‘राजधर्म’ ह्या बाबत सर्वात जास्त मार्गदर्शक तत्वे सापडतात ती महाभारतात व मर्यादापुरुषोत्तम कसा असतो हे समजून घेता येते रामायणात. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम तर श्रीकृष्ण पूर्णपुरष आहे. श्रीरामाचे स्थान अन्योन्य आहे. श्रीमद्भगवदगीतेत विभूतीयोगात (अध्याय १० वा) श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे विहित कार्य समजावून सांगतांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
पवन: पवतास्मि राम: शस्त्रभृतामहम् |
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसास्मि जान्हवी ||१०:३१||
पवित्र करणाऱ्यांमध्ये वायु मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गङ्गा मी आहे.
तसेच अर्जुनाला त्याचे क्षत्रिय म्हणून विहित कार्य समजावून सांगतांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि |
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोsन्य त्क्षत्रियस्य न विद्यते ||२.३१||
क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की, तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही.
त्याचप्रमाणे, महर्षि वाल्मिकी रामायणात श्रीरामाला व लक्ष्मणाला त्यांच्या आश्रमात घेऊन आले, ते करीत असलेल्या यज्ञात जे राक्षस विघ्ने निर्माण करीत असत त्यांचा नि:पात करण्याकरिता. त्या राक्षसांमध्ये प्रमुख होती ताटिका. श्रीरामाच्या मनात असा विचार येऊ शकतो की, ताटिका तर स्त्री आहे, तेंव्हा तिचा वध कसा काय करावा, ते तर पाप घडेल. ही रामाच्या मनाची द्विधा अवस्था विश्वामित्रांच्या लक्षात आली असावी. रामाच्या मनातील ‘पाप-पुण्याच्या’ कल्पनांचे द्वंद्व सुरू आहे असावे असे विश्वामित्रांना वाटले असावे व म्हणून त्यांनी श्रीरामाला त्याच्या विहित कर्माची जाणीव करून दिली.
एनां राघव दुर्वृत्तां यक्षीं परमदारुणाम् |
गोब्राम्हणहितार्थाय जहि दुष्टपराक्रमाम् ||१५||
हे रामा ! गाई आणि ब्राम्हणांच्या रक्षणाकरीता तू त्या अतिदुष्ट आणि भयंकर राक्षसणींचा वध कर.
नहि ते स्त्रीवधकृते घृणा कार्यां नरोत्तम |
चातुर्वर्ण्यहितार्थाय हि कर्तव्यं राजसूनुना ||१७||
नृशंसमनृशंसं वा प्रजारक्षण कारणात् |
पातकं वा सदोषं वा कर्तव्यं रक्षता सदा ||१८||
एका स्त्रीचा वध करावा लागेल याचे तू मुळीच वाईट वाटून घेऊ नकोस. चातुरवर्ण्य आश्रमाप्रमाणे , क्षत्रियाने, कितीही क्रूर वाटत असले तरीही धर्म रक्षणार्थ जी आवश्यक आहे ते कृती करायलाच पाहिजे, ते त्याचे विहित कार्यच आहे. ज्यांचे विहित कर्म समाजातील लोकांचे संरक्षण करणे आहे, त्याने ते कितीही पाप व चुकीचे वाटत असले तरीही ते कृत्य करायलाच पाहिजे.
राज्यभारनियुक्तानामेव धर्म: सनातन: |
अधर्म्यां जहि काकुत्स्थं धर्मो ह्यस्यां न विद्यते ||१९|| सर्ग – २५: बालकाण्ड ||
ती राक्षसीण मुळीच योग्य वागत नाही व धर्माच्या पालनात अडथळे निर्माण करते, त्यामुळे त्या दुष्ट राक्षसणीचा वध करायलाच पाहिजे. प्रशासनाची व राज्यकारभाराची ज्यांची जबाबदारी आहे त्यांना असे कृत्य करावेच लागते.
याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ काय याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. ‘पाप’ व ‘पुण्य’ ह्या संकल्पना सर्व कालीन शंभर टक्के एक सारख्याच असू शकत नाहीत, राहू शकत नाहीत. त्या कालानुरूप कालसुसंगत असायला हव्यात. त्रेतायुगापासून प्रत्येक युगात कल्पना बदलत गेलेल्या आहेत. कुठलीही कल्पना कालसापेक्ष असते. सर्वच संकल्पना बदलतातच असे नाही, पण त्यात कालानुरूप थोडाफार बदल होतोच होतो. असे म्हणतात काही भागात पूर्वी मुसलमान आक्रमणकर्ते जेंव्हा लढण्याची वेळ येईल तेंव्हा त्यांच्या सैन्यासमोर गाई उभ्या करीत असत, कारण त्यांना माहीत होते की, हिंदू धर्मात गाय फारच पवित्र मानण्यात येते व त्यामुळे हिंदू सैन्य गायीना वाचविण्याकरिता आपल्यावर शस्त्रे चालवणार नाहीत.
वास्तविक ‘धर्म’ श्रेष्ठ आहे हे जरी खरे असले तरीही ज्यांनी धर्माचे रक्षण व पालन करायचे आहे तेच जर जीवंत राहिले नाही, तर धर्माचे पालन करण्याचा प्रश्नच शिल्लक राहणार नाही, म्हणून आधी धर्माचे रक्षण करणे व तो जीवंत ठेवणे सर्वात महत्वाचे आहे व त्याकरिता धर्म राक्षण कर्णाऱ्यांना जीवंत राहणे गरजेचे आहे.
अर्जुनाचा नातू राजा परीक्षित हा सर्प दंशाने मृत्यू पावला. पुढे त्याचा मुलगा जनमेजय मोठा झाल्यावर राजा झाला व त्याला कळले की, आपला पिता सर्पदंशाने मृत्यू पावला आहे, म्हणून ‘सर्पयज्ञ’ करून जगातील सर्व सर्प नष्ट करण्याचे त्याने ठरविले. त्याप्रमाणे यज्ञ सुरू केल्यावर सर्व सर्पांची आहुति पुरोहिताच्या सहाय्याने जनमेजयाने सुरू केली. सर्व सर्प यज्ञकुंडात येऊन पडू लागले, परंतु सर्पांचा राजा ‘तक्षक’ हा मात्र येईना, कारण त्याने इन्द्राकडे आश्रय घेतला होता. तक्षकाला कळून चुकले होते की, इंद्राशिवाय त्याला दुसरे कोणीही वाचवू शकणार नाही. इंद्राकडे अभय मिळावे म्हणून आपला जीव वाचविण्याकरींता तक्षक गेला होता. तक्षकाला असे वाटले की, इन्द्र तर देवांचा राजा आहे, एकदा का त्याच्या आश्रयाला आपण गेलो की, मग आपल्याला काहीच भीती नाही.
जेंव्हा तक्षकाच्या आहुतीचा मंत्र (स्वाहाकर) उच्चारला गेला तेंव्हा तक्षक काही येईना. तेंव्हा जनमेजयाने पुरोहिताला विचारले की, असे का होत आहे. पुरोहिताने सांगितले की, तक्षक हा इंद्राच्या आश्रयाला गेलेला आहे, त्यामुळे तो यज्ञकुंडात पडत नाही. तेंव्हा जनमेजयाने पुरोहीताला सांगितले की, मग इंद्रासगट तक्षकाच्या आहुतीचा स्वहाकार करा. त्याप्रमाणे, पुरोहितानी तसा स्वहाकार केला, “इंद्राय तक्षकाय स्वाहा |” असा स्वाहाकर करताच हाहाकार झाला. त्याचवेळी, आस्तिक नावाचे रूषी तिथ आले. गर्भातच त्यांना धर्माचे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव ‘आस्तिक’ ठेवले होते. ह्याच आस्तिक ऋषींनी तक्षकाला राज्य जनमेजयाच्या सर्पयज्ञातुन वाचविले होते. आस्तिकांची आई जरत्कारुला काले की, राजा जनमेजय सर्व सर्पांना नष्ट करण्याचा यज्ञ करत आहे. तक्षक हा आस्तिकांचा मामा होता. त्यांचा आईने त्यांना यज्ञाच्य ठिकाणी जाऊन मामाचे प्राण वाचविण्याला सांगितले. त्याप्रमाणे, आस्तिक तेथे गेले व त्यांनी त्यांच्या संगीत गायनाने जनमेजयाला मंत्रमुग्ध केले. पुरोहिताने स्वाहाकाराची आहुति दिल्यामुळे इंद्राने तक्षकाला सोडून दिले व तक्षक यज्ञ मंडपात येऊ उभा राहीला. त्यावेळी राजा जनमेजयाने ऋषी आस्तिकांना विचारले की, आचार्य मी तुमच्यावर खुपखुश झालो आहे, तुमही मला काय हवे ते मागा. त्यांनी राजाला तक्षकाचे जीवदान मागितले. राजा जनमेजय वचनात अडकलेला असल्यामुळे त्याने तक्षकाला आहुति मंत्रातून मुक्त केले. त्यामुळे, तक्षकाने प्रसन्न होऊन आस्तिकाला वचन दिले की, जो ही तुमचे हे व्याख्यान ऐकेल त्याल आम्ही कधीच दंश करणार नाही. ज्या दिवशी तो सर्प यज्ञ बंद झाला त्या दिवशी पंचमीच होती , म्हणून तो दिवस ‘नागपंचमी’ म्हणून साजरा केला जातो.
श्रीमदभगवदगीतेत श्रीकृष्णाने चातुर्वण्याबाबत सांगितले व त्यांची कर्तव्येही सांगितली, परंतु त्यात कुठेही आपल्या वर्णाचे कर्म करू नये असे सांगितलेले नाही.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: |
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ||४.१३||
भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुसरून अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग केलेले आहेत आणि तू हे समजून घतले पाहिजे की, जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. मनुष्याने आपल्याला प्रपात झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे, परक्याचे कर्म स्विकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगम्यात आलेले कर्म हे काहडईहक पापाने प्रभावित होत नाही.
ज्याप्रमाणे धूराने अग्नि आवृत्त झालेला असतो त्याप्रमाणे सर्व पर्यटन कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात, काळवंडलेली असतात, म्हणून हे अर्जुना १ मनुष्याने आपल्या स्वभावानुसार उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरीही त्या कर्मांचा त्याग करू नये.
प्रत्येकाने आपले विहित कर्म केले पाहिजे यात काहीहक शंका नाही, पण हे चातुरवर्ण्य, समाज सुरळीत चालावा म्हणून केलेली आहेत, परंतु समाजाचा जो भक्कम आधार आहे तोच जर दोलायमान होत असेल तर चातुरवर्ण्यात वर्गीकृत केलेल्या लोकांना धरम्च्या रक्षणाकरिता दुसऱ्या वर्णाशी जोडलेले कर्म देखिल करावे लागेल, कारण मनुस्मृति म्हणते,
यंत्र धर्मो ह्यधर्मेण सत्य यत्रानृतेन च |
हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासद: ||८.१४||
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षित: |
तस्माद्धर्मो न हन्तोव्यो मा नो धर्मो हतोsवधीत् ||८.१५||
मनुस्मृती व महाभारत शांतीपर्व ||
ज्या सभेमध्ये, राज्यामध्ये अधर्माच्य योगाने धर्म व असत्याच्या योगाने सत्य यांचा सर्वांच्या डोळ्यादेखत नाश केला जतो तेथे ते सर्वजण पापाच्य योगाने नष्ट झाले आहेत असे समजावे, कारण धर्माचे उल्लंघन केले असतां तो धर्मच पुरुषांचा इष्टानिष्टांसह नाश करतो व तयांचे रक्षण केले असतां तोच त्यांचे इष्टानिष्टांसह इष्टानिष्टांसह रक्षण करतो. यास्तव, धर्माचे उल्लंघन करू नये.
महाभारत युद्धात कौरवयांच्या बाजूने लढणाऱ्या सैन्यात अंके रथीमहारथी, राजेमहाराजे, शूरवीर, महापराक्रमी तर होतेच , पण त्याशिवाय आचार्य द्रोणाचार्य, कृपाचार्य हे देखिल होते. ते तर आचार्य होते. त्यांचे कार्य तर शिकविण्याचे होते, मग ते युद्धात कसे काय सहभागी झाले होते ! ते तर पांडवांचे गुरु होते, पण जेंव्हा युद्ध अटळ झाले तेंव्हा ते शस्त्र धरण करून युद्धभूमीवर उभे राहिले, बहुधा त्याचे कारण ‘धर्म’ हेच असावे.
धर्मेण हन्यते व्याधि: धर्मेण हन्यते ग्रहा: |
धर्मेण हन्यते शत्रु: यतो धर्म ततो जय: ||महाभारत शांतीपर्व ||
ते महान आचार्य होते. त्यांना जसा ‘धर्म’ समजला, उमजला व वाटला त्याप्रमाणे, त्यांनी युद्धात भग घेण्याचे ठरविले असावे.
धर्मस्य तत्वं निहितं गुह्ययाम
महाजनो येण गत: स: पन्था : ||
महापुरुषांचे अनुकरण व अनुसहिलं आणि संस्मरण अपूर्व सामर्थ्य आइणि इहलौकिक व पारलौकिक अनुकूलतेची निर्मिती करते आणि म्हणून महापूरुषांचे अनुकरण करावे असे महाभारतातच सांगितलेले आहे. या पार्श्वभूमीवर जेंव्हा आजची परिस्थिति अधर्म व अधर्मी लोकांनी नुसता धुडगूस व उच्छाद मांडुन भयावह केले आहे, तेंव्हा आपल्या सर्वांना क्षत्रिया सारखेच कार्य करावे लागेल, तरच धर्माचे रक्षण होईल व धर्माचे रक्षण झाले तरच आपले रक्षण होईल हे निश्चित आहे.
सारांश असा की, एका दुष्टाला, पाप्याला नष्ट करण्याकरिता दुसरे एक पाप करावे लागले, दुष्टता करावी लागली तरीही चालेल, पण धर्मरक्षण केलेच पाहिजे. आज सनातन हिंदू धर्म बुडवायला निघालेल्या अधर्मीं सर्पांना ठेचायलाच पाहिजे, त्यात आपल्याला काहीच पाप लागणार नाही. तेंव्हा मनातून भ्रामक पापपुण्यांच्या कल्पना काढून टाका, झटकून फेकून द्या व आवश्यक व योग्य कार्य करा. क्षणाचाही विलंब करू नका.
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत || कठोपनिषद: १.३.१४|| उठा, जागे व्हा ! २० नोव्हेंबरला आपल्या सर्वांना आपल्या धर्माच्य रक्षणाकरीता लोकशाहीचा मंगलोत्सव साजरा करावयाचा आहे.