शाळा जुनी होत नाही
बाई जुन्या होत नाहीत
विद्या जुनी होत नाही
ज्ञान टाकाऊ होत नाही……
पदव्यांसाठी शिक्षण नाही
शिक्षणासाठी शाळा नाही
वाचनालयासाठी पुस्तके नाहीत
सरकारला हवे म्हणून मैदान नाही…..
बसण्यासाठी वर्ग नाही
मारण्यासाठी छडी नाही
शांत फक्त बसण्यासाठी
मित्र आणि मैत्रिणी नाही……….
गूण मिळविण्यासाठी केवळ
परीक्षा आणि अभ्यास नाही
नौकरी मिळविण्यासाठी फक्त
शिक्षण आणि पदवी नाही……….
आयुष्य समृद्ध करण्यासाठी
पैसा फक्त पुरेसा नाही
आनंद एकट्याने मिळत नाही
वाटल्याशिवाय वाढत नाही………
वर्गाच्या खोल्या कांहीं
मुकबधीर असतं नाहीत
त्यांच्या नि:शब्दतेतही
संवादांच सामर्थ्य आहे………
एकमेकांच्या साक्षीने
आपण घालू साद त्यांना
सूरु होइल मग छानसा
एक हवाहवासा सुसंवाद……..
आधी बरोबर यायला हवं
एक सारखं बनायला हवं
आपल्या अंत:करणामधुन
मैत्र जीवांचे घडायला हवे………
चला आज ठरवु या
विद्यामाता नमू या
आशिर्वादे गुरुजनांच्या
आपली शाळा टिकवु या………
© मुकुंद भालेराव
पोंडा- गोंये
दिनांक: ३० आक्टोबर २०२३
सायंकाळ: १८:५२