पाहता नभात मी, हरी तिथे गवसला, पाहता मनातही, तिथेही तो असे उभा…….. सागरात जलात मी, केशवास पाहीले, गिरीशिरी वनांतरी, केशवास पाहीले…….. निर्झरी किरणातही, रक्तवर्ण रश्मिही, रुप तुझे विलग नसे, अंतरी हरी हरी…… पर्णपुष्प वृक्ष वल्ली, विविधतेत रुप असे अंतरात अवकाशी, तूच तू सारीकडे…….. शब्दरुप भावरुप, काव्यमर्म तू असे, शब्दब्रम्ह रुप तुझे, वर्णू मी हरी कसे……. […]
Month: October 2023
जस्मिन लाभो सौभाग्य………..
ती दूर तिकडे पलीकडे, सह्याद्रीच्या पार पुढे, घाटावरती लांब लांब ती, निवसते ती शांतपणे…………… माया आणि प्रेम अपार, हृदयामध्ये ओढ अपार, शब्दांमध्ये वर्णू कैसे, प्रेम तिचे ते असे अपार……… जन्म दिवस हा आनंदी, अशीच राहो स्वानंदी, लाभो तिजला भाग्य असे, अन पती-पुत्राचे प्रेम तसे……….. सस्मित राहो अविरत ऐशी, भाग्य तळपु दे निशीदिनी, अमाप लाभो आशिर्वचने, […]
अशी सकाळ कधी झालीच नाही
अशी सकाळ कधी झालीच नाही, रंगांची बरसात झालीच नाही, सोन्याचा अभिषेक हिमशिखरावर, असा कधी झालाच नाही……….. महेशाच्या मस्तकावर, सोने कूणी असे उधळलेच नाही, शुभ्र हिमाच्या शालीला, सोन्यात कुणी विणलेच नाही……….. केदाराच्या मंदिराला सुवर्णाचे, वर्ख कूणी चढविलेच नाही, पवित्र गंधीत वायू कणांना, सोन्याने कूणी भारलेच नाही………… चित्तवृत्ती अशा प्रफुल्लित, आधी कधी झाल्याच नाहीत, धर्तीवर स्वर्ग असा […]
रामकृष्णहरी
तू सोडलेस का रे प्रिय नाम ते हरीचे तू त्यागता हरीशी कैसे मिळेल साचे……… हरीनाम गोड आहे हरतो दैन्य सारे कांही नको तयाला भक्तीच सर्व आहे………. काया शिणून जाता करशील काय तेंव्हा दिसणार रूप नाही अंतरी प्रकाश नसता…….. फिरलास योनी योनी सुटले न दुष्टचक्र मिळता मनुष्य देह कां विसरशी हरीस………. भक्तास शोधतो तो भक्तीस भाळतो […]
चांदण्यांची आरास
चांदण्यांची आरास ऐशी नयनात तुझीया रंगली, तारकांची मुक्त नृत्ये विलसती मुखमंजीरी….. कुसुमेच सारी बरसती माधुर्य अमृताचे असे, बेधुंद बंदिशी त्या तशा मोहवीती मन स्नेहारवे……. शांत राती गगन मार्गी धवल निर्झर वाटतो, रुप त्यांचे शुभ्रांकीत ते रूप तूझीये साहतो………. चंद्रमाही कवतूके तो पाहतो तव नयनासही, दिव्य दिसतो मंद्र तेथे तो ही तूझ्या नयनातही………. लेवुनी तव रम्य […]
अभिषेक
सावळ्या नभातुनी जलधारा बरसती, कड्याकड्यातुनी अशा शुभ्र धारा बरसती…… उंच शिखरी गिरीवरी उभा असे मनुष्य तो, अभिषेक त्यांच्या शिरी करीतसे मेघ तो……. हरीत वृक्ष बहरले प्रपात शुभ्र धावती, पाहता नृत्य तसे मनात मोर नाचती…… शुभ्र नभापलीकडे कृष्ण जलद विखुरले, दुर्ग उंच ठाकला धरती सौख्य पसरले…… वलयांकित दुर्ग कसा हरीत वृक्ष चहुकडे, नभात दाटले कभीन्न कृष्ण […]