चर होउ लागते…………

आपल्या लाडक्या पांडुरंगात,

पुर्णपणे लीन झालेला, आकंठ बुडून गेलेले तुकोबा आठवतात.

आजच्या भाषेत सांगायचे तर,

Tuykobaraay dissolved in Pandurang and lost his identity…….His existence gets aligned optimal level and he get saturated with Vitthal beyond all limits.

मग आर्तपणे भैरवीतली तुक्याची आळवणी,

अंत:करणाला अगदी पिळवटून टाकते, खरच सांगतो.

आनंदाचे डोही आनंद तरंग |

आनंदचि अंग आनंदाचे ||१||

काय सांगो जाले कांहींचियाबाही |

पुढे चाली नाही आवडीने ||२||

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |

तेथिंचा जिव्हाळा तेथें बिंबे ||३||

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |

अनुभव सरिसा मुखा आला ||४|| 

इतका सारा प्रवास केला की वाटते आपण अनंताचा प्रवास करून आलो. अवघे  विश्व पाहून आलो. सप्त लोकांना भेटून आलो. सप्त पाताळांना स्पर्श करून आलो. सारे अवकाश धुंडाळून आलो. तार्‍यांच्या अगणित आकाशगंगाना स्पर्शून आलो. सप्त सागर पार करून आलो. कित्ती मोठा प्रवास ! किती योजने फिरून आलो. किती मुक्काम टाळून आलो. किती पर्वत ओलांडून आलो. खळाळणार्‍या किती सरितांच मनस्वी गोड नाद कानांत साठवून आलो. किती गिरिकंदरांना पार केले. किती निर्झर, किती जल समुदाय, किती वृक्षवल्ली मला न्याहाळीत होत्या. अपूर्व होते सारे ! प्रवास आतला होता की बाहेरचा. प्रवास निर्हेतुक होता की सहेतुक. काही का असेना, जे गवसले ते पाहिले नव्हते स्वप्नात स्वप्नात देखील. जो अनुभव आला तो केवळ माझ्याच प्रयत्नामुळे असे नाहीच वाटत मला. दैवी आहे, परमेश्वराचे वरदान म्हणावे लागेल, अन्यथा दुसरा  कुठलाही पटणारा तर्क देता येणार नाही, सांगता येणार नाही आणि जेंव्हा बुद्धी अशी खुंटुन जाते, सारे तर्क संपून जातात, सारे आडाखे चुकून जातात, सारी प्रमेये निष्प्रभ ठरतात, तेंव्हा मग अगम्य शक्तिचे अस्तित्व मान्य करावेच लागते; किंबहुना दूसरा कुठलाही पर्याय शिल्लकच राहत नाही. The only option remains is to accept the God and his unfailing blissfulness, else continue wandering in the dark, aimlessly unending for time immemorial. The best way is to surrender and submit to him unequivocally and unconditionally with full understanding and His accept of eternity, perpetuity and formlessness. Once that is internalized everything falls in line and no riddle remains unanswered. म्हणजे पुन्हा तिथेच येऊन पोहचलो ना,

‘अनन्याश्चिंतयंतो मां ये जना: पर्युपासते | तेषाम् नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||९.२२||       

जे लोक अनन्य भावाने नित्य माझी उपासना करतात आशा लोकांच्या योगक्षेमाची काळजी मी घेतो. किती सोपे आहे न हे ! केवळ अश्रद्ध असल्यामुळेच बहुधा आपल्याला सर्व समस्यांना तोंड देत बसावे लागते. आपण स्वत: फार बुद्धिमान, तर्कमार्तंड समजून अनेक विनाकारण तर्क कुतर्क लढवित बसतो. त्यापेक्षा सरळ साधी सोपी गोष्ट करणे कधीही हितावहच नाही का बरे?

आपल्याला असे सारखे वाटत असते की आपण तथाकथित विज्ञान युगात आधीपेक्षा खूप जास्त ज्ञान मिळविले आहे आणि म्हणून पूर्वी प्राचीन ऋषिमुनींनी मिळविलेल्या ज्ञानापेक्षा आपल्याला जास्ती कळते व समजते. कित्ती भ्रामक समजूत आहे नं आपली. विश्वातील विज्ञानात अति प्रगत समजली जाणारी राष्ट्रे प्राचीन भारताच्या महान ज्ञानाला स्विकारत आहेत, परंतु आपण मात्र आपल्याच सांस्कृतिक वारशास नाकारत आहोत. ह्याच्या पुष्ट्यर्थ मी कांही संदर्भ येथे देऊ इच्छितो.

Carl Gustav Jung (July 26, 1875 – June 6, 1961) was a Swiss Psychiatrist. He is one of the founding fathers of Depth Psychology and the founder of Analytical Psychology. Like Maharishi Patanjali, he was a pivotal theoretician, whose work was derived from an integration of theory and practice. A study published in a book form titled as ‘Consciousness in Jung and Pat Anjali’, authored by Leanne Whitney, (Edition 2018, ISBN: 978-0-367-19872-5) throws light on the peculiarities of both (Page Nos. 69-70). The post enlightenment faith, in the rational mind is on clear display, when empirical science rests on the foundation that we can formulate our world view by means of researching phenomena, without any metaphysical assertions. Harold Coward (1985), author of ‘Jung and Eastern Thought’, has accurately observed that Jung, throughout his career, “repeatedly and obsessively denies any metaphysical claims,” yet his research remains within a framework that rests on the basic assumption that the “collective unconscious constitutes an original psychic entity, on which rests the conception of a man as microcosm corresponding to the macrocosm.” म्हणजे येथे जूंग देखील आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधाबाबत विचार करत होता. Furthermore, “in this collective unconscious the libido strives toward the emergence of the divine self.” आता हे वाचल्यानंतर तर मानवी मनातील राक्षस आपले ‘असुर’ अस्तित्व (Being Undesirable) सोडून ‘सुर’ (Desirable) बनण्याकरिता उत्सुक असतो व प्रयत्नशील असतो हीच बाब स्पष्ट होते. पुढे जाऊन त्या शोध निबंधात संशोधक / लेखक काय म्हणतो ते पाहू या.

In contradiction to Jung’s objectivity and alignment with empirical science, Patanjali’s work with objectivity and empiricism is temporary. Patanjali’s model uses reflective awareness (चिंतन शील जागरूकता) and the subject-object distinction to portray dualistic wordily life as suffering and mobilize the involution of all objects of awareness. Patanjali’s model relinquishes objectivity to lay emphasis on “Prajna” (प्रज्ञा), a feminine term defined as “wisdom (बुद्धी), knowledge (ज्ञान), insight (दृष्टी)”, which is gained neither through factual nor intellectual knowledge: Prajna (मेधा) connotes a clear experience of the non-dual (अद्वैत) instrument of pure perception (शुद्ध ज्ञान). ‘PatanjIi’s model relinquishes objectivity to lay emphasis on ‘Prajna’ ह्या मताशी मी मुळीच सहमत नाही.  

In Sutra 3.5,

तज्जयात्प्रज्ञालोक: ||

तत् – Then, from that, Consequently

जायत् – Mastery, Conquests

प्रज्ञा – Knowledge, Wisdom, Learned, Intelligent 

लोक: – Dawns, Light, Free, Open, Seeing

The light of knowledge as enlightenment attained in Samprajnata Yoga, which is ultimate knowledge of Grahya, Grahana and Grahita; which is step to attainment of Kaivalya.

Prajnalok is beyond means of Indriyas, Mind and Intellect, thoughts. In Samadhipada, Patanjali has explained how Rutumbhara Prajna dawns in Sabija Samadhi. This knowledge is Universal Truth.

Patanjali stated that through the mastery of three-part process of Concentration, Meditation, and Absorption, Prajna shines forth. Worldly experience consists of notion that there is no distinction between the Purusha self and Pure Intelligence, although these two are completely distinct. It also means the experience in duality (द्वैताचा अनुभव), in which consciousness is caught with its contents resulting in subject-object perception and the obscuration of non-duality (अद्वैताची अस्पष्टता).  

This thread of Patanjali’s text further reinforces his point that the stilling of the fluctuations of the mind is imperative in order to experience pure perception. (शुद्ध ज्ञानाकरिता विचलित होणार्‍या मनाला शांत व निश्चल करणे आवश्यक आहे.) Instead of moving around objects of knowledge, we get a vision from the inside. Yet for Patanjali, subject-object-knowledge-indeed, all empiric consciousness and epistemic states – must be completely assimilated and released for the ontic reality of pure consciousness to be known through direct experience.        

या बाबतीत, ओशो म्हणजेच आचार्य रजनीशांचे प्रतिपादन अर्थवाही वाटते. त्यांच्या म्हणण्यानुसार धारणा, ध्यान व समाधी मिळून सम्यम तयार होते. The three – Dharana, Dhyan Samadhi, taken together constitute Samyama and by mastering it, the light of Higher Consciousness dawns.     

या सर्वातील मोठा अडसर आहे आपले मन.

 मनो नाम महाव्याघ्र: विषयारण्यभूमिषु |      

चरत्यत्र न गछन्तु साधवो ये मुमुक्षव: || विवेकचूडामणी: १७८ ||

मन नावाचा महाभयंकर वाघ कर्मेन्द्रियांच्या प्रचंड मोठ्या जंगलात भटकत असतो. चांगल्या लोकांनी, म्हणजे ज्यांना मुक्ति हवी आहे त्यांनी त्या जंगलात जाउच नये. मला तर वाटते याकरिता ‘मन:शुद्धी’ (Purification of Mind) फार आवश्यक आहे. त्याकरिता कशाप्रकारे करता येईल ही अपेक्षित मन:शुद्धी.

मोक्षैकसक्त्या  विषयेषु रागं

निर्मूल्य संन्यस्त च सर्वकर्म |

सच्छृद्धया यश्श्र्वणादिनिष्ठो

रजस्स्वभावं सधुनोति बुद्धे: || विवेकचूडामणी: १७८ ||

मुक्ति प्राप्त करण्याच्या लक्षावर संपूर्ण समर्पणाच्या भावनेने लक्ष केन्द्रित केल्याने गोष्टींविशयींची वासना (Excessive Hunger) नष्ट होते. अशी वासना एकदा कां नष्ट झाली की, मग व्यक्ति वासनेमुळे कराविशी वाटणारी सर्व कर्मांचा त्याग करतो आणि गुरूंच्या वाचनांचे श्रवण करतो, ब्राम्हणावर संपूर्ण विषवास ठेऊन, ज्यामुळे बुद्धी राजस स्वरूप पुर्णपणे विल्यास जाते. ‘विवेकचूडामणी’ [Vivekchudamani with an English translation of the Sanskrit commentary of Sri Chandrasekhar Bharati of Sringeri, Bharatiya Vidya Bhavan, Mumbai, 1999].

जेंव्हा माणूस सगळे कळूनही न कळल्यासारखेच वागत राहतो तेंव्हा त्याच्या बुद्धीची कीव करावी वाटते. कांही लोक असे असतात की, त्यांना आपल्याला कळत नाही हेच मुळात कळत नाही. कांही लोक असे असतात की, त्यांना आपल्याला कळत नाही हे कळते, तर काही लोक असे असतात की, त्याना आपल्याला कळत नाही हे कळते आणि सर्वात भाग्यवान लोक ते की, ज्यांना कळते की, आपल्याला कळते. आता ज्यांना हे कळले तरीही जर त्यांची मानसिकता स्विकारण्याची नसेल तर त्यापेक्षा आणखीन दुर्दैव काय असू शकेल?

कैसा तू करंटा मारतोस लाथा, न कळे तुजला आपले हित ||१||

दिला तुझ्या हाती दिव्य प्रकाश दीप, परि तुला न गवसे भाग्य तुझे ||२||

आपुल्याच हाती भाग्याचा तो मार्ग, मुक्तीचा तो मंत्र नाकारतो तू ||३||

साक्षात जरी हरी ठाकला समोर, तरी त्यांसी ओळख मागतो कां? ||४||

भाग्याची रेखा दिली हातामध्ये, म्हणतसे हे असत्य सारे असे ? ||५||

चतुर्भुज हरी जरी तुझ्या दारी, पाठविशी माघारी करंटाच रे ||६||

काय करे हरी अभाग्यासी गाठ, न ओळखे भाग्य उभे जरी ||७||

शांत चित्ते मनी हरीचे स्मरण, चारी मुक्ति सहज लाभतसे ||८||

कशाला उगीच नसती उठाठेव, शस्त्रांचा धांडोळा पुन्हा पुन्हा ||९||

पायावरी त्याच्या ठेऊन मस्तका, माग तू मागणे विश्वासाने  ||१०||

शीतल त्याचे मन दयेचा सागर, देई तुझ सहज अमृत दान ||११||  (मुकुंदायन)


मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१२-१२-२०२२ | सायंकाळ: १८:०७

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top