Marathi My Articles

मोदी ३.० – आकलन, धोरणे व अपेक्षा

ॐ स्वस्ती अस्तु  !

सर्वसामान्यपणे सुशिक्षित लोकांना ही शीर्षक वाचायला छान वाटले असेल, मलाही एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून निश्चितपणे छान वाटले. आज जगात, मा. श्री. नरेंद्रभाई मोदींमुळे  भारताला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. पंतप्रधानांचे व माझे स्वप्न एकच आहे,

हे माझ्या प्रिय मातृभूमि ! मी  तुला सदैव वंदन करतो. तु माझे आनंदाने  लालणपालन  केले आहेस. हे महामंगल पुण्यभूमे तुझ्या कार्याकरीताच माझे शरीर अर्पण करतो. मी तुला नमस्कार कारतो. हे परमेश्वरा ! तु आम्हाला अशी शक्ती दे की, जिच्यामुळे आमच्या राष्ट्राला कुणी आव्हान देऊ शकणार नाही. आम्हाला असे शुद्ध चारित्र्य दे, ज्याच्या समोर संपूर्ण विश्व नतमस्तक होईल. तु आम्हाला  असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वत: होऊन  स्विकारलेला काट्याकुट्यांनी भरलेला हा मार्ग सोपा होईल.

ही मातृभूमि! तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघठीत शक्ति आमच्या धर्माचे रक्षण करेल व आमच्या राष्ट्राला वैभवयाच्या परमोच्च शिखरापर्यन्त घेऊन जाईल !

आमचे स्वप्न एकच आहे कारण, आम्ही दोघेही एकाच विचार धारेतून घडलो आहोत. त्यांच्या व माझ्या वयात देखिल फारसा फरक नाही. ते माझ्यापेक्षा बरोब्बर ३६५ दिवसांनी मोठे आहेत.

सुरुवातीला राजकारण त्यांचे स्वप्न नव्हते व माझेही, माझे आत्ताही नाही. मग साम्य काय आहे? ‘परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् |’ या मातृभूमीला परम वैभवापर्यन्त घेऊन जाणे हे ते ध्येय त्यांच्या आणि माझ्याही मनांत हृदयात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. मी  स्वयंसेवक आहे व याचा मला अभिमान ! मा. मोदीजी तर ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक कधीच ‘होतो’ असे म्हणत नसतो, कारण त्यांचे स्वयंसेवकत्व आजन्म असते ! मा. मोदींचा त्याग व समर्पण खुप मोठे आहे. ते राजकारणात येण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. योगायोगाने ते राजकारणात आले व राष्ट्रपुरुष बनले.

करोना महामारीत व त्यानंतर मा. मोदींनी ज्याप्रकारे देशाला सावरले, संरक्षणात भक्कम केले व सर्वात आश्चर्य म्हणजे आज जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था बनविले ही सर्व अभिमानास्पद आहेच व त्याचा मला तुमच्या सारखाच गर्व आहे.

मी पुणे विद्यापीठात (१९७५-१९७७) शिकत असतांना जेंव्हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत होतो तेंव्हा आंतरराष्ट्रीय धोरणांचा व भारताचा तुलनात्मक अभ्यास करण्याची संधि मिळाली. आज मा. मोदींचे नाव आंतरराष्ट्रीय संबंधात खूप आदराने घेतले जाते. सर्वसामान्य माणसाला कदाचित यांची कल्पना करता येणार नाही, परंतु मी  त्या विषयाचा पदव्युत्तर शिक्षणात अभ्यास केलेल्या असल्यामुळे मला त्याचे महत्व खूप मोलाचे वाटते व मला त्याच भारताचा एक नागरिक व स्वयंसेवक म्हणून खूप अभिमान पण आहे.

स्व. दीनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतील  ‘अंत्योदय’ व्हायलाच पाहिजे यात कुणाचेही दुमत असणार नाही, परंतु मध्यम वर्गाचे काय? २०१४ पासुन २०२४ पर्यन्तच्या दहा वर्षात मा. मोदींनी व त्यांच्या सरकारने मध्यम वर्गांकरीता काय केले आहे? उद्योगपतींची संपत्ति वाढली ही चांगली गोष्ट आहे, गरिबांना स्वयंपाकाचा ग्यास, फुकट अन्नधान्य, घर बांधायला आर्थिक सहाय्य, शेत  मालाला पीकविमा हे सर्व चांगलेच आहे. सरकारी नोकरांना वेतन आयोग, महागाई भत्ता सुरूच आहे. त्याबाबत तक्रार नाही, पण एवढे सर्व करून पदरांत काय पडले?

उत्तर प्रदेशातील रामपूर गावातील एक मतदान केंद्रांवर अंदाजे २३५५ मतदार आहेत व ते सर्व मुसलमान आहेत. तिथे १००% मतदान झाले. त्यातील जवळपास ५३२ लोकांनी ‘पंतप्रधान गृह सहाय्य’ योजेनेतून लाभ देखिल मिळविलेला आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातील एकानेही भाजपला मतदान केले नाही ! करोंना काळात सुरू केलेले फुकट अन्नधान्य अजूनही सुरूच आहे. ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ शेवटचे ‘संबका विश्वास; कांही घडत नाही हे या उदहरणावरुण दिसते. तुम्ही लाख विश्वास करा, पण ते धर्मांध मात्र त्यांच्या धर्माशिवाय काहीही जाणत नाही, ओळखत नाही व मानत पण नाही’ आणि हा इशारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच दिलेला होता. मात्र स्व. पंडित नेहरू व स्व. मोहनचंद करमचंद गांधी यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले, त्यानंतर पुढे आलेल्या सर्वच कॉँग्रेसच्या सरकारांनी तर लोटांगणच घातलेले आढळते. 

मध्यमवर्गीय काबाडकष्ट करतो, प्रामाणिकपणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर भरतो, राष्ट्रावर प्रेम करतो, कायद्यांचे निमूटपणे पालन करतो, पण त्याच्या पदरी काय पडते ! शून्य ! नोकरी करणाऱ्यांच्या पगारातून न चुकता उत्पन्न कर कापल्याच जातो आणि सरकारी साध्या इंजिनियरच्या घरातून दोन दोन कोटी  रुपये व सोने मिळते. त्याला पकडतील, त्याच्यावर केस करतील, शिक्षा होईल; परंतु प्रश असा आहे की, हे मुळात घडतेच कसे? कोण डोळेझाक करते या प्रकारांकडे?

आमदार व खासदार पांच वर्षे राहिले की, त्यांना आयुष्यभर पेन्शन आहेच! मग ते काय खरोखर समाज कार्य करतात काय? कोणते व काय समाजकार्य करतात त्यांच्या पांच वर्षाच्या काळात? त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी त्यांच्याकडे कोटी कोटी रुपयांची मालमत्ता कशी काय तयार होते असा प्रश्न मला पडतो.

एकेकाळी सायकलवर जाणारे श्री. लालूप्रसाद यादव कोट्याधीश कसे बनतात? कुठून येते अशी संपत्ती ? केस अजून सुरूच आहे. शिक्षा होईही कदाचित पण बेकायदेशीर मार्गाने कमाविलेल्या संपत्तीचे काय? त्याचा उपभोग निर्लज्जपणे तर घेतच आहेत. त्यांचा मुलगा प्रचाराकरीता खाजगी विमानातून फिरतो ! कुठून येतात इतके पैसे? शिक्षण तर पदवीपर्यन्तही झालेले नसलेल्या मुलाकडे कुठून  येतात इतके पैसे! 

सामान्य मध्यम वर्गीयांचे काय चुकते? मोदी ३.० सरकारने ‘कल्याणाचा मंत्र’ सांगितला आहे, ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास !’ या ‘सब’ च्या परिभाषेत मध्यम वर्गीय येत नाहीत काय ?

काल संसदेच्या मध्यवर्ति सभागृहात सर्व पक्षांनी मा. मोदीना नेता निवडल्यानंतर केलेल्या भाषणात ‘माध्यमवर्गीयांकडे’ विशेष लक्ष देणार आहेत असा उल्लेख केल्याचे वृत्त दूरदर्शन वाहिन्या दाखवीत होत्या. प्रत्यक्षात ते उतरेल तेंव्हा खरे! आणि नक्की काय करणार आहेत हा प्रश्न आहेच.

मोदी ३.० कार्यकाळात ‘नियत, निती व कृती’ (Intention, Policy and Action) कशी असावी याबाबत एक जबाबदार नागरिक म्हणून व त्यांच्याच विचारसरणीला पूरक व्यक्ति म्हणून  माझी अपेक्षा आहे की, ‘परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् |’ ह्या संकल्पनेतील राष्ट्राला वैभवाच्या परमोच्च शिखरावर घेऊन जाण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करतांना, ऋग्वेदाच्या १० मंडलातील सूक्त १०८: ‘संज्ञानम् सूक्तात’ म्हटल्या प्रमाणे,

सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनासि जानताम् |
देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते ||२||
समानो मंत्र: समिति समानी समानं मन: सह चित्तमेषाम् |
समानं मंत्रभि मंत्रये व: समानेन वो हविषा जुहोमि ||३||
समानी व आकूति: समाना हृदयानि व: |
समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ||४||

यातील मर्मगर्भ अर्थ लक्षात घ्यावा. सनातन हिंदू धर्माच्या अभिमानास्पद वारशाचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार पुनरुच्चार करणाऱ्या मा. पंतप्रधान श्री नरेन्द्रभाई मोदीं व त्यांच्या येऊ घातलेल्या सरकारने जाणीवपूर्वक व गांभीर्याने विचार करून त्याप्रमाणे लवकरात लवकर योग्य व आवश्यक अशी धोरणे बनवावीत व सतत दुर्लक्षित राहिलेल्या मध्यम वर्गीयांना देखिल समाजात मानाचे स्थान व स्थैर्य मिळवून देतील अशी आशा करू या.

॥भारत माता की जय॥

मुकुंद भालेराव
Master of Arts (Sanskrit)
Master of Arts (Sanskrit)
Bachelor of Arts (Marathi Literature)
Master of Arts (History)
Master of Arts (International Relations)
PG Diploma in Production Management
PG Diploma in Labour Management
Bachelor of General Laws
Bachelor of Laws (Labour & Taxation)
Alumnus: Indian Institute of Management, Ahmadabad

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top