कांही तरी तुझ्यात अभिराम
दडून आहे राहिलीले
उमगत मात्र नाही मला
काय आहे ते बरे………..
एक धागा नक्की आहे
अदृश्य जरी असला जरी
घट्ट आहे त्याची वीण
पक्की खास आहे खरी……….
तुझ्यात आणि माझ्यात
बीज एकच लपले आहे
अपार आहे ओढ ऐसी
म्हणून तर संवाद सुरु आहे…….
(c)मुकुंद भालेराव
दिनांक: २५ जून २०२३
सकाळ: ०७:४९