एक श्रीमंत करणारा अनुभव आला मला एकदा, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ‘सुदर्शनक्रिया’ ही मार्गदर्शानानुसार करण्याची क्रिया (Process) आहे. स्वअस्तित्वाचा शक्तिशाली अनुभव होता तो ! असे वाटले कि, माझे सर्व नियंत्रणच कुणीतरी घेतले होते, जसे आजच्या संगणकाच्या युगात नाही का आपण ‘टीम व्ह्यूअर’ (Team Viewer) किंवा एनी डेस्कच्या (Any Desk) माध्यमातून दुसर्या कुठेही असणाऱ्या, हो कुठेही म्हणजे अगदी आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर, क्यानडात, न्यूझीलंडमध्ये किंवा अमेरिकेत असणार्या दुसर्याच्या संगणकामधे प्रवेश करून त्यातील सगळ्या पद्धतीवर ताबा मिळवू शकतो व हवे ते करू शकतो. ह्या अनुभवातून पटले की एकलव्याने दुरून द्रोणाच्यार्याकडून धनुर्र्विद्या कशी शिकली असेल.
मी खूप वेळा समुद्र किनारी गेलो पण कधी स्कुबा डायव्हिंग केले नाही. पण आज मी अभूतपूर्व अनुभव घेतला. मी समुद्राच्या पाण्यात आतमध्ये सुर मारला आणि समुद्र तळावर चक्क चाललो, आणि ते ही पाण्यात ओले न होणारे कपडे न घालता, व तसे कपडे परिधान न करताही माझ्या अंगावरचे कपडे मात्र पूर्णपणे कोरडेच राहिले. किती सुंदर निळे निळे पाणी होते तिथे, स्वच्छ !
आणि एका क्षणी, मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या मुलाधारामध्ये सिग्मंड फ्रोईडच्या ‘इड’ मध्ये रुतलेल्या स्वत:ला पूर्णपणे सोडवून घेतले, मुक्त करून घेतले व बाहेर पडलो त्या जाळ्यातून; जसा, बटू वामनाने नाही का दानशूर बळीराज्याच्या डोक्यावर पाय ठेऊन स्वत:ला वेगळे ठेवले होते तसे. मी पृथ्वीवर नाच करत होतो. तो खूप आनंददायक अनुभव होता, ती अवर्णनीय अनुभूती होती.
त्या आधी मी मुलाधारातून विशुद्धीपर्यंत गेलो व पुढे सरकत सहस्त्रार चक्राला स्पर्स्श केला, आणि तो तसा प्रवास एकदा नाही तो प्रवास अनेकदा वेळ घडला, हे किती वेळात घडले याच अमला अंदाज नाही करता येत. जस एखादा प्रथितयश गायक यमन कल्याण ह्या संपूर्ण-संपूर्ण रागातील एखादी बंदीश खूप तरलतेने मधुररपणे आळवतो अगदी तसा; जसा तो गायक त्या रागाच्या सर्वांगाला स्पर्श करणाऱ्या सर्व स्वरांचा मनमुराद वापर करून एका स्वरावरून दुसर्या स्वरावर अलगदपणे विहरत असतो.
एका क्षणी तर मला असे वाटले कि, मी लक्ष लक्ष प्रखर तेजाने तळपणार्या सूर्याच्या संन्नीध पोहचलो आहे. तो प्रकाश इतका तीव्र व दैदिप्यमान होता कि, मी त्या ‘प्रकाशावकाशात” खोलवर आतमध्ये ओढल्या गेलो, एखाद्या प्रकाशमान विवरामध्ये आत ओढल्या गेलो….किती आत हे मात्र नाही सांगता येणार….
मी एकदम एखद्या अतिसूक्ष्म बिंदूएवढा सूक्ष्म झालो……बिंदू…..हो बिंदूच, म्हटल तर अस्तित्व असलेला………………….
त्यानंतर, जणू कांही मला कुठल्यातरी अदृश अशा रज्जुनी मागे ओढले, खेचले खरे तर. ज्या कुणी मागे खेचले त्याचा आल्हाददायक होता, चित्तवेधक होता आणि तो आवाज मला सातत्याने मंत्र्मुघ्ध करत होता. माझे संपूर्ण शरीर भरून गेले व उर्जावान झाले आणि कांही क्षण तर मला मी अधांतरी तरंगत आहे असे वाटले, सगळ्या बंधनातून मुक्त.
देहरहित……विदेही अवस्था !!!!!!!! ती अशीच असेल का……मी मला पाहत होतो दुरून…..असे वाटत होते की, आत प्रचंड उर्जा निर्माण झालीय व ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय….कदाचित यालाच मला वाटते १०१२ इतके प्रचंड मेंदूतील न्युरोंस एकसमयावच्छेदेकरून पेटले असावेत, जी मेंदूतील एक विद्युतचुंबकीय क्रिया आहे. मी पूर्वी असे वाचले होते कि, मनुष्याच्या मेंदूत १०० बिलियन (महापद्म) न्यूरान्स असतात व ते १०० न्युरान्सला संपर्क करतात. १००० ट्रीलीयन (खरब) मज्जातंतूंची जोडणी (Synaptic Connections) हि त्यांची ताकद आहे. मला आधी खूप वेळा प्रश्न पडला होता की खरच इतक्या वेगाने आपला मेंदू काम करतो का….परंतु आजची अनुभूती हि शब्दांच्या पलीकडची आहे.
त्या अनुभवाचे वर्णन काहीसे असे करत येईल कि, जणू कांही मी अवकाशात ढगांच्या वर तरंगत आहे, हवेपेक्षाही हलका होऊन…दिव्यरुपात (Delicate, Etheral, Feminine, Fine, Fragile, Corynebacterium, Celestial, Heavelny, Empyrean!).
“कशी ती अवस्था, ‘कशी काय सांगू,
शब्दात ना ती, अशी साठ्वेना….”
मला वाटते डॉ सलील कुलकर्णीने असेच काहीचे एक गाणे गायिले आहे ‘आयुष्यावे बोलू कांही’ या कार्यक्रमात. शब्द कदाचित वेगळे असतील, पण एकदम तरळले ते शब्द.
तो अवकाशातील ब्रम्हानंद होता, परमानंद होता, अकल्पनीय होता, अवर्णनीय होता. अवकाशयानाशिवाय अवकाश प्रवास ! मंत्र्मुघ्ध करणारा, आचंभित करणारा, मनमोहक ! ते महासागरात येणाऱ्या प्रचंड वेगवान आकर्षक लाटेवर आरूढ होऊन मनमुराद आनंद अनुभव घेण्यासारखे होते. त्या अनुभूतीचे मोजमाप आजच्या आधुनिक विद्न्यानाच्या कुठल्याही मोजमापाने करता येणार नाही.
समुद्रमंथनाचे वेळी घुसळल्याप्रमाणे माझ्या अंतरंगात खूप प्रचंड उलथापालथ झाली व मला दशोदिशांमान्ध्ये भिरकावून दिले. खूप भारून गेल्यासारखे, घाबरवून टाकणारे, मंत्र्मुघ्ध करणारे आणि कलप्नातीत होते ते सर्व.
आत्म्याला स्पर्श करणारा अतिशय तालबद्ध, हर्षोल्लास वाढविणारा एक आवाज माह्या कानात गुंजारवासारखा मन्त्रोच्चार करत होता आणि त्यामुळे माझ्या मूलाधारामध्ये अनंत काळापासून सर्पाप्रमाणे वेटोळे घालून बसलेली निद्रिस्त कुंडलिनी जागृत झाली……या सर्व उलथापालथीत माझे माझ्यावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले, मी अनिर्बंध झालो, मुक्त झालो. मी ‘मी’ नव्हतो. मग काय होतो हे निश्चितपणे नाही सांगता येणार मला. मी कुणी योगी नाही, महर्षी नाही, साधू नाही, संत नाही किंवा दशग्रंथी ब्राम्हणही नाही.
जे अनुभवले, ज्याची प्रचिती आली….हो आली म्हणतो मी, कारण मी कांहीच केले नाही. जसे अर्जुनाने कांहीच न करत त्याला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले. अर्जूनाने फक्त प्रश्नच विचारले होते, अगणित! जे कांही केले ते श्रीकृष्णाने केले. अर्जुन तर निष्क्रिय होता, गलितगात्र होता. त्याने फक्त सगळे अनुभवले. बस्स, माझे ही तसेच झाले असे मला वाटते, म्हणजे मी निमित्तमात्र !
मग मी तदनंतर जर अशोध घेण्याचा प्रयत्न केला, विशेषकरून महर्षी पातंजलींचे ‘योगशास्त्र’ व आचार्य शंकराचार्यांचे ‘विवेकचूडामणी’ यामधून.
“स्वयं ब्रह्मा स्वयं विष्णू:,
स्वयंमिन्द्र: स्वयं शिव:|
स्वयं विश्वमिदं सर्व
स्वस्मादन्यन्न किंचन || [विवेक चूडामणी:३८९]
आत्मा म्हणजेच ब्रम्ह, आत्मा म्हणजेच विष्णू, आत्मा म्हणजेच इंद्र, आंत आत्मा म्ह्णजेच शिव. आत्म न्ह्न्जेच विश्व. आत्म्याशिवाय कांहीच नाही. बृह्दारण्य उपनिषदामध्ये असे म्ह्टले आहे कि, ‘मीच मनु आहे, सूर्य सुद्धा मीच आहे. जो ‘पुरुष’ जो सूर्य, ते एकच आहेत. चैतन्य, जे एकच आहे त्याविषयी बोलल्या जाते, कारण, आपणच अज्ञानापोटी त्यां चैतन्याला ब्रम्ह, विष्णू, शिव, इंद्र अशा वेगवेगळ्या उपाधी चिकटविलेल्या आहेत. एकाच दोरीला आपण सर्प, काठी, पाण्याचा प्रवाह, जमिनीतील भेग किंवा घळ; जे कि सर्व एकच ब्रम्ह आहे आणीन त्याशिवाय दुसरे कांहीही नाही. ही सर्व त्या एकच नामाची (Noun) विशेषणे (Adjective) आहेत. आपण जेंव्हा असे म्हणतो, “मी स्वत: पाहीले, तू स्वत: पहा, त्याने स्वत:ने पाहिले; ह्या सर्व वाक्यांमध्ये, ‘मी स्वत:’, ‘त्याने स्वत:’ ‘स्वत:’ हा ह्या सर्व विशेषणाबरोबर आहे. ह्या सर्व बाह्य वस्तु आहेत, ज्या ‘स्वत:’ ने निर्म्ना केलेली आहेत. खरे तर त्यानं स्वत:चे असे कांही अस्तित्वच नाही आणि हेच खरे वास्तव सत्य आहे.
ह्यापूर्वीच्या श्लोकात आचार्य सांगतात,
“यत्र भ्रान्त्या कल्पितं यद्विवेके,
तत्तन्मात्रं नैव तस्माद्विभिन्नम् |
भ्रान्तेर्नाशे भ्रान्तिदृष्टाहितत्वं
रज्जुस्तस्माद्विश्वमात्मस्वरूपम्” ||३८८||
ज्याची आपण कल्पना करतो संभ्रमामुळे ते सर्व सुखं नजरेने अंत:चक्षूने पहिले तर लक्षात येते कि, ते सर्व वगळे नाही तर एकच आहे. जेंव्हा संभ्रम दूर होतो, नष्ट होतो, तेंव्हा संभ्रमातून दिलेला सर्प अदृश्य होतो क्षणार्धात आणि वास्तविक सत्य असणारी दोरी आपल्याला दिसू लागते. याचाच अर्थ असा आहे कि, सर्व जग हे आत्मनच आहे.
जेंव्हा एखाद्या मुलभूत गोष्टीवर दुसर्या गोष्टीचा अध्यारोप केला जातो (Superimposed), तेंव्हा त्याचे सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर जे मूळ आहे ते लक्षात येते. विश्लेषणात्मक निरीक्षण केल्यानंतर ‘अरे हा तर साप नाही’ ही भ्रामक कल्पना नष्ट होते ‘हा साप आहे’ हे असत्य विलयास जाते व मग ‘सापाचे सत्य’ कि ही तर दोरी आहे हे उदयाला येते. जेंव्हा नकारात्मक व दिशाभूल करणाऱ्या विचारचक्रातून आपण बाहेर पडतो, तेंव्हा मग सगळे विश्वच आत्म्याचेच रूप आहे ह्यःची जाणीव होते, प्रचिती येते, अनुभूती येते व त्यानंतर ‘दोरी-साप’ हा खेळ पूर्णपणे थांबतो. जो पर्यंत संभ्रम असतो तोपर्यंत, साप दिसतो, भासतो, असतो व वाटतो. ज्या क्षणी आपला संभ्रम दूर होतो, त्याच स्ख्नी तो साप पण अदृष्ट होतो आणि फक्त मुलभूत अशी दोरी शिल्लक राहते.
(c) मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१४ जानेवारी २०१८
पुनर्शब्दांकन: ०८-०४-२०२३