[Courtesy: Artist Gulyas Laszlo born in Budapest, Hungary in 1960]
रोखू नकोस नयना
ऐसी सखोल ह्रुदया,
उठती तरंग लक्ष
न सावरे मनाला………..
बाहुस स्पर्ष ऐसा
उठती तरंग मुग्ध,
मनी चेतती अनंत
तैसेच काव्यपुष्प……….
ह्या बरसत्या क्षणाला
ठेउ कसे धरुनी,
ही प्रेमज्योत नयनीं
उमलो अशीच सजणी……….
जाउ नकोस आता
तू थांब जवळी येथे,
न जावो पूढती काळ
मिलनात सर्व येथे…………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: १०-११-२०२३
वेळ: सकाळी: १०:२९