राहो चिरंतन रश्मी
पसरो जगी प्रकाश
ह्या अद्य जन्मदिनी
भक्ती तूझ्या मनात……..
दैवे दिले धनाला
कर्तृत्व आत्मजाचे
आहे सुवीद्य पत्नी
सहचर्य अंजलीचे……
धनकोशी कार्य केले
तू राहीला विशुद्ध
वळलास अंतर्यामी
झालास ईशमग्न ………
तव अंतरात फुलली
अध्यात्म सुप्त सुमने
पिकले रसामृतांचे
ते भक्ती मळे हरीचे………..
लाभोत कर्म सारे
उमलो सदैव भक्ती
गीता शिकवताना
ऊकलोत मर्म गाठी………
गीतेत माधवाचा
उपदेश जीवनाचा
प्रगटो तुझ्याही जीवनी
आनंद अर्जुनाचा………
© मुकुंद भालेराव
फोंडा – गोंये
दिनांक: २ नोव्हेंबर २०२३
वेळ: सायंकाळ: १८:००