आज् काय जाहले, चित्त् तुझे हरवले,
मालवला रवि तरी, काय तुला जाहले,
ही अशी कातर् वेळी, आर्त् अशी का सखे,
मन् शॊधते का तुला, सांगु तुला मि सखे…..
निशा अशी भिजवुनी, गंध् तुझा दरवळे,
डोळ्यातुनी भाव तुझे, म्ंद हास्य दरवळे,
रात्र सारी जागली, त्रुप्त तुझे स्मित सखे,
एकदा पुन्हा मला, बाहुपाशी घे सखे……….
अधर अधर मधुर मधुर,
कुंतलात लपवुनी, का नयन हे असे,
म्ंद म्ंद लहर लहर, वायुस्ंगे प्रीत फुले,
स्तब्ध शांत शब्द शब्द, उमलुनी भाव फुले………
वायुस्ंगे प्रीत फुले, स्तब्ध शांत शब्द
शब्द, उमलुनी भाव फुले
जाउ तू नकॊ सखे, सोडुनी अता मला,
एक एक भावशब्द उमलतो तुझ्या करी…
मस्त कविता काका!!!