Marathi My Articles

शब्दांच्या पलीकडे

“हेल्लो….आपण कोण बोलताय?” पलीकडून रागावलेला प्रश्न ऐकून मी काय उत्तर द्यावे ह्या विचारात होतो.
इतक्यात पुन्हा तोच प्रश्न अधिक जोरात, “अहो उत्तर का देत नाही तुम्ही?”
“मला बोलू तर द्या.” मी कसेबसे बोललो.
“फोन करणार्याने आपले नाव सांगायचे असते मला वाटते.” मी सरळ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारला.
“नावात काय आहे?” त्यांचा अजून रागावलेला प्रश्न फास्टबॉल सारखा माझ्या अंगावर आला.
“……..बर….मी अविनाश गोखले बोलतो………आता तरी आपले नाव सांगाल काय?” मी.
“हे बघा…मला तुमचा आधीच खूप राग आलेला आहे.”
मी पटकन कॉल डीसकनेक्ट केला. tru कालर वर नाव आले…डॉ. राधिका जॉर्ज…लंडन….
“ही काय पद्धत झाली…कुणी बोलत असताना कट करण्याची…” आता रागाचा पार अजून वर चढला होता.
“डॉ. राधिका जॉर्ज म्याडम…….तसे नाही….”
“ओह तर तुम्हाला माझे नावही कळले तर………पण मी म्हणते तुम्हाला त्या चित्राला असे दु:ख देण्याचा अधिकार कुणी दिला?”
“कोण चित्रा?” मी सरळ प्रश्न विचारला.
“अच्छा म्हणजे सगळे करून सवरून तो मी नव्हेच!!!!!”
मला काहीच अर्थबोध होत नव्हता. “अहो, तुम्ही काय बोलताय तुमचे तुम्हाला तरी कळतय का?”
“सांगते ना…आधी हे सांगा कि तुम्ही फर्ग्युसनला होता ना १९६८ साली?”
“का? त्याचा इथे काय संबंध?” मला खरच काहीच कळत नव्हते.
“नुक्कड लंडनवर मी आत्ताच तुमची ती ‘एका लेखकाचा कबुलीजबाब’ कथा वाचली. तुम्हाला काय वाटल मी तुम्हाला कधीच शोधू शकणार नाही?” नुसती धगधगती आग…तिचा बोलण्याचा आवेग इतका होता कि तिचे शब्दही बाहेर पडत नव्हते.
“मीच सांगते मी कोण आहे…..ऐक….मीच ती चित्रा देशपांडे…..”
“अहो कोण चित्रा…..मी नाही ओळखत कुणा चित्रा देशपांडेला…..”
“मग त्या कथेत कुठून आली ती चित्रा? हवेतून अवतरली का आकाशातून? सांग न आता तू…..”
अरे बापरे ! हे काय होतय माझ्या लक्षात येत नव्हते.
“सांग तू होतास कि नाही फर्ग्युसनला त्या वर्षी…..माझा भाऊ तरी आठवतो का नाही….कुमार देशपांडे?” तिच्या बोलण्याच्या वेगामुळे तिचे शब्दही नीट बाहेर पडत नव्हते.
“अहो….तुमचे बिपी खूप वाढलेले दिसतेय…शांत व्हा जरा…” मी सांगण्याचा प्रयत्न केला.
“शांत व्हा म्हणे……तू अस ‘का केले माझ्या बरोबर…किती प्रेम करत होते मी तुझ्यावर…एकदा तरी भेटून जायचे होतेस मला तू….” तिला हुंदके आवरत नव्हते.
“अहो, तुम्ही मला दुसरे कुणी तरी समजत आहात….मी खरच कुणा चित्रा देशपांडेला ओळखत नाही…..आणि तुम्ही तर डॉ. राधिका जार्ज आहात……..” मी समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
“अरे…आता तरी असे नको करू ना प्लीज….अवि…” ती फारच केविलवाण्या स्वरात बोलत होती. तिचे हुंदके मला उगाच अपराधीपणाची भावना निर्माण करत होते. मी विचार करत होतो कि त्यांना कसे सांगावे कि खरच मी कुणाही चित्रा देशपांडेला ओळखत नाही.
“अरे….खरच सांग ना रे……..”
“अहो….मी एसपी ला होतो त्या वर्षी…फर्ग्युसनला नाही…..आणि माझा कुणीच मित्र नाही चारुदत्त देशपांडे नावाचा…..” मी त्यांना खरेच सांगण्याचा प्रयत्न पुन्हा केला.
“मग तुमच्या ‘एका लेखकाचा कबुलीजबाब’ कथेतील चित्राचे वर्णन व प्रसंग खोटे आहेत का?” आता तिचा स्वर जरासा कापरा, चिडका, उद्विग्न बनला होता…..अस कस होईल?….इतके सगळे काल्पनिक कसे असू शकते…….” त्या स्वतःशीच बोलत असाव्यात बहुधा…स्वगतासारख्या…..
“किती वेळ खोटे बोलणार अजून….मी उद्याच येतेय तिकडे भेटायला……..” करारी स्वरात त्या सांगत होत्या….
“अहो……तुम्ही लंडनला आहात ना?” मी विचारतो तोच…..
“मग काय झाले….I have no problem. I must see you…..now….I mean immediately…….anyway…let me first book my flight to Bombay….” अगदी निश्चयी होता आवाज….
“I really tell you Dr. Radhika George Madam, I am not that who you are referring and who was your friend……..please try to understand….अहो ती कथा ही खरच एक काल्पनिक कथा आहे…” मी त्यांना मनापासून सांगण्याचा प्रयत्न केला.
“Hello…..Avinash…..I am Kumar Deshapnde calling from…Sanfransisco…..how are you? Where were you from ages? Why you did not contact me? And at least Chitra? Why you have done so?”
आता तर मला काय बोलावे हेच कळे ना.
“चित्राचा मला आत्ताच फोन आला की तू सापडला म्हणून.”
“Hey…listen please…..you are mistaking me for somebody else……I am not that whom you are referring to….”
“Do not tell me that….I heard even your voice in audio clip of your telephonic conversation with Chitra just now….I cannot do mistake in identifying your voice…..”
“अहो पण खरच मी तो नाही जो तुम्ही समजता..” मी सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो, पण त्या दोघानाही ते पटत नव्हते.
“Avinash….do not try to fool me and Chitra…..you are my friend only….do not run away now at least….meet Chitra….she will be reaching by tomorrow morning….I am also calling Mr. Vikramji for helping Chitra to meet you……please…..please….please…..”
मी विक्रमजीना फोन लावला….
“विक्रमजी……एक विचित्र problem झाला आहे…….माझी कथा वाचून..खूप मोठा प्रोब्लेम झालाय….”
“Oh My God……!!! What happened?….तुम्ही दुसर्याची कथा तुमच्या नावावर छापली का?” विक्रमजीनचा विचित्र प्रश्न….
“नाही…नाही…..नाही…..तस नाही…..ती माझीच कथा आहे शंभर टक्के..”
“मग??? काय झाले?” विक्रमजीचा प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच समजत नव्हते…..मी थोडा विचार करत होतो…….पाच दहा मिनिटे गेली असतील…….फोनच्या आवाजाने मी भानावर आलो.
“हो…मी आहे इथे….”
“मलाही आत्ताच लंडनवरून फोन आला….कुणी डॉ. राधिका जॉर्ज उर्फ चित्रा देशपांडे बोलत होत्या….त्यांचे असे म्हणणे आहे कि तुमच्या ‘एका लेखकाचा कबुलीजबाब’ कथेतील चित्रा त्या आहेत आणी तुम्ही त्यांना……..व मी त्यांची तुमच्या बरोबर भेट घडवून आणावी….” विक्रमजी एका दमात बोलले सारे, जणू काही मी नाही तर ऐकणारच नाही…..
“विक्रमजी…..खरच मी त्या डॉ.राधिका जॉर्ज उर्फ चित्रा देशपांडेना ओळखत नाही हो…ती कथा खरच पूर्णपणे काल्पनिक आहे…..” मी आता खरोखरच घाबरलो होतो. ही काय नवीन समस्या झालीय.
“…खरच विचित्र योगायोग आहे…….मी इतक्या कथा आज पर्यन्त प्रसिद्ध केल्यात पण इतका योगायोग कधीच पाहीला नाही” विक्रमजी मला सांगण्याचा प्रयत्न करत होते.

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top