तू स्वाभिमान आमुचा
वचने तव मधुर सदा
प्रक्षाळीले पदद्वया
सीमांत पूजनात त्या……….
स्नुषा बनुनी प्रवेशली
सलज्ज भाव तव मनी
प्रार्थुनी इष्टदेवासही
गृहप्रवेशली आनंदुनी…….
द्वादश वर्ष जाहले
ऋतूरंग गृहा आणिले
स्नेह सदा गृहात तू
वर्षत भुवन भारीले………
शब्द वचन मृदू सदैव
शांत प्रेम प्रेरिले
सावकाश मनामनांत
अपूर्व स्थान स्थापीले…………
वंशबीज ते प्रसन्न
मातृरूप पावले
अंशरूपी अभिराम तो
प्रसन्न चित्त जाहले…….
आता नसे विभक्त तू
गृहात रंग रंगला
पुत्रवधू होऊनी
सप्तरंग पसरविला………
वसंत सदा असे गृहांत
ध्वनी निनादतो अखंड
श्रवती बंदिशी सुखे
गंधीतस्वरे विचरीत रंग……….
मिळो सदा प्रेम तुला
तव स्नेह असा दरवळो
आयुरारोग्य मिळो तुला
ऐश्वर्य किर्ती दरवळो……
तुझ्या मनांत परिमल
स्नेह्सुधा निशिदिनी
हृदयातही तसे मनांत
फुलवीत प्रीत अहर्निशी………
(c) मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २७ जून २०२३
सकाळी: ११:४२