तू सोडलेस का रे
प्रिय नाम ते हरीचे
तू त्यागता हरीशी
कैसे मिळेल साचे………
हरीनाम गोड आहे
हरतो दैन्य सारे
कांही नको तयाला
भक्तीच सर्व आहे……….
काया शिणून जाता
करशील काय तेंव्हा
दिसणार रूप नाही
अंतरी प्रकाश नसता……..
फिरलास योनी योनी
सुटले न दुष्टचक्र
मिळता मनुष्य देह
कां विसरशी हरीस……….
भक्तास शोधतो तो
भक्तीस भाळतो तो
कांही नको तयाला
नामास शोधतो तो…………
त्याची अनंत नामे
रूपे अनंत त्याची
परि सत्त्य एक आहे
विश्वात सत्य काजी……..
मुखी नाम त्या हरीचे
जळतीळ पापराशी
भक्तीस भाळलेला
हरी भक्तीचा उपाशी……..
कांही नको तयाला
ते यज्ञ, हवी-समर्पण
स्मरूनी तयास घेता
हरीनाम फक्त, अर्पण……..
हरी तो पवित्र आहे
हरतोच दु:ख सारे
चरणी विनम्र त्याच्या
हरीनाम सर्व आहे………..
हरीरामकृष्ण अवघे
विश्वात साठलेले
त्याचा ध्वनी मनाला
सुखवुन दु:ख जाए……….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २९ सप्टेंबर २०२३
सकाळी: ११:०७