Marathi

स्वप्ंनावली

स्वप्ंनावली……

ऐशा हसर्या नयन फुलांनी, ओंजळीत मम मुक्त हसावे,
स्वरगंधाच्या माधुर्याने, कोमल कुंतल कुसुम हसावे…..

फक्त जरासा चेहरा माझ्या, ओंजळीत तो लाजून यावा,
थरथरणार्या ओंठानाही, माधुर्याचा स्पर्श असावा………

हसर्या तुझीया हिरकणीने, हरवुन घ्यावे मुक्त मना,
फक्त पहावे नयनातुनी तव, गोड मनाच्या मुक्त खुणा….

समीप असावे हसरे डोळे, ओठांवरती स्मित असावे,
शब्द कशाला हवेत आता, ओठांवरती ओठ असावे…….

मुकुंद भालेराव
नाशिक / २६-०४-२०१८ / सकाळी ८-९ वाजता

Share this on:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top