Marathi

आत्माराम

आत्माराम

मनाच्या कणाला भिती ग्रासताहे, भितीच्या भयाला
वेदना न साहे |
कुणाची कशी साथ मिळणार आहे, सभोती सदाही
हर्षात आहे ||१||

वृथा या मनाला फसवून काही, कधी न मिळाले,
मिळणार काही |
मनी शुद्ध आत्मारामार्थ आहे, सदा शुद्ध संकल्प
आत्मार्थ आहे ||२||

व्यथा या मनीच्या वृथा साह्ताहे, त्यजुनी असत्त्यास
खरा मार्ग पाहे |
चरणामृताचे मनी स्वप्न पाहे, हरीच्या मनीचे असे
भाव वाहे ||३||

निमाला मनीचा अंगार सारा, हुंकार दु:खी आता
कशाला|
त्यागून सारे फसवे मनीचे, सतसंग का ना उभवी
सदाचे ||४||

फिरवूनी सार्या प्रभामंडलात, मनानेच मजला दाविले
अनंत |
नमुनि आता मी तम भन्जनाशी, मनी बांधिली गाठ
सर्वोत्तमाची ||५||

अता कल्पना ना मनी प्रश्न नोहे, प्रमेयेच आता न
शोधून पाहे |
मनी प्रश्न आता उरलेच नाही, कशाला आता तू
बांधून राही ||६||

उन्मुक्त उत्फूल्ल तेजोनभीचे, प्रकाशी असे रूप
नारायणाचे |
व्यापुनी सारे ब्रम्हांड आता, माझा न मी तो
सर्वोत्तमाचा ||७||

संकल्प सारे संपूर्ण झाले, मनी अष्टभाव उमलुनी
आले |
हरी तो निराळा नसे भाव आता, असे दास मी तो
सर्वोत्तमाचा ||८||

तमा ना तमाची, मनाला न चिंता, सुखाची न इच्छा,
असे ना समस्या|
मनी तृप्त सारे अता रीक्त आहे, मना मोहूनी पुढे
श्याम आहे ||९||

त्याचा सखा मी बंधूच माझा, जगाचा निराळा कशाला
पसारा |
उन्मेष आता हरीचे मनी हे, सभाह्य असे रूप
नारायणाचे ||१०||

मुकुंद भालेराव
औरंगाबाद / महाराष्ट्र / भारत

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top