ऐकता व्याख्यान |
हरवले मन |
गेले दूर निघून |
असे तेंव्हा ||१||
आत्म्याचा विचार |
ब्रम्हाचे स्वरूप |
निरुपण करती |
आचार्य ते ||२||
घडला प्रमाद |
उडाले ते लक्ष |
शोधण्या मतितार्थ |
निरुपणाचा ||३||
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: २६-११-२०२३
वेळ: सकाळ: ०९:००