उंच डोंगरात असे,
सुंदरसे घर असे,
आकाश स्पर्शते जणू,
वाटते घर जसे……..
सरळ उभा घाट जणू,
चढणाची वाट असे,
वाहने कशीबशी,
चालती वाट तिथे………….
द्विचक्रिका धावतसे,
वेगाचे वेड जसे,
सुसाट धावती मुले,
वार्याधची वरात जसे…………
क्षणात भासते असे,
सुहृद हस्त पसरवितो,
हस्तांदोलन करावयास जणू,
विनम्र अग्रे वाकतो………..
वाट अशी थाट असा,
फोंड्याचा घाट जसा,
नटखट जणू नृत्य करी,
वाटतो कृष्ण जसा………………
वाटते असे क्षणी,
उतावळा पथ असे,
सागरास भेटण्यास,
धावतसे अधस्त दिशे……………
मुकुंद भालेराव
पोंडा: गोवा / ०७-०१-२०२३ / सायंकाळी: ०५:४९



Recent Comments