दरवर्षीच आपण सर्व महिला दिन साजरा करतो, म्हणजे काय करतो तर व्हाटस आप, फेसबुक, ट्विटर वगैरे माध्यामावर संदेश पाठवतो. बस्स इतकेच. उरलेल्या वर्षातल्या ३६४ दिवस काय करतो? उत्तर, काहीच नाही. काय करणे अपेक्षित आहे? कुणास ठाऊक. आपण कधी हे समजावून घेण्याकरिता कांही प्रयत्न केला आहे का? कांही जणांनी केलाही असेल कदाचित, पण असे फारच थोडे. अस्तु.
राजकीय कारणाकरीता ज्यावर पूर्वी व आताही सतत टीका होता असते व टीका करणार्यांपैकी बहुतेक विद्वानांनी (????) कधीही मुळात जो ग्रन्थ वाचलेलाच नसतो, असा ग्रंथ म्हणजे ‘मनुस्मृती’. भारतरत्न डा बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली एवढेच ऐकलेले असते, त्याबाबत कधी मुळातून त्याबाबत वाचलेले नसते. अर्थात ते वाचावे कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश आहे. मुद्दा एवढाच आहे कि, आपण एखाद्या गोष्टीवर टीका करतांना खरे तर त्याबाबत मुळात जाऊन वाचायला हवे. इतका वेळ कोण वाया (???) घालवणार आज. सगळ्यांना झटपट हवे सर्व कांही. कष्ट नको. मनुस्मृती कालबाह्य झाली असे बरेच जण म्हणत असतात. त्यांचा प्रश्न असा कि आता कोण मनुस्मृतीचे पालन करतो. कांही अंशी हे म्हणणे खरेही आहे, करणा मनुस्मृती ही इसवी सन पूर्व २ रे शतक ते इसवी सनाचे २ रे शातक या कावाधीमध्ये लिहिल्या गेली. त्यानंत अनेक सामाजिकस्थित्यंतरे झली. भारतात इंग्रजांचे राज्य आले, भारता स्वतंत्र जाहला अन त्यानंतर स्वतंत्र भारताचे संविषण अस्तित्वात आले.
हे जरी खरे असले तरी मनुस्मृती कालबाह्य झाली म्हणणे हे अयोग्य आहे. जगात चांगल्या गोष्ठी कधीही कालबाह्य ह्जोता नसतात. जर मनुस्मृती कालबाह्य झाळी असती तर भगवान मनुंचे छायाचित्र फिलीपाइन्सच्या कायदेमंडळात सभापतींच्या मागे लावले नसते. इथे एक गोष्ट नमूद करणे महत्वाचे आहे की, फिलीपाईन्स हा सागरी बेटसमुहाचा देश पाश्चिमात्य (खास करून अमेरिका) संकृतीने प्रभावित आहे, आणि तरीही त्या देशाच्या संसदेत भगवान मनुचे छायाचित्र ही सामान्य बाब नक्कीच नाही. असो.
हे सर्व इथे लिहिण्याचे कारण असे कि, स्त्रियांच्या बाबतीत मनुस्मृतीमध्ये जवळपास १४१ श्लोक स्त्रियांच्या महतीबाबत आहेत. त्यातील कांही निवडक श्लोकांचा इथे उहापोह करत आहे.
०१) यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तर देवता: |यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: || [अध्याय-३, श्लोक: ५६]
ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो त्या घरावर परमेश्वर प्रसन्न होतो व ज्या घरात स्त्रियांचा मां राखला जात नाही त्या घरातील सर्व धार्मिक कृत्य्ये निष्फळ ठरतात.
०२) मात्रुश्वसा मातुलानी श्वश्रूरथ पितृश्वसा |संपूज्या गुरुपत्नीवत्स्रमास्ता गुरुभार्यया || [अध्याय-२, श्लोक: १३१]
मावशी, मामी, आत्या, ह्यासर्व गुरुपत्नी इंत्क्याच पूजनीय आहेत. त्या सर्वांचा सन्मान गुरुपत्नी इतकाच करायला हवा.
०३) स्त्रीधनानि तू ये मोहादुपजीवन्ति बान्धवा: |नारी यानानि वस्त्रं वा ते पापा यात्न्यधोगतिम्र || [आधाय-३, श्लोक: ५२]
स्त्रीचे नातेवाईक किंवा मित्र जर तिच्या संपत्तीवर चुकीच्या, बेकायदेशीर मार्गाने कब्जा करतील, किंवा तिच्या स्वत:च्या धनाचा तिला उपभोग करण्यापासून तिला थांबवतील, तर ते नरकात जातील.
०४) स्त्रियां तु रोचमानायां सर्वं तद्रोचते कुलम् |तस्यां त्वरोचमानायां सर्वमेव न रोचते || [अध्याय-३, श्लोक: ६२]
प्रसन्न स्त्री संपूर्ण घर व विश्व प्रसन्न बनविते व आपल्या पतीच्या आयुष्यात आनंदाचे नंदनवन फुलविते, तर सदैव नाराज स्त्री सगळ्या घराला दु:खी करते.
०५) पित्रा भर्ता सुतैर्वापि नेच्छेद्विरहमात्मन: |एषां हि विरहेण स्त्री गर्ह्ये कुर्यादुभे कुले|| [अध्याय-५, श्लोक:१४९]
स्त्रीने आपल्या पित्यापासून, पतीपासून किंवा मुलांपासून विभक्त राहू नये, कारण त्यामुळे कुटुंबाची समाजात मानहानी होते, छीथू होते.
०६) सदा प्रहष्टया भाव्यं गृह्कार्येषु दक्षया |सुसंस्क्रुतोपस्करया व्यये चामुक्तहस्तया || [अध्याय-५, श्लोक: १५०]
गृहकृत्यात कुशल असणारया स्त्रियांना त्यांना कराव्या वाटणाऱ्या घरातील कामे त्यांच्या मानाप्रमे करून आनंदी होऊ द्या. त्या विनाकारण होणाऱ्या वायफळ खर्चास पायबंद घालू शकतात.
०७) स्त्रियाप्यसंभवे कार्यबालेन स्थविरेण वा |शिष्येण बन्धुना वापि दासेन भृतकेन वा || [अध्याय-८, श्लोक:७०]
जेंव्हा दुसरा कुठलाही विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसेल, तेंव्हा स्त्री, बालक, ज्येष्ठ नागरिक, शिष्य, मित्र, गुलाम (पूर्वी असायचे) किंवा घरकाम करणारे यांची साक्ष न्यायालयात स्विकारल्या जाऊ शकते.
८) सूक्ष्मेभ्योsपि प्रसंगेभ्य: स्त्रियो रक्ष्या विशेषत: |द्वयोर्हि कुलयो: शोकमावहेयुररक्षिता: || [अध्याय -९, श्लोक:५]
स्त्रियांचे संरक्षण समाजातील दुष्ट प्रवृत्तीपासून करणे महत्वाचे व आवश्यक आहे, कारण अन्यथा दोन कुटुंबाचे (माहेर व सासर) अपरिमित नुकसान होऊ शकते.
९) प्रजनार्थम् महाभागा: पूजार्हा गृहदीप्तय: |स्त्रिय: श्रियश्च गेहेषु न विशेषोsस्ति कश्चण || [अध्याय-९, श्लोक:२६]
कुटुंबात सुत्कुष्ट संतती लाभण्याकरिता, गृहलक्ष्मी, जी घराचा प्रकश असते, पावित्र्याचे स्वरूप असते, वैभवाचे कारण असते, तिचा वस्त्रप्रावरणे व अलंकार देऊन सन्मान करायला हवा. पत्नी आणि वैभवलक्ष्मीमध्ये कांहीच फरक नाही. त्या दोन्ही एकच आहेत.
१०) कुटशासनकर्तृन्श्च प्रकृतीनां च दूषकान् |स्त्रीबालब्राहणध्वांश्च्य हन्यादिद्वटसेविनस्तथा || [अध्याय-९, श्लोक:२३२]
राजाद्न्येचा अवमान करणारे, राजाच्या मंत्र्यांना भ्रष्ट करणारे, स्त्रियांच वध (खून) करणारे, बालकांची हत्या करणारे, ब्राम्हणांचा खून करणारे आणि शत्रूशी प्र्रामानिक असणारे सर्व मृत्यू दंडास पात्र आहेत.
११) ब्राम्हणार्थे गवार्थे वा देह्त्यागोsनुपस्क्रूत: |स्त्रीबालाभ्युपपतौ च बाह्यानां सिद्धीकारणम् || [अध्याय-१०, श्लोक: ६२]
कुठल्याही लाभ किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता जे आपले आयुष्य, ब्राम्हण, बालके, स्त्रिया यांच्या भल्याकरिता वेचतात त्यांना स्वर्गप्राप्ती होते.
सारांश, महिला दिन ह्या केवळ एका दिवशी कांही शब्द, फुलांचे गुच्छ, समाज माध्यमावर संदेश व कांही भेटी देणे म्हणजे स्त्रियांचा सन्मान नव्हे, तर प्रत्येक दिवशी, प्रत्येक ठिकाणी समाजात वा घरात, कार्यालयात, बसमध्ये, रेल्वेत, विमानात व इतर कुठेही त्यांचा मां द्यायला हवा. त्यांच्याशी बोलतांना अदबीने बोलायला हवे, कुठल्याही शब्दाने वा कृतीने त्यांचा उपमर्द होणार नाही याची काळजी सर्वांनीच घायला हवी. त्याचं करीता ३३% टक्के आरक्षण, नोकरीच्या जास्त संधी, नेतृत्वाच्या वाट हे सर्व आलेच. हे जर आपण सर्वांनी केले तर आपल्या कुटुंबातील आपली मुलगी, बहिण, सून, आई, आत्या, मामी, मावशी व इतर कुणीही समाज समृद्ध करू शकेल, कुटुंब समृद्ध करू शकेल. तेंव्हा आजच्या दिवशी निश्चयपूर्वक असा निर्धार करुया कि आमच्या घरात, आजूबाजूला समाजात, शाळेत, महाविद्यालयात, प्रवासात, कार्यालयात आम्ही सर्व स्त्रियांचा मान किंचितही कमी होणार नाही या करिता आटोकाट प्रयत्न करू.
© Mukund Bhalerao
Chatrapati Sambhaji Nagar