मनास नाही कसले ओझे
मुक्त असे हे मन माझे
नाही कसला मोह मनाला
प्रकोप नाही सुख आहे……
शुष्क नसे अन रिक्तही नाही
पूर्ण भरुनी मी आहे
कणाकणाने मनात माझ्या
विश्व प्रार्थना ती आहे……….
सर्व सोबती सगे सोयरे
आनंदाचे कल्पतरू ते
फुलवीत सारे अहर्निश ते
सुखप्राप्तीचे धन्य तसे…….
मनी फुलली कुसुमांची ती
इंद्रधनूची स्वागतमाला
रंगबिरंगी चहूबाजूंनी
अविरत श्रवती स्वरमाला…….
आता कांही स्वप्न नसे ते
भरून सारे उरलेले
तमा न आता कांही कशाची
आनंदाचे दिव्य मळे…….
मेघाची बरसात मानसी
नभी स्वप्नांचे लक्ष दिवे
यक्षगान ते गंधर्वांचे
दिव्य फुलांचे प्रेममळे……
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ०७-०६-२०२३