खिडकीतुन दिसते मला
सूस्तावलेले एक शहर
शहर तरी म्हणावे का त्याला
निपचित पडलेले हे नगर……..
एक आटपाट नगर आहे
नांव त्याचे पोंडा बरे
कुणी म्हणती फोंडा त्याला
आळशी दिसते हेच खरे……..
मधुन मधुन येतो आवाज
ऊतरणार्या विमानांचा
तसाच येतो फायटर जेट
वेगाने वरुन जाण्याचा….
कळत नाही लोक ईथले
नक्की काय करत असतात
मौन व्रत स्विकारल्यासारखे
शांतच कां बसलेले असतात…….
बोलत कुणी नसेल कां
किंवा भांडत नसेल कां
खळखळून हसण्यावर
ईथे बंदी असेल कां……….
डोंगर झाडी खूप आहे
मोकळे आकाश विशाल आहे
प्रवासी खूप येत असतील
पण ईथले रहीवासी स्वमग्न आहे……..
झाडांमध्ये हालचाल नाही
हवा मुक्त वहात नाही
सगळेजण घराबाहेर
हिंडत फिरत कां नाही……….
जीवन जगणे असे कसे
त्यात कांही गती नाही
असेल विशाल सागर ईथे
मने का विशाल नाही………
मी बरा माझे बरे
विचार असा असेल कां
कोशामध्ये गुंतुन सारे
रहात सारे असतील कां……..
कोण जाणे काय काय
मनात त्यांच्या चालत असेल
निसर्ग इतका अवतीभवती
पण वृत्ती मंद का असेल……….
© मुकुंद भालेराव
फोंडा – गोंये
दिनांक: ३१-१०-२०२३
वेळ: संध्याकाळी: १८:५१