Marathi

गोड तू मुलगी माझी

गोड तू मुलगी माझी,
मनात तू असतेच गं,
चिमुकली होती गोडगोड,
अजून तशीच मनात गं…….

आनंद किती दिला आहे,
चिमुकले तुझे हात गळ्यात,
बोबडे होते बोल तुझे,
मधुर तुषार शब्द मनात ……..

तेंव्हा मात्र व्हिडीओ नव्हता,
ऑडीओ करता आला नाही,
आठवणीत जपून ठेवण्याचा,
प्रयत्न मात्र सोडीत नाही…….

जय किंवा अभिराम काय,
अनिरुद्ध किंवा अक्षय काय,
अथवा पल्लवीला सर्व हे,
दाखवू कसे चित्र पहा ……..

विज्ञान शोध लावेल तेंव्हा,
स्मृतीचित्रे बोलू लागतील,
मुक्या जुन्या सिनेमातली,
रंगीत आणि बोलकी होतील……………


‘विमलतनय’
17-6-2023
सकाळ:07:52

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top