Marathi My Literature

माझा मुलगा अमेरिकेत इंजिनिअर

सर्व हिंदू वाचकांना तळमळीची विनंती कि हा लेख जरूर वाचा. हा लेख तुम्ही वाचल्याने मला युट्युब सारखे लाईक केल्यावर पासिये मिळतात तसे मिळणार नाहीत, पण जर हा शोधनिबंध तुम्ही वाचला तर हिंदूंचा भविष्यकाळ अंधकारमय होण्याच्या आशंकेला अंशत: तरी दूर करण्याकरीता हातभार लागेल असे मला वाटते. आपण जसे सह्कुटुंबसहपरिवार आमंत्रण देतो अगदी तसेच हा लेख सर्वांनी जरूर वाचवा.   

माझा इंजिनिअर मुलगा अमेरिकेत डॉलर्स कमावतो…..

हिंदूंचा भविष्यकाळ अंधकारमय !!!!???

आज समाजात असे सांगायला लोकांना खूप अभिमान वाटतो कि माझा मुलगा अमेरिकेत आहे. त्याने अमेरिकेतून एम. एस. केले आहे. पर्यायाने तो अमेरिकेत खूप डॉलर्स कमावतो. ठीक आहे, परकीय चलन मिळते देशाला. आज अमेरिकेची आर्थिक परिस्थिती फारच डबघाईची झालेली आहे. जगात अमेरिकेच्या डॉलर विरोधात कित्येक देश आपसात व्यवहार करण्याकरिता डॉलर सोडून इतर चलनाचा विचार करीत आहेत. आज हा लेख लिहित असतांना तर अशी बातमी आली कि, अमेरिकन सरकार स्वत:वरचे कर्ज फेडू शकत नाही. त्यामुळे, आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे, व अमेरिकन कोन्ग्रेस अध्यक्षांना कर्जाची मर्यादा वाढवून द्यायला तयार नाही व तसे झाले तर अमेरीकेच्या इतिहासात पाहिल्यांदाच सरकार कर्ज फेडण्यास अपयशी ठरले असे होईल. तर मग त्या अमेरीकेन डॉलर्सचे काय एवढे कौतुक! असो.

भारतात काय सुरु आहे याची कल्पना बर्याच जणांना नसेल. मी नुकताच युटयूबवर एक व्हिडीओ पहिला. तो किती जुना आहे हे मला सांगता येणार नाही. तो होता एआयएमएमचे खासदार ब्यारीस्टर असउद्दीन ओवेसी यांचा. विशेष म्हणजे त्या व्हीडीओत ते कुठल्याही पक्षाला शिवीगाळ करत नाहीत तर, मुस्लिम तरुणांना व पालकांना आवाहन करत आहेत कि, तुमच्या मुलांना इंजीनिअर किंवा डॉक्टर बनवू नका तर “उसे कोन्स्टीटयूशनल लॉयर बनाओ”. का बरे म्हटले असेल असे माहित आहे तुम्हाला? भारतात काय मुस्लीम वकील कमी आहेत. मुळीच नाही. पण त्यांना हवे तसे सर्वोच्च न्यायालयात वकीली करणारे मुस्लीम तरुण हुशार लॉयर नाहीत. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम न्यायाधीश हवे तितके बनू शकत नाहीत. या दृष्टीने केरळमध्ये अगदी योजनेबर हुकुम काम सुरु आहे. कसेही करून मुस्लीम तरुणांना कायद्याचे पदवीधर बनविण्याचा कारखानाच सुरु केला आहे. त्यावर कांही लोकांनी / समुदायांनी हरकत घेतली आहे, बार कौन्सिलकडे तक्रार केल्याचे माझ्या वाचण्यात आले कि, तेथील कायद्याची पदवी योग्य नाही, आणि म्हणून त्यांची वकील म्हणून नोंदणी करू नये. यासंदर्भात त्याच केरळमद्ध्ये एक अभूतपूर्व घटना घडलेली आहे. एका विशिष्ट वर्गातील व्यक्ती वकिली करीत होता. ती व्यक्ती म्याजीस्ट्रेट झाली, सत्र न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली, मग उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली व शेवटी सर्वोच्च न्यायालयात पण न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. कदाचित भारताच्या न्यायालयीन इतिहासात ही आता पर्यंतची एकमेव घटना असेल. त्या व्यक्तीचे नाव घेणे औचित्य भंग होईल म्हणून लिहिले नाही. हो, पण ती व्यक्ती देखील श्री ओवेसिंच्या योजनेचा भाग होती असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. मी फक्त उदाहरण म्हणून दिले आहे. त्या व्यक्तीच्या बाबतीत कदाचित अन्य कारण असेल, पण अगदी कनिष्ठ न्यायालयात वकिली करणारी व्यक्ती अगदी सर्वोच्च न्यायाधीशाच्या पदापर्यंत जाणे असंभव आहे, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. कनिष्ठ न्यालायातील वकील अगदी फार तर उच्च न्यायालयात न्यायाधीश इथपर्यंत जाऊ शकतो, त्यापलीकडे नाही.      

या पार्श्वभूमीवर, ते म्हणतात किमान शंभर हुशार वकील सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम समुदायातून बनायला हवेत, जेणेकरून पुढे त्यातून वीसएक सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनतील व मग ते आपल्या राज्यघटनेचा सोयीस्कर अर्थ काढू शकतील, म्हणजे उद्देश काय मुस्लीम तरुणांनी वकील बनायचा, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली करायची, जेणेकरून त्यातील कांही जण न्यायाधीश बनले म्हणजे आताच्या कोलेजीयम पद्धतीप्रमाणे ते न्यायाधीश पुढे दुसर्या मुस्लीम वाकीलाला न्यायाधीश बनण्याकरिता त्याचे नाव पुढे करतील; व असे करून हळूहळू एकदा का सर्वोच्च न्यायालयात पुरेसे मुस्लीम न्यायाधीश झाले कि, मग ते भारतीय राज्यघटनेचा हवा तसा अर्थ लावतील व भारतात तर कायद्याचे राज्य असल्यामुळे सर्व नागरीकांवर ते निर्णय बंधनकारक राहतील. किती दूरदृष्टी (Vison) आहे बघा ! आणि आम्ही हिंदू, या भ्रमात राहू कि आमचे कोण काय बिघडविणार.   

अभिमानाने आमची मुले अमेरीकेत्त डॉलर्स कमावतात व दरवर्षी आम्हाला विमानाचे तिकीट पाठवितात, आम्ही तिथे जातो व घरात बसून राहतो. केंव्हातरी मुलाला किंवा मुलीला त्यांच्या कामातून वेळ मिळेल तेंव्हा थोडेफार इकडेतिकडे फिरून येऊ. सहा महिने झाले कि व्हिसा संपतो, मग भारतात परत येऊ. तो पर्यंत ईकडचे आमचे घर देखील त्यांनी लुटलेले असेल. मग जा न्यायालयात अन वर्षानुवर्षे भांडत बसा. मग मुलगा म्हणणार जाऊ द्या ना बाबा. सोडून द्या ते घर आणि या इथे अमेरिकेत. काय ठेवले तिथे भारतात. त्याच्या दृष्टीने खरेही असेल कदाचित, पण तुम्ही तुमचे सगळे नातेसंबंध सोडून जाऊ शकणार आहात का? मुळीच नाही. पूर्णविराम. असो आता मी आपल्या मूळ मुद्याकडे वळतो.

ते तसे न्यायाधीश बनल्यानंतर काय होईल कांही कल्पना आहे? बहुतेकांना नसणारच. मी सांगतो. ते जेंव्हा न्यायाधाश बनतील व त्यांच्या डोक्यात जर श्री असुउद्दिन ओविसी म्हणतात तसे करण्याचा विचार पक्का रुजलेला असेल, तर खालील राज्यघटनेतील कलमांचा अक्षरश: दुरुपयोग करतील.

  1. Article–25: Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion,

  2. Artice-26: Freedom to manage religious affairs,

  3. Article-27: Freedom as to payment of taxes for promotion of any particular religion,

  4. Article-28: Freedom as to attendance at religious instruction or religious worship in certain educational institutions,

  5. Article-29: Protection of interests of minorities,

  6. Article-30: Right of minorities to establish and administer educational institutions,

इतके कमी कि काय, या सर्व कलमांचा संबंध ते कलम-२१: जगण्याच्या अधिकाराशी  जोडतील व वर म्हणतील कि, आम्हाला पण जगण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे व त्याकरिता मग घटनेच्या कालम-३२ व २२६ कलमांचा सर्रास दुरुपयोग अगदी कायद्याच्या चौकटीत राहून करता येईल, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन. They will destroy the constitution by usurping the unlimited extraodinary powers available to Supreme Court under Article-142, throwing the settled law pertaining to ‘Basic Srtructure’, declared by one of the largest constitution bench of 13 Judges, in Keshvananad Bharati Sripadgalvaru v. State of Kerla (1973 SC 1461).

मग बस बसा रडत व दुसर्याच्या नावाने बोटे मोडत. आपलीच मुले आपल्याला शिव्या देऊ लागतील. त्यावेळी पश्चाताप करून काय उपयोग; कारण मग इंजीनिअरिंगचा कांही उपयोग होणार नाही आणि मुलाला डॉक्टर बनविण्याचा पण. त्यावेळी कितीही डॉलर असले तरीही त्यांचा कांहीच उपयोग होणार नाही. या बाबतीत मला एक जुन्या ६०च्या दशकातील चित्रपटातील (कानून: अशोककुमार व धर्मेंद्र) एक संवाद आठवतो. त्यात धर्मेंद्रचा मोठा भाऊ अशोक कुमार असतो व तो खुनाच्या आरोपाखाली गुन्हेगार म्हणून न्यायालयात आरोपीच्या पिंजर्यात उभा असतो. तेंव्हा धर्मेंद्र न्यायाधीशांना म्हणतो, “जज साहब मेरी पुरी दौलत लेलो, मगर मेरे भाईको छोड दो|” त्यावर जज उत्तर देतात, “मिस्टर सुरजप्रकाश, अदालत पैसोसे खरीदी नही जाती|” हल्ली कांही नेते मात्र खुशाल ठोसुन ओरडत असतात कि, न्यायालयावर दबाव आहे, निवडणूक आयोगाने शेण खाल्ले वगैरे, पण त्यांच्या त्या वाह्यात बोलण्याला काडी इतकीही किम्मत नाही. कांही दिवसांपूर्वी इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डा धनंजय चंद्रचूड यांनी जाहीरपणे सांगितले कि, माझ्यावर कधीही कुणाचा दबाव नव्हता व नाही. 

तर मुद्दा असा कि, तुमच्याकडे अगदी अब्जावधी डॉलर्स असले तरीही तुम्ही न्यायालयाच्या विपरीत व अपेक्षित नसलेल्या त्या निर्णयाविरुद्ध कांहीच करू शकणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या वर कुठलेच न्यायालय नाही. फार तर तुम्ही पुनर्विलोकन (Review Petition) अर्ज करू शकता, पण पुन्हा तो विचारात घ्यायचा कि नाही हे सर्वोच न्यायालयच ठरविते. त्याने ठरविले कि पुनर्विलोकन करण्याची गरज नाही तर संपले कि, पुढे कांहीच नाही. अशा न्यायाधीशाला काढण्याकरिता संदेसच्या सदस्याच्या २/३ सद्स्यांनी प्राभियोगाच्या खटल्यात ठरावाच्या बाजूने मतदान करावे लागते. एक पाहणी अहवाल असे सांगतो कि भारतात जन्म घेणाऱ्या ६० बालकांपैकी ४० बालके मुस्लीम, २० बालके हिंदू व २० बालके इतर धर्माची  असतात. विषयाचे गांभीर्य समजण्याकरिता आपण असे गृहीत धरू कि, ही आकडेवारी बरोबर आहे, तर २०४७ मह्द्ये जेंव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेंव्हा काय चित्र असेल, (४० x ३६५ x २५) = ३,६५,००० मुस्लीम २५ वर्षांचे झालेले असतील व हिंदू १,८२,०००. यात आत्ताचे मिळविले तर? आणि हो, हे नवीन ३.६५ हजार मतदान करतील ‘काफिरां’च्या विरोधात. समजा हे चित्र केवळ एका कुठल्यातरी मतदान क्षेत्रातील आहे तरीसुद्धा त्या मतदान क्षेत्रात काय घडेल. लोकशाहीमध्ये सगळे निर्णय बहुमताने होत असतात. आता हेच चित्र अशाच प्रमाणात जर का संपूर्ण भारत देशात तयार झाले तर, आताची राज्यघटना पार धुळीस मिळविल्या जाईल व ‘शरिया’ कायदा लागू होईल. कदाचित जीएसटी जाईल व त्याजागी ‘हिंदूकर’ येईल. मग कितीही डोके आपटा न्यायालय म्हणेल हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे आम्ही त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. हे वाचायला महाभयंकर वाटेल परंतु, आज ज्या प्रमाणात मुसलमान व हिंदूची लोकसंख्या वाढत आहे, व्यस्त प्रमाणाता, तशीच वाढत राहिली तर असेच होईल हे मात्र खरे.      

आता सांगा, २०४७ साली तुमच्या मुलावर किंवा नातवावर असा प्रसंग आला तर काय तो तुमची आरती ओवाळेल ? मुळीच नाही. शिव्याच घालेले हे नक्की.

तसे न्यायाधीश जर खरेच झाले व तसे वागले तर, ‘पळवेल त्याची बायको! चालवेल त्याची कार, राहील त्याचे घर, हिसकावून घेईल त्याची मालमत्ता’ वगैरे वगैरे, असे अर्थ लावण्यास सुरुवात होईल.  

मला कल्पना आहे कि, यापूर्वी भारतात एकाहून एक उत्कृष्ट मुस्लीम न्यायाधीश झालेले  आहेत, जसे न्या. एम. हिदायतुल्ला, न्या. नाझीर, न्या. एम. सी. छागला वगैरे. पण ते वेगळे होते. ते न्यायव्यवस्थेमध्ये दुष्ट हेतूने शिरले नव्हते. इथे तर श्री ओवेसी जाहीरपणे अगदी छातीठोकपणे सांगतात कि, याच्याकरिता वकील बना, न्यायाधीश बना कि पुढे जाऊन तुम्हाला घटनेचा अर्थ सोयीस्कर लावता आला पाहिजे, अगदी त्याकरिता ‘Mischievous interpretation’ करावे लागले तरी चालेल. वास्तविकपणे, कायद्याचा अर्थ लावण्याचे जे शास्त्र (Interpretation of Statutes) आहे, त्याप्रमाणे, अर्थ लावतांना, ‘ज्या गोष्टी घडू नयेत’ याकरिता ती तरतूद केलेली आहे ती गोष्ट रोखण्यास तो लावलेला अर्थ उपयोगी पडला पाहिजे.

एका कांतीलाल विरुद्ध परामानिधी या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे, “…that the mischief rule can be applied while interpreting a statute only when the language of the enactment is capable of two or more constructions. In such a case it becomes important to consider the mischief and defect whihc the Act purports to remedy and ncorrect. [AIR 1957 SC 907].  

आता मी जर ‘Devil’s Advocate’ व्हावयाचे ठरविले तर, मी वरील कलमे ज्या भागाखाली येतात, ‘Right to Freedom of Religion’ आणि ‘Cultural and Educational Rights’ हे प्राप्त करण्याकरिता वरील कलमांचा नेमका असा विपरीत अर्थ लावेल कि, ज्यामुळे मुस्लीम समुद्यांचा (अवाजवी) फायदा होण्याबरोबर, हिंदूंना नुकसान पोहचेल आणि वर असेही म्हणेल कि मुस्लीमांच्या हक्काकरिता असाच अर्थ लावणे आवश्यक आहे; कारण मुळात हे कलांच मुळी त्यांच्या करीतच तयार केले आहे. [मागे नाही का आपले भूतपूर्व पंतप्रधान डा मनमोहन सिंगांनी असे अकलेचे तार तोडेल होते कि, या देशाच्या संसाधनांवर आधी मुस्लिमांचा हक्क आहे म्हणून!]. एकदा का सर्वोच्च न्यायालयाने असा अर्थ लावला कि सगळेच संपले कि. मग बसा हरी हरी करत. कांहीही करता येणार नाही.

एकच गोष्ट तुमच्या हातात राहील ती म्हणजे ‘Honour-killing….Uthensia’ सन्मान मरण किंवा इच्छा मरण, बस्स. तुम्ही कितीही डोके आपटा काहीही उपयोग होणार नाही.

याचा अर्थ असेच घडेल अशी कांही भविष्यवाणी मी करीत नाही, पण श्री. ओवेसीच्या म्हणण्याचा अर्थ असाच आहे हे मात्र नक्की. कदाचित तुम्ही हे वाचाल त्यावेळेपर्यंत तो व्हिडीओ युटयूबवरून डिलीट पण केलेला असेल. मला माहिती नाही.  

मला कल्पना आहे कि, कांही सडक्या डोक्याचे व कुजक्या बुद्धीचे पुरोगामी (जी विशेषणे फक्त तथाकथित पुरोगाम्यांकरिता राखीव आहेत याचीकृपया नोंद घ्यावी ही विनंती.) अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून कंठशोष करतील कि, “नाही नाही मुस्लीम धर्म असा नाही. तो शांतात प्रिय धर्म आहे, सहिष्णू आहे वगैरे.” चला आपण कांही काळाकरिता त्यांचे खरे आहे असे मान्य करू. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विषयी काय म्हणतात ते बघा. “How Muslim politics has become perverted is shown bt the attitudwof the Muslim leaders to the political reforms in th Indian States.The Muslim and their leaders carried on a great agitation for the inytroduction of representative governmentin the Hindu State of Kashmir. The same Muslims and their leaders are deadly opposed to the introduction of representative governments in other Muslim States. The reason for this strange attitude is quite simple. In all matters, the determioning question with the Muslims is how it will affect the Muslims vis-a-vis the Hindus…..The dominating consideration is how democracy with majority rule will affect the Muslims in their struggle against the Hindus. Will it strenhthen them or will it weaken? If democracy weakens them, they will not have democracy.” [Pakistan or the Partition of India, Author: Dr. B. R. Ambedkar, Publisher: Namaskar Bookds, ISBN:9789355712295, Page-236-237] इतकेच नाही पुढे वाचा. Dr. Ambedkar discusses the causes behind the behaviooyr and political aggression of teh Muslims. “How the Muslim mind will work and by what factorsmit is likely to beswayed will bemclaear if the fundamental tenets of Islam which dominate the Muslim politics and the views expressed by prominent Muslims bearing on Muslim attitude towards an Indian Government are taken into consideration…………Among the tenets the one that calls for notice is the tenet of Islam which says that in a ocuntry which is not under Muslim rule, wherever there is conflict betweeb Muslim lasw and law of land, the former (Muslim law) must prevail over the latter and a Muslimwill be justified in obeying the Muslim law and defyiing the lasw of the land.” (Page-292).

He further quotes the Muslim leader Maulana Mahomed Ali, “the only allegiance a Musalman, whether a civilian or soldier, whether living under a Muslim or  non –Muslim administration, is commanded by the Koran to acknowledge is his allegiance to God, to his Prophet and to those in authority from among the Musalmans……But the unalterable rule is and has always been that as Musalmans they can obey only such laws and orders issued buy their secular rulers as do not involve disobedience to the commandants of God who is the expressive language of the Holy Koran is ‘the all-ruling ruler” (Page-293). यापुढे तर जळजळीत, कटू व आपल्या अंतकरणात आग लावणारे धगधगते सत्य विदित केले त्यांनी, “According to Muslim Cannon Law, the world is divided into two camps, ‘Dar-ul-Islam’ (Abode of Islam) and Dar-ul-Jarth (Abode of War). A country is Dar-ul-islaam when it is ruled by Muslims. A country is Dar-ul-Harb when Nuslim only reside in it but are not tulers of it. That Cannon Law of the Muslims, India cannot be the common motherland of the Hindus and the Musalmans. It can be the land of Muslamans, but it cannot be the land of ‘Hindus and the Muslamans living as equals.’. Further, it can be th eland of the Muslamans only when it is governed by the Muslims. The moment the land beocmes subject to the authority of non-Muslim powers, it ceases to be the land of the Muslims. Instead of being Dar-ul-Islam, it beocmes Dar-ul-Harb, i.e. The Land of War. It must not be supposed that this view is only of academic interest. For it is capable of becoming an active force capable of influencing teh ocnduct of teh Muslims. It did greatly influence the ocnduct of the Muslims when teh British occupied INdia. The British occpied India. The British occupation raised no qualms in the minds of the Hindus. But so far as the Muslims were concerned, it at once reasied the question whether India was any longer a suitable place of residence for Muslims. A discussion was started in the Muslim community, which Dr. Titus says lasted fr half a century, as to whether India was Dar-ul-Harb or Dar-ul-Islam (Page-294).

‘श्रद्धा’ हा इस्लामचा आधार आहे. सकृतदर्शनी ऐकायला किती छान वाटते. पण ही श्रद्धा केवळ अल्लाह व त्याच्या प्रेशितावर असावी लागते. ही मुल्यावर श्रद्धा नसली तर शुद्ध चारित्र्य, शील, सद्गुण, सद्वर्तन या गोष्टी कवडीमोलाच्या होतात. या संदर्भात १९२३ साली कोन्ग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या मौलाना मुहम्मद अलींच्या उद्गारांचे स्मरण होते. अलिगढ येथे १९२४ केलेल्या भाषणांत मुहम्मद अली म्हणाले, “महात्मा गांधींचे चारित्र्य कितीही विशुद्ध असले तरी धर्माच्या दृष्टीने विचार करता एखाद्या चारित्र्यशून्य मुसलमानापेक्षा ते मला कमी प्रतीचे वाटले पाहिजे.” त्यांच्या उद्गारांमुळे खळबळ उडाल्यावर त्यांनीच लखनउच्या प्रकट सभेत पुढील स्पष्टीकरण दिले. “मी जे म्हणालो ते अगदी सत्य आहे. माझ्या धर्माप्रमाणे आणि श्रद्धेप्रमाणे कुठल्याही व्यभीचारी आणि पतित मुसलमान मला श्रीयुत गांधीन्पेक्षा (महात्मा नव्हे, श्रीयुत!) श्रेष्ठ आहे असेच मी समजतो.” (इस्लामचे अंतरंग, डॉ श्रीरंग अरविंद गोडबोले, राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळ, पुणे, पृष्ठ – २६० व मुसलमान ऐक्य: भ्रम आणि सत्य, जोग ब. ना., उन्नती प्रकाशन, मुंबई, १९९०, पृष्ठ-२०२)

मुसलमान कधीही कुठल्याही देशांत तिथल्या मातीशी एकरूप होऊच शकत नाही. बघा आज फ्रांस, ओष्ट्रेलिया, इंग्लंड या देशात काय होत आहे. मध्यपूर्वेतून समुद्र मार्गे अनधिकृतरित्या छोट्या छोट्या नावामधून अगदी लहान मुलांना बरोबर घेऊन ते पोहचत असत युरोपियन देशामध्ये. कालांतराने त्या त्या देशांमध्ये, त्यांनी आपली लोकसंख्या वाढविली व मग अगदी ठरवून केलेय योजनेप्रमाणे, वेगवेगळे हक्क मागायला सुरुवात केली. आपली भाषा, आपला वेष, जसे कि, दाढी वाढविणे, बुरखा घालणे हे मात्र कधीच सोडले नाही. तिथल्या कायद्यांचा आदर तर फारच लांबची गोष्ट, ज्याचा संदर्भ मी वर दिलेलाच आहे. समाजात ज्यावेळी तिथल्या मूळ रहिवाशांना जेव्हा त्रास व्हायला लागला, तेंव्हा सरकारचेह डोळे हळूहळू उघडायला लागले व मग त्यातून फ्रांस, औष्त्रेलीया सारख्या देशांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली. इतके जगभर घडत असतांना भारतात मात्र अजूनही ‘धर्मनिर्पेक्ष’ (Secular) तेचे गोडवे गाणे चालूच आहे. चीनने मात्र तिथल्या मशिदीच पाडू टाकल्या, फ्रांसने बुर्खाय्वर बंदी घातली वगैरे.

प्रश्न असा आहे कि, आमच डोळे कधी उघडणार आमच्या आईबहिणी व बायकोला घरातून ओढून न्यायला सुरुवात केल्यानंतर!

या पार्श्वभूमीवर, आता आपण “आयुष्यावर बोलू कांही” याप्रमाणे “हिंदू धर्मावर बोलू कांही”.

जय नावाच्या ईतिहासात (महाभारत) धर्माची व्याख्या काय केली आहे.

“धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मो धारयते प्रजा: |

य:स्याद्धारणसंयुक्त: स धर्म इति निश्चय: || महाभारत: कर्णपर्व-४९.५० ||

धारण करतो म्हणून त्याला धर्म म्हणतात. धर्म हा प्रजेचे रक्षण करतो. ज्याचा धरणाशी संबंध असेल तो धर्म. आमचा हिंदू धर्म खरच महान व मोठ्या मनाचा व मोठ्या हृदयाचा आहे.

तदेतत् क्षत्रस्य  क्षत्रं यद्धर्म: | तस्माद्धर्मात्परं नास्ति | (बृहदारण्यक उपनिषद: १.४.१४)

A state of Dharma was required to be always maintained for peaceful co-existence and prosperity of all. The ruler was only the penultimate authority.

अशाच आशयाचे ऋग्वेदात शेवटचे सुक्त ‘संज्ञान सुक्त’ (१०.१९४.१-४) ऋग्वेदात आहे. त्यात तर एकात्मतेचा व समानतेचा महामंत्रच दिलेला आहे.

ज्या ‘मनुस्मृती’च्या नावाने धर्म बदललेले आधुनिक विद्वान घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत असतात (भलेही आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली असेल, आणि जी हे ओरडणार्या जवळपास ९९% लोकांनी वाचलेली नसतेच, तशी तर हिंदूंनी तरी कुठे वाचलेली असते म्हणा.) त्यातील ही उदात्त कल्पना पहा जरा.

यथा सर्वाणि भूतानि धरा धारयते समम् |

तथा सर्वाणि भूतानि विभ्रत: पार्थिवं व्रतम् || (मनुस्मृती अध्याय-९ वा, श्लोक: ३११)

आता प्रश्न असा आहे कि, इतके वाचल्यावर तुमच्यापैकी कितीजण असे ठरवतील कि मी माझ्या मुलाला, मुलीला किंवा नातवाला कायद्याची पदवी घेउन वकिली करण्यास सांगेल. आज तुम्ही तुमच्या आजूबाजूला समाजात पाहिले तर वकील बनणार्यांची संख्या इंजिनिअर व डॉक्टर बनणार्यांच्या तुलनेत नगण्यच असेल. तुम्हाला माहित आहे का कि, आत्ताचे सर्वोच्च न्यायाल्याचे मुख्य न्यायमूर्ती डॉ धनंजय चंद्रचूड हे स्वत: अमेरिकेत कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन आलेले आहेत, तद्वतच त्यांचा मुलगा देखील अमेरिकेत हारर्वर्ड विद्यापीठातून कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन आलेला आहे. मग आम्ही आमच्या मुलाला का नाही कायद्याचे उच्च शिक्षण घ्यायला अमेरिकेत पाठवत, इन्जिनिअरिन्गच्या ऐवजी? भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृत आता अपरिहार्य भाषा म्हणून ठरविलेली आहे. अस्तु.

आपल्याला ठरवायचे आहे कि, ‘श्रेयस हवे कि प्रेयस हवे.’ मधुमेह झालेल्या माणसाला गुलाबजांब आवडतील, पण ते खाणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने श्रेयस (योग्य) आहे का? निश्चितच नाही. बिअर पिण्याकरिता आग्रह करावा लागत नाही, पण गोमुत्र पिण्याकारिता आग्रह करावा लागतो. सिनेमातील गाणे पाठ करण्याकरिता सांगावे लागत नाही, पण रामरक्षा पाठ करण्याकरिता सांगावे लागते. हल्ली तर जपानी, जर्मन व क्वचित रशियन भाषा शिकण्यात फार गौरवास्पद वाटते, ग्रेट वाटते, पण संसकृत शिकण्याची इच्छा का होत नाही. संस्कृत ही जगातील सर्वात श्रीमंत व समृद्ध भाषा आहे. इंग्रज येथे असतांना त्यांच्या कित्येक अधिकाऱ्यांनी संस्कृत भाषा शिकून अनेक संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीत अनुवाद केलेत, अगदी महाकवी कालिदासाच्या मेघदूताचे सुद्धा. ते काय मूर्ख होते संस्कृत शिकायला? याबाबत जगप्रसिद्ध तत्वज्ञ, विचारवंत, लेखक व हिंदू संस्कृतीचे अभ्यासक व प्रकांड पंडित फ्रेडरिक म्याक्स मुल्लर (६-१२-१८२३ ते २८-१०-१९००) यांनी एक खूप छान व महत्वाचे पुस्तक लिहिले आहे, “India – What can it teach us? (Published by Rupa Publications Pvt. Ltd., New Delhi,16th Edition, ISBN: 978-81-716-7920-1) त्यामध्ये ते म्हणतात, “If I were to look over the whole world to find out the country most richly ebdowed with all the wealth, power ,and beauty that nature can bestow….in some parts a very paradise on earth…I should point to India. If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant…..I should point to India. And if I were to ask myself from what literature wem here in Europe, we who have been nurtured almost exclusively on the thoughts of Greeks and Romans, and of one Semitic race, the Jewish, may draw that corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more comprehensive, more universal, in fact more truly human, a life not for this life only, but a transfigured and eternal life……….again I should poiny to India.” [Page-5]. असो.

कुणी म्हणेल कि ते तर परदेशी होते, आमचा देश संविधानाने चालतो व चालायला पाहिजे. ठीक आहे. मग आत मी तुमच्याकरीता, आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने डॉ रमेश यशवंत प्रभू विरुद्ध श्री. प्रभाकर काशिनाथ कुन्टे (Civil Appeal No. 2836/1989) तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने (न्या.जे.एस.वर्मा, न्या.एन.पी.सिंग व न्या.के.वेंकटस्वामी) ह्या प्रकरणात ११ डिसेम्बर १९९५ रोजी दिलेल्या एका निकालातील एक भाग उधृत करतो. “…becasue it integrates a large variety of heterogenous elements, Hinduism constitutes aa very complex but largely continuous whole and since it covers the whole of life, it has religious, social, economic, literary and artistic aspects. As a religion. Hinduism is an utterly diverse conglomerate of doctrines, cults and waay of life……in principle, Hinduism incorporates all forms of belief and worship without necessiating the selection or elimination of any. The Hindu is inclined to revere the divine un every manifestation, whatever it may be, and is doctrinally tolerantm, leaving others……inckuding both Hindus and non-Hindus….whatever creed and worship-prectices suit them best. A Hindu may embrace a non-Hindu religion without ceasing to be a Hindu.” [Supreme Court Judgment on HINDUTVA- A way of Life, Page-55, Compiled by Mr. Justice (Retired) M. Rama Jois, Suruchi Prakashan, New Delhi, 2015, ISBN: 81-89622-79-X ] याच अर्थाचा व याल पुष्टी देणारा आदी शंकराचाऱ्यांचा एक श्लोक आपण ऐकलाच असेल….”आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं | सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति||”

हे सर्व लिहिण्याचे प्रमुख कारण असे कि, आमच्या तरुण पिढीला आम्ही हिंदू असण्याची लाज वाटण्याचे मुळीच कारण नाही. सर्व वाचकास ही माझी विनम्र विनंती आहे कि, हा लेख आपल्या घरातील सर्वांना वाचावयास द्या.   

आम्हाला निवडायचे काय आहे? काय बरोबर आहे? काय योग्य आहे? आवडीचे (प्रेयस) नाही निवडायचे. काय श्रेयस (हितावह) आहे ते निवडायचे आहे.

(c) मुकुंद भालेराव

छत्रपती संभाजी नगर  

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top