Marathi My Poems

भगवदगीता, पातंजलयोगसूत्रे आणि मी

मायेच्या बंधनात मी
मोहाच्या प्रेमरूपात मी,
चित्त मना मुक्त कसे
करू कसे न ज्ञात ते………..

योगमार्ग कठीण दिसे
ध्यानमार्ग सुलभ तो,
परि कसे करू मी ध्यान
चित्त शांत न होतसे…………….

बुद्धीला न सावरे
मन: अश्व हा नावरे,
अनंत विषय सर्प जसे
क्षणोक्षणी दंश तसे…………….

चित्त वृत्ती निरोध हवा
जाणतो परि मला,
मार्ग न दिसे असा
चालण्यास तिथे तसा…………..

अचपल मन माझे
धावते दिगंतरी,
क्षीण बुद्धी वाटते
मनास रोखण्या अशी…………

काय करायचे असे
ठाव हे मला असे,
परि कसे घडू तसे
हे न ज्ञात ते नसे………..

व्याकुळ हृदय होतसे
क्षुधा ती तीव्र भासते,
न सापडे सोपान तो
जाऊ मी कुठे कसे………….


© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ४ डिसेम्बर २०२३
वेळ: सकाळी: ११:०८

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top