गर्जा जयजयकार यशाचा,
गर्जा जयजयकार,
मंगलवाद्ये वाजवीतही
गर्जा जयजयकार………….
समर नसे तरी संघर्षाची,
होती परीक्षा अवघड फार,
करून गेला पार करुनी,
अथांग मोठा सागर पार………
तुफान लाटा उसळत होत्या,
मनात भीती वार्याची,
तशात तरली नौका परी ती,
विश्वासाने भाग्याची………
नभात भाष्कर तळपत होता,
गंध वायूचा दरवळला,
अगस्तीस तो घाबरलेला,
रत्नाकरही विरघळला…………
नाचत नाचत फेर धरुनी,
मस्त्य कन्यका अवतरल्या,
स्वप्न मनोहर पाहुन त्याचे,
आनंदाने गहीवरल्या………
अवकाशातून वरूण कृपेची,
फुले उधळली जलावरी,
रवी किरणांचा अविरत पाउस,
बरसत जयच्या मनावरी……
चंद्र-गुरूचा कृपा-योग तो,
एकादश त्या भाग्याशी,
कमी कशाची नाही तयाला,
आई-बाबा पाठीशी………..
अनंत वचने कवितेची ती,
स्मिता ‘ददातु’ म्हणत असे,
ईश रमाचा सदैव देई,
मुकुंद, हर्षित भाग्य असे…….
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: १६ जुलाई २०२३
दुपार: १२:५७