नित्तळ सुंदर पाणी होते,
वहात होती नदी अशी,
परी शांत तो प्रवाह होता,
नौका माझी एकच होती……..
हिरवे हिरवे वृक्ष किनारी,
नयन मनोहर फुले उमलली,
सप्तरंग ते इंद्रधनुचे,
मनात माझ्या फुले उमलली……….
नौका ऐशी विहरत जाता,
सुंदर तेथे सदन दिसे,
सुंदर लोभस वनराजीचे,
किती मनोहर स्वप्न असे………..
अवचित सुंदर फुले बरसली,
सुरेल गाणे विहरत आले,
‘साव रे ऐ जय्यो’
मन आनंदे असे उमलले……
ललनेच्या त्या मोहक ताना
मधाळ ऐसा मेघ बरसला,
मलाच विसरून गेलो मी पण,
अनामिकेचा स्वरसाज असा……….
मना स्पर्शले शब्द सुरांनी,
हरवून गेलो रम्य वनी,
कोण असे ती अनामिका जी,
आळवीत आहे अशी विराणी…….
© मुकुंद भालेराव छत्रपती संभाजी नगर ११ जुलै २०२३ दुपारी: १४:१९