पाहता डोळ्यात ऐसे,
वेड ऐसे लागले
सखे बोलता सहज सारे
प्रेम कैसे जाहले…….
विसरलो कसे उपदेश सारे
प्रेमात पडता हे जाहले,
मनी शांतता ना, ना झोपही,
उपदेश ना ते ऐकले तु,
मी ही प्रिये ना ऐकले…….
ना ओळख तुझी माझी,
तेंव्हा, हृदयात माझ्या तु असे,
मी आणि तू प्रेमात कैसे गुंतलो,
झाले कसे ना कळले
मलाही तुजला न तैसे ते कळे…..
सहजच सारे संवाद झाले,
स्वप्नील सारे वाटते,
शांतता ही छान आहे,
आहे वनी सौदर्य सारे,
न होऊ नाराज सखये
प्रेम आपले आगळे……..
भय ना मनी माझ्या प्रिये,
चिंता नको प्रेमारवाच्या,
सांगू नको तु ती व्यर्थ
सारी उगा ती ती कारणे…….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ०८-८-२०२३
सकाळी: ११:२३