फुलता मनात साऱ्या
हसली फुले मिळूनी
जत्रा फुलुनी गेली
जणू वाटली दिवाळी……….
नभी तेवले दिवे ते
स्वर्गीय तारकांचे
हसर्या सख्याच साऱ्या
नयनात गीत सारे………….
शशी पावताच तेथे
निशा सलज्ज झाली
त्या तारका सख्यानी
रात्रीस जागविली………
उषा गुलाब फुलवीत
पूर्वेस जाग आली
शशी चालता घराला
निशा सवे निघाली………
रात्रीत साथ होती
गमनात प्रीत न्यारी
हातात बाहुमध्ये
मिसळून दूर गेली……..
आता तिथे उषेने
शिंपून रक्तीमेला
उद्याचलास दिसता
ओवाळीले रविला………..
मांगल्य ते प्रभावी
विश्वात मंत्र सारे
ऋचा नभात साऱ्या
उदघोष श्रुतिस्मृतींचे……..
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ०७-०६-२०२३