Marathi

शुभमंगल भावनांची फुले

अन्त:करण तुटत असेल
मन दु:खी होत असेल,
प्रथम ‘जय’ गेला लांब
सारखे भेटावे वाटत असेल…….

कळते मला जस्मिन तुझे
मन कसे अशांत असेल,
अगदी पहिल्यांदा आयुष्यात
जीवातला जीव, दूर असेल…….

प्रसंग कित्येक आठवत असतील
प्रयत्न आठवायचा करत असशील
प्रत्येक क्षणात स्मृती अनेक
मधुरही त्या खूप असतील…..

पण विरह हा सोसावा लागेल
जीव टांगणीला लागेल सुद्धा,
पदोपदी क्षणोक्षणी आठवण
तर अशी येतच राह्णार…….

त्रेचाळीस हजार आठशे मिनिटे
केले कष्ट डोंगरा एवढे,
झाली असेल झोप अनावर
झटकून तरीही तयार असेल………

कष्ट आले फळास आता
दशोदिशा त्या दुमदुमल्या,
पण लक्ष खरे ते दूर असे
निश्चय राहो नित्य असे……..

भरभरून मनांत अपार
यशाची शिखरे अपरंपार,
पादाक्रांत ती करण्याला
धैर्य, कष्ट, अन संकल्प महान……..

शुभमंगल भावनांची फुले
भरभरून तु त्याला दे,
आशिर्वाद अपरंपार तू
अव्याहतपणे त्याला दे……….


© मुकुंद भालेराव
छत्र्पती संभाजी नगर
दिनांक: ०१-०८-२०२३
वेळ: रात्री २३:४१

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top