थांबू नकोस आता
अनिरुद्ध१ तूच आहे
आकाशी घे भरारी
अवकाश लक्ष आहे……
हृदयात स्फुरण राहो
मनी शक्तीपुंज तळपो
बाहूत दशगजांचे
सामर्थ्य सतत राहो……..
आसमंत अनन्त आहे
आभा२ तुझ्या मनात
इच्छा प्रगल्भ राहो
यशवंत हो जगात……..
ब्रम्हांड भरून आहे
तेजस्विता३ मनात
संकल्प दृढ राहो
प्राप्नोति४ कीर्तिस्तम्भ५……
विज्ञान-ज्ञान लाभो
स्मरणात संस्कृती ही
हृदयात धर्मदीप
राहो सदा प्रदीप्त६……..
धनवान बुध्दीमंत
ब्रम्हज्ञ७ ध्येय राहो
विश्वातली प्रमेये
त्वम८तत्९ प्रतिकरोति१०……..
मुकुंद भालेराव
दिनांक: ०६-६-२०२३
दुपारी: १५:३७
(०१) अनिरुद्ध = मुक्त, स्वतंत्र (०२) आभा = प्रकाश, दिव्यप्रकाश
(०३) तेजस्विता = शक्तीमान, शूर (०४) प्राप्नोती = प्राप्त होणे, मिळणे
(०५) कीर्तिस्तम्भ = प्रसिद्धीची खुण (०६) प्रदीप्त = तळपत
(०७) ब्रम्हज्ञ = सर्वज्ञ, सर्व ज्ञान असणारा (०८) त्वम = तू
(०९) तत् = ते (१०) प्रतिकरोति = सोडविणे, उपाय शोधणे