सारांश
तिथे लांब आहे नभाचा किनारा, किनार्यात विहरे फुलांचा
पसारा
मनी आस आहे सदा मुक्त राधा, धारा बनावी मनाचा
किनारा
कविताच माझी सदा सर्व रंग, स्वरांच्या सुरांच्या कुसुमात
दंग
मनी भाव आहे असे शाम राधा, कधी मुक्त माझ्या मनाचा
किनारा
नसे दु:ख कसले नसे तो विषाद, मनी व्यापले सर्व भरूनी
अनंत
कशाला व्रुथा मी आसक्त आता, सखा भेटला हा मुकुंद
राधा
ईथे मी तिथे मी, मी सर्वव्यापी, करी उज्वला ती सर्वाथ
व्यापी
हरीराम आहे, मनी शाम आहे, कविताच सारे मनी गंध आहे
हरीच्या पदाने मनी रंग सारे, तिचा मी हरी रे तू साक्षी
आहे
उन्मुक्त सारे मनी स्तब्धताहे, तूझा मीच सारा सारांश
आहे..
मुकुंद भालेराव
औरंगाबाद विमानतळ / २७-०१-२०१८ / सकाळी 0८:00 वाजता