Marathi

जादू आईची

आई तुझ्या डोळ्यांमध्ये
मीच पाहीले मला,
पाहता पाहता दिसले
तुझे रुप मला…..

पाहता होतो असे कसे
बदल कसे झाले,
माझे रुप तुझ्यामध्ये
बदलून कसे गेले………

जादू झाली बघता बघता
ते ही बदलून गेले,
चेहर्यावरती प्रेमाचे
भाव तिथे आले…….

क्षण काही गेले असतील
जादू पुन्हा झाली,
चक्रधारी रुप त्याचे
पण नजर तुझी‌ झाली……

‘आई’ असे हाका मारता
‘ओ’ तुझी आली,
कृष्ण तो होता जरूर
पण तूच दिसून आली……


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
८ जुलै २०२३
सकाळी: ०४:१५

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top