माझ्या मनात सखये
तव रूप साठलेले,
असले जरी जुने ते
ते छान छान आहे…….
झाली कित्येक वर्षे,
मनी भाव तोच आहे,
शोधीत मी मनाला
मनी तेच आज आहे……..
किती रम्य ते निराळे
तव रूप पाहिलेले,
त्यासी नसे ती तुलना,
नयनात तेच आहे…….
जादू कशी रुपाची
नयनात बंद आहे
सांगू कसे कुणाला
तू अंतरात आहे……….
धरुनी तुझ्या कराला
मी सागरात गेलो,
तैसा गिरी नद्यांशी
जल पावसात गेलो…………
काहीच बंध नव्हते,
आपल्या प्रीती फुलाला,
चुम्बुनी घेतले मी,
नयनातल्या फुलांना……
ती भावना अजूनही,
हृदयात स्थिर आहे,
हातात हात माझ्या,
प्रिये तसाच आहे………
आलो पुढे कितीही,
तो स्नेह अंतरात,
बिलगून तो मनाशी,
ते स्थिर अंतरात……….
आपल्या मनी शरीरी,
हे स्नेहसूक्त आहे,
तू सांग आज मजला,
ते राग मैफिलीचे………..
शब्दात सांगू कैसे,
जे शब्द नाद आहे,
हृदयी भरून त्यांचे,
सारेच गंध आहे…………
तो गंधही निराळा,
हृदयात मुक्त आहे,
मन बावरे निराळे,
गगनात मुक्त आहे……….
ह्या भावना अशा ह्या
रमती मनात माझ्या,
तव रूप ते रमेचे,
मनी भावते सदाचे……….
© मुकुंद भालेराव छत्रपती संभाजी नगर दिनांक: वेळ: